आमच्यासारखे आम्हीच (भाग 91)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
......................................................................

अंजली तिच्या वडिलांसोबत तिच्या घरी निघून गेली... अंजलीच्या बाबतीत देखील आता सगळं काही चांगलं झाल्यामुळे सर्वांनी सुस्कारा सोडला....

सगळेच जण आपापल्या ठिकाणी अभ्यासाला लागले....

पी एल चे दिवस संपले... सगळेच विद्यार्थी आता हॉस्टेल वर परतले होते....

आधी थेअरी आणि मग प्रॅक्टिकल अश्या  परीक्षा झाल्या... सगळ्यांचे पेपर चांगले गेले...

परीक्षा संपल्यावर वार्षिक स्नेहसंमेलनाचे वारे सगळीकडे वाहू लागले होते... आता नेहाला तिचं काम पूर्ण करायचं होतं या साठी नेहाने दुबे सरांची मदत घेतली...

नेहा : सर!! मला तुमच्याशी फार महत्वाचे बोलायचे आहे..

दुबे सर : काय??

नेहा : मला माझ्या गर्ल्स representative या पदाचा राजीनामा द्यायचा आहे...

दुबे सर : अगं नेहा!! तू ईतकी ऍक्टिव्ह, समजूतदार सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आणि आता मध्येच हे नवीन काय??

सर पण असं म्हणत नेहाने अंजलीच्या वागण्याविषयी दुबे सरांना सांगितलं...

दुबे सर : नेहा!! तुला खरंच असं वाटतं की तू राजीनामा दिल्यावर सगळं काही बदलेल??

नेहा : सर बदलणार की नाही माहिती नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे... आणि असंही गीतिकाच्या मम्मीने जेव्हा अंजलीचं कॉन्सेलिंग केलं तेव्हा आपली निवडणूकच या गोष्टी साठी कारणीभूत आहे हे लक्षात आलं....आणि सर कामाचं म्हणाल तर मी काय पद नसताना काम करू शकणार नाही का??

दुबे सर : ठीक आहे... चल आपण प्रिन्सिपॉल सरांकडे जाऊ... तिथेच त्यांच्या समक्ष तू राजीनामा दे....

नेहा आणि दुबे सर प्रिन्सिपॉल केबिन मध्ये गेले...

दुबे सरांनी नेहा काय म्हणते आहे ते प्रिन्सिपॉल सरांना सांगितले...

प्रिन्सिपॉल : अंजलीला गर्ल्स representative करने अवघड नाही पण ती रेव्ह पार्टी मुळे ब्लॅक लिस्ट मध्ये गेली आहे... आणि आपल्याकडे नियम आहे की ब्लॅक लिस्ट मध्ये गेलेल्या व्यक्तीला आपल्याला कुठलेही पद देता येत नाही...

नेहा : पण सर जर हा नियम मोडल्याने कुणाचं भलं होणार असेल तर काय हरकत आहे...मी राजीनामा देऊन माझ्या जागेवर घ्या असंच मी म्हणत आहे... माझ्या जागी दुसरं कुणी representative असतं तर मी विनंती करायला देखील आले नसते....

प्रिन्सिपॉल : दुबे सर!!यावर तुमचे काय म्हणणे आहे...

दुबे सर : सर... नेहा म्हणते तसा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही...तरी आपण यांच्या प्रेसिडेंट शी एकदा बोलून घेऊ...

 लागलीच प्रेसिडेंट अमितला देखील बोलावण्यात आले...

प्रेसिडेंट अमितने काही आडेविढे न घेता होकार दिला....पण नेहा देखील तितकीच ऍक्टिव्ह राहील अशी अट देखील घातली...

 सर्वांच्या संमतीने नेहाचा राजीनामा घेण्यात आला....

गर्ल्स representative चे पद एका दिवसासाठी रिक्त ठेऊन दुसऱ्या दिवशी.... स्नेहसंमेलणासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर अशी बातमी सगळीकडे viral करण्यात आली त्यात गर्ल्स representative चे नाव अंजली लिहिलेले होते... आता हॉस्टेल वर जो भेटेल तो अंजलीचे अभिनंदन करत होता...

सुरुवातीला अंजलीला समजलेच नाही की अचानक तीचे सगळे जण अभिनंदन का करत आहेत ते...ती भांबवून गेली... तितक्यात ही चौकडी तिला भेटायला आली 

नेहा : अभिनंदन अंजली!! बघ तुझी निवड कॉलेज कमिटीने गर्ल्स representatve म्हणून केली आहे...

अंजली :काय 😳... कसं काय? आणि तू...

नेहा : अगं मी आतापर्यंत होते ना... फर्स्ट सेमिस्टर पुरती..आता पुढचे सेमिस्टर तू असणार आहेस... असं आपल्या कॉलेज कमिटीनेच ठरवलं आहे ...

अंजली : नेहा!!तू काहीही बोलू नकोस... असं कसं होईल.. आतापर्यंत दरवर्षी वर्षभर एकच गर्ल्स representative झाली आहे... मग या वर्षी असं काय झालं की नियम बदलला...

नेहा : झालं ना... तुझ्यावर अन्याय.. अजून काय...

अंजली : माझ्यावर अन्याय 🤔..हम्म ते खरं आहे म्हणा..

नेहा : अगं आता ईतका विचार करू नकोस... एंजॉय कर एंजॉय....

अंजली : ये ए ए... थँक यू...

सगळेच जण आनंद साजरा करायला लागले.

थोडया वेळातच अंजलीला एक वेगळा आत्मविश्वास वाटायला लागलं सकारात्मक वाटायला लागलं...

अभिनंदनाचा वर्षाव सुरु असतानाच अंजलीचा फोन खणखणला..

अंजली :😳 विक्याचा फोन 📳 निर्लज्ज कुठला... माझ्यासोबत ईतकं काही घडलं तरी या विक्याला लाज कशी काय वाटत नाही... बघू तर याच्या निर्लज्ज पणाची हद्द कुठपर्यंत आहे ते असा विचार करून अंजलीने फोन उचलला...

विकी : hi अंजु!!

अंजली : अंजु कोण अंजु!!आणि आता कशाला तू मला फोन केला आहेस... हम्म तू तोच विकी आहेस ना ज्याने माझा फोन नंबर ब्लॉक केला होता... तू तोच विकी आहेस ना ज्याने मला त्याच्या घराचा पत्ता देखील खोटा सांगितला होता..

विकी : अगं अंजु!!थांब थांब.. उगाचच नको नको ते आरोप करत आहेस... अगं अचानक माझा फोन खराब झाला होता आणि मी तुला माझ्या जुन्या घराचा पत्ता सांगितला होता...

अंजली : ए विक्या. माझ्या कानात काही बिड्या नाहीत... मला तू ईतकं मूर्ख समजू नकोस...तू मला धोका दिला तेव्हाच मी तुझ्याशी ब्रेक अप करत आहे... समजलं ना... हा आजचा शेवटचा फोन... ईथुन पुढे जर तू मला फोन केलास तर याद रख... मी प्रिन्सिपॉल सरांकडेच तुझी तक्रार करेन...

बापरे आता अंजली चांगलीच पेटलेली दिसत आहे असा विचार करून विकी ने सॉरी सॉरी ठेवतो फोन म्हणून फोन ठेवून दिला....

अंजलीने देखील फोन ठेवला...फोन ठेवल्या ठेवल्या अंजलीला एक समाधान वाटत होते... जणू काही विकीने दिलेल्या धोक्याचा अंजलीने बदलाच घेतला होता....

अंजलीचे वडील अंजलीची विचारपूस तिच्या नकळत नेहाशी करत... आणि निश्चिन्त होत होते...

आता निकालाची वाट बघत सर्वजण कॉलेज मध्ये होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी सुरु झाली....

क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या