आमच्यासारखे आम्हीच (भाग 92)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
..........................................................................

परीक्षेचा निकाल लागला... सगळेच जण चांगल्या मार्काने पास झाले... वर्गातील काही मुलांना केटी लागली...पण जवळ जवळ सगळ्यांचा निकाल पॉसिटीव्ह लागल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं आणि आता gathering चे वारे वाहू लागल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते....

अंजली देखील आता gathring ची मन लाऊन तयारी करू लागली होती...  काठावर का होईना अंजली देखील परीक्षेत पास झाली होती त्या मुळे आता तिला फक्त नी फक्त gathring कडे concentreat करता येत होतं...

विश्वास देखील चांगल्या मार्काने पास झाला होता... आता त्याचं बी ई पूर्ण झालं होतं...

निकाल घ्यायला आल्यावर विश्वासने नेहाला भेटायचं ठरवलं...

नेहा कॉलेज कॅम्पस मध्येच होती...

नेहाला पाहून विश्वासने नेहाला आवाज दिला... ए चिमणे...

चिमणे... किती दिवसांनी मी हे ऐकत आहे... विश्वास दादाचा आवाज आहे हा... अरे खरंच की विश्वास दादाच आपल्याला आवाज देतोय...

नेहा : hi विश्वास दादा!!फर्स्ट ऑफ ऑल.. तुझं खूप खूप अभिनंदन... तू किती छान मार्कांनी पास झाला आहेस..

विश्वास : थँक्स चिमणे!!बरं ऐक ना.. तुझं आता लेक्चर नसेल तर माझ्यासोबत थोडा वेळ कॅन्टीन मध्ये ये ना...

नेहा : अरे दादा!!सध्या gathring ची तयारी चालू आहे.. कुठलंच लेक्चर व्यवस्थित होत नाही... चल आपण कॅन्टीन मध्ये जाऊ या...

विश्वास : चिमणे!!मला ना श्रावणीला लग्नासाठी प्रपोज करायचे आहे... पण एक अडचण आहे...

नेहा : कसली अडचण??

विश्वास : तीचा भूतकाळ...

नेहा : विश्वास दादा!!तू हे बोलतोस... बरोबर आहे सगळी मुले एकसारखी असतात... पण तुझ्याकडून मी ही अपेक्षा केली नव्हती.. बी ई पास काय झालास.. एकदम बदलून गेलास...

विश्वास : ए चिमणे!!मला माझं वाक्य तर पूर्ण करू देत... तुम्ही मुली ना... तुम्ही उगाचच पूर्वग्रह करून ठेवलेला असतो आणि नंतर त्याच्याशी link लावता... अगं मला तिच्या भूतकाळाविषयी प्रॉब्लेम नाहीये... पण तीचा भूतकाळ माझ्या आईवडिलांना समजला तर ते कदाचीत मला या लग्नाला मान्यता देणार नाहीत... मग अश्यावेळेस मी काय करू?? त्यातल्या त्यात आमचे घराणे म्हणजे  राजकारणी घराणे... तो दबाव येणार तो वेगळाच....

नेहा : अच्छा!!तुला असं म्हणायचं होतं तर...

विश्वास : मग नाही तर काय??

नेहा : बरं बरं सॉरी... पण मग आता??

विश्वास : मला तेच तर समजत नाहीये...मी माझ्या आईवडिलांना कश्या पद्धतीने सांगू...

नेहा :विश्वास दादा!!मला काय वाटतं माहितीये तू त्यांना सगळं खरं खरं सांग.. अगदीच सुरुवातीपासून... काय सांगावं त्यांना तुझं म्हणणं पटेल ही...

विश्वास : अगं चिमणे!! मी माझ्या आईवडिलांपासून लपवणार काहीच नाही गं... पण जितकं मी त्यांना ओळखतो ना ते या लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीत... तसंही मी माझ्या मामाशी या विषयी बोललो तर त्याने देखील नकार दर्शवला....

नेहा :😳 मग आता....

विश्वास : मी आई वडिलांना सांगून बघतो त्यांनी होकार दिला तर ठीक... नाहीतर तुला माझी मदत करावी लागेल...

नेहा : मदत 😳 कसली मदत...

विश्वास : मी जर रजिस्टर मॅरेज केले तर तुला साक्षीदार व्हावे लागेल...

नेहा : हुश्श... ईतकंच ना... Done...

विश्वास : थँक्स चिमणे!!आता मी बिनधास्त पणे माझ्या आईवडिलांना श्रावणी बद्दल सांगू शकतो... बरं ऐक ना... तूमची चौकडी, प्रज्वल आणि रोहन मी सगळ्यांना पार्टी देऊ इच्छित आहे.. बी ई complete झाले म्हणून...

नेहा : विश्वास दादा!! श्रावणीला पार्टी दिली की नाही??😉

विश्वास : नाही गं चिमणे!!

नेहा : मग ती आम्हाला भांडेल ना...तू असं कर तिला आधी स्पेशल पार्टी दे 😉 आणि मग आम्हाला काका काकूंनी होकार दिल्यावर दे..

विश्वास : पण ते होकार देतील ना गं...

नेहा : हे बघ विश्वास दादा!! काका काकू कसे रिऍक्ट होतील ते मी नाही सांगू शकत पण प्रयत्न करायला काय हरकत आहे??

विश्वास : हम्म...चल निघतो मी.. आज श्रावणीला पण भेटणार आहे...

नेहा : श्रावणी वहिनीला माझ्याकडून Hi सांग..

विश्वास : श्रावणी वहिनी... आ हा हा... किती छान वाटतं ऐकायला...

नेहा : चल दादा मी पण निघते... अंजलीचा फोन येत आहे...

विश्वास : अंजली🤔 म्हणजे तीच अंजली ना तारा चा व्हिडीओ viral करणारी....

नेहा : हॊ.. पण आता ती बदलली आहे... असं म्हणून थोडक्यात नेहाने अंजलीचा घटनाक्रम विश्वासला सांगितला....

विश्वास : चला म्हणजे याला देर आये दुरुस्त आये असं म्हणायला काहीच हरकत नाही....

Gathering ची तयारी सुरु झाली त्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या...
स्पर्धेचे विभाजन करण्यात आले.. त्या मध्ये क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कला असे विविध भाग पाडण्यात आले.,..

क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, तसेच कले मध्ये, रांगोळी, चित्रकला, कविता लेखन, निबंध लेखन अश्या स्पर्धा ठेवण्यात आल्या.. तर सांस्कृतिक कार्यक्रमात सामूहिक नृत्य, नाटक, स्किट,गीत गायन आणि सोलो नृत्य असे कार्यक्रम ठरले....

Gathering च्या दिवसात कॉलेजची वेळ हीसकाळी 8 ते 12 करण्यात आली... त्यानंतरचा वेळ प्रॅक्टिस साठी देण्यात आला आणि 4 ते 8 हा स्पर्धे साठी ठेवण्यात आला..

क्रिकेट साठी पूर्ण दिवस लागतो म्हणून त्याला रविवारी ठेवण्यात आले....

सगळ्यांच्या नाव नोंदणी साठी एक विशिष्ठ कालावधी देण्यात आली...

प्रत्येकाच्या तोंडी आता फक्त gathering चाच विषय होता...

मनासारखे काम मिळाल्यामुळे अंजली देखील जीव तोडून मेहनत घेत होती... काही तांत्रिक अडचणी आल्या की नेहाच्या मदतीने ती सोडवत होती....

क्रमश
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या