आमच्यासारखे आम्हीच (भाग 93)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

पहिली स्पर्धा क्रिकेट ची ठरली फर्स्ट इयर A विरुद्ध फर्स्ट इयर B... तशीच फर्स्ट इयर च विरुद्ध D मुला मुलींची एक combine टीम तयार झाली...

फर्स्ट इयर चे चार वर्ग डिव्हिजन A, B,C,D होते... सेकंड इयर च्या प्रत्येक ब्रँच ची एक टिम तशीच third आणि final इयर च्या टिम तयार झाल्या होत्या...

अंजली,नेहा आणि रोहन फर्स्ट ईयर च्या क्रिकेट स्पर्धा  कंडक्ट करणार होते.. त्याच प्रमाणे प्रज्वल आणि दिव्या सेकंड इयर त्याचप्रमाणे third आणि फायनल इयर च्या स्पर्धा या त्यांच्या त्यांच्या वर्गातील संसद प्रतिनिधी घेत होते...

ईतके सारे वर्ग एकाच वेळेस स्पर्धा खेळणार असल्यामुळे दुबे सरांनी कॉलेज ग्राउंड व्यतिरिक्त जवळच असलेले खेळाचे मैदान उपलब्ध करून दिले.

त्या मुळे एका दिवशीच एका ग्राउंड वर फर्स्ट इयर आणि दुसऱ्या ग्राउंड वर सेकंड इयर च्या स्पर्धा चालू झाल्या...

सायली, गीतिका, अनुया रोहन विकी, यास्मिन तशीच वर्गातील अजून पाच मुले अशी मिळून यांची क्रिकेट टीम आठवडा भरा पूर्वीच तयार झाली होती ......

 कोण किती चांगलं खेळतं याचा अंदाज प्रॅक्टिस दरम्यान आला होता..

कॅप्टन गीतिका झाली, तर सायली विकेट कीपर...बॉलर विकी होता तर रोहन ऑल राऊंडर... 

अनुया आणि यास्मिनचा खेळ मध्यम होता पण त्यांची फिल्डिंग अतिशय उत्तम होती...

प्रेसिडेंट अमित सगळीकडे फिरून सर्व काही व्यवस्थित चाललं आहे ना. क्रिकेट किट व्यवस्थित मिळाले ना याची खात्री करून घेत होता.

तर अंजली आणि नेहा त्यांच्या वर्गाच्या स्पर्धेचे नियोजन बघत होत्या...

टिम तयार झाल्या होत्या स्पर्धेला बरोबर सकाळी पाऊणे नऊ वाजता सुरुवात होणार होती.कॉमेंट्री करण्यासाठी कुणी सापडत नव्हतं. त्याची कुणकुण नेहाला लागली...

नेहा : अंजली!!मला क्रिकेट कॉमेंट्री करायची इच्छा आहे.. तू परवानगी दिलीस तर मी कॉमेंट्री करेन..

नेहा आणि चक्क आपल्याला परवानगी मागत आहे...

अंजली : जा वत्स जा तू भी क्या याद रखेगी... कर ले क्रिकेट कॉमेंट्री.... अंजली एकदम मुडमध्ये येऊन म्हणाली....

नेहा : थँक्स अंजली dear... तुला एक गुपित सांगू का??

अंजली : गुपित 🤔कसलं गुपित...

नेहा : बरं झालं माझा गर्ल्स representative असण्याचा कालावधी फर्स्ट सेमिस्टर पुरताच होता... अंजली!! तू खूप छान काम करत आहेस.... मला तर बिलकुल नसतं जमलं असं ...

अंजली : हॊ मग "अंजली " म्हणतात मला 😉पण हे सगळं खरं असलं तरी तो मुलांचा representative आहे ना... तो पण क्रिकेट खेळणार म्हणून डबल लोड आला आहे ..

नेहा : तुला कसला आला आहे डबल लोड... तू एकटीच सगळं सांभाळून घेशील...

Excuse me.... मी कार्तिक...मी तुमचा बॅचमेट 

अंजली : अरे hi कार्तिक!!असं काय करतोस...आपलं कधी बोलणं झालं नसलं तरी काय झालं... मी आपले सगळे बॅच मेट ओळखते....

कार्तिक : 😊 थँक्स!!बरं हे क्रिकेट होईपर्यंत रोहनने त्याचा चार्ज मला दिला आहे. जर काही काम किंवा अडचण असेल तर मला सांगू शकतेस...

अंजली : अरे वा.. हे बरं झालं... ऐक तर मग... आपल्याकडे या दोन टिम आहेत... दोन्हीही टिम कडे एक एक किट दिलेले आहेत ते व्यवस्थित आहेत का ते चेक कर... हेल्मेट पासून तर बॉल पर्यंत सगळं काही आहे का ते चेक कर... त्यातली एकही वस्तू इकडची तिकडे झाली नाही पाहीजे... ते वापस करताना एक ही आकडा चुकला नाही पाहीजे... त्या नंतर मी त्यांच्या ब्रेक मधल्या खाण्यापिण्याची तयारी ठेवते... नेहा!! तू कॉमेंट्री सोबत फर्स्ट एड किट देखील जवळ ठेव... म्हणजे कुणाला काही छोटीमोठी दुखापत झाली तरी आपल्याला तिथेच त्यांचे प्राथमिक उपचार करता आले पाहीजे.

नेहा :वा अंजली!!एकदम परफेक्ट प्लॅनिंग तुझ्या डोक्यात आहे...

अंजली : थँक्स

कार्तिक : अंजली!!मी किट चेक करतो...

कार्तिक तिथून निघून गेला... नेहा मात्र कौतुकाने अंजली कडे बघत होती... समोर विकी असताना देखील अंजलीला काहीच फरक पडत नव्हता... ती अगदीच नॉर्मल वागत होती...

काहीका असेना त्या विकीने अंजलीला धोका दिला ते एका अर्थाने बरं झालं ... त्या कारणाने का होईना अंजली मध्ये हा चांगला बदल घडला...

मनोमन विकी ला धन्यवाद म्हणत नेहा कॉमेंट्री करण्यासाठी गेली... आता नेहाचं संपूर्ण लक्ष क्रिकेट च्या मैदानाकडे गेलं...

कॅप्टन गीतिका आणि समोरच्या टिम मधला कॅप्टन एकमेकांसमोर उभे राहीले.. विरोधी टिमचा कॅप्टन गीतिका कॅप्टन असल्याचे बघुन कुत्सित पणे हसला..... जणू काही मुलगी कॅप्टन असल्यामुळे त्याला तिथेच जिंकल्यासारखं वाटत होतं....

टॉस केला गेला... टॉस विरोधी टिम ने जिंकला... आता तर match जिंकलीच असं विरोधी टिम च्या कॅप्टनला वाटायला लागलं....

हसून घे,तुला माहितीच नाही ही गीतिका state लेव्हल पर्यंत क्रिकेट कॅप्टन होती आणि match जिंकून आली... उगाचच नाही या गीतिकाला कॅप्टन केलं.... असा विचार करून तीने त्या कॅप्टनला स्माईल दिली....

विरोधी टिम ने बॅटिंग निवडली... नेहाला देखील कॉमेंट्री करताना टेन्शन आलं होतं... पण गीतिकाचे क्रिकेटचे किस्से माहिती असल्यामुळे नेहाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती....

अंपायर दुबे सर झाले होते... दुबे सरांनी मॅच चे नियम समजावून सांगितले...
 Match 20 ओव्हर ठरल्या ...4 बॉलर, प्रत्येकी 5 over टाकणार असे सांगितले...
प्रत्येक टिमला खेळण्यासाठी दीड तास वेळ असणार मध्ये एक ब्रेक होईल...
आता सकाळी 9 ते 1 पर्यंत आणि B डिव्हिजन ची match होईल आणि

 दुपारी 2 ते 6 च आणि D डिव्हिजन ची match होईल.....

Match बघणाऱ्या बाकी विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला आणि match ला सुरुवात झाली....

क्रमश
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या