रोज डे च्या निमित्ताने...
आता जवळपास दहा, अकरा वर्ष झाले असतील या गोष्टीला पण valentine डे किंवा valentine week आल्यावर ही गोष्ट आठवल्याशिवाय मला रहात नाही. त्या वेळेस.. त्या वेळेपूरता का होईना मला माझा अभिमान वाटायला लागतो..
तुम्ही म्हणाल आता त्यात अभिमान वाटण्यासारखं काय असणार... पण कधी कधी आपला साधा सरळ स्वभाव कुणाला ईतकं आनंदी करून जाईल... ज्याचा की आपण कधी विचारच केलेला नसतो...
त्याचं झालं असं की ज्यावेळेस मी लहान होते त्या वेळेस मी माझ्या मम्मी आणि डॅडी ला रुग्णसेवा करताना बघतच मोठी झाले. त्यातल्या त्यात जर एखादा माणूस वयोवृद्ध असेल तर त्याची ते दोघेही खूप सेवा करत असत.. तशीच त्यांनी माझ्या आज्जी आजोबांची खूप सेवा केली... मला ते नेहमीच म्हणत की आज्जी आजोबांची सेवा करावी म्हणजे त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या सोबत असतात..
ज्या वेळेस मी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले त्या वेळेस मी बऱ्याच वेळेस general opd काढत असे.. त्या वेळेस बरेच असे वयोवृद्ध रुग्ण तिथे एकटेच येत असत आणि आमच्यकडून तपासून घेत असत...
जवळ जवळ सगळ्या वृद्धांची कहानी ही थोडीफार मिळती जुळतीच असे..कुणाला मुलांनी घरातून काढून दिलेले होते .. तर कुणाची मुले दुसरीकडे राहण्यासाठी गेलेले असे.....कुणाचे मुलाशी पटत नसे... अश्या वेळेस या वृद्ध रुग्णांना सगळ्यात आपलासा वाटणारा दवाखाना म्हणजे सरकारी दवाखाना....
हे आलेले वृद्ध रुग्ण माझ्याकडून फार हक्काने तपासून घेत असत आणि म्हणत असत बाई अंगात ताकद राहण्यासाठी मला एखादं चांगलं टॉनिक लिहून द्या बरं का?? मी म्हणायचे हो आजोबा...आणि टॉनिक लिहून द्यायचे
असंच एक आजोबा दर पंधरा दिवसाला येऊन माझ्याकडून न चुकता टॉनिक लिहून घेत असे ....
काही दिवसांनी माझी बदली झाली... तेव्हा माझी नौकरी टेम्पररी होती... काही वर्ष नौकरी केल्यावर माझ्या जागी पर्मनंट वैद्यकीय अधिकारी आल्यामुळे माझी नौकरी गेली...
नौकरी गेल्यावर महिनाभरातच मी एक छोटंसं प्रायव्हेट क्लिनिक टाकलं...
एक दिवस माझे नाव पाहून माझ्याकडून टॉनिक लिहून घेणारे आजोबा मला माझ्या क्लिनिकला भेटायला आले... ते आजोबा कधी मक्का तर कधी संत्री विकायचे... मला म्हणाले हा स्वीट कॉर्न आहे बाई,घेता का?? मी तो त्यांच्याकडून विकत घेतला... मग मला म्हणतात कसे... मी आता सरकारी दवाखान्यात फारसं जात नाही... तुम्ही बदली होऊन गेल्या नंतर मला कुणी टॉनिक लिहून दिलं नाही... मी मागितलं तर मला म्हणाले डॉक्टर तुम्ही आहेत का मी?? मी जे लिहून देणार तेच तुम्हाला घ्यायचे आहे.... उगाचच तूमची बदली तिथून झाली😒....
मी ते ऐकून थोडी भावनिक🥺 झाले होते कारण आता तर माझ्याकडे ती काय कुठलीच नौकरी नव्हती...
नंतर काही दिवसांनी असंच मी प्रायव्हेट क्लिनिक मध्ये बसले असताना हेच आजोबा परत माझ्या क्लिनिक मध्ये आले... आणि विचारले..बाई संत्रे घ्यायचे आहे का?खरं तर मला संत्रे घ्यायचे नव्हते.. पण त्या आजोबानी इतक्या प्रेमाने आणले म्हणून मी थोडेसे संत्रे विकत घेतले... नंतर निघता निघता मला त्या आजोबांनी गुलाबाचे फुल दिले... बाई हे घ्या तुमच्यासाठी आणले आहे...
मी ते फुल घेतले...आणि एकदम मला आठवलं अरे आज तर चौदा फेब्रुवारी 🤔 valentine डे...
काय योगायोग आहे हा...
त्या वेळेस आता सारखे स्मार्ट फोन देखील नव्हते... त्या मुळे valentine डे हा प्रकार त्
या आजोबाना तरी माहिती असणं अशक्य होतं....
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या