नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
..........................................................................
बॉलिंग ला सुरुवात विकीने केली.... हे काय पहिल्याच बॉल वर सिक्स...
विकी तर एकदम चांगला बॉलर आहे असं कसं झालं कॅप्टन गीतिकाला एकदम टेन्शन आलं...
चूक कुठे झाली... दुसऱ्या बॉल वर तश्याच प्रकारचा सिक्स...
अरे बापरे या टिम ने तर अगदीच जोरदार प्रॅक्टिस केलेली दिसत आहे. गीतिका जरा लक्ष दे गं नाही तर सहा बॉल वर सहा सिक्स व्हायला वेळ लागणार नाही...
पण विकीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू होतं... दोन बॉल मध्ये बारा रण काढतो की काय 🤔 थांब आता तू catch आऊट होतो की नाही बघ... असा मनात विचार करून विकी यास्मिन कडे गेला आणि यास्मिन!!catch पकडायला तयार हॊ अशी कल्पना दिली...
अरे पोरींशी काय बोलतोस बॉलिंग कर बॉलिंग अशी चियरिंग विरोधी टिमच्या समर्थकांकडून झाली...
ते ऐकून विकीला राग 😡आला...आणि तो एकदम फास्ट पळाला आणि त्याने बॉल टाकला पण या वेळेस स्लो आणि स्पिन अश्या प्रकारे बॉल टाकला....
बॅटींग करणाऱ्याला वाटलं की हा आता पहिल्या दोन बॉल सारखाच फास्ट बॉलिंग करणार आहे. आपण नुसतं played केलं की झालं... परत एक सिक्स.. तो गाफिल होता आणि त्यानी बॉल नुसता played केला... परीणामी बॉल उंच उडाला आणि थेट यास्मिन असलेल्या दिशेला आला...
यास्मिनने अलगद catch पकडली.... आणि एकच जल्लोष उडाला catch आऊट...
सोबतच नेहाची कॉमेंट्री सुरु होती.... नेहा देखील जोशात जोरात ओरडली catch आऊट... अरे हे काय एका पोरीने catch आऊट केलं... पण आपण कॉमेंट्री करत असल्यामुळे आपल्याला असा पक्षपाती करता येणार नाही हे तिला लागलीच समजले...आणि ती शांत झाली
तितक्यात गीतिकाच्या टिमच्या समर्थकांनी "आणू का बाई रस,आणू का बाई रस, आणू का बाई रसगुल्ले "अशी चियरिंग केली....
आता दोन्हीही टिम च्या अंगात एक उत्साह संचारला होता...
चियरिंग करणाऱ्या विद्यर्थ्यांचा घसा कोरडा होत होता पण तरी आपली टिम जिंकावी या साठी जोर जोऱ्यात चियरिंग करत होते...
बॅटिंग करणाऱ्या टिमची बॅटिंग झाली सर्व बाद 120 रण झाले... यात सायली ने एक,रण आऊट केला तर विकी ने एक, क्लीन बोल्ड आणि (बाकी विकेट्स )... रोहन ने दोन क्लीन बोल्ड तर अनुया ने एक catch घेतली... आणि बाकी दोन बॉलर ने राहिलेल्या विकेट्स घेतल्या....
गीतिकाच्या टिमला आता जिंकण्यासाठी 121 रण करावे लागणार होते..
साडे दहा ते साडे 11असा ब्रेक देण्यात आला होता. त्या ब्रेक मध्ये चहा नाश्त्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. अंजलीने तीचे काम व्यवस्थित पार पाडले होते..जवळच एक रेस्ट रूम होती...
चहा नाश्ता झाल्यावर सर्व जण फ्रेश झाले व आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले...
बॅटिंग सुरु झाली... सुरुवातीला सायली आणि रोहन बॅटिंग करण्यासाठी गेले...
सायलीला पाहताच विरोधी टिम ओरडली "लवंगी मिरची, कोल्हापूरची"... सायलीला एकदम उठलेला गदारोळ पाहून थोडं घाबरायला झालं...
ही गीतिका पण ना मला कशाला ओपनिंग ला पाठवत आहे.. सायली मनातल्या मनात विचार करत होती...
तिच्या चेहऱ्यावरचे हाव भाव रोहनने टिपले... रोहनने तू टेन्शन घेऊ नकोस असे त्याच्या डोळ्यानेच खुणावले....
रोहन कडे बघुन सायलीला धीर आला... तीने बॅटिंग करायला सुरुवात केली... पण समोरचा बॉलर एकदम फास्ट बॉलर होता...सायली जरा गडबडली... बॉल वाया गेला....
आता सायली थोडंसं अजून घाबरली... त्या मुळे दुसराही बॉल वाया गेला...सायली घाबरलेली पाहून फक्त बॉल ला बॅट लागू दे आणि पळ असं रोहन ने खुणावलं...
मग सायलीने तसंच केलं....रोहन strike वर आला त्याने नंतरच्या दोन बॉल ला दोन चौके मारले आणि मग तिसऱ्या बॉल ला एक रण काढला जेणेकरून त्याला परत बॅटिंग करता येईल...
आता सायली देखील स्थिरावली होती....
रोहन परत स्ट्राईक वर आला... तो दोन चौके मारल्यावर त्याने एक रण काढला...मी छक्का मारण्याचा किती प्रयत्न करत आहे तरी देखील काय झालं आहे काय माहिती... हा बॉल उडतच नाहीये... रोहन विचार करत उभा राहिला...
बॉलर ने बॉलिंग करायला सुरवात केली...
सोबत नेहाची कॉमेंट्री सुरु होती...
ये बॉलर ने फास्ट स्पीड मे बॉल डाला. बॅट्समन सायलीने अपनी बॅट घुमायी और ये ओ नो ये तो चमत्कार हॊ गया... सायली ने मारा सिक्सर... दुसरे ओव्हर मे पहला छक्का....
अरे ये मै क्या देख रही हूं... फिरसे सायली ने बॅट घुमायी और एक सिक्स... अब अगर सायली फिरसे एक सिक्स मारेगी तो हॅट्ट्रिक हॊ जायेगी.... अबतक B डिव्हिजन को कुछ टेन्शन नही था लेकीन उन्हे टेन्शन आता नजर आ रहा है | और ये रही हॅट ट्रिक... वेल done सायली well done....
रोहन ने देखील जागेवरच आनंदाने उडी मारली..जे मला नाही जमलं ते सायली ने करून दाखवलं... तेही हॅट ट्रिक...🥰🥰
ओव्हर बदलली रोहन बॅटिंग साईड ला जायला निघाला बरोबर मधोमध रोहन ने सायलीला शेक हॅन्ड करून अभिनंदन केलं..
रोहन : सायली!!congrats...
सायली : थँक्स 😊
रोहन : सायली!! I LOVE YOU..
सायली : 😳 काय
रोहन : 😊...😍😍
सायली देखील न कळत स्मित 😊करत तिच्या जागेवर गेली....नेमकं काय झालं हे क्षणभर तिला कळलंच नाही... पण तिला छान वाटत होतं...पण तरीही तीने तिच्या मनावर ताबा ठेवला....
रोहन ने 40 रण केले तर सायली ने 35 दोघांनी मिळून 75 रणांची भागीदारी केली... दहावी ओव्हर चालली होती...
आता match आपल्या हातात आला याची खात्री रोहन ला वाटायला लागली तितक्यात पळत असताना सायलीचा पाय मुरगळला आणि ती पडली... रण आऊट झाली...
रोहन आपल्या जागेवर गेला... पण सायली पडली हे बघून थोडा बोर झाला... पण मग टाळ्या वाजवून ओरडायला लागला... Well done सायली well done...
टाळयांच्या गजरात सायली pavelian कडे वळाली...
आता हातात आलेला गेम जाऊ नये या हिशोबाने गीतिका मैदानाकडे निघाली तोच टाळ्यांचा कडकडाट तिला ऐकू आला .....
नेहाने कॉमेंट्री केली बॅट्समन सायली के आऊट हॊ जाने के बाद अब ये आया नया बॅट्समन" विकी "
विकी 😡.... गीतिका विकी कडे रागाने बघत होती....
क्रमश
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या