आमच्यासारखे आम्हीच (भाग 95)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
..........................................................................

काय करावं..
. ह्या झेंडूची...बॉलिंग सर्वात चांगली आहे🙄...
म्हणून याला टॉलरेट करावं लागत आहे...

पण नाही,याने जर या पुढे त्याने माझं नाही ऐकलं तर आम्ही कधीच जिंकणार नाही...

आता या match मध्ये  हातात आलेला गेम त्याने घालवायला नको..

 नाहीतर आपण चांगला बॉलर टिम मध्ये ठेऊनही हारून जाऊ....

 गीतिकाच्या मनात नुसते विचारचक्र चालू होते...

गीतिकाच्या टिम मधल्या बाकी विद्यार्थ्यांना देखील विकीचं वागणं खटकलं होतं...

सायली : गीतिका!! मी आऊट झाल्यावर तू मैदानात जाणार होतीस ना मग हा झेंडू ??🤔 चक्क बॉलर...

गीतिका : अगं मी जाण्याआधी तोच पळूत मैदानात गेला..आणि एकदा मैदानात गेल्यावर परत बोलावता येत नाही ना....

सायली : ते काही नाही...आता जर या स्पर्धेत आपण जिंकलो तर पुढे त्याला वॉर्निंग दे नाही तर टिम मधून काढून टाक... बघ ना तो किती बॉल खात आहे ओ नो एका ओव्हर मध्ये चक्क एकच रण काढला त्याने... अरे देवा,गीतिका!!तो परत strike वर...

गीतिका : काय करू.... देवा आता तूच वाचव बाबा... गीतिका हात जोडत होती🙏...

रोहनला देखील विकीचा खूप राग 😡येत होता.... एक तर विकी त्याला strike वर येऊ देत नव्हता आणि स्वतः काही रण देखील काढत नव्हता....

दूसरी ओव्हर देखील अशीच गेली... त्यात ही विकीने एकच रण काढला.. एक वाईड... दोन ओव्हर मध्ये तीन रण फक्त... टोटल स्कोर 78.... आता आठ ओव्हर मध्ये 43 रण करायचे होते....

ओव्हर संपल्या संपल्या रोहनने विकीला... एक तर आऊट हॊ नाही तर मला स्ट्राईक दे असं सांगितलं...

ईतकं होऊनही विकी मात्र ओव्हर कॉन्फिडन्ट 😏होता...

विकी : अरे रोहन!!डोन्ट वरी... तू बघच मी आता कसे सिक्स मारतो ते... त्या सायलीची तरी हॅट्ट्रिक झाली मी तर सहा च्या सहाही बॉल वर सिक्स मारतो की नाही ते बघ....

रोहन : ए विकी!!अरे बाबा मला तरी अधून मधून strike वर येऊ दे की....

विकी :ठीक आहे येऊ देतो, येऊ देतो... पण मला वाटतं त्याची आता गरजच नाही पडणार... असं म्हणून विकी strike वर गेला..

या ही ओव्हर मध्ये विकीने पहिले पाच बॉल वाया घातले... आणि आता ओव्हरच्या शेवटच्या बॉल वर विकीने जी बॅट घुमावली बॉल उंचावर उडाला आणि फिल्डरने त्याचा बॉल catch केला....

विरोधी टिमच्या मुलांनी विकेट गेली म्हणून टाळ्या वाजवल्या... पण गीतिकाच्या टिम मधला प्रत्येक जण विकी आऊट झाल्यामुळे विरोधी टिम पेक्षा जास्त खूष झाला होता...

आता मात्र गीतिका मैदानात उतरली... ओव्हर बदलल्यामुळे गीतिका रणर होती तर रोहन strike वर...

रोहन आणि गीतकाने धुव्वाधार खेळी करत अगदीच पाच ओव्हर मध्ये 121 रण पूर्ण केले आणि B डिव्हिजन वर दोन विकेट,19 ओव्हरमध्ये विजय मिळवला...

मॅन ऑफ द match... 'किताब...रोहनला मिळाला...

Match झाली A डिव्हिजनचे सगळेच जण जल्लोष करायला लागले... थ्री चियर्स for फर्स्ट year A डिव्हिजन Hip Hip hurrah... अश्या घोषणा झाल्या...
सर्वजण मैदानातून pavelian कडे येताना नुसता टाळ्यांचा गडगडाट होत होता....

रोहन सायलीजवळ आला...

सायलीने त्याला स्मित करत त्याचं अभिनंदन केलं... तर रोहनने त्याचा हॅन्ड शेक करत अभिनंदन केलं...

रोहन : सायली!! मला उत्तर नाही मिळालं 😍😍

सायली : उत्तर 🤔कसलं उत्तर??

रोहन : परत म्हणू 😍😍

नाही... नको, म्हणून सायली लाजलीच 🥰...

हाय रे मै मरजवा... किती गोड लाजत आहे सायली... म्हणजे उसके भी दिल मे कुछ कुछ होता है...रोहन एकटक सायली कडे बघत होता.. 

दुपारी डिव्हिजन C आणि  D मध्ये match होणार होती...

जी टिम जिंकेल त्याच्यासोबत A डिव्हिजनची फायनल होणार होती...

आता सर्वजण आपापल्या रूमवर गेले....

मुली देखील हॉस्टेल कडे गेल्या... रस्त्याने जाताना फक्त नी फक्त क्रिकेट match च्या गप्पा चालू होत्या...

जो तो विकीच्या मूर्ख पणावर चिडला होता आणि गीतिकाजवळ त्याचा राग व्यक्त करत होता..

चियरिंग करून सर्व मुलींचे आवाज बसले होते... तर नेहाचा आवाज कॉमेंट्री करून बसला होता...

सायली मात्र रोहनने कश्याप्रकारे क्रिकेट खेळतानाच आपल्याला I Love you म्हटले हे आठवून मनात स्मित🥰 करत होती....

पण प्रत्येक वेळा समोर येणारा जो तो सायलीचं अभिनंदन करत होता... आणि प्रत्येक वेळी सायलीची तंद्री तुटत होती....

पण  विकीला मध्येच बॅटिंग साठी पाठवल्यामुळे जो तो गीतिकाला सुनावत होता... ती प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं कुणीच ऐकत नव्हतं... आधी अभिनंदन करत आणि मग विकीला बॅटिंग साठी पाठवलं म्हणून सुनावून जात होता.

आता मात्र जिंकूनही गीतिका दुःखी झाली होती....

तिच्या डोळ्यात अश्रू आले...ती ते शिताफीने सर्वांच्या नजरेपासून लपवत होती... पण नेहाच्या नजरेतून ते सुटले नाही...रूमवर आल्या आल्या नेहा गीतिका जवळ गेली...

नेहा : गीतिका!! क्रिकेट match जिंकल्यावर देखील तुझ्या डोळ्यात अश्रू??

गीतिका : नेहा 😳...

नेहा : गीतिका!!काय झालं सांग ना...

गीतिका : नेहा!!बघ ना तो नालायक झेंडू... त्याने जवळजवळ match चा पचका केलाच होता... आणि त्याने मनानेच हा कारभार केला... आणि कॅप्टन म्हणून मलाच सगळे सुनावत होते🥺...

नेहा : अच्छा तो ये बात है... वत्स... याला म्हणतात... जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.... तू कॅप्टन असल्यामुळे  पूर्ण टिम च्या चूका म्हणजे तुझ्याच चूका... पण मी म्हणते ते जाऊ दे... पण आता फायनल match च्या वेळेस त्या झेंडू ला जरा चांगली वॉर्निंग दे....

गीतिका : हॊ नेहा!... आणि थँक्स... तुझ्या लक्षात आलं म्हणून नाहीतर मी रडतच बसले असते....

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या