आमच्यासारखे आम्हीच (भाग 96... अंतिम )

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
...........................................................................

त्यानंतर C आणि D डिव्हिजन च्या matches झाल्या त्यात C डिव्हिजन जिंकला.. मग A डिव्हिजन विरुद्ध C असा फायनल match झाला.

गीतिका व्यतिरिक्त प्रत्येक खेळाडू ने विकीला वॉर्निंग दिल्यामुळे आता त्याला गीतिकाचे ऐकावेच लागले... फायनल match मध्ये A डिव्हिजन जिंकली.

मुलगी कॅप्टन असल्यामुळे सेकंड, थर्ड आणि फायनल year चे सगळेच स्टुडन्ट यांचा फायनल match बघायला आले होते...

नुसतेच match बघायला नाहीतर तिथे असणाऱ्या पैकी बऱ्याच जणांना गीतिकाचा वर्ग जिंकावा असेच वाटत होते. त्या साठी A डिव्हिजन ला चियरिंग मोठया प्रमाणात होत होती.

गीतिकाला खेळताना बघुन प्रेसिडेंट अमित मात्र तिच्याकडेच बघत राहिला. अरे आजवर आपलं हिच्याकडे लक्ष कसं गेलं नाही. किती सुंदर आहे ही..नुसतीच सुंदर नाही तर बोल्ड ही आणि आत्मविश्वास ठासून भरलेली असं तिच्या खेळण्यातून जाणवत होतं.

हं बरोबर आहे.. ही रोज क्विन झाली तेव्हा मला एकदम नाजूक नार वाटून गेली होती. म्हणूनच हिच्याकडे लक्ष नसेल गेलं. वाह काय खेळत आहे.ही नक्कीच आधीची क्रिकेट प्लेअर असणार आहे.

अमित ची नजर आता गीतिकावरच खिळली होती..

नेहाची कॉमेंट्री चालू होती. कॉमेंट्री करता करता तीची नजर बऱ्याचदा अमित कडे जात होती. अमित गीतिका कडे एकटक बघतोय हे तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.

क्रिकेटच्या स्पर्धेनंतर बॅडमिंटन,कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस,अश्या विविध स्पर्धा झाल्या...त्यात मिक्स डबल्स मध्ये प्रत्येक वेळी रोहन आणि सायली यांची जोडी खेळत होती..विनर नाही तर रनर अप तरी..बक्षीस मिळवत होती.

दोघांनाही सोबत खेळताना एक वेगळाच आनंद मिळत होता.

रोहन प्रत्येक वेळी सायलीला तुझे उत्तर मिळाले नाही म्हणून छेडत असे.. पण सायली नुसतं smile करून निघून जात असे.

रोहन मनाने कितीही आवडत असला तरी सायलीचा नकार ठरलेला होता.तिला तिच्या नातेवाईकांसमोर प्रूव्ह करायचं होतं.

सतत सोबत असल्या कारणाने रोहन आणि सायली मध्ये काही तरी शिजतंय अशी चर्चा मात्र कॉलेज मध्ये सुरु झाली. भरीस भर रोहन आणि सायलीने स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात एक डुएट गाणं देखील म्हटलं...

अनुया, प्रज्वल, रशीद,गीतिका, नेहा, यास्मिन सर्वांनीच कशा ना कशात बक्षिसे मिळवली होती.त्यामुळे प्रत्येक जण आनंदी होता.

अंजलीने जीव तोडून मेहनत करून सर्व कार्यक्रमांचे व्यवस्थित नियोजन केले होते. या कारणामुळे अंजलीची देखील सगळीकडे वाहवा होत होती.

अंजलीला कुठल्याही विद्यार्थ्यांने जर एखादी त्रुटी दाखवली तर ती लागलीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असे.त्या मुळे सर्व विद्यार्थी, लेक्चरर, प्रिन्सिपॉल सर्वच जण तिच्यावर खूष होते.

स्नेहसंमेलन अगदीच आनंदात आणि उत्साहात पार पडलं.
स्नेहसंमेलनाच्या शेवटच्या दिवशी हे स्नेहसंमेलन संपूच नये असं सर्वांना वाटत होतं.

एक दिवस सुट्टी देऊन आता कॉलेज मधल्या अभ्यासाला परत सुरुवात होणार होती. 

विश्वासने त्याच्या आणि श्रावणीच्या नात्यnavhबद्दल त्याच्या घरी सांगितलं.

नेहाने टिप्स दिल्यामुळे विश्वासने त्याच्या घरी श्रावणी माझ्या आयुष्यात कशी आली आणि मी कसा सुधारलो हे सर्व व्यवस्थित समजावून सांगितल्या मुळे विश्वासच्या आईवडीलांनी देखील त्यांच्या नात्याला मान्यता दिली.

सायलीने रोहनला तो आवडतो पण तीचे इंजिनियरिंग पूर्ण होई पर्यंत असेच मित्र राहूया आणि त्या नंतरही जर असंच वाटलं तरच हे नाते पुढे ठेऊयात असं त्याला क्लिअर सांगितलं.ते देखील माझ्या आईवडीलांनी आपल्या नात्याला मान्यता दिली तरच..

अनुयाच्या आई बाबांना अनुया आणि प्रज्वलच्या नात्याबाबत कळाले.सुरुवातीला अनुयाच्या वडिलांनी तिला विरोध करून पाहिला. पण अनुया त्यांचे काही एक ऐकायला तयार नव्हती. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाडकी कन्या असल्यामुळे शेवटी त्यांनी प्रज्वलला भेटण्याची तयारी दर्शवली.

 अनुयाच्या बाबांनी प्रज्वलला भेटून जर तो आयुष्यात पुढे काही केलं तरच तुमच्या नात्याला मान्यता देऊ असे आव्हान दिले.तो पर्यंत मात्र तुम्ही दोघांनी मैत्रीचे नाते ठेवायला माझी काहीच हरकत नाही पण कुठल्याही नात्यात अडकून न राहण्याची त्यांनी प्रज्वल आणि अनुयाला अट घातली.

प्रज्वल ने ते आव्हान आणि अनुयाच्या वडिलांनी टाकलेली अट आनंदाने स्वीकारली.

यास्मिन आणि रशीदची एंगेजमेंट झाली पण लग्न रशीदचे बी ई पूर्ण झाल्यावर, नौकरी  लागल्यावर करायचे ठरले.

अमितने त्याचे इंजियरिंग पूर्ण होईपर्यंत गीतिकाला त्याच्या मनातलं काहीच सांगितलं नाही. त्याची गोष्ट मनातल्या मनात राहिली. पण पुढे गीतकाचे बी ई complete झाल्यावर लग्नासाठी त्याने तिला रीतसर मागणी घातली.

नेहा आणि अंजलीची देखील खूप छान मैत्री झाली.

तर वाचक मित्र, मैत्रिणींनो कसा वाटला हॉस्टेलच्या चार मैत्रिणींचा पहिल्या वर्षातील प्रवास.तुम्हाला आवडला ना. कदाचीत तुम्हाला वाटत ही असेल की हा प्रवास अजून चालू राहायला हवा होता. पण प्रवासाला कुठे ना कुठे डेस्टिनेशन असतं ना..

या चौघींच्या नशिबाने त्यांचे डेस्टिनेशन खूप चांगले मिळाले. पण प्रत्येकाला असे डेस्टिनेशन मिळेलच असे नाही. पण तरीही जर प्रत्येकाला एक नेहा सारखी मैत्रीण मिळाली तर चांगले डेस्टिनेशन मिळण्यापासून कुणीही वंचित रहात नाही.

तुमच्या आयुष्यात आहे का अशी नेहा.... माझ्या आयुष्यात तर अश्या खूप साऱ्या नेहा आहेत..... जर तुमच्याही आयुष्यात अशी एखादी नेहा असेल तर तिच्या बद्दल कंमेंट मध्ये ऐकायला मला नक्कीच आवडेल....

आणि हॊ विश्वास आणि श्रावणीच्या लग्नाला यायचं... बरं का 🙏

समाप्त
 वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

  1. खरंच , असं वाटलं की ही कथा कधीच संपू नये. आता पुढचा आपला प्रोजेक्ट कोणता आहे आणि कधी वाचायला मिळणार?

    मी रोज चेक करायची की कथा अपडेट झाली का.. आता चैन नाही पडणार .

    उत्तर द्याहटवा