सत्य घटनेवर आधारित
पल्लवी लग्न करायचेच नाही असं म्हणत होती.
तिच्या नकारचं कारण तिच्या आई दीपाला समजत नव्हतं. ती रोज येता जाता पल्लवी समोर लग्नाचा विषय काढत असे. पण लग्नाचा विषय काढला की पल्लवीच्या कपाळावर आठ्या येत असत.
दीपा : अगं पल्लवी बेटा!! लग्नाचा विषय काढला की तुझ्या कपाळावर सतत आठ्या का येत आहेत. माझं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळी योग्य वयात झालीच पाहीजे ना. तुला कुणी मुलगा आवडतो का??तसं असेल तर तसं सांग.... मी तुला त्याच्याशी लग्न करण्यापासून अडवणार नाही...
पल्लवी : अगं आई!! मला जर कुणी मुलगा आवडत असता तर मी तुला आधीच सांगितलं नसतं का. तसंही माझी प्रत्येक गोष्ट तुला माहिती आहेच ना.मी तुझ्याशी सगळंच share करते ना....
दीपा : हॊ... पण मग तू लग्न करण्यासाठी नकार का देत आहेस??
पल्लवी : आई!! बाबा गेल्यापासून तू अन मी एकमेकांचे साथीदार झालो आहोत... कित्ती लहान होते मी तेव्हा बाबा एका अपघातात देवाघरी गेले.. मला तर त्यांचा चेहरा देखील नीट आठवत नाही.... एकदम पुसटसा आठवत आहे.. तेव्हापासून मी तुझा जगण्यासाठीचा संघर्ष पाहिला आहे... पदोपदी आपण एकमेकांना साथ देऊन मी लहानाची मोठी झाले आहे अन आता तू मला म्हणतेस लग्न करून निघून जा... सांग ना आई मला कसे पटेल... तू मला आतापर्यंत साथ दिली आता तुझी साथ देणं माझं कर्तव्य नाही का?? बरं हे कर्तव्य वगैरे बाजूला राहू दे... माझ्या मनालाच पटत नाहीये की मी लग्न करून तुला असं एकटं सोडून जाणं....
दीपा : अगं पल्लवी बाळा असा विचार काय करतेस? लग्न ही जगाची रीतच आहे.. आणि तुला सांगते आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला जोडीदाराची गरज भासतेस... त्यात जर तो जोडीदार आपल्याला समजून घेणारा असला... आपल्यावर प्रेम करणारा असला... आपले कोडकौतुक करणारा असला तर जगण्याची मजा ही निराळीच असते...तुझे बाबा हे जग लवकर सोडून गेले हे माझं दुर्दैव पण हे तुझ्या वाटेला का यावं....
पल्लवी :अगं आई पण....
दीपा : पल्लवी!!अजून माझं बोलणं झालं नाहीये थांब... ऐक.. मला सांग माझं सुख कश्यात आहे..
पल्लवी : कश्यात?
दीपा : तुला सुखी पाहण्यात... तू आनंदाने सासरी गेलीस तिथे छान रमलीस की मी मिळवलं...
पल्लवी : आई!! तू पण ना... ठीक आहे मी लग्नाला तयार होते पण एका अटीवर...
दीपा : कुठल्या??..
पल्लवी : आधी सांग तू हॊ म्हणशील....
पल्लवी टाकून टाकून अशी कुठली अट टाकणार आहे.. अंदाज नसताना दीपाने होकार दिला....
पल्लवी : आई!! तुझ्या वयाच्या पंधराव्या वर्षी तुझं लग्न झालं होतं बरोबर?बालविवाह
दीपा : हॊ 🤔.. अगं!!तेव्हा लग्नाची घाई करत असत...
पल्लवी : आई तू सतरा वर्षांची असताना माझा जन्म झाला...आणि बाबा तू वीस वर्षांची असताना देवाघरी गेले
दीपा : हॊ...पण आता हे कसले गणित करत आहेस...अन तुझी कसली अट आहे....
पल्लवी : आई!!आज तू 38 ची आहेस माझ्यासारखंच तुझं देखील खूप आयुष्य बाकी आहे... आणि मलाही वाटतं तुला समजून घेणारा तुझ्यावर प्रेम करणारा जोडीदार तुझ्या आयुष्यात असावा....
दीपा : पल्लवी!!काहीतरीच काय...
पल्लवी : काहीतरीच काय नाही... खरंच.... तूला एक चांगला जीवनसाथी मिळायलाच हवा... तर माझी अट अशी आहे की माझ्या लग्नाआधी तुझे लग्न व्हायला हवे...
दीपा :😳 पल्लवी हे कसं शक्य आहे?.
पल्लवी : आई!! का शक्य नाही...
दीपा : अगं पण तुझे आजी आजोबा आत्या काय म्हणतील??
पल्लवी : कोण आजी आजोबा? आई बाबा गेल्यावर प्रॉपर्टी साठी चक्क तुला घरातून हाकलून लावलं ते आजी आजोबा??🤔... आत्याचं तर तू सांगूच नकोस...आपण जेव्हा संकटात होतो तेव्हा आपल्यासोबत कोण होतं.... नशीब मामाने साथ दिली म्हणून आपल्याला हे छत तरी मिळालं...तू आत्मनिर्भर होऊ शकलीस... स्वतःचं छोटं बुटीक टाकू शकलीस... पण त्यांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत ना... मग तुला एखादं हक्काचं माणूस नको का?
पल्लवीचे ते शब्द ऐकताच दीपाच्या डोळ्यात पाणी🥺 आले... खरंच किती मोठी झाली आपली दीपा....
पल्लवी : आई!!तुझ्या डोळ्यात पाणी??
दीपा : खरंच माझी लेक किती मोठी झाली आहे....
पल्लवी : आई तू हॊ म्हण ना... अगं मी तुझ्यासाठी काही स्थळं पण पाहून ठेवलेत...
दीपा : काय?😳 हे तर उलटेच झाले....
पल्लवी : अगं आई आता काय उलटे अन काय सुलटे?? तू हॊ म्हण ना...
दीपा : हं....
पल्लवी :ये 💃💃💃 मामा!! लवकर ईकडे या आई तयार झाली...
ही पोरगी नुसते एका मागे एक धक्के देत आहे😳...दादाला आधीच पटवलेले दिसते....दीपा पल्लवी कडे पाहात राहिली...
पल्लवीचे मामा : वा पल्लवी वा ईतक्या वर्षात आम्ही जे नाही करू शकलो ते तू करून दाखवलंस.. I am proud of you my child....
दीपा : 😳 काय दादा!! म्हणजे तू पण यात सामील होतास??
पल्लवीचे मामा : अगं दीपा!!सामील वगैरे काही नाही... पण कालच दीपा माझ्याशी यावर बोलली... खरं सांगू का मला पण नेहमी वाटायचं की तुला कुणीतरी जोडीदार असावा... सुरुवातीला तुला म्हणालो देखील पण तू नकार दिल्यावर काळाच्या ओघात राहून गेलं.... पण आता जेव्हा पल्लवीच असं म्हणत आहे तेव्हा लोकलज्जेची भीती देखील आता राहिली नाही....
दीपा :हं....
मग काय आता दीपासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली.... चांगले स्थळ मिळाले देखील.... पल्लवीने आणि तिच्या मामाने छोटेखानी थाटामाटात लग्न लावून दिले. आणि मग ठरल्याप्रमाणे पल्लवीचे लग्न झाले...
तात्पर्य : आनंदाने जगण्याचा अधिकार सर्वांना आहे...
विधवा विवाह, पुनर्विवाह यांना कश्याही प्रकारे तोलू नये. ते होण्यामागे विविध कारणे असु शकतात.. त्या व्यक्तीच्या त्या वेळ च्या परिस्थितीवर ते अवलंबून असते.
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या