©®डॉ सुजाता कुटे
सध्याचे मृत्यूचे तांडव बघता माझ्या मते तरी आपली काही नैतिक जबाबदारी बनते आहे. असे तुम्हाला वाटत नाही का.
मागील वर्षाचा अनुभव घेता lockdown हा पर्याय लोकहिताचा नाही असं बऱ्याच व्यापारी वर्गांना आणि ज्याचं पोट अगदी हातावर आहे अश्या लोकांना ते वाटत आहे. त्यांच्या दृष्टीने ते अगदीच योग्य आहे.
पण आता अशी वेळ आली आहे की कोरोनाची रुग्ण संख्या खूप वाढत आहे आणि त्यांच्या उपचारासाठी icu चा तुटवडा,remdesvir चा तुटवडा किंवा होणाऱ्या लसकरणाचा तुटवडा जाणवत आहे.
बरं काही लोक असेही आहेत की कोरोना वगैरे काहीच नाही असं देखील म्हणायला कमी करत नाहीत.
काही जण राजकारण मध्ये आणत आहेत.
पण खरं सांगायचं झालं तर सरकारने केलेल्या उपाययोजना अगदीच स्तुत्य आहेत.
त्यांनी अगदी ग्रामीण भागातही मोठ मोठे ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत.
मी काही कुठल्या पक्षाची नाही. सरकारी डॉक्टर आहे.©®डॉ सुजाता कुटे.
सरकारने केलेले नियोजन स्वतः अनुभवत आहे.
फक्त सांगायचा मुद्दा इतकाच की जी वाढती रुग्णसंख्या आहे अश्या परिस्थितीत ती तर आपणच कमी करू शकतो ना. हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.
काहीतरी सुवर्णमध्य साधला तर नक्कीच हे शक्य आहे ...
बाहेर जाण्याची गरज नसेल तर स्वघोषित lockdown करून.
बाकी मास्क आणि सॅनिटायझर तर सोबतीला आहेतच की...
आपण ईतकं जरी पाळलं तर सध्यस्थीतीला आपल्या आप्ताला आय सी यू मध्ये रिकामा बेड मिळेल... वेळेवर उपचार मिळतील, लसीकरणाला वेळ मिळेल आणि पुढे होणारी जीवित हानी निश्चितच कमी होईल...
बाकी तुम्ही सुज्ञ आहात.. विचार करा...जमेल त्या पद्धतीने आमलात आणा.. नक्कीच आपण कोरोनाच्या या संकटातूनही बाहेर येऊ. पण ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने स्वीकारलं तरच... काय पटतंय ना??
©®डॉ. सुजाता कुटे
0 टिप्पण्या