नायक तुम्ही सुद्धा

बहुतांश हिंदी मराठी सिनेमांमध्ये एक सीन दाखवला जातो. की नायकाच्या अती जवळची व्यक्ती असते त्या व्यक्तीला काही अपघात झालेला असतो, गोळी लागलेली असते किंवा मारहाण झाल्यामुळे तो गंभीर जखमी झालेला असतो.

 त्या व्यक्तीला धावत पळत तो नायक रुग्णालयात घेऊन येतो.
 मग तिथे ड्युटीवर असणारा डॉक्टर त्या रुग्णाला न तपासता आधी ही पोलीस केस आहे आणि तुम्ही आधी पोलीस केस करा. मग आम्ही उपचार करतो असे म्हणतो अश्या प्रकारचा सीन दाखवला जातो.

मग काय नायकाला एकदम राग येतो. नायक तिथेच धिंगाणा घालायला सुरु करतो आणि डॉक्टरची गच्ची पकडतो. डॉक्टरांना धमकावतो. मग घाबरून डॉक्टर त्या रुग्णाला ताबडतोब उपचारासाठी आत वॉर्ड मध्येकिंवा ऑपेरेशन थिएटर मध्ये नेतो.

आणि या नायकाची जवळची व्यक्ती वाचते.

ते पाहून सिनेमा पाहणारी जनता खूष होते. टाळ्या वाजवते....डॉक्टरला धमाकावलं म्हणून ती व्यक्ती वाचली असा ग्रह ते करून घेते .

प्रत्येकाला वाटायला लागतं की आपण सिनेमाच्या नायकासारखेच खऱ्या आयुष्यातील नायक आहोत.

 मग काय अश्याच प्रकारची दमदाटी तो त्याच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात हॉस्पिटल मधील डॉक्टरांना करण्याचा प्रयत्न करतो.

पण खरंच वास्तवात तसे असते का? खरंच डॉक्टर अशी रुग्णाची अडवणूक करतात का? आणि नातेवाईकांना पोलीस केस करायला सांगतात का?...

तर याच उत्तर "नाही " असं मी देईन.

मग अश्या रुग्णांचं काय होतं??

तर तुमच्या माहिती साठी सांगते अश्या गंभीर रुग्णांचे ताबडतोब उपचार सुरु केले जातात..सोबतच पोलीस केस साठी अश्या रुग्णांची वेगळी नोंद केली जाते. पोलिसांना लेखी तिथे असणारा ड्युटी डॉक्टर कळवतो..

मग आता मला सांगा ईथे रुग्णाची अडवणूक होते कुठे?

ते सिनेमा वाले आणि आजकाल सिरीयल वाले देखील त्यांचा टी आर पी वाढवण्यासाठी हे सर्व दाखवतात आणि शोकांतिका अशी आहे की आपणच ते खरं मानतो.
लेख आवडल्यास like करा, comment करा, share करायचा असल्यास नावासहित share करा.
©®डॉ सुजाता कुटे
 ©® Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या