कधी नाही ते थरथरत्या हाताने सूर्याने एका सुंदर मुलीला "अन्विताला "मारण्याची सुपारी घेतली.
पण त्या आधी सूर्याला तिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं होतं.
तिच्या मदतीने तिच्या वडिलांच्या गटामध्ये त्याला घुसायचं होतं.त्यांची सगळी प्रॉपर्टी, उद्योगधंदे, देशा विदेशात काय काय चालते याची सगळी माहिती मिस्टर ब्लॅक यांना त्यांनी सांगितलेल्या वेळेवर काटेकोर पणे द्यायची होती.
मिस्टर ब्लॅक म्हणजे एकदम कुख्यात गुंड. त्याचं खरं नाव रामचरण पण जेव्हापासून त्याने गुन्हेगारी जगात प्रवेश केला..तेव्हापासून त्याने स्वतःची ओळख मिस्टर ब्लॅक अशी ठेवली.
तसा रामचरणचा देखील एक भूतकाळ होता. रामचरण म्हणजे अत्यंत पापभीरू, सतत देव देव करणारा शांत सुस्वभावी असा होता. पण त्याचे ज्या मुलीवर जीवापाड प्रेम होते तीने ऐन लग्नाच्या दिवशी धोका दिला आणि त्याच्या सख्ख्या मित्रासोबत ती पळून गेली. तेव्हा पासून तो सैरभैर झाला होता.त्याचाच परिणाम म्हणजे तो गुंडगिरी करायला लागला. त्याच्या गुंडगिरीचा प्रभाव ईतका वाढला की कुणी त्याचं नाव जरी काढलं तरी समोरची व्यक्ती थरथर कापत असे.
ज्याने या मिस्टर ब्लॅकशी टक्कर घेतली त्याचा दिवस ब्लॅक डे ठरेल असं त्याचं ब्रीदवाक्य होतं. आणि तो ते ब्रीदवाक्य खरं करुन दाखवत असे. त्या मुळे त्या शहरात त्याचा खूप मोठा दरारा होता. लोकं शक्य तो वर त्याच्या नादी लागत नसत.
"सूर्या "म्हणजेच "सूर्यकांत "एकदम देखणा, रांगडा त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं . त्याचा चेहरा अगदी राजबिंडा होता.तो जर समोर आला तर कुणीतरी राजघराण्यातील व्यक्ती आपल्या समोर उभी आहे असाच भास होत असे.
पण वास्तवात सूर्या हा एकदम गरीब घरात जन्मला होता. त्याचे वडील त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षी अपघातात देवाघरी गेले.
सुरुवातीला त्याची आई एका खाणावळीत काम करुन उदरनिर्वाह करत असे.
पण एक दिवस अचानक चोरीच्या आरोपावरून सूर्याच्या आईला खाणावळीच्या मालकाने काढून टाकलं तेव्हा सूर्या जेमतेम बारा वर्षांचा होता.
चोरीच्या आळामुळे सूर्याच्या आईने हाय खाल्ली आणि त्या धक्क्याने ती देवाघरी गेली.या गोष्टीचा सूर्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. ही दुनिया खऱ्याची नाहीच असे त्याने ठरवून टाकले होते.तेव्हापासून तो एकलकोंडा झाला होता.
आई वारल्यानंतर सूर्याची रवानगी बाल सुधार गृहात झाली होती. बाल सुधार गृहात गेल्यावर सूर्याने मात्र मागे वळून पाहिले नाही.
आधीच अभ्यासात हुशार असणारा सूर्या आता खाण्यापिण्याची व्यवस्था झाल्यामुळे वर्गात सर्वप्रथम राहू लागला व बारावी मध्ये मेरीट मध्ये आला.आणि त्याचा एका चांगल्या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये नंबर लागला होता. त्याचं सर्व काही सुरळीत चाललं होतं.
पण अचानक त्याच्या आयुष्याने कलाटणी दिली. आणि त्याचा संबंध गुन्हेगारी जगताशी आला......
योगायोगाने ती सुंदर मुलगी "अन्विता "सूर्याच्या कॉलेज मध्येच येणार होती.
सूर्या इंजिनियरिंग च्या शेवटच्या वर्षाला तर तिचं नुकतंच ऍडमिशन झालं होतं.
त्याला अन्वीताचा आगा पिच्छा काहीच माहिती नव्हतं.पण मिस्टर ब्लॅक ने तीची सुपारी दिल्यामुळे आता सूर्याला सगळ्याच गोष्टी कराव्या लागणार होत्या.
पण तिला गाठायचं कसं..आणि अश्या तरुण मुलीला जाळ्यात अडकवून मिस्टर ब्लॅकला काय माहिती काढायची आहे?... मला काहीही माहिती न देता मिस्टर ब्लॅक?.... जाऊदे....आता वेळ आली की आपल्याला कळेलच.
सध्या तर काय आपल्याला मिस्टर ब्लॅकची आज्ञा पाळणं महत्वाचे आहे. असा विचार करत सूर्या कॉलेज मध्ये गेला.
कॉलेज मध्ये जाताच त्याला जागोजागी मुला मुलींचे घोळके दिसत होते सिनियर मुले मुली ज्युनियर मुलींचे introduction घेण्यात मग्न होते.
तितक्यात सूर्याची नजर स्विफ्ट डिझायर कारमधून उतरणाऱ्या मुलीकडे गेली
बापरे 😍😍ईतकं सोंदर्य... खरंच देवाने हिला नक्की वेळ देऊन तयार केलं असणार... तीने साधासा पिवळ्या रंगाचा सलवार कुर्ता घातलेला होता... गोरा रंग, निळे डोळे, लांबसडक सरळ केस, चेहऱ्यावर हलकासा ओळखू न येणारा मेक अप... हसली की गालावर खळी...तिला बघुन आपण कुठल्या कामासाठी आलो आहे हे क्षणभर सूर्या विसरून च गेला.
जागे व्हा महाशय असं मनात म्हणत सूर्या जरा भानावर आला. आता या अन्विताला शोधायचं कसं?? तितक्यात सूर्याच्या मोबाईलची मेसेंजरची बीप वाजली.
मिस्टर ब्लॅक?? आता याने काय पाठवले आहे असा विचार करत सूर्याने फोटो डाउनलोड केला.😳हीच ती अन्विता..हिची सुपारी 😳 आधी मैत्री करायची आणि नंतर मी तिला मारून... नाही नाही... मिस्टर ब्लॅक मी असं काम नाही करू शकणार..पण काय करणार? आपले हात दगडाखाली आहेत..
.जाऊ दे सूर्या आता जास्त विचार करू नकोस...कामाला लाग नाहीतरी साधं सरळ असणार ते सूर्याचे आयुष्य कसले??... असे कंगोरे असणारच....असा विचार करत सूर्या अन्विताच्या दिशेने चालू लागला..
अन्विताला सोडून स्विफ्ट डिझायर तिथून निघून गेली... तिला सोडणारा बहुदा ड्रायव्हर असावा असा विचार करत सूर्या अन्विताजवळ पोहोचला.
काही सिनियर मुले कसून अन्विताचे इंट्रो घेत होते.. इंट्रो कश्याचा?? इंट्रोच्या नावाखाली त्यांची रॅगिंग घेणे चालू होते.काही मुली तिच्यासोबत अगदी उद्धटसारखं बोलत होत्या .तर काही जन अन्विता समोर उगाचच खी खी करत होती.
समोरचा जमाव बघुन खूपच घाबरली होती. तिच्या डोळ्यातून 🥺अश्रू वाहत होते.
अन्विताच्या डोळ्यातील अश्रू पाहून सूर्याला कसं तरीच झालं. आता अन्विताशी मैत्री करण्याची हीच योग्य संधी आहे असा विचार करून सूर्या ने अन्विता जवळ उभ्या असलेल्या जमावाला करडया आवाजात विचारले?? काय चालू आहे रे तिकडे? तुम्हाला दिसत नाही का ती मुलगी किती घाबरली आहे ते?
सूर्याचा आवाज ऐकताच अन्विताने तिचे डोळे पुसले आणि डोळे किलकिले करून सूर्याकडे पहायला लागली.
आपल्या बोलण्याने फरक पडत आहे हे जाणल्याने सूर्याने पुन्हा तिथल्या जमवावर शब्दांची तोफ डागली.. चला निघा ईथुन तुम्हाला दिसत नाहीयेका ती मुलगी किती घाबरली आहे. तरी तुमचं खी खी खी चालूच...
तो जमाव सूर्याला ज्युनियर होता. त्या मुळे सगळे जण मान खाली घालून तिथून निघून गेले.
अन्विताला जरा हायसं वाटलं..
अन्विता : थँक्स 😢
सूर्या : अरे तुझे डोळे अजूनही पानावलेले?? आता तुला घाबरण्याची गरज नाही कारण सध्या तू सिनियरमोस्ट मुलाजवळ उभी आहेस.. बाय द वे मी सूर्या.. सूर्यकांत इनामदार...पण सगळे मला सूर्या च म्हणतात.. तू तुझे नाव नाही संगितलेस??
अन्विता : हॅलो!!मी अन्विता, अन्विता महाजन.. फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्स.. इथलीच आहे...
ही जशी गोड दिसते तसा हिचा आवाज देखील किती गोड आहे. सारखं ऐकत रहावं असं वाटतं.. खरंच ईतक्या गोड नाजूक मुलीशी मिस्टर ब्लॅक ची काय दुश्मनी असेल??
सूर्या विचारात असतानाच परत सूर्याच्या फोन ची रिंगटोन वाजली..
सूर्याने त्याचा फोन बघितला 🙄मिस्टर ब्लॅक... बरं अन्विता!!मला महत्वाचा कॉल येत आहे.. तुला जर परत कुणी त्रास दिला तर त्यांच्या समोर फक्त माझं नाव घ्यायचं.. आणि त्यांनी ऐकलं नाही की मला फोन करून सांग...हा माझं फोन नंबर घे 7542........चल बाय
अन्विता :बाय 😊
सूर्या : हॅलो!!बोला बॉस!!
मिस्टर ब्लॅक : फोन उचलायला ईतका वेळ 😡??
सूर्या : बॉस!!मी तुमचेच काम करत होतो..
मिस्टर ब्लॅक : रँगिंग करणाऱ्या जमावाला बाजूला पाठवून? 😡
सूर्या : 😳 तुम्हाला कसं?
मिस्टर ब्लॅक : सूर्या!!मी मिस्टर ब्लॅक आहे समजलं... माझ्या पासून काहीच लपत नाही..
सूर्या :पण तुम्हीच म्हणाले ना की तिच्याशी मैत्री कर, प्रेमात पाड वगैरे....
मिस्टर ब्लॅक : हम, ठीक आहे गो अहेड, तसं माझे माणसं पण तुझ्या मागावर आहेत. त्या मुळे मला अपडेट्स आपोआपच मिळत राहतील...असं म्हणून मिस्टर ब्लॅक एकदम छद्मी पणाने हसला😂😂... त्याच्या हास्यात क्रूरता दिसत होती आणि सूर्याला अन्विता आणि मिस्टर ब्लॅक हे दोघेही दोन टोके दिसत होती...
सूर्या मात्र माझ्याच नशिबी असं का म्हणून हताश झाला होता.
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 2 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
2 टिप्पण्या
मस्त सुरवात ...पुढचे भाग वाचायची उत्सुकता..
उत्तर द्याहटवाधन्यवाद dear
हटवा