अन्विता एका शास्त्रज्ञाची मुलगी होती..
जशी ती दिसायला सुंदर तशीच बुद्धिमानही होती.
लाडाकोडात वाढलेली अन्विता सध्या तीची ओळख म्हणजे एका प्रसिद्ध शास्त्रज्ञाची मुलगी अशीच होती. तरी देखील बऱ्याच ठिकाणी तिला तिच्या सोंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे तीची एक वेगळी ओळख होती.
घाबरून बावरलेली अन्विता तिच्या वर्गात पोहोचली. तिचा पहिला दिवस सगळ्या मुलामुलींशी ओळख करण्यात आणि इंट्रो देण्यातच गेला.
आता मात्र सिनियर मुले अन्विताशी खूप अदबीने वागत होती. कुणी एखाद्या व्यक्तीने उद्धट पणा केला तर सूर्याचे नाव ऐकू येई मग अन्विताशी उद्धट पणा करणारा तिथून मान खाली घालून निघून जाई.
कॉलेज मध्ये सिनियर मुलांच्या वागण्याने अन्विता मात्र पुरती भांबावली होती.
सूर्याचा दरारा आहे की सूर्या सगळ्यात सिनियर आहे म्हणून सगळे जण आपल्याशी अश्याप्रकारे वागत आहेत हे मात्र तिला समजत नव्हतं.
सगळं काही आपल्या विचार करण्या पलीकडचं आहे.
पण जाऊ दे त्या मुळे आपला फायदाच होत आहे. अन्विता आम खाओ आम, गुठलियो से हमको क्या लेना देना...असा विचार करतच तिच्या घरी पोहोचली.
अन्विता तिच्या आई बाबांचे लाडके एकुलते एक कन्यारत्न.... अन्विताने फक्त तोंड उघडायला हवं ती वस्तू तिच्यासमोर हजर झालीच समजा.
घरी पोहोचल्या पोहोचल्या अन्विताच्या बाबांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. एक बाप म्हणून त्यांच्याही मनात खूप धाकधूक होती. रॅगिंग प्रकार फार भयंकर असतो हे त्यांनी स्वतः त्यांच्या कॉलेजच्या वेळेस अनुभवलं होतं.त्या मुळे एक वेगळीच धाकधूक त्यांच्या मनात होती.
अन्विता : बाबा बाबा बाबा अहो बाबा!!मला जरा श्वास तर घेऊ द्या... मी सगळं काही सांगते...जरा फ्रेश होऊन आले..
अन्विता ची आई : अन्विताचे बाबा!!ईतकी काय घाई आहे...
अन्विताचे बाबा : अगं जानकी!!तुला नाही समजायचं... हे बापाचं काळीज..
अहो बाबा!!आज तर मज्जाच झाली.असं म्हणत अन्विताने कॉलेज मध्ये काय काय घडलं ते सांगितलं. बाबा!!आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. सूर्या मुळे मला आता बिलकुल त्रास होणार नाही.
अन्विताची आई :😳 अन्विता बेटा!!सांभाळून बरं का? नाहीतर उद्या मला म्हणशील की मला सूर्या....
अन्विता :आई!!थांब पुढे काहीच बोलू नकोस.. मी असं तसं काहीच करणार नाही.. आय मीन... सूर्यासोबत तर नक्कीच नाही.. अगं तो सिनियर मोस्ट आहे.. म्हणून असेल कदाचीत.
ईकडे सूर्या मात्र अतिशय बेचैन झालेला होता. त्याच्या डोक्यात नुसता गोंधळ उडालेला होता. एक तर अन्विताचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता आणि दुसरीकडे मिस्टर ब्लॅकचे ते वाक्य सतत त्याच्या कानात घुमत होते.
मैत्री, प्रेम धोका आणि नंतर खून ही... आयुष्यात कधी जे करायचं नव्हतं ते सगळंच आता आपल्याला करावं लागणार... शेवटी नशिबात असेल तेच घडणार.... विचार करत करत सूर्याची पावले बार कडे वळाली...
बार कडे जाऊ लागताच सूर्याचा फोन वाजला... फोन मिस्टर ब्लॅक चा फोन 🤔 आता कशासाठी केला असेल??विचार करत करत सूर्याने फोन उचलला.... बोला बॉस!!
मिस्टर ब्लॅक : ईकडे उजव्या बाजूच्या दरवाजाने आत ये...
सूर्या :बॉस 😳तुम्ही?? ईथे बार मध्ये...
मिस्टर ब्लॅक : सूर्या!! तुला सांगितलं ना... मी लक्ष ठेवून आहे म्हणून😂😂...
मिस्टर ब्लॅकशी फोनवर बोलत बोलत सूर्याने उजव्या दरवाजातून बार मध्ये प्रवेश केला..बार मध्ये प्रवेश करताच सूर्या अजून गोंधळून गेला...
बारच्या मुख्य प्रवेशद्वारातून बार वेगळाच दिसत असे.. पण आज पहिल्यांदाच वेगळाच प्रवेश द्वार पाहिला आणि बार... बार कसला आपल्या मिस्टर ब्लॅकचा अड्डाच वाटत आहे.😳 सगळे जण मिस्टर ब्लॅकची सेवा करताना दिसत आहेत... मिस्टर ब्लॅक एका खुर्चीवर बसलेला आणि एक सोन्दर्यवती ललना खुर्चीच्या मागे उभं राहून मिस्टर ब्लॅकचे हात दाबत होती ....
मिस्टर ब्लॅक :वेलकम सूर्या!!मिस्टर ब्लॅकच्या या दुनियेत तुझं स्वागत आहे...
सूर्या :बॉस 😳
मिस्टर ब्लॅक :अरे हा माझाच बार कम रेस्टॉरंट आहे.. तू नको विचार करूस मनसोक्त एंजॉय कर....
ए छोटू!!याला काय हवं नको ते बघ.. आणि बिल घेऊ नकोस... हा माझा खास माणूस आहे.... याचा चेहरा लक्षात ठेव....
याच्याकडून कधीच बील घायचं नाही... समजलं.. एकदम करडया आवाजात मिस्टर ब्लॅकने छोटू ला ताकीद दिली.
काय यार मी जरा खऱ्यांच्या दुनियेतून बाहेर यावं असा विचार केला तर इथेही मिस्टर ब्लॅक आहेतच.😢
मिस्टर ब्लॅक :अरे सूर्या!!उभा का? ये ईकडे... सूर्या!!सुरुवात तर छान झाली...असंच काम चालू दे...पण जरा लवकर बरं का... ते काय आहे ना माझ्याकडे जास्त वेळ नाहीये....अशी जवळ जवळ प्रेमळ वॉर्निंग मिस्टर ब्लॅकने सूर्याला दिली
सूर्या :हो बॉस!!मी आजच अन्विताची सगळी कुंडली काढतो...
मिस्टर ब्लॅक :ठीक आहे...माझं लक्ष आहेच 😊 बरं जाऊदे.. हे घे... एक 🍺व्हिस्कीचा ग्लास समोर करत मिस्टर ब्लॅक सूर्याला म्हणाला...
सूर्याने व्हिस्की 🍺घ्यायला सुरुवात केली खरी पण एका विचित्र दबावाखाली त्याचं मन लागत नव्हतं... कशी बशी व्हिस्की रिचवून कामाच्या बहाण्याने सूर्या तेथून बाहेर बारच्या पडला...
बारच्या बाहेर पडल्या पडल्या सूर्याने सुटकेचा निःश्वास सोडला.
सुटलो बुवा बॉसच्या तावडीतून... असा विचार करत सूर्या त्याच्या घराच्या बाहेर असलेल्या लॉन मधल्या बेंच वर बसला आणि दिवसभरात काय घडलं याची उजळणी करू लागला.... आजचा दिवस किती वेगळा होता... किती ते सोंदर्य... आजवर कधीच पाहिलं नव्हतं... तिच्या चेहऱ्यात एक वेगळीच निरागसता होती.... खरंच आपल्या बॉसचं या निरागस अन्विताशी काय वाकडं असेल??किती ती चेहऱ्यावरची निरागसता....
काय करणार भोगा आता आपल्या कर्माची फळं... काय गरज होती तुला झटपट श्रीमंत होण्याची??त्या प्रदीपच्या नादाला लागलास आणि छोटे मोठे गुन्हे करायला लागलास... नशिली पदार्थांची विक्री करायला लागलास.... नुसतं पैसा पैसा करत होतास... आता?
पण आता? तू तर... सूर्या तुला तरी योग्य वाटतं का अश्या प्रकारे जीव घेणं... तसंही आपण काय करत होतो म्हणा... स्लो पॉयजन ची विक्री करून लोकांच्या जिवाशी खेळतच होतो ना.... आणि हा बॉस?? बॉस तर माझ्यावर सतत लक्ष ठेवून आहे... जसं की याचा माझ्यावर विश्वासच नाही... कधी कधी वाटतं हे सगळं सोडून द्यावं.. पण आता सुटका नाही.. बघितलं नाही का असाच प्रयत्न राकेश ने केला होता.... मग काय त्याची अवस्था न घर का न घाट का अशी झाली होती....
मिस्टर ब्लॅकच्या चक्रव्युव्हात आपण पुरते अडकलो याची जाणीव सूर्या ला झाली.
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 3 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
0 टिप्पण्या