दुसरा दिवस उजाडला... अन्विता नेहमीसारखीच तयार झाली..
अन्विता :चल आई!!निघते मी... कालचा दिवस तर छान होताच... पण आजचा दिवस कसा जातो बघू...
अन्विताचे बाबा : अन्विता बेटा!!...आपली स्विफ्ट डिझायर घेऊन जा... म्हणजे तुला बस स्टॉप वर वाट बघायला लागणार नाही...थांब जरा मी लागलीच वैजूला बोलावतो
अन्विता : नाही नको बाबा!! उगाचच वैजूला बोलवा त्याला सोडवायला सांगा...आता उशीरही होईल...मी बसनेच जाते...उगाचच खर्च कशाला??आणि कॉलेज साठी लागेल तितक्या बसेस आहेत.
अन्विताचे बाबा : अगं तू कशाला खर्चाचा विचार करतेस? सगळं काही तुझंच तर आहे ना...
अन्विता :बरं बाबा!!आज मी बसने जाऊन बघते जर मला त्रास झाला तर फोर व्हिलर नेईन..
अन्विताचे बाबा : म्हणजे तू माझं नाहीच ऐकणार तर🙄... ठीक आहे जा... पण काही त्रास वाटला तर कॉल📳 करशील...
अन्विता : बाबा!!कित्ती काळजी करणार आहात तुम्ही... नाही म्हटलं तरी पुढच्या महिन्यातच अठरा पूर्ण होणार आहे म्हटलं... बरं चला निघते मी...असं म्हणून अन्विता घराबाहेर पडली...
अन्विताचे बाबा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघतच राहीले...
अन्विताची आई : अहो शास्त्रज्ञ साहेब !!तुमचे आता हे हाल आहेत तर मग तिच्या लग्नानंतर काय करणार??
अन्विताचे बाबा :मी ठरवलं आहे... मी तिच्यासाठी घर जावई बघणार....
अन्विताची आई : अन तिनं मुलगा बघितला तर....
अन्विताचे बाबा : त्याला घर जावई होण्याची अट टाकेन... पण मला नाही वाटत आपली अन्विता असं तसं काही करेल...
अन्विताची आई : असं तसं म्हणजे... तुम्ही आपला भूतकाळ विसरला आहात का? आपलं ही लव्ह मॅरेज आहे म्हटलं...
अन्विताचे बाबा : जानकी!!शेवटी काय असते बापाची काळजी हे मात्र बाप झाल्यावरच समजतं बरं का?
झपझप पावले टाकत अन्विता बसटॉपच्या दिशेने निघाली...
सूर्या कॉलेज मध्ये आपल्या मित्रांच्या गराड्यात उभा होता.. तितक्यात अचानक त्याला त्याच्या हृदयाचा एक ठोका चुकला .. अरे हे काय...
समोर बघताच तो अन्विताला बघतच राहिला... अन्विताने अबोली कलर चा ड्रेस घातलेला होता... किती ते अमाप सोंदर्य... काय ती तीची अदा... उफ्फ....उजव्या हाताने ती तिचे केसं कानामागे मागे करत होती....
सूर्या!!सूर्या!!प्रदीपच्या आवाजाने त्याची तंद्री भंग झाली...
सूर्या :काय प्रदीप!! माझी तपस्या भंग केलीस तू...
प्रदीप : सूर्या!! अरे तू तर खरोखरच अन्विताच्या प्रेमात पडलेला दिसतोस... या तपस्ये पेक्षा दूसरी मोठी तपस्या आपल्याला करायची आहे... विसरलास का? नाहीतर मिस्टर ब्लॅक आठवण करून देईल..
सूर्या : शु शु... ईथे मिस्टर ब्लॅकचं नाव घ्यायचं नाही असं आपलं ठरलं आहे ना.... अरे ते बघ सोंदर्याचा झरा अगदी खळखळून माझ्याजवळ वाहत येताना दिसतोय...
अरे सूर्या!!ती तुझ्याकडेच येतेय...
अन्विता :हॅलो.. गुड मॉर्निंग सूर्या सर!!
सूर्या : अं ह गुड मॉर्निंग!! अं एनी प्रॉब्लेम??
अन्विता : नाही सूर्या सर!!प्रॉब्लेम नाही.. मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला आले... काल मी खूप घाबरून गेले होते... तुम्हाला व्यवस्थित धन्यवाद पण नाही म्हणू शकले... म्हणून आज...
सूर्या : धन्यवाद😡... मला असं धन्यवाद नकोय खोट्या रागाने सूर्या म्हणाला...
अन्विता : म्हणजे... सॉरी... माझं काही चुकलं का?
लागलीच सॉरी... मनातल्या मनात स्मित करत सूर्या म्हणाला... तू जेव्हा माझ्यासोबत कॅन्टीनमध्ये एक कप कॉफी घेशील तेव्हाच मी तुझं धन्यवाद स्वीकारेन...
अन्विता : ईतकंच ना.. सांगा सर कधी कॉफी घ्यायची आपण??
सूर्या : आता 9 वाजले आहेत...अकरा वाजता कॅन्टीन मध्ये ये... आणि हो... सर नाही नुसतं" सूर्या " समजलं ना...
ताकीद देण्याच्या भाषेत सूर्या म्हणाला.
अन्विता : ठीक आहे 😊सूर्या!!
आता कॅन्टीन मध्ये मी हिच्याशी मैत्री करणार.... सूर्या आपले लवकरच एक एक पाऊल पुढे पडत आहे... ग्रेट गोइंग... मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटत आणि आज मै उपर गाणं गुणगुणत सूर्या त्याच्या लेक्चर हॉल मध्ये घुसला...
दोन लेक्चर झाले सूर्या मात्र अन्विताशी काय काय बोलायचं आहे त्याची मनात उजळणी करत होता...
अन्विताच्या वर्गात नव्या नव्या ओळखी होत होत्या.. तिच्या सोंदर्या कडे बघुन वर्गातील प्रत्येक मुलगा तिच्याशी ओळख करू पहात होता तर प्रत्येक मुलगी अन्विताला जास्त भाव मिळतो म्हणून तोंड वाकडं करत होती...
लोकलाईट की हॉस्टेलाईट?? एक मोठा भिंगाचा चष्मा घातलेल्या मुलीने अन्विताला विचारलं..
अन्विता : लोकलाईट तू बेला ना??
बेला :हो... पण तुला कसं माझं नाव माहिती?
अन्विता :अगं आता त्या मुलाने तुला आवाज दिला ना... त्या वेळेसच ऐकलं मी...
बेला: ओ तो झुक्या...
अन्विता :झुक्या 🤔🙄😂😂😂... तू काय झुकरबर्ग म्हणालीस का??
बेला :अगं तो आहेच तसा... त्याची सतत काही तरी शोध मोहीम चालू असते... त्यात तो कुठलाही technical प्रॉब्लेम पटकन सोडवतो... म्हणून मग मीच त्याचं नाव झुक्या ठेवलं अगदीच कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून..
अन्विता :हो का? भारीच...तू सांग ना तू हॉस्टेलाईट की लोकलाईट??
बेला : अगं मी हॉस्टेलाईट... अन्विता!!तुझी तर मात्र ऐश आहे... सूर्या मुळे ना तुझा इंट्रो झाला ना रॅगिंग...
अन्विता : हो गं हे मात्र खरं आहे....अरे हो...
धावत पळत अन्विता कॅन्टीन कडे जाण्यासाठी निघाली तर सूर्या आधीच कॅन्टीनमध्ये येऊन बसला होता...
अन्विता स्मित 😊करत त्याच्यासमोर येऊन बसली...
सूर्या : ए दामू!!दोन कॉफी बनवून आण....
काय म्हणते अन्विता कसं वाटलं कॉलेज?
अन्विता : छान... सूर्या सर!!तुमची ब्रँच कुठली?
सूर्या : कॉम्प्युटर... तुझी इलेक्ट्रॉनिक्स ना...आणि विसरलीस ना..... नुसतं सूर्या म्हण... सूर्या सर नाही..
अन्विता :ok सूर्या 😊... हो माझी ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स....
सूर्या :हे बघ अन्विता!!मला घुमवून फिरून बोलायला आवडत नाही... माझ्याशी मैत्री करशील??
बापरे एकदम मैत्री??मला नुसती मैत्री चालेल पण हा सूर्या जर दुसऱ्या इंटेंशन ने म्हणत असेल तर? अन्विता विचार करत होती...
अन्विता!! काय झालं... काय विचार करत आहेस? सूर्या ने अन्विता ची तंद्री तोडली
अन्विता : काय?
सूर्या : अगं काय? म्हणत आहेस... तुला माझ्याशी मैत्री करायला अडचण आहे का?
अन्विता :अं.. नाही अडचण काही नाही... असा सिनियर सपोर्टिव्ह मित्र कुणाला नको? मी friendship करायला तयार आहे....
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 4 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
0 टिप्पण्या