अन्विताच्या मैत्रीसाठी मिळालेल्या होकाराने सूर्या मनोमन नाचू लागला...
पहिली पायरी जिंकली त्याचा त्याला तुफान आनंद झाला होता...
पण चेहऱ्यावरचा आनंद शिताफीने लपवत चेहऱ्यावर साधारण भाव आणत सूर्या अन्विताला थँक्स😊 म्हणाला...
अन्विताने देखील मैत्रीसाठी होकार दिला पण' मैत्रीच' हं.. असं मनात ठरवल्याने तीने स्वतःच्या डोक्याला जास्त ताण दिला नाही...
कॉफी घेऊन झाल्यावर दोघेही आपापल्या क्लास कडे वळाले...
सूर्याला मैत्रीची पहिली पायरी चढल्याचा मनोमन खूप आनंद झाला होता.. पण हे एक षडयंत्र आहे याचं खूप वाईट वाटत होतं..
का रे देवा माझी अशी परीक्षा घेतोस? मी ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करायचं... त्याच व्यक्तीच्या विरोधात हे षडयंत्र?? 😢
तितक्यात सूर्याचा फोन वाजला... सूर्याने फोन पाहिला... मिस्टर ब्लॅक?? आता याला मी अन्विताशी फ्रेंडशिप केली हे देखील कळाले असेल...याचे आता मला नवल नाही वाटणार..
विचार करत करत सूर्याने फोन📳 उचलला...
मिस्टर ब्लॅक : अभिनंदन!!आपल्या षडयंत्राची पहिली पायरी पार केल्याबद्दल...
सूर्या : धन्यवाद!! असाच आपला आशीर्वाद असू द्या😊...
मिस्टर ब्लॅक : पुढच्या पर्वा साठी best luck...
सूर्या : थँक्स 😊
आज तरी त्याने मला प्रपोज केलं पाहिजे... खडूस कुठला... नुसता मैत्री करतो काय... रोज मला त्याच्या स्विफ्ट डिझायर मध्ये आणून कॉलेज मध्ये सोडतो काय? त्याच्यासाठी... त्याच्यासाठी मी माझ्या आईबाबांशी खोटं बोलले 😢... सांगितलं रोज बसने कॉलेजला जाते म्हणून...
आणि आता?? तो मोहीत.. अजूनही मला प्रपोज करत नाहीये.. अन तो कालचा सूर्या 🤔 त्याने तर माझ्याशी मैत्री देखील केली...अन्विताच्या मनात नुसती चालबिचल चालू होती..
ते काही नाही बस्स झालं आता.... मीच त्याला प्रपोज करते.... आज कॉलेज सुटल्यावर मला घ्यायला येईलच ना.... तेव्हा....अन्विताने ठरवून टाकले होते....
ठरवल्यापासून अन्विता मात्र बेचैन झाली होती...आज मोहीतला सांगूनच टाकू असा पक्का निर्णय अन्विताने घेतला होता...
कॉलेज सुटलं... कॉलेज जवळच्या बस स्टॉप वर अन्विता मोहीत ची वाट पहात उभी राहिली...
सूर्या देखील त्याच्या घरी जाण्यासाठी म्हणून त्याच्या स्पोर्ट्स बाईक वर निघाला... थोडा पुढे गेल्यावर बस स्टॉप वर त्याला अन्विता दिसली... अन्विता सारखं सारखं घड्याळाकडे बघत होती...
अन्विताची चलबिचल पाहून सूर्या तिच्या जवळ आला... Hi अन्विता!! काय झालं...काळजीच्या सुरात सूर्या म्हणाला..
अन्विता : अं काही नाही😊... बसची वाट बघत आहे...
सूर्या : तुझी काही हरकत नसेल तर मी तुला घरी सोडलं तर चालेल??
अन्विता : नाही नको... कशाला उगाचच तुला त्रास...
हाय रे मै मरजावा... माझ्या त्रासाची ईतकी चिंता?? अन्विताचं नी माझं नक्कीच जुळेल...सूर्या मात्र दिवास्वप्न रंगवू लागला होता...
तितक्यात अन्विताचा फोन 📳वाजला....
Excuse me... असं म्हणत अन्विताने फोन रिसिव्ह केला...
काय?? किती वेळ??किती वाट बघायला लावणार आहेस... काय तुझी गाडी पंक्चर झाली का? बरं बरं...काय म्हणतोस कॅबने येऊ...बरं बरं...लागलीच येते...
सॉरी सूर्या!!मला एक खूप महत्वाचे काम आले आहे... मला लागलीच कॅबने जावं लागणार आहे...
सूर्या : अगं मग मी सोडतो की??
अन्विता : नाही नको मी कॅबनेच जाईल....
सूर्या : बरं, as you wish...
थँक्स... म्हणून अन्विताने लागलीच कॅब बुक केली...अगदीच पाच मिनिटात कॅब हजर झाली... कॅब येईपर्यंत सूर्या अन्विताजवळ थांबला होता...
कॅब आली निघते मी बाय असं म्हणून अन्विता कॅब मध्ये बसली...
का नसेल आली आपल्या सोबत ही... बाईक वर नको वाटलं असेल का?? माझी अती घाई तर नाही होत आहे ना...विचार करतच सूर्या त्याच्या घरी जायला निघाला.
मोहीतने आपल्याला ईथे का बोलावलं असेल... हे तर पंक्चर काढण्याचं ठिकाण ही दिसत नाहीये.. कॅबमधूनच विचार करत करत अन्विताची नजर त्याला शोधू लागली..
तितक्यात तिला मोहीत दिसला... किती हँडसम दिसतोय हा... आज तर नेहमी पेक्षा खूप छान दिसत आहे... हं अबोली कलरचा शर्ट ... मला मॅचिंग....
अन्विता कॅबमधून उतरताच मोहीतने त्याचे दोन्ही कान पकडले... सो सॉरी अन्विता!! अगं मला वेळेतच यायचं होतं... पण??
अन्विता : अरे मोहीत... गाडी पंक्चर झाली ना... ते थोडीच तुझ्या हातात होतं? बरं ते जाऊ दे.. आपण ईथे कशासाठी आलो आहोत ते जरा सांगशील??
मोहीत : अगं थांब थांब... चल जरा आपण त्या कॅफे मध्ये जाऊ... मग सांगतो...
जमलं तर आपल्या मनात काय आहे ते बोलून मोकळं होऊ... असा विचार करून अन्विता देखील मोहीत सोबत कॅफे मध्ये गेली...
मोहीतने अन्विताला कॅफे मधल्या फॅमिली रूम मध्ये नेले..
हा मोहीत असं का वागतोय?? अन्विताला संभ्रम पडला होता...
फॅमिली रूम मध्ये प्रवेश करताच अन्विताला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला...
त्या छोट्याश्या फॅमिली रूम मध्ये लाल हृदयाच्या आकाराचे फुग्यांनी सजवली होती...
रूम बघुन अन्विताचे डोळे दिपले होते...
ओ माय गॉड... मोहीत किती सुंदर सरप्राईज आहे हे... अन्विता रूम बघत बघत बोलली...
तितक्यात मोहीतने कॅफेच्या वेटरला डोळ्यांनीच खुणावले.. वेटर पळत पळत गेला आणि केक घेऊन आला...
फॅमिली रूम मध्ये धुसर प्रकाश होता.. आजूबाजूला मेणबत्त्या लावलेल्या होत्या..
केक देखील लाल आणि हृदयाच्या आकाराचा होता...
मोहीत आज आपल्याला प्रपोज तर करणार नाही ना😍😍... अन्विताच्या मनात एकदम विचार चमकून गेला...
केक ठेवून वेटर फॅमिली रूम मधून निघून गेला.
तितक्यात तिथे अगदीच शांत आणि बारीक आवाजात संगीत वाजायला सुरुवात झाली..
आता कसं प्रसन्न वाटत आहे... मोहीत अन्विताला म्हणाला...
अन्विता.:😳 मोहीत!!किती सुंदर केलं आहेस तू... एवढी छोटीशी ही रूम पण कसली मस्त सजवली आहे तू...
मोहीत : अन्विता!! खरं तर मी तुला बस स्टॉप वर घायला येऊ शकलो नाही त्या बद्दल मनापासून सॉरी... मला हे डेकोरेशन वेळेतच करायचं होतं पण ह्या लोकांनी उशीर केला.
अन्विता : म्हणजे?? 🤔 तुझी गाडी पंक्चर झाली नव्हती... हो ना? 🤔
मोहीत: 😊 हो..
अन्विता :अच्छा!! पण मग हे सगळं...
मोहीत : शु 🤫... मला बोलू तर दे...
अन्विता : ok 🤫
मोहीत : अन्विता!! तुझी भेट झाल्यापासून एकही दिवस असा गेला नाही की घरी गेल्यावर मी तुला मीस केलं नाही.... अन्विता!!तसं मला जे तुझ्याबद्दल वाटतं ते कदाचीत तुलाही वाटत असावं.. कारण मला ते तुझ्या डोळ्यात दिसतं.. आज हे बोलणं औपचारिकता आहे असं समजून मी तुला विचारत आहे... Do you love me... तुला मी आवडतो का? अन्विता मला तू खूप आवडतेस i love you...😍😍
अन्विताला मोहीतने प्रपोज करणं अगदीच अनपेक्षित होतं...पण अन्विता ईतकी आनंदी झाली की तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले...
अश्रू पाहून मोहीत एकदम भांबवून गेला... अन्विता!!माझं काही चुकलं का?? सॉरी..
अन्विता : चुकलं नाही मोहीत!!मलाही तू खूप आवडतोस... I love you too.. अन तुला माहिती आहे का तू आज मला प्रपोज नसतं केलं ना ... तर मी तुला केलं असतं...
मोहीत :😳काय 😍😍... मग तर ये केक तो कटना बाकी है...हे घे अन्विता... केक कट कर...
अन्विता : अं हं.... आपण दोघे मिळून केक कट करू...
असं म्हणून दोघांनीही केक कट केला आणि एकमेकांना प्रेमाने भरवला...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 5 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
http://www.swanubhavsaptarang.com/2021/06/5.html
0 टिप्पण्या