दैव जाणीले कुणी (भाग 5)

प्रेम व्यक्त झाल्यावर दोघांनाही आकाश ठेंगणे वाटायला लागले होते..दोघेही खूप खूष होते...
अन्विता : मोहीत!!किती छान आहे हे... मला चिमटा घे ना...

मोहीत :अगं प्रिये !! हे सगळं खरं आहे... वास्तवात सगळं घडत आहे..

अन्विता : 😍😍😍 मोहीत!!आता आपण कधीच एकमेकांना सोडायचं नाही... कितीही संकटे आली तरी...

मोहीत :हो गं...आता मरेपर्यंत नाही....

तितक्यात अन्विताचा फोन वाजला.... अन्विताने फोन📳 बघितला... मोहीत किती वाजले आहेत??

मोहीत : आठ... कां गं??

अन्विता : अरे बापरे आठ 😳... हॅलो आई!! सॉरी सॉरी अगं मी तुला फोन करणारच होते पण....

अन्विताची आई :😡 ते काही नाही... तू आता बस ची वाट पाहू नको सरळ कॅबने घरी ये.... वेळेचं काही भान ठेवत नाहीस?? तुझे बाबा तुला माहिती नाहीत का??

अन्विता : अगं आई!! बसच आली नाही... म्हणून मी पाईच निघाले... मोहीत ला डोळा मारत अन्विता तिच्या आईला बोलायला लागली....

मोहीत देखील अन्विता किती शिताफीने खोटं बोलत आहे हे कौतुकाने पाहू लागला..

अन्विता : मग रस्त्यात मला नलू भेटली... तिच्याशी गप्पा मारता मारता मला वेळेचं भानच राहिलं नाही...बघ...बरं ते जाऊ दे तू पॉप्स ला सांग की मी दहा मिनिटातच कॅब नी पोहोचते... आता मला कॅब बुक करावी लागेल... मी फोन ठेवते असं म्हणून अन्विताने फोन 📳ठेवून दिला...

मोहीत :अरे वा अन्विता!!तू तर एकदम शिताफीने खोटं बोलत आहेस?? आणि हे पॉप्स काय पॉप्स??

अन्विता : काय करू... मला माझ्या आई बाबांशी खोटं बोलायचं नाहीये पण आपल्याला भेटून फक्त दोन महिनेच झाले आहेत ना... नी माझे बाबा माझ्या बाबतीत खूप पझेसिव्ह आहेत... म्हणून त्यांना खोटं बोलावं लागतं... आणि पॉप्स... मी माझ्या बाबांना एरवी बाबा म्हणते पण मस्का मारायचा असला की पॉप्स म्हणते.... पॉप्स म्हटलं की ते खूप खूष होतात....

मोहीत : 😊चांगली ट्रिक आहे...

अन्विता : बरं ऐक ना...मला सोड ना... नाहीतर माझे बाबा आकाशपातळ एक करतील...

मोहीत : जशी आज्ञा राणीसरकार..

अन्विता : राणीसरकार?? काहीपण 🥰🥰

मोहीत : अगं खरंच....

दोघेही मोहीतच्या डिझायर गाडी मध्ये बसले...

मोहीत : तुला माहिती अन्विता!! तुझ्या व्यतिरिक्त कुठलीही परस्त्री अशी माझ्या बाजूला बसलेली नाही....

अन्विता : मोहीत!!मला आधीचं माहिती नाही पण आता मात्र या पुढे कुणीच बसणार नाही ईतकं नक्की 😍😍..

मोहीत :😊 मनोमन स्मित करू लागला...

अगदीच दहा मिनिटात मोहीतने अन्विताच्या घराजवळ गाडी थांबवली...

अन्विता : मोहीत!! सो सॉरी... आज मला तुला घरी नेता येत नाही...

मोहीत : काय अन्विता!!कॅब ड्रायव्हर ला कुणी घरी नेत असतं कां?😂😂😂

अन्विता : सॉरी रे...

मोहीत : काय सॉरी सॉरी लावलंय... मला काय तेवढं पण कळत नाही कां?? बरं चल निघतो मी... उद्या बस स्टॉप वर भेटू.. बाय...

अन्विता :बाय...

मोहीत :असं कोरडं बाय??😍😍

अन्विता : माझी आई 😳  निघते मी...

मोहीत : बदमाश 😍😍बघून घेईन... आता या मोहीतच्या तावडीतून तुझी सुटका नाही...

अन्विता : सुटायचं तरी कुणाला आहे?? पण त्या साठी आता मात्र मला घरी जावं लागेल...😊

असं म्हणून अन्विता आपल्या घरी गेली....

घरी गेल्या गेल्या अन्विताच्या बाबांचा रागीट चेहरा पाहून ती तिच्या आईला सांग ना आता काय करू असे खुणेनेच विचारायला लागली...

तर अन्विताची आई हतबल झाले मी असं तिला खुणेने दाखवायला लागली...

अन्विताचे बाबा :जानकी!!काय खानाखुणा चालू आहेत?? 😡मला काय कळत नाही असं तुम्हाला वाटतं का? मी तिचा बाप आहे म्हटलं...

 अन्विता :सॉरी बाबा!!माझं चुकलं... मी पुन्हा नाही असं करणार... या पुढे एक तर उशीर करणार नाही आणि असा उशीर होणार असेल तर फोन करून कळवत जाईल... मी कान पकडते..

अन्विताचे बाबा :हं चल फ्रेश होऊन ये लवकर... मला खूप भूक लागली आहे...

अन्विता :ओ थँक यू बाबा!! लव्ह यू पॉप्स... मी लागलीच फ्रेश होऊन आले...

अन्विताची आई : तुम्ही ना फक्त मला सुनावता 😏 लेकीला मात्र एका शब्दाने सुनावत नाही...किती बडबड केली होती माझ्यासमोर?? 🤔 मी आता चांगलं फैलावर घेतो की नाही ते बघ... तीची चांगली खरडपट्टी काढतो...अन तिला बघितलं की मेणबत्ती सारखे वितळले ..

अन्विताची बाबा : काय करणार?? माझी राजकन्या आहेच तितकी गोड 😍😍

असं म्हणून तिघेही जेवायला बसले... अन्विताचं मात्र जेवणात लक्ष नव्हतं पण ती लक्ष दिल्याचा आव आणत होती. तिचा आज जणू आयुष्यातील सर्वात जास्त आनंदाचा दिवस होता...

ईकडे सूर्या देखील आता पुढे काय करायचे आहे त्याचे प्लँनिंग करत होता... मैत्रीची पहिली पायरी यशस्वी झाल्यामुळे त्याला एक वेगळा आत्मविश्वास तयार झाला होता... कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीच्या दिवशी आपण थोडी का होईना अन्विताला आपल्या प्रेमाची आयडिया आली पाहिजे...

चला सूर्या लवकर झोपा आता पुढे जाण्यासाठी आपल्याला लवकर उठावे लागेल... मनातल्या मनात स्मित करून सूर्या त्याच्या बेडरूम कडे गेला...

जेवण झाल्यावर अन्विता आईबाबासोबत गप्पा मारायची पण आज तिचा मूड नव्हता... आज मी खूप थकले आहे... मला झोप येतेय... सकाळी लवकरच कॉलेजला देखील जायचं आहे..आईबाबांना काही शंका नको यायला म्हणून आधीच एक्सप्लेनशन देऊन अन्विता तिच्या बेडरूम कडे वळाली..

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
भाग 6 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇


.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या