अन्विता तिच्या बेडरूम मध्ये गेली..दिवसभरांचा घटनाक्रम आठवत होती... आधी सूर्याची मैत्री नी,नंतर मोहीतचं प्रपोजल... विचार करता करता तिला झोप लागली...
सकाळी लवकरच उठून अन्विता आज बाबांसोबत walk घेण्यासाठी तयार झाली.. आपली लेक आज भयंकर आनंदात आहे हे तिच्या वागण्यावरून तिच्या बाबांना उमगले होते...
अन्विताचे बाबा :गूड मॉर्निंग बेटा!!आज जरा लवकर नाही उठलीस??
अन्विता :ते काय आहे ना बाबा... मी आजपासून हेल्थ कॉन्शियस राहणार आहे... मी तुमच्यासोबत वॉक घेण्यासाठी उठले....
अन्विताचे बाबा : बरं... चल... बरेच दिवस झाले आपल्या व्यवस्थित गप्पा पण नाही झाल्या... त्या निमित्ताने गप्पा तरी होतील...
बोलत बोलत दोघेही घराबाहेर पडले... झपझप पाऊले टाकत दोघेही गार्डन पर्यंत गेले... थोडा वेळ व्यायाम केल्यानंतर दोघेही गार्डनच्या बाकावर बसले....
अन्विता : बाबा!!आता तुमचं कसलं संशोधन चालू आहे
अन्विताचे बाबा :सध्या मी असं मशीन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे की जे माणूस आणि त्याचा स्वभाव ओळखेल... म्हणजे कुणी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती समोर आली की त्याला ओळखेल... त्या वरून आपल्याला सावध होता येईल...
अन्विता :वाह ग्रेट बाबा!!खरंच तुम्हाला कसं सुचतं सगळं??जगापेक्षा किती वेगळा विचार करता तुम्ही...अन अन्विता विचारात गुंग झाली...
अन्विताचे बाबा : अन्विता!!बोल बेटा... तुला काय बोलायचे आहे?...
अन्विता : बाबा!!तुम्ही कसं ओळखलं 😳??
अन्विताचे बाबा : बेटा मी तुला पूर्णपणे ओळखून आहे...
अन्विता : बाबा!!पहिले सांगा तुम्ही मला रागावणार नाही... पूर्ण ऐकून घ्याल... आणि मगच तुमचे मत द्याल...
अन्विताचे बाबा : तू असं कोड्यात बोलू नकोस काय बोलायचं ते नक्की सांग..
अन्विता : बाबा!!तो सूर्या आहे ना काल मला मैत्री साठी विचारलं...
अन्विताचे बाबा : कॉलेजच्या दुसऱ्याच दिवशी??
अन्विता : हो... आणि मी मैत्रीसाठी होकार दिला...
अन्विताचे बाबा : अन्विता!!तुला असं नाही वाटत तू त्याला होकार देऊन घाई केली ते... अगं कालचीच तर ओळख तुमची नुसतीच तोंड ओळख...अन लागलीच... तो कसा काय आहे... उगाचच मागे बिगे लागला तर?? मला वाटतं तुला कुठलाच त्रास नको व्हायला....
अन्विता : नाही हो बाबा!!तसं काही होणार नाही... कॉलेज मध्ये सुरक्षित राहायचं असेल तर सूर्या सोबतची मैत्री कधीही चांगली... तुम्ही मला ओळखता ना बाबा!! मी काय अश्या तश्या मुलाला सिलेक्ट करणार नाही...
अन्विताचे बाबा : तू सिलेक्ट करायचं देखील नाही... समजलं ना 😡... मी तुझ्यासाठी मुलगा शोधेल...
अन्विता : बरं बाबा!!तुम्ही म्हणाल तसं...
अन्विता खरं तर मोहीत बद्दल तिच्या बाबांना बोलणार होती... पण तिच्या बाबांचे रागरंग बघुन ती शांत बसली.
बाबांना आता मोहीत बद्दल सांगणं योग्य नाही... ते माझ्या बद्दल जास्तच पझेसिव्ह होत आहेत... असा विचार तीने केला...
घरी आल्यावर अन्विता फ्रेश होऊन कॉलेजला गेली तर तिचे बाबा रिसर्च च्या कामाला लागले...
दिवसामागून दिवस जात होते... आता अन्विता तिच्या कॉलेज मध्ये बऱ्यापैकी रुळली होती.. मोहीत तिला आणायला आणि सोडायला हजर असायचा... त्या मुळे तिला त्याला भेटण्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नव्हती..
तरी देखील अन्विताच्या हालचाली तीची आई बरोबर टिपत होती....
अन्विताचे तयार होने, गाल्यातल्या गालात हसणे. तासनतास आरश्यासमोर उभे राहणे...
अन्विताचं काहीतरी चाललं आहे हे तिच्या आईच्या नजरेतून सुटले नव्हते...पण हे वयच असं असतं म्हणून तीची आई तिच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत होती.
सूर्या मात्र त्याच्या मैत्री वरच अडकलेला होता...त्याला अन्विताच्या आयुष्यात काय बदल घडला आहे याची मात्र कणभर ही कल्पना नव्हती.
कॉलेज मध्ये अन्विता, झुक्या आणि बेला यांचं त्रिकुट जमलं होतं.. तिघेही एक मेकांचें बेस्ट फ्रेंड्स झाले होते. ते कधीच एकमेकांना सोडून साधं कॅन्टीन मध्ये देखील जात नसत.अभ्यासात एकमेकांना मदत करत असत.. लोकलाईट म्हणून अन्वितासोबत बाकी कुणी तितकं मोकळं झालं नव्हतं... पण बेला आणि झुक्या मात्र पदोपदी तीची मदत करत...
बेला :अन्विता!!मला तुला एक सिक्रेट सांगायचं आहे...
अन्विता : बोल ना...
बेला :अगं तो झुक्या आहे ना... त्याला आपल्या क्लास मधली गायत्री आवडते...
अन्विता : हो ना... मला पण वाटलं होतं... तो तिला लपून छपून बघत होता.... मी पण ते पाह्यलं...
बेला : पण ती ना झुक्या कडे बघत पण नाही... खूप घमेंडी वाटते....
अन्विता :हं... घमेंडी वाटते तर खरी... पण कधी कधी ना बेला दिसतं तसं नसतं बर का... त्याच्या पलीकडे पण काही असतं..
बेला : तू म्हणतेस तसंच असावं... अगं झुक्या खूप सिरियस आहे तिच्या बाबतीत....
अन्विता : 😳,मग तो तिला प्रपोज का करत नाही...
बेला : अगं... ती समोर दिसली की झुक्या ततपप करतो... तो काय बोलणार??
अन्विता : तो हाय टेक आहे ना... मग त्याचा वापर कर म्हणावं...तितक्यात बेला चा फोन 📳वाजला...
फोन बघुन बेलाचा चेहरा खुलला... अन्विता मी जरा जाऊन येते... असं म्हणून बेला कॉलेज गेट च्या बाहेर पडली...
अन्विता :झुक्या अशी काय आहे ही.... लागलीच बाहेर पडली...
झुक्या : तिचा हिरो आला असेल? 😊
अन्विता :हिरो... तीने तर मला काहीच नाही सांगितले 🤔
झुक्या :तू तरी आम्हाला कुठे काय सांगतेस... मित्र म्हणवतेस ना.... 😡
अन्विता : अरे बापरे आता मी काय लपवलंय?? बरं ते जाऊ दे... तुझ्या आई बाबांनी तुझं छान नामकरण केलं असेल ना... मला तुला झुक्या म्हणणं बरोबर वाटत नाही.... बघ.. महिना झाला आपली मैत्री होऊन... मला तुझं साधं नाव तरी माहिती आहे का? अन म्हणे मी लपवलंय...
झुक्या : अन्विता!!तू विषय बदलू नकोस हं... तो कार मध्ये तुला सोडायला नक्की कोण येतं सांग😡... तुझ्या घरचा मेंबर तर नाही वाटत....
अन्विता : अरे सांगते सांगते... एवढं घाई का करतोस... सर्व निवांत पणे सांगते....पण आधी तुझं बारश्या वालं नाव तर सांग...
झुक्या : "मोहीत "
अन्विता : कुठे 😳
झुक्या : अगं माझं नाव मोहीत...
अन्विता :😳 काय?? बरं झालं याला झुक्या म्हणतो ते... याचे कुरळे केसं पण त्याच्या नावाशी साजेशे आहेत..😊
झुक्या :अन्विता!! मनातल्या मनात काय हसत आहेस...
अन्विता :काही नाही... मोहीत पेक्षा झुक्या सोपं आहे असं मला वाटलं..
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 7 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
.
0 टिप्पण्या