दैव जाणीले कुणी (भाग 7)

झुक्या :हं अन मला "झुक्या" ऐकायची 😊

अन्विता : बरं झुक्या!!हे गायत्री प्रकरण काय आहे रे..

झुक्या :शु 🤫... हळू बोल..

अन्विता : बरं चल कॅन्टीन मध्ये...

सूर्या अन्विता आणि झुक्याच्या हालचाली बघत होता.. आपल्याला अन्विता मैत्रीला हो म्हटली खरी पण आपल्याशी एक अंतर ठेवून वागते हे सूर्याच्या लक्षात यायला लागले होते..

 पण आता महिना देखील होऊन गेला तरी आपण काहीच पुढचं पाऊल उचललं नाही याची त्याला खंत देखील वाटत नव्हती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मैत्री करेपर्यंत जो तगादा मिस्टर ब्लॅकने त्याच्या मागे लावला होता. तो आता पूर्णपणे बंद झाला होता.

मिस्टर ब्लॅक त्याच्या काही महत्वाच्या कामासाठी भारताबाहेर गेला होता... म्हणून कदाचीत तो आपल्यावर पाळत ठेवू शकत नसावा असं सूर्याला वाटून गेलं होतं.पण काही का असेना त्या कारणामुळे आपल्यावर येणारा दबाव कमी झाला याचा आनंद सूर्याला वाटून गेला होता.

कॅन्टीन मध्ये गेल्यावर अन्विता झुक्याला म्हणाली काय रे तू गायत्रीला ईतका का घाबरतोस..

झुक्या :घाबरतो... मी कशाला घाबरू?? माझा काय संबंध...

अन्विता :ये गायत्री!!

झुक्या :क काय??

अन्विता :😂😂😂...गायत्री नाहीये... तू तिला घाबरतो की नाही हे मी बघत होते...

झुक्या : हं.. घाबरतो 😢...

अन्विता : 🤣🤣... बरं ते जाऊ दे... तुझं झुक्या म्हणून नामकरण झालं आहे... तरी तुला सांगावं लागत आहे... आधी फ्रेंडबुक चा वापर कर की...

झुक्या : अगं अन्विता!!तुला काय वाटतं... मी हे केलं नसेल? अगं फ्रेंड request टाकून महिना झालाय... पण ती accept करेल तर शपथ... बरं ईथे पण मान खाली घालून असते.. मी एक दोन वेळेस तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न पण केला..पण ती तिथून निघून गेली... एक अवाक्षरही बोलली नाही..

अन्विता :हं... तू नको काळजी करूस... मी बघते गायत्री नेमकी अशी का वागत आहे ते....बरं अन ती बेला... तितक्यात बेला कॅन्टीन मध्ये आली...

झुक्या :आल्या मॅडम!!

अन्विता : काय बेला!! तू अशीच मध्ये काहीच न सांगता निघून गेली...

बेला : अगं तो जय!!आहे ना त्याचा परीक्षेचा फॉर्म भरायचा होता... वेळेची लिमिट होती... परीक्षेची फीस माझ्याकडे होती म्हणून पळाले..

अन्विता :आता हा जय कोण?

बेला :माझा छोटा भाऊ आहे गं...

अन्विता :पण झुक्या तर मला म्हणाला की हिरो असेल म्हणून...

बेला :हं बरोबर... त्या गायत्री मुळे याला असंच काहीतरी सुचणार... काय झुक्या आधी कन्फर्म तरी करायचं ना.. माझं बॉयफ्रेंड वगैरे कुणी नाही समजलं ना...

अन्विता :पण माझा आहे 🥰🥰...

बेला :😳काय... तो सूर्या का?

अन्विता : बेला!!काहीतरीच काय...

बेला :let me guess... तो स्विफ्ट डिझायर वाला... हो ना...

अन्विता : हो🥰 म्हणून अन्विताने तीची प्रेमकथा दोघांनाही ऐकवली...

झुक्या : मोहीत काय 😍आता समजलं तू मला झुक्या का म्हणायचं ठरवलं....

बेला : अन्विता!! ही गुड news अशी नको आहे.... आम्हाला पार्टी पाहिजे... हो ना रे झुक्या?

झुक्या :सव्वाल आहे का?.... पाहिजे म्हणजे पाहिजे...आणि ते पण तुझ्या हिरो सोबत...

अन्विता : अरे हो हो नक्कीच...

फ्रेशर्स पार्टी चा दिवस उगवला... ज्या दिवसाची सूर्या खूप आतुरतेने वाट पहात होता तो हा दिवस... आज कसंही करून अन्विताला प्रपोज करायचं हे त्याने ठरवले होते. खरं पहायला गेलं तर सूर्या आणि अन्विता हे मित्र असले तरी त्यांची मैत्री अगदीच फॉर्मल होती.त्यांचा कुठलाही मैत्रीचा धागा जुळला नव्हता. त्या मुळे सूर्याला अन्विताशी व्यवस्थित मैत्री करून प्रपोज करायचं होतं पण मिस्टर ब्लॅक च्या भीतीने त्याला ते करणं जरुरी होतं..

मिस्टर ब्लॅकने फ्रेशर्स पार्टी ची डेडलाईन दिल्यामुळे कदाचीत तो देखील फ्रेशर्स पार्टी नंतर आपल्या मागे लागेल असं वाटून त्याने तोच दिवस निवडला..छान गुलाबाचा बुके त्याने सोबत ठेवला..

आपण ईतकं घाई घाईत अन्विताला प्रपोज केलं तर ती आपल्याला होकार देणार नाही हे त्याला माहिती होतं.. पण मिस्टर ब्लॅक च्या भीतीने हा नकार पचवून आपल्याला प्रयत्न करावे लागतील.. आपण उगाचच निगेटिव्ह विचार करत आहोत.. काय सांगावं पहिल्याच प्रयत्नात लॉटरी लागेल....देव करो तसंच व्हावं... म्हणजे मला लवकरच पुढे जाता येईल... विचार करत करतच सूर्या फ्रेशर्स पार्टी च्या ठिकाणी पोहोचला...

सर्व सिनियर आणि ज्युनियर्स ची मजा मस्ती चालू होती... सूर्या हॉल मध्ये जाताच सर्व जण सूर्या जवळ जमा झाले...

अन्विता :बेला!!सूर्याला ईतके जण भाव का देत असावेत... तो आला की असं वाटलं की कुणीतरी सेलिब्रिटी आला आहे..

बेला :अगं तो सगळ्यांचा फेव्हरेट आहे.... अन्विता!!तो आपल्याकडेच येत आहे....

हॅलो अन्विता!!how are you? सूर्या तिच्यासामोर बुके करत म्हणाला...

अन्विता :i am fine... हे कुणासाठी?

सूर्या : ऑफकोर्स,माझ्या पहिल्या प्रेमासाठी....तुझ्यासाठी...

अन्विता : काय 😳.. सॉरी.. सूर्या तू काय बोलत आहेस..

सूर्या : अन्विता!! हे बघ मी काही नाटक सिनेमा सारखं व्यक्त होऊ शकत नाही पण ज्या दिवसापासून तुला पाहिलं आहे त्या दिवसापासून मी फक्त न फक्त तुझाच विचार करत आहे..मला माहिती आहे माझ्या अश्या अचानक विचारण्याने तू गोंधळून जाऊ शकतेस पण खरं सांगू का मी एकवेळ साऱ्या जगाला फसवेल पण स्वतःला नाही फसवू शकत.. माझ्या मनात जे काय चालले आहे ते मी तुला सांगून दिलं... हे बघ मला काही घाई नाहीये... तू तुझा वेळ घे मग उत्तर दिलं तरी चालेल....


सूर्याच्या प्रपोज करण्याने अन्विता मात्र एकदम निःशब्द झाली... बाबा आपल्याला काय म्हणाले होते ते अन्विताला आठवलं....

तेवढं बोलून सूर्या तिथून जायला निघाला...

सूर्या!!अन्विताने आवाज दिला...

अन्विता :सूर्या!!आय रिस्पेक्ट युअर फीलिंग्स...बट आय एम ऑलरेडी एंगेजड

सूर्या :😳काय? सूर्याच्या पायाखालची जमीन सरकली... किती स्वप्न पाहिले होते मी... किती प्रेम करतो मी अन्वितावर... पण ही गोष्ट माझ्या लक्षात कशी आली नाही...

सूर्याचा उतरलेला चेहरा पाहून अन्विता म्हणाली...सूर्या अरे मी कधीच तुला त्या नजरेने पाहिलं नाही... प्लीज समजून घे...आणि आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे...

सूर्या : its ok अन्विता.... डोळ्यातले अश्रू लपवत सूर्या निघून गेला...

तर आपल्यामुळे सूर्या दुखावला गेला त्याचं अन्विताला वाईट वाटत होतं ...

नकार ऐकल्यावर सूर्या डायरेक्ट मिस्टर ब्लॅक च्या बार वर गेला... सूर्याची अस्वस्थता कमालीची होती... तो प्रॅक्टिकल आणि इमोशनल च्या भोवऱ्यात अडकला होता... अन्विता आपल्यासाठी नाही हे त्याला पचतच नव्हतं...

पण का... का आपण ईतका अन्विताचा विचार करतोय.. तिला पटवणं हा तर आपल्या षडयंत्राचा भाग होता ना... मग ती नाही म्हणाली म्हणून का ईतकं दुःख होत आहे... आणि जिथे असं कावे आहेत तिथे असलं भलतंच काहीतरी घडणार ना...

 सूर्याचे व्हिस्कीचे पेग च्या पेग संपत होते... पण त्याला काही ठोस निर्णय घेता येत नव्हता...

काय सूर्या!!तुझ्या नशिबात कधी प्रेम नव्हतंच... असं म्हणून तो स्वतःवरच हसत होता....

आणि आता मिस्टर ब्लॅक आपली शाळा घेईल ते वेगळंच... अरे हो मिस्टर ब्लॅक... त्याने अजून आपल्याला फोन कसा नाही केला... अन्विताने दिलेला नकार मिस्टर ब्लॅक पर्यंत पोहोचला नसेल?? 🤔कसं शक्य आहे.... अचानक मिस्टर ब्लॅक चा विचार तर नाही बदलला....

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
भाग 8 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या