ए छोटू मिस्टर ब्लॅक ची काही खबरबात?? अडखळतच सूर्याने छोटूला प्रश्न विचारला...
छोटू : नाही साहेब!!पण ते खूप busy आहेत असं कळालं.. काहीतरी नवीन प्रोजेक्ट सुरु आहे म्हणून अजून महिनाभर येणार नाहीत असं आज मालक म्हणत होते.
बरं बरं... चल निघतो मी असं म्हणून सूर्याचा हात त्याच्या खिशाकडे गेला..
छोटू : साहेब!!तुमच्यकडून पैसे घ्यायचे नाही असं मिस्टर ब्लॅक नी सांगितलं आहे ना..
सूर्या : अरे हे पैसे तू ठेव... मी ड्रिंक्स साठी पैसे देत नाहीये... सूर्या बोलताना अडखळत होता आणि चालताना डुलत होता. त्याचे झोक चालले होते..
अश्या अवस्थेत हा घरी जाणे शक्य नाही.. हे छोटूने जाणलं..
छोटू :साहेब!!हे पैसे मी एका अटीवर घेतो... तुम्हाला घरापर्यंत मी सोडणार...
सूर्या :अरे पण तुझा मालक???
छोटू : काही नाही म्हणणार... उलट माझं कौतुकच करतील.. साहेब तुम्ही गाडीजवळ जा.. मी मालकांच्या कानावर टाकून समोरच्या दरवाजा कडून येतो...
छोटू ने सूर्याला सूर्याच्या बाईक वर त्याच्या घरी सोडलं..
ईकडे अन्विताला सुरुवातीला बोर झाले होते. पण मग मोहीतची भेट झाल्यावर त्याने तीला समजावल्यानंतर ती स्थीर झाली होती..
घरी गेल्या गेल्या ती बाबाच्या गळ्यात पडून रडायला लागली..
अन्विताचे बाबा : काय अन्विता!! तुला रडायला काय झालं..
अन्विता :काही नाही बाबा!! तुम्ही त्या दिवशी जे म्हटले ने ना ते खरं झालं..
अन्विताचे बाबा : काय गं??
अन्विता : बाबा!!सूर्याने मला आज प्रपोज केलं... आणि मी नाही म्हणाले...
अन्विताचे बाबा :काय 😳... बरं झालं तू नाही म्हणालीस ते पण मग तू रडत का आहेस??
अन्विता : कारण तुमचाच अंदाज खरा ठरला.. मला कधीच वाटलं नव्हतं की तो मला प्रपोज करेल म्हणून... मी ईतकी भोळी आहे का हो बाबा??
अन्विताचे बाबा : हं.. बरं ते जाऊ दे... मला एक कप कॉफी करशील का? बाबांनी वातावरण बदलण्यासाठी अन्विताला सांगितलं...
अन्विता :बाबा!!कॉफी आणि ईतक्या रात्री??
अन्विता :अगं मी जरा study रूम मध्ये जरा वाचत बसणार आहे...
अन्विता :फ्रेश होऊन,लागलीच कॉफी बनवून आणते ...तो वर तुम्ही स्टडी रूम मध्ये थांबा..
अन्विता फ्रेश व्हायला गेली..
अगदीच आपल्या आई सारखी आहे.. इमोशनल... थोडं पण काही झालं की रडणारी...कधी कधी वाटतं हिला हिच्या आईबद्दल सांगून टाकावं.. पण नाही... तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलं आहे मी हिला...
डोळ्यातील अश्रू पुसून अन्विताचे बाबा स्टडी रूम मध्ये जाऊन बसले..
सकाळी उठल्यावर सूर्याचं डोकं जाम दुखत होतं. त्याला मळमळ करत होतं.
खूप हँगओव्हर झालेला होता.. कितीही म्हटलं तरी कालचा किस्सा सूर्याच्या डोक्यामधून जात नव्हता.. कोण असेल?? अन्विताचा बॉयफ्रेंड.. कसा असेल?.. आधीच डोकं ठणकत होतं आता अजून जड पडलं आहे..
नको आज कॉलेजलाही जायला नको आणि विचारही करायला नको.. मस्त घरी राहू.. आराम करू.. डोकं दुखायचं राहिलं की एखादा छान ऍक्शन मुव्ही बघू...असा विचार करून सूर्याने कॉफी बनवून घेतली..
दुपारी हँगओव्हर उतरल्यावर सूर्या आधीच्या दिवशी घडलेल्या गोष्टींची उजळणी करत होता..
विचार करतानाच अचानक सूर्याला काहीतरी सुचलं...
तो तडकन उठला आणि तयार होऊन कॉलेज मध्ये गेला..आणि आता दुरूनच अन्विताच्या सर्व हालचालीवर तो लक्ष ठेवायला लागला..
अन्विता बस स्टॉप वर जाते काय आणि तिथे तिला एक डिझायर कार घ्यायला येते काय...अच्छा तर अन्विताला बस स्टॉप वर ड्रायव्हर नाही तिचा बॉयफ्रेंड घ्यायला येत असणार... अरे अशी शंका आपल्याला आधी का नाही आली.... सूर्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला..
बघू तर हा महाभाग आहे तरी कोण असा विचार करत सूर्या अन्विताला घ्यायला येणाऱ्या ड्राइव्हर ची वाट बघू लागला.
पण झालं असं की अन्विताने सूर्याला पाहिलं... आणि मग ती सूर्याच्या दिशेने यायला लागली..अन्विता त्याच्याकडे येत आहे असं पाहून सूर्या उगाचच त्याची बाईक हलवून पेट्रोल आहे की नाही ते चेक करू लागला..
अन्विता :hi सूर्या!!
सूर्या :hi..
अन्विता :कसा आहेस??
सूर्या : कसा असणार आहे😊... बराच आहे म्हणायचं...
अन्विता :सूर्या!! सॉरी... पण आपण चांगले मित्र तर राहूच शकतो ना.... म्हणजे तुला मान्य असेल तर... जसे बेला, झुक्या आहेत तसेच...
सूर्या : हं...
चला मैत्री तर मैत्री काय सांगावं ही मैत्री देखील आपल्या कामी येईल... असा विचार करून सूर्याने मैत्री साठी होकार दिला.
अन्विता : सूर्या!!उद्या मी बेला आणि झुक्या माझ्या बॉयफ्रेंड सोबत पार्टी करणार आहोत.. तुला जर जमत असेल तर तू देखील जॉईन व्हावं अशी माझी मनापासून ईच्छा आहे..
सूर्या : मला चालेल पण तुझ्या बॉयफ्रेंडला मी चालेल का?
अन्विता : नं चालायला काय झालं?? तो काही तितका narrow minded नाहीये आणि तसंही मी आणि मोहीत कालची गोष्ट कालच विसरलो असं समज ती माझ्या ओठांवर परत येणार नाही..
सूर्या : अन्विता!!खूप समजूतदार आहेस गं तू...
अन्विता : हो मग... आहेच मी 😉
चला आता गेस वगैरे करायची गरज नाही.. आपली डायरेक्ट भेट होणार आहे..असा विचार करत असताना मिस्टर ब्लॅकचा सूर्याला फोन आला...
मिस्टर ब्लॅक : काय प्रगती कुठपर्यंत??
सूर्या : काय मिस्टर ब्लॅक!!तुम्हाला तर सगळं कळतं ना मग हे ही कळालं असेल की अन्विताचं ऑलरेडी अफेअर आहे म्हणून...
मिस्टर ब्लॅक : सूर्या!!काय 😳 नाही रे आता मी ईथे परदेशात busy झालो होतो... आता कुठे उसंत मिळत आहे.. आणि खरं सांगू का माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे... जरी अन्विताचं अफेअर असलं तरी देखील तू त्यावर काही उपाय काढशील.. असं मला वाटतं..
सूर्या : पण बॉस!!याच पद्धतीने जाणे गरजेचे आहे का? मैत्री करून पण आपल्याला बाकीची कामे करता येतील की...
मिस्टर ब्लॅक : बाकीची कामे करता येतील रे पण मला तिच्या भावनांचा खेळ करायचा आहे😡... जरा त्यांना कळू देत की....पुढे काही बोलणार की मिस्टर ब्लॅक भानावर आला...
सूर्या : काय झालं? बॉस!! का थांबलात?
मिस्टर ब्लॅक : अं काही नाही... तू तुझं काम चालू दे.. मला updates देत जा... आता तुझ्यावर कुणीही पाळत ठेवू शकणार नाही.. मला माझ्या इकडच्या कामासाठी मॅनपावर लागत आहे... समजलं... चल फोन ठेवतो...
हा मिस्टर ब्लॅकच आहे ना...
आज चक्क एवढ्या कोवळ्या आवाजात... आणि नंतर तर तो असं बोलत होता की जणू काही मी कश्याचं एक्सप्लेनेशन मागत आहे... मला वाटतं मी अजून मिस्टर ब्लॅक ला बिलकुलच ओळखलं नाही..
आज बोलता बोलता मिस्टर ब्लॅक इमोशनल झाल्याचं वाटत होतं..का परदेशाचा परिणाम आहे... काय माहिती..
सूर्या विचारात गुंग झाला.
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 9 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
.
1 टिप्पण्या
The bonuses and promotions at FanDuel Casino are distinctive however nonetheless value taking advantage of|benefiting from|profiting from}. Weekly bonuses are aplenty, with constantly changing video games for which the bonuses apply. While solely authorized in a number of} states, we’d advocate testing FanDuel Casino. The assist employees is always out there to help, and banking on the cashier is easy. The cherry on prime is the 점보카지노 welcome package deal, with great terms that may assist new players win more.
उत्तर द्याहटवा