कुठे थांबायला पाहिजे ते कळाले पाहिजे

काय चुकतं आईवडिलांचं?? आपल्या मुलाविषयी किती स्वप्ने त्यांनी पाहिलेली असतात??
आपल्या मुलाने चांगलं मोठं डॉक्टर व्हावं समाजात नाव कमवावं...

 त्या साठी त्यांना अगदीच बालवर्गापासून तयार करणं. महागड्या शाळेत घालणं. महागड्या शिकवण्या लावणं.. बरं ज्यांचीआर्थिक परिस्थिती कमजोर असते तिथे त्यांची मुलं स्वतःहून शिकतात, एखादा हुशार असतो तो मग डॉक्टर होतो..

बरं यांचं इतक्यावर थांबत नाही कारण नुसतं garaduation ला कोण विचारणार?? मग काय post garaduation, आणि आता तर काय super speciality..

त्या शिवाय मोठया शहरात आपला दवाखाना कसा चालेल.. हो ना??

त्या नंतर या डॉक्टरला सेटल व्हावंसं वाटतं. आपलं कुटुंब असावंसं वाटतं...

म्हणून सूरू होते धावपळ..

कारण तो डॉक्टर मग तो पोस्ट graduate असो की super specialist उशिरा सेटल झालेला असतो.

 त्याच्या सोबतीचे दुसऱ्या फिल्ड मधले मित्र चार ते सहा वर्षांपूर्वीपासूनच कमवायला लागलेले असतात.

मग काय अहोरात्र कामाला जुम्पले जाते.. हो हो मी ईथे जुम्पलेच म्हणेन... कारण आता क्षणभर विश्रांती घेणे हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे हे तो डॉक्टर विसरून जातो.

त्या मुळे आजकाल काय होत आहे?

डॉक्टरांचं आयुष्य हे कमी होत चाललेलं आहे..डॉक्टरांना रुग्णाच्या जीवनाचा विचार करताना सतत एक मानसिक तणावात वावरावे लागते. आणि आता तर रुग्णाच्या नातेवाईकांचे वागणे.. त्यांच्या शिव्या, त्यांचा मार, तोडफोड आणि कधी कधी तर जीवघेणे देखील हल्ले होतात.

या सर्व प्रकारामध्ये डॉक्टरचं जैविक घड्याळ कुठे सुरळीत असतं.. ते तर पूर्णपणे बिघडलेलं असतं..

मग का नाही डॉक्टरांचे आयुष्य कमी होणार??का नाही अगदीच कमी वयाचा डॉक्टर त्याचा जीव गमावणार. आणि बाकीच्यांनी काय?? फक्त हळहळच करायची का? की या असल्या अनुभवातून काही बोध घ्यायचा??

माझी आपल्या डॉक्टर मित्र मैत्रिणींना कळकळीची विनंती आहे की पैसा कमावण्यासोबत आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला देखील योग्य वेळेवर महत्व दिले पाहिजे. अहोरात्र काम करत असताना आपल्या शरीराला देखील तितकीच आरामाची गरज आहे हे जाणले पाहिजे. पैसे कमवण्या मागे धावताना कुठे थांबायचे ते कळले पाहिजे..
काय पटतंय ना??

लेख आवडल्यास like करा, कंमेंट करा, share करायचा असल्यास नावासहित share करा 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या