दैव जाणीले कुणी (भाग 10)

अन्विताची आई आज एकदम शांत शांत होती... जानकी आपल्याला काहीतरी बोलू पहात आहे पण तीची हिम्मत होत नाही हे अन्विताच्या बाबांनी जाणलं...

जेवण वगैरे आटोपल्यावर अन्विताच्या बाबांनीच विषय छेडला...

अन्विताचे बाबा : जानकी!!तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? नाही म्हणजे एकंदर मला तुझ्या वागण्यावरून दिसत आहे...

जानकी : तुमच्या पासून कधी काही लपलं आहे का?? पण तुम्ही एकदम रिऍक्ट होणार नसाल तर मी बोलते?

अन्विताचे बाबा : म्हणजे?? रिऍक्ट होण्यासारखं काही आहे का??

जानकी : हं...

बरं सांग..मी नाही रिऍक्ट होत...असं अन्विताचे बाबा म्हणाल्यावर अन्विताच्या आईने अन्विता बद्दल सर्व काही तिच्या बाबांना सांगितलं...

अन्विताचे बाबा : कोण आहे हा मोहीत?? काय करतो?? त्याचे कुटुंब कसे आहे?? नौकरी करतो का शिकतो?? असा कसा अन्विताने याला होकार दिला??

अश्या एकामागे एक प्रश्नांची शृंखला तयार झाली होती..

अन्विताची आई : अहो अन्विताचे बाबा!! आपण कुठे तिचं आताच लग्न लाऊन देत आहे ना.... आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे तर आता मोहितच देईल...

अन्विताचे बाबा :म्हणजे??

अन्विताची आई : आज तो अन्विताला सोडवायला येईल तेव्हा आपण बोलू...

अन्विताचे बाबा : हे कधी ठरलं??

अन्विताची आई : ठरलं वगैरे नाही...पण मोहीत तिला रोज सोडायला येतो... आज येईल तेव्हा आपण बोलू...

सुरुवातीला एकदम हायपर होणाऱ्या अन्विताच्या बाबांना जानकीने हळूहळू शांत केलं होतं...

अन्विताच्या बाबांचा शोध हा शेवटच्या टप्प्यात होता... त्यांनी त्याचं एक घड्याळ बनवायचा प्रयत्न केला होता. त्या मध्ये सेंसार होतं.. जे की त्वचेला स्पर्श करून चांगला आणि वाईट स्वभाव ओळखणार होतं...

चांगला किती आणि वाईट किती ची टक्केवारी फक्त अन्विताच्या बाबांच्या हातात असलेल्या डिस्पले वर दिसणार होतं...

पण आज आता अन्विताच्या काळजीपोटी तिच्या बाबांचं मनच लागत नव्हतं..त्या मुळे अन्विताचे बाबा लॅब मधून स्टडी रूम मध्ये गेले.... पुस्तकं चाळत होते... पण त्यांचं मन काही केल्या लागत नव्हतं... शेवटी अन्विताच्या आईने त्यांची बेचैनी हेरली आणि एक जुना पिक्चर लाऊन दिला...

तरी तिच्या बाबांचं लक्ष पिक्चर मध्ये कमी आणि विचारातच जास्त गुंतलेलं होतं... लहानपणापासून अन्विता मध्ये होणारे बदल त्यांच्या नजरे समोरून एका पिक्चर सारखे झपाझप जात होते...

विचारात असतानाच घराची बेल वाजली... संद्याकाळचे साडेसहा वाजलेले होते..

अन्विताचे बाबा मोहीतला बघण्यासाठी खूप उत्सुक होते..जानकीने घराचा दरवाजा उघडला...मोहीत ला पाहताच अन्विताचे बाबा जरा स्थिरावले... दिसायला तर चांगलाच दिसतो हा... चेहऱ्यावरून तरी लुच्चा लफंगा वाटत नाही...

आई, बाबा!!हा" मोहित" अन्विताने ओळख करून दिली...

मोहीतने पाया पडायची संधी सोडली नाही... लागलीच वेळ न दवडता मोहीत अन्विताच्या आई आणि बाबाच्या पाया पडला...

त्या मुळे मोहीतची अन्विताच्या बाबांवर पूर्ण छाप पडली होती...

अन्विता : बाबा तुम्ही बोलत बसा मी जरा फ्रेश होऊन येते...

आता आपल्याला मोकळेपणाने बोलता येईल हे अन्विताच्या बाबांनी जाणले...

अन्विताचे बाबा : मोहीत!! तू काय करतोस??

मोहीत : ड्राय फ्रुटस चा व्यवसाय करतो...माझ्याकडे आलेले ड्राय फ्रुटस देशात आणि विदेशात देखील विक्री होतात... मी स्वतः या मध्ये लक्ष घातल्यामुळे प्रॉडक्ट ची क्वालिटी टिकून आहे.. एक मिन मी आलोच असं म्हणून मोहीत कार कडे गेला...

इंप्रेसिव्ह... एकदम अन्विताचे बाबा म्हणाले... जानकीला देखील मोहीत खूप आवडला...

तितक्यात समिश्र ड्राय फ्रुट्स चा एक बॉक्स मोहीत त्याच्या हातात घेऊन घरात आला... हे घ्या बाबा!! मी सोबतच आणले होते...टेस्ट करून बघा...हे घ्या काकू!!असं म्हणून ड्राय फ्रुटसचा तो बॉक्स समोर केला...

अन्विता फ्रेश होऊन हॉल मध्ये आली...

अन्विताचे बाबा, आई आणि मोहीत तिघांना मोकळेपणाने बोलताना पाहून तिला खूप आनंद झाला.. आता आपल्याला कुठलेही टेन्शन नाही हे तिच्या लक्षात आले..

अन्विता आणि मोहीत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा... की अन्विता!! तुझं हे आता शिकायचं वय आहे.. अजून तुला तुझं graduation पूर्ण करायचं आहे..मी जरा स्पष्टच बोलतो....त्या मुळे तुम्हाला काही मर्यादा पाळाव्या लागतील....अन्विताचे बाबा अन्विताला पाहून म्हणाले...


मोहीत : बाबा!! तुम्ही बिलकुल काळजी करू नका... तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही असं बिलकुल वागणार नाही..

अन्वीताची आई : बरं मोहीत!! आता आला आहेस तर आज जेवूनच जा...

मोहीत : हो हो नक्की...

अन्विताचे बाबा : मोहीत!!तुझ्या घरी कोण कोण असतं...

मोहीत : बाबा!! मी अनाथ आहे... मला आपलं असं कुणीच नाही... मी अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालो..

आपलाही इतिहास मोहीत सारखाच आहे... आणि आपण अनाथ असल्यामुळे जानकीच्या बाबांनी आपल्याला नाकारलं होतं म्हणून नाईलाजाने आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागलं होतं...हे जाणल्यामुळे अन्विताच्या बाबांना मोहीत अजून जवळचा वाटायला लागला...

थोडया वेळानंतर मोहीत त्यांच्या घरातील एक मेंबर असल्यासारखा वाटायला लागला...सुरुवातीला तणावपूर्ण वाटणारे वातावरण आता चांगलेच हलके फुलके झाले होते...

मोहीतने एकाच दिवसात सर्वांची मने जिंकली होती...

ईकडे सूर्या मात्र आता खूपच विचित्र अवस्थेत सापडला होता...

एकीकडे त्याचा प्रेमभंग, एकीकडे खोटी मैत्री आणि एकीकडे मोहीतचे त्याच्यापेक्षा उजवे असणे..
सगळंच समीकरण त्याच्या मनाविरुद्ध झाले होते..

 आपण मिस्टर ब्लॅकला सांगितलं तर?? की आपल्याकडून ही सुपारी शक्य नाही... पण आपल्याला माघार....

देवा तूच वाचव मला या मिस्टर ब्लॅकच्या कचाट्यातून..
अन्विताच्या नकारामुळे मला आता सगळं काही सोडून द्यावंसं वाटत आहे..काहीच करावंसं वाटत नाहीये...

सूर्याला सगळीकडे नकारात्मक वाटायला लागलं होतं..

तितक्यात सूर्याला मिस्टर ब्लॅकचा फोन आला...

मिस्टर ब्लॅक : सूर्या!! तू मला हल्ली काहीच updates देत नाहीयेस... तू तुझी मोहीम विसरला वाटतं...

सूर्या : नाही नाही बॉस... विसरलो नाही... फक्त थोडा थंड पडलो आहे... पण लवकरच मी नवीन प्लॅन आमलात आणेल...

मिस्टर ब्लॅक : हे बघ सूर्या!!जरा लवकर... दोन महिन्यामध्ये मला त्या अन्विताच्या घराची माहिती खडा न खडा मिळाली पाहिजे... समजलं?? अगदी त्यांच्या प्रॉपर्टी सहीत... तुला काय वाटतं की ही माहिती मी माझे गुंड वापरून करू शकत नाही का? पण मला काही मागचे जुणे कर्ज वसुल करायचे आहे त्या मुळे या पद्धतीने जावं लागत आहे... नाही तर 48 तास पण लागणार नाही मला याची काळी आणि छूपी प्रॉपर्टी माहिती करायला??समजलं... कुठे 48 तास आणि कुठे दोन महीने.... पण ही डेड लाईन समज... समजलं का...

सूर्या : ok बॉस आता नाही ढिला पडणार मी

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
भाग 11 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
.
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या