काय तो आता अन्विताचा निर्णय मी लावतोच...
सूर्या काहीतरी कठोर निर्णय घेतल्यासारखा बोलत होता..
मिस्टर ब्लॅक :हे बघ सूर्या आता मी फोन ठेवतोय... उद्या मी भारतात येणार आहे... परवा संध्याकाळी 5 वाजता मला तू माझ्या नेहमीच्या अड्डयावर भेट...समजलं का?
सूर्या : हो बॉस हो...
मिस्टर ब्लॅक : चल मी फोन ठेवतो असं म्हणून मिस्टर ब्लॅकने फोन ठेवला...
सूर्या मात्र विचार करत बसला... बॉसच्या बोलण्याने तो जरा गोंधळला होता... बोलण्याने म्हणजे... त्याच्या बोलण्याच्या टोन ने तो गोंधळला होता... कारण बॉस चा बोलण्याचा टोन हा साधा सरळ होता... त्या मध्ये नेहमीसारखा कडक पणा नव्हता... जणू काही बॉसला सूर्याकडून काही अपेक्षाच नसावी... उगाचच काहीतरी म्हणायचं म्हणून बॉस ने आपल्याला फोन केला असं त्याला वाटून गेलं...
मोहीत त्याच्या घरी निघून गेल्यानंतर अन्विताच्या घरी फक्त मोहीत बद्दलच चर्चा होती..मोहीत अन्विताच्या आई बाबांना आवडला होता.. मोहीत सर्वगुणसंपन्न आहे आणि तो अन्विताला खूप आनंदी ठेवेल याची खात्री अन्विताच्या आईवडिलांना वाटायला लागली होती.
त्या मुळे अन्विताचे बाबा आता अन्विताच्या बाबतीत बऱ्यापैकी निश्चिन्त झाले होते..
मिस्टर ब्लॅक भारतात परत आला... ठरल्याप्रमाणे सूर्या मिस्टर ब्लॅकला भेटायला गेला.. बऱ्याच दिवसानंतर मिस्टर ब्लॅक आल्यामुळे त्याच्या अवती भोवती त्याच्या खास माणसांचा गराडा होता..
मिस्टर ब्लॅक : ये सूर्या!! कुठपर्यंत आलं आहे अन्विता प्रकरण??
सूर्या : मैत्री झाली.... त्या मोहीतने गोंधळ घातला म्हणून नाहीतर मी थोडा पुढे गेलो असतो...
मिस्टर ब्लॅक : सूर्या!!मला खरं खरं सांग... तुला मनापासून ईच्छा आहे ना माझे काम करण्याची??
हे काय विचारत आहेत... सांगून टाकू का मला हे काम करायचं नाही ते?? सूर्या विचार करू लागला...
काय समजू मी?? सूर्या!!तुला कमिशनर ला कबूली जबाब द्यायचा आहे का? जेल मध्ये अडकायचं आहे का? मिस्टर ब्लॅक त्वेषाने म्हणाला..
सूर्या :नाही बॉस!! मी अन्विता विषयी विचार करत होतो..
मिस्टर ब्लॅक : नुसता विचार नाही.. मला कृती पाहिजे...
तितक्यात सूर्याला एका माणसाचा छद्मी पणाने हसण्याचा आवाज आला...
सूर्याने त्या माणसाकडे नजर फिरवली... त्या माणसाने मास्क लावलेला होता.. पण त्याचे डोळे ओळखीचे वाटत होते.. याला मी कुठे तरी पाह्यलं आहे?? कदाचीत मिस्टर ब्लॅकच्या या गोटातच...
ठीक आहे बाबांनो आज माझा दिवस नाही पण जेव्हा माझा दिवस येईलना तेव्हा तुम्हाला समजेल हा सूर्या काय चीज आहे हे...
असा विचार करत करत सूर्या त्याच्या घरी जायला निघाला...आज त्याने त्याची बाईक घरी ठेवली होती.. म्हणून तो रस्त्याने पायीच निघाला...
चालत चालत त्याच्या डोक्यात सतत त्या मास्क लावलेल्या माणसाबद्दल विचार चालू होता...
कुठे पाहिलं आहे मी त्याला... माझ्यावर हसत काय होता... त्याच्या मास्क मुळे मला लक्षात का येत नाहीये...
जाऊदे सूर्या आता डोक्याला तो ताण नको आपण अन्विताला कसं ईतकं जवळ करायचं की ती आपल्यावर शंभर टक्के विश्वास टाकेल... याचा विचार करणं जरुरी आहे...
असा राहून राहून विचार सूर्याच्या डोक्यात येत होता...
विचार करता करता अचानक सूर्याला काहीतरी क्लिक झालं...
मोहीत yes मोहितच होता तो...😳😳
मास्क वाला... म्हणजे???
सूर्याला एकदम ग्लानी आली तिथेच एक भिंतीचा कठडा होता तिथे तो धपकन बसला...
त्याच्या डोळ्यासमोर क्षणभरासाठी एकदम पांढरं पांढरं दिसायला लागलं....
बसल्यावर कसाबसा सावरत समोरच्या टपरीवाल्याला आवाज देऊन एक बिसलेरी बॉटल मागितली....पाणी पिल्यावर स्वतःच्या चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा मारला... आणि टपरीवाल्याला चहा सांगून तिथेच विचार करत बसला...
सूर्या आता एक एक गोष्ट आठवत होता...आणि त्याला आता link लागत होती...
हा मोहीत मिस्टर ब्लॅक चा प्यादा तर नाही ना... ओ माय गॉड... म्हणजे मोहीतचं अन्विता वर प्रेम वगैरे काही नाही?? 😳 नसावच...
माझ्या आधी मिस्टर ब्लॅक ने मोहीतला कामाला लावलं होतं....
मिस्टर ब्लॅक माझ्याशी फेअर नव्हताच कधी.. अरे पण त्याला जर मोहीतचा वापर करून घ्यायचा होता तर मला तरी का अडकवलं??आता मला समजतंय अन्विताने मोहीतला होकार दिल्यावर मला येणारे मिस्टर ब्लॅकचे फोनकॉल्स बंद का झाले..याचा अर्थ असा की मिस्टर ब्लॅकला सगळे updates मिळत होते.. मग तरी देखील मला का बरं मिस्टर ब्लॅकने असे गोवले असेल??
पण एक बरं झालं... मला मिस्टर ब्लॅकच्या नकळत आता यातून बाहेर पडता येईल... आणि मोहीत?? मोहीतला तर मी बघुन घेईनच पण अन्विता!!तिचं काय?? तिला खरं कळालं तर?? तिला किती मानसिक धक्का बसेल... पण जर तिला कळालंच नाही तर मिस्टर ब्लॅकच्या प्लॅनला ती बळी पडेल...
सूर्या जसं जसं विचार करत होता.. तसं त्याला एकामागे एक धक्के बसत होते....जर मला ईतके एक एक मानसिक धक्के बसत आहेत तर अन्विता... अन्विता तर कोलमडून पडेल??
पण सूर्या तुला एक करावं लागेल... अन्विताला असले धक्के कमीत कमी बसावे असं काहीतरी करावं लागेल...असं स्वतःशीच सूर्याने ठरवलं... कॅन्टीनच्या चहाने आता त्याला थोडी तरतरी आली होती..
सूर्या आता त्याच्या घरी जायला निघाला...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 12 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
0 टिप्पण्या