सगळ्याच विचारांनी सूर्याचं डोकं एकदम जड झालं होतं.
... आता मोहीत या षडयंत्राचा मुख्य भाग आहे... आपण नाही... वा हे खरंच आपल्या साठी चांगलं आहे... आपण याच गोष्टीचा वापर अन्विताला मिळवण्यासाठी करू शकतो..
Afterall.. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं...प्रेमासाठी काहीपण... असं मनोमन सकारात्मक विचार करत सूर्या त्याच्या घरी पोहोचला...
विचारांचं कसं असतं नाही... काल परवा पर्यंत मला असं वाटत होतं की अन्विता माझ्या आयुष्यात येऊच शकत नाही..तिचा विचार आपल्याला सोडून द्यावा लागेल
....पण आज वाटत आहे की अन्विता आता माझीच लाईफ पार्टनर होऊ शकते...
पण आता पुढे काय??पुढे आपण पण फक्त दाखवल्या सारखं करायचं.. आता यांच्या षडयंत्रास neutral करण्यासाठी आपलं एक षडयंत्र... 😂😂😂 मस्तच आपण आता प्लॅन करून अन्विताला मोहितच्या तावडीतून सोडवले पाहिजे... पण कसं?? 🤔..
अचानक सूर्याला उत्साहाचं उधाण आलं होतं.. उत्साहाच्या भरात सूर्या ने त्याच्या घरात अस्ताव्यस्त पडलेला पसारा आवरला... आज मी आवरतोय... उद्या कदाचीत अन्विता... सूर्या दिवास्वप्न बघू लागला आणि स्मित करू लागला ...
ईकडे अन्विताचे बाबा आता अन्विताच्या लग्नाविषयी विचार करू लागले..
अन्विताचे बाबा : जानकी!! मला ना आपल्या अन्विताचं लग्न धूमधडाक्यात आणि मोठं करायचं आहे...काहीच कमी पडायला नको.. आपण ईतकं मोठं लग्न करू की सगळे लोकं बघुन अवाक झाले पाहिजे..
जानकी : असं का?? तुम्ही तर असं म्हणत आहे की जसं काही तिचं उद्याच लग्न करणार आहात... अहो अजून तिचं graduation पूर्ण व्हायला तीन वर्ष आहेत.. समजलं का?
अन्विताचे बाबा : हं... जानकी मी काय म्हणतो?... अन्विताला??
जानकी : हं.. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे लक्षात आलं मला... नको.. बिलकुल नको.. तो भूतकाळ होता.. तिला काहीही सांगण्याची गरज नाहीये.. आणि प्लीज हा विषय परत नको प्लीज..
अन्विताचे बाबा :बरं बाबा!!राह्यलं... नाही तर नाही... मी हा विषय परत काढणार नाही... पण कधी कधी वाटतं??
जानकी : अरे तुम्ही परत 😡...
अन्विताचे बाबा : बरं नाही बोलत मी...
सूर्याची रूम आवरून झाली की तितक्यात सूर्याकडे त्याचा मित्र प्रदीप आला...
प्रदीप : काय सूर्या!!आजकाल भेटणं तू खूप कमी केलं आहेस?? काय पळून वगैरे जाण्याचा विचार तर नाही ना...
सूर्या : प्रदीप!!समजा मी पळून गेलो तर तुला सापडणार नाही असं शक्यच नाही ना...
प्रदीप : सूर्या!!मला तुला एक सांगायचं होतं?
सूर्या : काय रे...
प्रदीप : मला मिस्टर ब्लॅकच्या गोटातून बाहेर पडायचं आहे... बस्स झाली ड्रग्स सारखी पापं...
सूर्या :😳 काय?? प्रदीप!! तू हे काय बोलत आहेस...उगाचच खिडकी उघडून सूर्या बाहेर पाहू लागला...
प्रदीप : सूर्या!! तू खिडकीबाहेर काय बघत आहेस?
सूर्या : काही नाही रे.... आज सूर्य कुठून उगवला हे मी पहात आहे...
प्रदीप : त्याला कशाला बघतोस... स्वतःला बघ की... 😂😂😂
सूर्या : प्रदीप!!तू तर नहिले पे दहिला मारला ....
प्रदीप : मग... तुला काय वाटलं.. पी.जे. काय फक्त तू मारू शकतोस का?? 😂😂
सूर्या : पण असं काय झालं की तू एकदम असा विचार करत आहेस??
प्रदीप : कसं आहे ना सूर्या जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वतः खड्ड्यात पडतो.. ही म्हण माझ्या बाबतीत खरी झाली आहे...
माझा लहान भाऊ प्रकाश त्याला आपल्याच कॉलेज मधून ड्रग्ज मिळाले आणि आता तो संपूर्ण त्याच्या आहारी गेला आहे...
मी आणि माझे बाबा त्याला यातून बाहेर काढण्याचे अतोनात प्रयत्न केले... पण सगळं व्यर्थ...
आज तर मी त्याचे हातपाय चक्क बांधून आलोय...कधी स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की मला प्रकाश सोबत ईतकं रुड वागावं लागेल....
तुला मी इतक्या दिवसात का भेटलो नाही माहितीये... कारण मी आणि माझ्या बाबांनी प्रकाशला rehablitation सेंटर मध्ये टाकलं होतं... पण तो तिथून पळून गेला... त्याला शोधून शोधून थकलो... शेवटी तो मला बसस्टॅन्ड वर फार विचित्र अवस्थेत भेटला... मग कसं बसं त्याची समजूत काढून त्याला घरी आणलं...
डोळे पुसत प्रदीप प्रकाशबद्दल बोलत होता...
सूर्या : पण प्रकाश तर एकदम हुशार ना रे... आणि आपल्या या कॉलेजशी त्याचा दुरूनही संबंध नाही... मग?? तो कसाकाय यात अडकला..
प्रदीप: मलाही नेमकं नाही माहिती...पण त्याचा प्रेमभंग झाला आणि तो या गांजाच्या आहारी गेला... आणि तितक्यावरच तो थांबला नाही.. त्याने विविध ड्रग्ज try करून बघितले... आपण जितक्या प्रकारच्या ड्रग्जचा व्यवहार करतो ते सर्व...
सूर्या : बापरे... खरं सांगू का प्रदीप... त्या कमिशनर प्रकारापासूनच मी बाहेर पडायचं ठरवलं होतं पण नेमकं मिस्टर ब्लॅकने मला अन्विताची सुपारी दिली... प्रदीप!!आपण जेव्हा या क्षेत्रात पाऊल ठेवलं तेव्हा कुणाचा जीव घेण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं... मला तर फक्त पैसा कमवायचा होता... तो ही लवकर... पण या पैसे कमवण्याच्या नादात मी किती जीवांशी खेळत आहे हे कसं नाही समजलं... का मी त्याच्या दुष्परिणामांचा विचार केला नाही.....
प्रदीप : जाऊदे सूर्या!!आता आपल्याला रडत बसण्यात काही अर्थ नाही... पण ईथुन पुढे आपण यातून बाहेर पडणार हे नक्की...
प्रदीपला मी मोहीत बद्दल सांगू का?? पण जर हा प्रदीप आपल्याशी खोटं बोलत असेल तर... कितीही नाही म्हटलं तरी प्रदीप हा मिस्टर ब्लॅक चा खूप महत्वाचा माणूस होता... आपल्याला ईतक्यात प्रदीपवर विश्वास ठेवता येणार नाही... पण जर प्रदीप आपल्याशी खरं बोलत असेल तर🤔... एक से भले दो... आपल्याला अन्विताला मिस्टर ब्लॅक आणि मोहीतच्या तावडीतून वाचवता येईल....सूर्या विचार करू लागला...
प्रदीप : सूर्या!!कुठे हरवलास??
सूर्या : काही नाही रे... जरा विचार करत होतो... कॉलेज मध्ये ऍडमिशन झाल्यावर ठरवलं होतं की आता एकदम सरळ मार्गाने जावं... पण लोकांनी माझ्या आईवर ठेवलेला ठपका आठवला नी मी वाम मार्गाला लागलो...
प्रदीप : सूर्या!!अरे तुझं नावच सूर्या आहे...त्याचा उदय होऊ दे.. आणि जे झालं तो अंधार होता असं समजून सोडून दे...
सूर्या : प्रदीप!! मला नाही वाटत की आता ते शक्य आहे... मिस्टर ब्लॅक...
प्रदीप : हं.... तुझं ही बरोबर आहे म्हणा... बरं ते जाऊदे... आता आपण मिस्टर ब्लॅकच्या तावडीतून सही सलामत बाहेर कसं पडायचं याचा विचार करू या...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 13 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇http://www.swanubhavsaptarang.com/2021/07/13.html
0 टिप्पण्या