दैव जाणीले कुणी (भाग 13)

प्रदीपला जर खरंच मिस्टर ब्लॅकच्या तावडीतून सुटायचे असेल तर आपला यात डबल फायदा आहे...

एक तर आपल्याला मिस्टर ब्लॅक च्या ग्रुप मधून बाहेर पडणे सोपे होईल आणि दुसरं की कदाचीत अन्विताला मोहीत च्या तावडीतून बाहेर काढण्यासाठी देखील मदत होईल...
 पण नाही इतक्या लवकर मी प्रदीप च्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही..

मी स्वतः एकदा प्रकाशला स्वतःच्या डोळ्याने बघतो मग ठरवू प्रदीपला आपल्या प्लॅन मध्ये कसे सामील करून घ्यायचे ते...
सूर्याच्या डोक्यात नुसतं विचारचक्र चालू होतं...

प्रदीप : ए सूर्या!!कुठे तंद्री लागली तुझी..

सूर्या : काही नाही रे... मी जरा प्रकाशचा विचार करत होतो..

हं... तू एकदा भेट ना... कदाचीत तुला भेटून त्याला बरं वाटेल...प्रदीप एकदम कळकळीने सूर्याला म्हणत होता...

आता मात्र सूर्याला थोडा थोडका का होईना प्रदीप वर विश्वास बसायला लागला...

अन्विता झुक्या आणि बेला यांचं त्रिकुट नेहमीप्रमाणे मस्ती करत होतं...

अन्विता : झुक्या? गायत्रीचं पुढे काय झालं??

झुक्या : काय होणार... ती आपलं नेहमी सारखीच... पण काय गं अन्विता तुझं जमलं तर तू आम्हाला विसरूनच गेलीस... तू गायत्रीशी बोलणार होती ना?

अन्विता : हे बघ झुक्या!!तू म्हणत असशील तर मी आताच जाऊन बोलते... जाऊ का??

झुक्या : हं... तू काय जातेस?तुला विचारायचं असतं तर तू नक्कीच आतापर्यंत तिला विचारलं असतं...

अन्विताने झुक्याचं ते बोलणं ऐकलं अन ताड ताड करत ती तिथून निघून गेली...

झुक्या : बेला!!ही ईतकी ताड ताड करत निघून का गेली..

बेला : मला वाटतं तिला तुझा राग आला...

झुक्या : तुम्हा पोरींच्या नाकाच्या शेंड्यावर राग असतो....आता मला काय माहिती होतं की अन्विताला ईतक्या साध्या गोष्टींचा पण राग येईल....

अन्विता ताड ताड करत गायत्री जवळ गेली...

अन्विता :ए गायत्री!! तू ईतका काय भाव खातेस गं...

गायत्री : भाव 🤔कसला भाव...

अन्विता : अगं मी झुक्या बद्दल बोलतीये... तुला आपल्या क्लास मधील झुक्या माहिती ना... की तो पण...

गायत्री : झुक्याचं काय??

अन्विता : तू त्याला टाळतेस म्हणे.... त्याच्याकडे साधं बघत सुद्धा नाहीस... का अशी वागतेस गं...तुझ्या अंगाला काय सोनं लागलं आहे का??

काही पण काय म्हणतेस??असं म्हणून गायत्रीने एकदम हुंदके द्यायला सुरु केले...

अन्विता :😳 गायत्री!!अगं मी असं ईतकं काय बोलले की तू एकदम रडायला लागलीस....

गायत्री : अन्विता!!तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे की तू असे नको नको ते आरोप माझ्या वरती करत आहेस...

ओ तू तर हर्ट झालीस.... गायत्री सॉरी गं... मला तुला हर्ट करायचं नव्हतं.... हे बघ आपण जरा कॅन्टीन मध्ये जाऊन बोलू का? म्हणजे जरा सविस्तर बोलता येईल... असं म्हणून अन्विताने गायत्रीला कॅन्टीन मध्ये नेलं....

अन्विता : गायत्री!!आता बोल...

गायत्री :काय बोलू....

अन्विता : अगं तू तुझ्याबद्दल काहीतरी म्हणत होती ना ते सांग... हे बघ तुला जर वाटत असेल की मी झुक्याला देखील सांगू नये तर तसं देखील सांग... मी त्याला नाही सांगणार... म्हणजे ईतका तरी तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस....

गायत्री : तसं काही नाही गं अन्विता!!माझा भूतकाळ या सर्व गोष्टींच्या पलीकडचा आहे...

अन्विता : म्हणजे??

गायत्री : म्हणजे मी विधवा आहे...

अन्विता: '😳 काय??अगं पण तुझं वय??

गायत्री : अन्विता!!मी वीस वर्षांची आहे... माझं आणि देवेनचं खूप प्रेम होतं एकमेकांवर अगदी मी आठवीत होते तेव्हापासून....

 आम्ही एकमेकांशेजारी राहायचो..शाळेत सोबत येणं जाणं असायचं... आमच्या घरी आमची पक्की मैत्री आहे असं माहिती होतं...
 म्हणून कुणी काही म्हणत नसत... पण बरोबर वयाच्या सतराव्या वर्षी आमच्या घरी आमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल कळालं... मग काय आम्ही दोघेही विविध जातींचे असल्यामुळे आम्हाला विरोध सुरु झाला...

.मला अठरा पूर्ण झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पळून गेलो... पण देवेन हा 19 चाच होता... म्हणून आम्हाला लपावं लागलं...

माझ्या बाबांनी पोलीस केस वगैरे काही केली नाही पण मी त्यांच्यासाठी मेले असं नातेवाईकांमध्ये जाहीर करून टाकलं...

आम्ही दोघांनी संसार सुरु केला...संसारात रमलो पण नियतीला हे मान्य नव्हते...

कामावरून येताना त्याला अपघात झाला आणि देवेन हे जग सोडून गेला😢...

मला परत माझ्या घरी जाण्याशिवाय काहीच ऑपशन नव्हतं...

मी सासरी आले... माझ्या सासरच्यांनी नी मला घरात घेतले नाही...ते तर सरळ म्हणाले आमच्या मुलाला गिळून बसलीस...आता कशाला आलीस.??

मी माहेरी आले... बाबांनीही घरी घेतले नाही... पण आईने बाबांचं मन वळवून मी पुढे शिकण्याच्या अटीवर ते ही अगदी मान खाली घालून मला घरात घेतलं..

माझ्या बाबतीत माझे बाबा आता अतिशय कडक वागतात... आणि खरं सांगू अन्विता!!स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं महत्व मला आता कळालं आहे...

मला कसल्याही भानगडीत पडायचं नाहीये... माझं पहिलं प्रेम देवेन होतं आणि देवेनच राहणार.....तू झुक्याला सांगशील का की प्लीज माझ्या नादी लागू नको म्हणून ...

तसंही कदाचीत माझा भूतकाळ कळाल्यावर तो माझ्या नादी लागणार नाही...

अन्विता : गायत्री!!खरंच मी खूप सुन्न झाले तुझा हा भूतकाळ ऐकून... सॉरी गं... आता मी परत तुला कधीच नाही असं रुडली बोलणार... आता मला कळालं की जोपर्यंत बोलून क्लिअर होत नाही तो पर्यंत समोरच्या व्यक्ती विषयी चांगला की वाईट असा अंदाज बिलकुल बांधू नये....

 गायत्री फ्रेंड्स....हात समोर करून अन्विता गायत्रीला म्हणाली...

गायत्री आणि अन्विता एकत्र?? 😳 अन्विताने गायत्रीला डायरेक्ट विचारले की काय? झुक्या दोघींना सोबत बघुन विचार करू लागला...

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
भाग 14 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या