दैव जाणीले कुणी (भाग 14)

अन्विता :गायत्री!!तू निवांत रहा... बघ तुला माझ्याकडून तर कुठली अश्या प्रकारे विचारणा होणार नाही पण झुक्याकडून देखील काही त्रास होणार नाही याची गॅरेंटी मी घेते. चल मी निघते ते झुक्या आणि बेला मला तुझ्यासोबत पाहून परेशान झाले आहेत...

गायत्री : ok अन्विता!!थँक्स...

अन्विता :थँक्स??

गायत्री : अगं मला समजून घेतल्या बद्दल...

अन्विता : काहीतरीच काय गायत्री!! मैत्री मध्ये no सॉरी no थँक you ok??

गायत्री :ok... नाही म्हणणार थँक्स मी...

अन्विता थेट झुक्या आणि बेला कडे गेली... झुक्या ला गायत्री बद्दल सांगायचं कसं हेच तिला कळत नव्हतं... आणि झुक्या अन्विताची आतुरतेने वाट पहात होता....

झुक्या : काय गं अन्विता!! तुझ्या आणि गायत्री मध्ये काय बोलणं झालं?

अन्विता : झुक्या!! कसं सांगू...


झुक्या : काय?? नकार दिला का तिने?? हे बघ तसं असेल तर मला सांग...मला काही वाईट वाटणार नाही.. पण तू क्लिअर क्लिअर सांग..

अन्विता : नाही रे झुक्या... असं म्हणून आणि आता सांगण्याशिवाय काहीच पर्याय नाही हे लक्षात आल्याने अन्विताने झुक्याला गायत्री विषयी सर्व काही सांगितलं...

गायत्रीचा भूतकाळ ऐकल्यावर झुक्या मात्र एकदम स्तब्ध झाला...

 त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं...

जसं जसं अन्विता झुक्याला सांगत होती तसं तसं झुक्याच्या डोळ्यातून अश्रू वहात होते सुरुवातीला डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा अन्विताच्या नकळत पुसण्यास तो यशस्वी झाला..

पण जसं जसं तिने संपूर्ण घटनाक्रम सांगायला सुरुवात केली तस तसं झुक्याचा त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि डोळ्यातून अश्रू ओघाळायला लागले....

बेला देखील स्तब्ध होऊन हे सर्व ऐकत होती...

बेला :झुक्या!! तू ईतका का सेंटी होतोस... बरं झालं सुरुवातीलाच कळालं....तू इन्व्हॉल्व व्हायच्या अगोदर...

तुला काय माहिती मी किती इन्व्हॉल्व झालो आहे बेला!!... मनातल्या मनात झुक्या बोलत होता...

अन्विता : झुक्या!!हे बघ मला काय वाटतं सांगू का... सध्या ना तू गायत्रीचा विचार करू नकोस... घरी जा शांतपणे स्वतःला विचार की खरंच गायत्री तुला तुझ्या आयुष्यात हवी आहे का?? तिचा असा भूतकाळ माहिती झाल्यावर... गायत्री देवेन वर प्रेम करत होती तुझ्यावर नाही... हे सत्य तुला ऍक्सेप्ट होईल का?

 हे बघ माझं तर स्पष्ट आणि परखड मत आहे की जर हे सत्य तुला पचत असेल तरच तू गायत्रीचा विचार करावा... नाहीतर तिचा विचार कायमस्वरूपी सोडून द्यावा....

बेला : विचार करावा?? अन्विता!!हे तू काय बोलत आहेस..समजा झुक्या अन गायत्रीचं जमलं जरी तरी दोघांच्याही घरी वादळ उठेल वादळ...

अन्विता : अगं बेला!!मी फक्त पर्याय सुचवला... शेवटी हे झुक्याचं आयुष्य आहे त्याला कश्या पद्धतीने जगायचं आहे हे मी थोडीच सांगू शकते...

झुक्या : अन्विता!!बेला!!मी घरी जाण्यासाठी निघतो.. तसंही शेवटच्या लेक्चर मध्ये माझं मन काही लागणार नाही... मला ना काहीच समजत नाहीये...

अन्विता : झुक्या!!तू जा...खरंच जा ...लेक्चरच्या notes मी तुला देईन...तू काळजी करू नकोस... जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं....

झुक्या : हं... निघतो मी...

काय यार.... किती बोर झाला ना झुक्या...बेला झुक्याकडे बघत अन्विताला म्हणाली....

सूर्याचं प्लॅनिंग सुरु झालं...

सगळ्यात पहिले आपल्याला मोहीतची संपूर्ण माहिती काढावी लागेल...
त्याच्यावर अशी नजर ठेवावी लागेल की तो अन्विताच्या बाबतीत कुठलं पाऊल उचलतो त्या आधी आपल्याला काही पावलं उचलावी लागतील..

तसं ही मोहीत देखील या पुढे काय पाऊले उचलू शकतो हे आपल्याला माहिती आहेच...

 एकाच षडयंत्राचा भाग असल्यामुळे...

आपल्याला मोहीत शी मोकळेपणाने बोलेल का? बहुतेक नाही... म्हणूनच मिस्टर ब्लॅक समोर मला तो ओळखू येऊ नये म्हणून मास्क घातला होता....

आपल्याला एक करता येईल.... आता मोहीतच्या आधी आपण जर अन्विताच्या प्रॉपर्टीची माहिती काढली आणि मिस्टर ब्लॅकला ती दिली तर मिस्टर ब्लॅक ला आपल्यावर मोहीत इतकाच विश्वास ठेवावा लागेल...

आणि प्रदीप🤔... प्रदीप माझ्या पेक्षा मिस्टर ब्लॅक च्या जवळचा आहे... प्रदीप कडून मिस्टर ब्लॅक बद्दल अजून काही माहिती मिळते का ते बघू...

 जेणेकरून मला आणि कदाचीत प्रदीपला देखील मिस्टर ब्लॅक च्या तावडीतून सुटता येईल... म्हणजे साप ही मरेल आणि काठी पण तुटणार नाही....

सूर्या आता विचार करणं बस्स... कामाला लागावं लागेल... असा विचार करून सूर्याने घड्याळी कडे नजर फिरवली...

 वाह काय timing आहे कॉलेज सुटायला फक्त 15 मिनिटे बाकी आहेत...

आपल्याला आहे तसंच निघावं लागेल असा विचार करून सूर्या लागलीच त्याच्या बाईक वर बसला आणि कॉलेज कडे निघाला....

आज कुठल्याही हलतीत मोहीत च्या डिझायर चा पाठलाग करून पुढे कुठे जातात हे पाहूया...असा विचार करत सूर्या कॉलेज मध्ये पोहोचला ....

अन्विता नुकतीच मोहीतच्या कार मध्ये बसत होती...

अगदीच योग्य वेळेवर पोहोचल्यामुळे सूर्याला अतिशय आनंद झाला...

अन्विता आणि मोहीतच्या नकळत सूर्याने त्यांचा पाठलाग सूरू केला...

मोहीत नेहमीप्रमाणे अन्विताला सोडवायला तिच्या घरी गेला..

सूर्या दुरूनच मोहीत आणि अन्विताच्या हालचाली टिपत होता... मोहीतचे अन्विताच्या बाबांना नमस्कार करणे काय... अन्विताचे बाबा आणि मोहीत गार्डन मध्ये गप्पा मारत चहा घेत बसलेले बघितले....

हे बघितल्यावर सूर्याला मोहीतच्या वागण्याचा अंदाज आला....

मोहीत म्हणजे एक्सप्रेस गाडीच्या वेगाने पुढे जात आहे... आणि त्याच्या तुलनेत मी पॅसेंजरही नाही...😢

मोहीत ने नुसतं अन्वितालाच नाही तर त्याच्या घरच्यांनाही पटवलं आहे काय ....

चहा घेऊन मोहीत!!निघाला... त्याला बाय करण्यासाठी अन्विता बाहेर आली....

मोहीत तिथून निघून गेला...

आणि सूर्या!! डायरेक्ट प्रदीपच्या घरी गेला... प्रकाशचे सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी....

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
भाग 15 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या