सूर्या प्रदीपच्या घरी पोहोचला...
प्रदीप हॉल मध्ये विचार करताना दिसला...
प्रदीप :सूर्या तू!! बरं झालं तू आलास... अरे मी तर परेशान झालो आहे...
सूर्या : का काय झालं?? परेशान कश्यामुळे झालास तू?
प्रदीप :अरे तेच... प्रकाशचा धिंगाणा... शेवटी त्याला रूम मध्ये कोंडून ठेवलंय... काय करू....
सूर्या : अरे असं कसं कोंडून ठेवलं... त्याने जर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर??
तसं केलं तर बरंच होईल...तोही सुटेल आणि मीही प्रदीप रागात येऊन म्हणाला...
सूर्या : तुला कळतंय का तू काय बोलत आहेस ते??
प्रदीप : हं.. सॉरी सूर्या!!पण तो काही तसं करू शकणार नाही... त्याला मी साखळदांडाने बांधलं आहे...
सूर्या :😳काय??
प्रदीप : हं... माझ्याकडे काही पर्यायच नव्हता मी काय करू...
सूर्या : हे बघ प्रदीप!!माझं आणि त्याचं जरा जमतं... जर माझ्याशी काही मनमोकळे पणाने बोलला तर...
प्रदीप : तो violent होत आहे... तुला त्याच्याशी बोलायचं तर जरा सांभाळून बोलावं लागेल...तसं तो तुझा फॅन आहे...कदाचीत तो तुझ्याशी व्यवस्थित बोलेल ही...
सूर्या : हं... चल बघुयात काय म्हणतो प्रकाश?
प्रदीप ने रूमचा दरवाजा उघडला... सूर्या आणि प्रदीप रूम मध्ये गेले... रूममध्ये एकदम मंद प्रकाश होता.. प्रदीप ने ट्यूब लावली..... प्रकाशने एकदम समोर हात धरला जेणेकरून त्याच्या डोळ्यावर डायरेक्ट उजेड पडणार नाही..
सूर्या ने प्रकाशला पाहिलं... प्रकाशला साखळदांडाने बांधलेले होते... साखळदंडाचा एक भाग खिडकीला बांधलेला होता...
बापरे काय हाल झाले आहेत प्रकाशचे....सूर्याला पाहून कसं तरी वाटायला लागलं...
सूर्या : प्रकाश!!
सूर्याच्या आवाजाने प्रकाश एकदम भावनाविवश झाला...
प्रकाश : दादा!!बघ ना यांनी माझं काय केलं...मला कसं बांधून ठेवलं...तू समजावून सांग ना प्रदीप दादा ला असं म्हणून प्रकाश रडायला लागला
सूर्या :अरे प्रकाश!!असं रडतोस काय??हे बघ तू शांत हो...असं म्हणून सूर्या प्रकाशच्या जवळ गेला...
प्रकाश : बघ ना सूर्या दादा!!आता मी ड्रग्ज नाही घेणार.. अगदी प्रदीप दादाची शपथ....
प्रदीप :ए प्रकाश!!उगाच माझी खोटी शपथ घेऊ नकोस...
प्रकाश : बघ सूर्या दादा... हा प्रदीप दादा कसा वागत आहे...
सूर्या : बरं बाबा प्रकाश!!तुला मी सोडतो... मग तर झालं...
असं म्हणून सूर्या प्रकाशच्या एकदम जवळ गेला...प्रकाशला हात लावणार ईतक्यात प्रकाशने त्याच्यावर हल्ला चढवला..
साखळदंड असतानाही प्रकाशच्या अतिशय जवळ असल्यामुळे सूर्याला त्याने जखडलं... त्याची मान पकडण्याचा प्रयत्न केला...
तितक्यात प्रदीपने खानकन प्रकाशच्या थोबाडीत मारली... त्या मुळे सूर्याची सुटका झाली...
सूर्या आणि प्रदीप,प्रकाश पासून दूर गेले... प्रकाश मात्र प्रदीपच्या मारामुळे शांत झाला आणि स्वतःचा गाल चोळू लागला...
सूर्या : प्रदीप!! हे काय होऊन बसलं रे...
प्रदीप : बघ ना सूर्या!!
सूर्या : मी काय म्हणतो प्रदीप!!माझ्या ओळखीचे एक मानसोपचार तज्ञ आहेत... आपण त्यांचा सल्ला घ्यायचा का....
प्रदीप : हो सूर्या!!आपण जे काय करायचं ते लवकर करू म्हणजे निदान प्रकाश बरा तरी होऊ शकेल ना... आता मला प्रकाशचे हाल बघवत नाही रे...सूर्या!!प्रकाश बरा होईल ना??
सूर्या :प्रदीप!!सगळं काही ठीक होईल... तू काळजी करू नकोस...
सूर्याला आता प्रदीपच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास बसायला लागला होता....
मोहीतचे आता अन्विताच्या घरी रोज येणे जाणे चालू होते...
अन्विताच्या घरानंतर मोहीत अन्विताच्या बाबांच्या लॅब पर्यंत गेला होता...
लॅब कशी आहे हे त्याने बघायचे ठरवले ...
पण लॅब अन्विताच्या बाबांची असली जरी तरी आतमध्ये जाण्यासाठी कडक security होती... लॅब च्या एन्ट्री दरवाजावर एक बास्केट होती... आणि तिथे भिंतीवर जागोजागी काही सूचना लिहीलेल्या होत्या...
Please keep silence,
please switch of your mobile here, and drop here.
अश्या प्रकारच्या सूचना पाहून मोहीत परेशान झाला... आता लॅब मध्ये फोटो आपल्याला घेता येणार नाही...
तरी आपण अन्विताच्या बाबांना विचारून बघू असा विचार करत असतानाच अन्विताच्या बाबांनी त्यांचा स्वतःचा मोबाईल तिथल्या बास्केट मध्ये टाकला...
आता अन्विताच्या बाबांनीच त्यांचा मोबाईल बास्केट मध्ये टाकल्या मुळे मोहीतला त्याचा स्वतःचा मोबाईल देखील बास्केट मध्ये टाकावा लागला...
त्या नंतर अन्विताच्या बाबांनी बायोमेट्रिक उपस्थिती तर मोहीत ची एन्ट्री तिथल्या कॉम्प्युटर मध्ये feed केली गेली त्यावर त्याची डिजिटल signature देखील घेण्यात आली.
नवीन कुणीही व्यक्ती जर तिथे आला तर त्या व्यक्तीचे सगळे डिटेल्स कॉम्पुटर मध्ये feed करून crime ब्रँच ला पाठवायचं आणि तिथून जर कन्फर्म झालं तरच त्यांना आत सोडायचं...असा तिथला नियम होता...
मोहीतचा review आला... कलम 302,307,420 बापरे बाप...
तिथला security gard काही बोलणार ईतक्यात मोहीतची नजर त्या रिपोर्ट कडे गेली...
अन्विताचे बाबा समोर बघत असतानाच मोहीत ने दोन हजार च्या दहा नोटा त्याच्या खिश्यातून काढून security gard च्या खिशात घातल्या...आणि फक्त शांत राहा असे खुणावले...
पैसे पाहून security खूष झाला...
सुटलो बूवा असा विचार करून मोहीत देखील खूष झाला....
तिथून दोघेही changing रूम मध्ये गेले.... अन्विताच्या बाबांनी एक ड्रेस मोहीतच्या हातात दिला आणि दुसऱ्या changing रूम मध्ये जाऊन change करायला सांगितलं... आणि स्वतः देखील change करण्यासाठी एका रूम मध्ये गेले...
Change करून झाल्यावर आतमध्ये जवळ जवळ अर्धा km चालत गेल्यावर तिथे परत एकदा त्यांची स्क्रिनिंग झाली... स्क्रिनिंग झाल्यावर तेथील security gard ने all ok असा इशारा केल्यावर त्यांच्या हातात त्यांच्या लॅब रूम ची चावी देण्यात आली...
चावी उघडून अन्विताच्या बाबांच्या लॅब मध्ये एन्ट्री केल्यावर अन्विताच्या बाबांनी मोहीत ला एक एक गोष्ट दाखवायला सुरुवात केली...
आता बोलता येत होतं तितकं शांत राहायची गरज नाही हे पाहून मोहीत अन्विताच्या बाबांना म्हणाला... बाबा!!ही लॅब फक्त तुमच्या मालकीची आहे की आपण एन्ट्री केली तो एरिया देखील??
अन्विताचे बाबा : तुला काय वाटतं??
मोहीत : एवढी security बघता एवढी लॅब फक्त??
अन्विताचे बाबा : 😂😂 मोहीत तुझा अंदाज चुकला... हा संपूर्ण एरिया माझा आहे.. तसं पहायला गेलं तर यातील अर्धा भाग माझ्या एका जुन्या जिवलग मित्राचा आहे...
पण तो मित्र दडून बसल्यामुळे मीच त्याचा वापर करत आहे.. पण तो अश्या पद्धतीने की जर तो मित्र उद्या परत आला तर त्याची जमीन त्याला मिळाली पाहिजे.. अश्या पद्धतीने सर्व केलं आहे मी...
मोहीत : मित्र??कोण नशीबवान मित्र आहे तो...
अन्विताचे बाबा : मोहित!!होता एक... काळाच्या ओघात कुठे हरवला काय माहिती??
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 16 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
0 टिप्पण्या