अन्विताच्या बाबांनी मुद्दाम नाव घेण्याचं टाळलं..
संशय येईल म्हणून मोहित ने देखील विचारण्यावर जोर दिला नाही...
मोहित :बरं, बाबा!! मग ही security?? सगळं सध्या तुमच्या हक्काचं असताना.. म्हणजे ही गोष्ट मला पचायला जरा जड जातेय...
अन्विताचे बाबा : अरे माझं संशोधन तश्याच प्रकारचं आहे..माझा आर्मीसाठी काही सेन्सर बनवण्याचा प्रयत्न असतो ...
मला प्रत्येक गोष्ट गोपनीय ठेवावी लागते ....
अजूनही आर्मीच्या बऱ्याच गोपनीय गोष्टीचे काम चालू आहे..
मोहित : सॉरी म्हणजे मी विचारू शकतो का?
अन्विताचे बाबा : काय??
मोहित :कुठल्या गोपनीय गोष्टी...
अन्विताचे बाबा :अरे मोहित! मला देखील माहिती नाही ते...
म्हणजे?? मोहित पुरता गोंधळला...
अन्विताचे बाबा :मोहित!! अरे मला फक्त एक मेल येतो की यापुढे तुम्हाला आता पंधरा दिवस आमच्या under काम करायचे आहे... तयारी ठेवा... मग काय मी आणि माझी बॅग घेऊन तयार.... काम पूर्ण होई पर्यंत कुठेच जाता येत नाही...
चल तुला माझी पर्सनल रूम दाखवतो... असं म्हणून लॅब मध्ये एका कोपऱ्यात डिजिटल कीबोर्ड होता... तिथे त्यांनी काही बटण दाबले....
कदाचीत पासवर्ड असावा... काय यार आपण किती गाफिल राहिलो... पासवर्ड बघितला असता तर.... असा विचार करत करत मोहित आणि अन्विताचे बाबा त्यांच्या रूम मध्ये गेले....
मोहित :वाह काय रूम आहे... एकदम फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या रूम सारखी....तिथल्या सुविधा पाहिल्यावर मोहीतला हेवा वाटायला लागला होता..
अन्विताचे बाबा आणि मोहित रूमच्या गॅलरी मध्ये आले... अन्विताच्या बाबांनी दोघांसाठी कॉफी मागवून घेतली...
मोहित : हे रूम सर्व्हिस वगैरे त्यांना रूम मध्ये एन्ट्री आहे??
अन्विताचे बाबा : हो... पण विशिष्ट वेळेतच... आणि तसंही गोपनीय गोष्टी मला या रूम मध्ये ठेवण्याची परवानगी नाहीये...except my laptop... 😊
मोहित : oh i see... पण बाबा हे ईतकं गोपनीय ठेवणं किती अवघड जात असेल नाही...
अन्विताचे बाबा :हो... सुरुवातीला तर खूप अवघड गेलं.. पण मग आर्मी मध्ये या साठी माझी स्पेशल ट्रेनिंग झाली...
मोहित :काय?? 😳 स्पेशल ट्रेनिंग... ग्रेटच...
अन्विताचे बाबा : हो ग्रेट... आणि त्यामुळे मी आता expert झालो आहे...
मोहित: हं.... बाबा पण तुम्ही ह्या क्षेत्रात कधीपासून??
अन्विताचे बाबा : माझं graduation झालं... Bsc chemisrty केलं होतं मी... पण माझे जे विचार होते ते नेहमीच पुस्तकाच्या पुढे पळत... मला प्रत्येक reaction मध्ये प्रश्न पडत.... मग काय असंच एक साधा सिम्पल प्रोजेक्ट मी intercollege compitition मध्ये मांडला... परीक्षक जेव्हा माझ्या जवळ आले तेव्हा मी तो प्रोजेक्ट दाखवताना अजून काय काय reaction होऊ शकतात याची माहिती त्यांना दिली...
मोहित : ग्रेट...
अन्विताचे बाबा : मग काय... माझ्या msc सोबतच त्यांनी माझी एक स्पेशल ट्रेनिंग केली... आणि नंतर प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट...
पण तिथे मला होणारा भ्रष्टाचार सहन होत नव्हता... तरुण सळसळतं रक्त होतं माझं ....
माझ्याकडे खूप मोठी जमीनही होती... शिवाय माझा मित्र त्याच्याशी मी ह्या सगळ्या गोष्टी सतत बोलायचो....
तो देखील मला खूप समजून घ्यायचा...
त्याला देखील देशासाठी काहीतरी करावं असं खूप वाटायचं....
मला नेहमी म्हणायचा आपण दोघे पार्टनरशिप मध्ये प्रायव्हेट आपली लॅब करू... आणि आपलं काम करू....
पण जेव्हा माझं लग्न झालं...
.त्या नंतर काही दिवसातच अचानक एके दिवशी तो गायबच झाला.... आणि मी अजूनही त्याची वाट पाहतोय....
जाऊदे चल निघू आपण.... घरी वाट पहात असतील....
अन्विताचे बाबा आणि मोहित त्यांच्या घरी जायला निघाले...
सूर्याने आता प्रदीपला आपल्या मनात काय आहे आणि मिस्टर ब्लॅक त्याच्यासोबत कसा माईंड गेम खेळत आहे हे सांगायचे ठरवले....
सूर्या : प्रदीप!! मला तुला काहीतरी सांगायचे आहे...
प्रदीप : बोल...
सूर्याने मिस्टर ब्लॅक बद्दल प्रदीप ला मोहित बद्दल सगळं सांगितलं...
प्रदीप : मोहित?? मी त्याला चांगला ओळखतो.. एक नंबरचा डॅम्बीस माणूस आहे तो... दिसायला एकदम सोज्वळ.. आणि स्मार्ट असल्यामुळे कुणालाही भुरळ पडेल असा...
चालू तर ईतका की त्याने उजव्या हाताने चोरी केली तर त्याच्या डाव्या हाताला देखील कळणार नाही.. खरं सांगू का एकदंर त्याच्यासमोर तुझा निभाव लागणे अशक्य आहे...
त्याच्या डोक्यामध्ये षडयंत्राचे ईतके फास्ट गणित चालतात की तू विचार करेपर्यंत त्याने ते काम करून टाकलेलं असेल...
सूर्या : काय 😳तो ईतका स्मार्ट आहे?? ओ आता माझ्या लक्षात येत आहे मी अन्विताला प्रपोज करण्याआधीच याने डाव कसा साधला ते....
प्रदीप : तुला खरं सांगू सूर्या!!मिस्टर ब्लॅक चा एक खूप मोठा कार अपघात झालेला होता.. रस्त्याच्या कडेला एका मोठया झाडाला त्याची गाडी धडकली होती... योगायोगाने मी त्या रस्त्याने जात होतो... मी त्यांना ऍम्ब्युलन्स बोलवून दवाखान्यात घेऊन गेलो... वेळेवर नेल्यामुळे त्यांचा जीव वाचला...आणि अश्याप्रकारे मी त्यांच्या गोटात सामील झालो...दैव अजून काय???
त्याच वेळेस हा मोहित कुठून गोटात आला काय माहिती.... सुरुवातीला मी मिस्टर ब्लॅकच्या खूप जवळची व्यक्ती होतो... पण मोहितने त्याच्या स्मार्टनेस ची जादूची कांडी फिरवली आणि मी मागे पडलो...
तसंही क्राईम जगत मध्ये मला इंटरेस्ट नव्हता... पण एकरक्कमी मिळणारा खूप सारा पैसा.... पैश्याने माझा घात केला...
तरी देखील मी मर्डर किंवा लूटमार अश्या गुन्ह्यापासून दूर राहिलो... अन आता हे होऊन बसलं आहे....
सूर्या : ओ... म्हणजे आपण दोघेही स्वतःच्या ईच्छेने गुन्हेगारी जगात आलेलो नाहीये....
प्रदीप : हो ना....
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 17 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
0 टिप्पण्या