सूर्या : मला सांग प्रदीप!!तू मिस्टर ब्लॅकला ओळखतॊस आणि मोहितला देखील ओळखतॊस मला आता तू सांग आपल्याला अन्विताच्या षडयंत्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का?
प्रदीप : सूर्या!! ज्या परिस्थिती मुळे आपण मिस्टर ब्लॅक च्या तावडीत अडकलो आहोत ते थोडं अवघड आहे... नाहीतर आपण सहजच या षडयंत्रातून बाहेर पडलो असतो...
सूर्या :हं...
प्रदीप : मी काय म्हणतो सूर्या तसंही मोहित ने लीड घेतली आहेच ना... तू जरा बॅकफूट वर रहा... मग आपोआपच तुला त्या षडयंत्रातून बाहेर पडता येईल..
सूर्या : प्रदीप!!ते सगळं खरं आहे रे... पण अन्विताच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर?? म्हणजे तसं पुढच्या प्लॅन मध्ये आहेच की...
प्रदीप : तुला काय करायचं आहे... तिच्या मृत्यूचं पाप तुला थोडीच लागणार?? त्या मोहितला करायचं आहे सर्व तो करेलच की...
सूर्या : पाप??.. असं कसं नाही लागणार... ज्या स्पीड मध्ये मोहित पुढे जात आहे....आपल्याला माहिती आहे ना की आता जास्तीत जास्त महिनाभरात अन्विताच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होणार आहे...मग आपण तिला यातून वाचवलं तर...
प्रदीप : हं... आपल्याला अन्विताला वाचवायचं असेल तर मिस्टर ब्लॅकचा तिला मारण्या मागचा हेतू काय आहे हे आपण आधी शोधलं पाहिजे... तोपर्यंत मोहित असलं काही पाऊल उचलणार नाही हे देखील बघितलं पाहिजे.... सूर्या!! तू म्हणतोस खरं.... पण कशावरून मिस्टर ब्लॅक नी फक्त मोहितलाच या कामाला लावलं असेल??
सूर्या : म्हणजे?? 😳 तुला काय म्हणायचं आहे?? अन्विताला मारण्यासाठी अजून तिसरा कुणीतरी?? बापरे... नाही नाही हे तर महाभयंकर आहे मग... अरे बापरे... प्रदीप!!तू म्हणतोस तसं तर मग अन्वितावर कधीही जीवघेणा हल्ला होऊ शकतो🤔.बरोबर म्हणतोस प्रदीप!!तू... मिस्टर ब्लॅक चं डोकं आहे ते... आपण जिथे विचार देखील नाही करू शकत तिथे त्याचं बरोबर डोकं चालतं... म्हणून तर मला अन्विताची सुपारी देऊन मोहित ला पाठवलं... असच अजून तिसऱ्या कुणाला तो पाठवूच शकतो ना....
अन्विता आज एकटीच होती.... नेहमीप्रमाणे तिला सोडवायला आणि आणायला आज मोहित नव्हता... काही महत्वाच्या कामानिमित्त तो परगावी गेला होता..
म्हणून मग तिच्या बाबांची डिझायर गाडी घेऊन जात होती सोबत वैजू ड्राइव्हर होताच... म्हणून ती निश्चिन्त झाली.
बेला:अन्विता!!आज दूसरी गाडी??
अन्विता :अगं मोहित जरा परगावी गेला आहे... म्हणून बाबानी घरची गाडी घेऊन जायला सांगितलं.... बरं ते जाऊ दे... झुक्याची काही खबरबात? गायत्रीचं ऐकल्या पासून आज चौथा दिवस आहे तो कॉलेज मध्ये दिसत नाहीये... मला काय वाटतं माहितीये बेला??
बेला :काय??
अन्विता :आज जर झुक्या आला नाही तर आपणच त्याच्या घरी जाऊ आणि त्याची समजूत काढू...
बेला : काय समजूत काढणार आपण? ईथे त्याला बिचाऱ्याला डेस्टिनीनेच धोका दिला आहे...
अन्विता : बेला!!तू असं नेहमीच नकारात्मक का विचार करतेस? मला तर वाटतं की यातून नक्की काहीतरी चांगलं घडेल...
बेला : हं... Hope so...
अन्विता : चल लाव बरं झुक्याला फोन... त्याला म्हणावं अती झालं आता...
बेला : तो फोनच उचलत नाहीये...
अन्विता : हा झुक्या पण ना... अगं बेला!!तो झुक्याच दिसतोय ना...
बेला : कुठे ग...
अन्विता :अगं त्या कॉलेज गेट जवळ...
बेला :अगं बाई... हो की... आणि त्याचा चेहरा देखील खुललेला दिसतोय...
अन्विता : बरं झालं बाई!!म्हणजे आता आपल्याला त्याला समजवावं नाही लागणार..
बेला :वेलकम झुक्या!!झुक्या कसा आहेस??
झुक्या :कसा दिसतोय मी..
अन्विता :झक्कास..
झुक्या :हो बरोबर... एकदम झक्कासच आहे मी..
अन्विता :अशी काय जादू झाली की तू ठीक वरून एकदम झक्कास दिसायला लागणार...
तितक्यात समोरून गायत्री गेली... झुक्या मात्र एकटक गायत्रीकडे बघत होता... आज त्याच्या डोळ्यात गायत्रीविषयी भीती बिलकुल नव्हती... त्याच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चमक होती....
झुक्या!!तू गायत्री बद्दल काय ठरवलं आहेस... अंदाज घेण्यासाठी अन्विता म्हणाली..
झुक्या : अन्विता!!बेला!! मी जेव्हा गायत्री बद्दल ऐकलं तेव्हा पार हादरून गेलो होतो... एका क्षणात असं वाटलं की सगळं संपलं आता...
मी जिच्यावर प्रेम करतो ती दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करते... आपल्याला तिच्या विश्वात स्थान नाही....
घरी गेल्यावर हमसून हमसून रडलो...
रडल्या नंतर मला अचानक मोकळं वाटायला लागलं असं वाटायला लागलं आपल्या समोर जे काळं ढग होतं ते आता अश्रूद्वारे वाहून गेलं आणि स्वच्छ निरभ्र आकाश दिसायला लागलं...
मनात विचार आला भलेही आज गायत्री आपल्यावर प्रेम करत नाही... पण जर ती माझ्या प्रेमात पडली तर... प्रयत्न करायला काय हरकत आहे..
फार तर फार काय करेल ती नाही म्हणेल... पण माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे... आणि मी प्रयत्नच नाही केले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार...
बेला :अरे झुक्या!!पण तिचा भूतकाळ??
झुक्या : अगं बेला!!मी सगळ्या बाजूने विचार केला... मला तू सांग गायत्री सोबत जे घडलं त्यात तिचा काय दोष आहे ग... तिला जगण्याचा अधिकार नाही का? म्हणजे मी असं म्हणत नाही की तिचं परत लग्न झालं नाही तर ती जगणार नाही... ती जगणार... पण त्या आयुष्यात जर तिला एक जीवनसाथी मिळाला तर काय वाईट आहे..आणि माझं तिच्यावर प्रेम आहे... मला माझं प्रेम मिळालं तर काय वाईट आहे...
बेला :वाईट काहीही नाही झुक्या!!पण तुझ्या घरी हे नातं मान्य करतील का?? हे बघ आता तू गायत्री सोबत आणा भाका घेशीलही पण मग जेव्हा तुझ्या घरी ते मान्य होणार नाही तेव्हा तिला सोडून देशील का??
झुक्या : नाही नाही मी तसं नाही करणार.. मी आधी माझ्या मॉम डॅड ला सांगणार आणि मगच पुढे जाणार...आय मीन तिला प्रपोज करणार...
अन्विता :ग्रेट... झुक्या खरंच याला म्हणतात प्रेम... आहे त्या परिस्थितीत देखील गायत्री बद्दल तू विचार सोडला नाहीस.... मस्त एकदम मस्त...
झुक्या : बेला!!अन्विता!!त्या साठी मला तुम्हा दोघींची मदत लागेल...
बेला : हू ठीक आहे... पण एक लक्षात ठेव झुक्या!!तू पुढे जाण्याचं ठरवलं आहेस हे खरं जरी असलं तरी पुढे कितीही संकटे आली तरी मागे हटायचं नाही... तरच मी मदत करणार... अन जर धोका दिलास तर मग मात्र तू आहे अन मी आहे...
झुक्या : बेला!!मी वचन देतो... तसं नाही होणार... मी सर्व काही जुळून आल्याशिवाय कुठलेच पुढचे पाऊल उचलणार नाही... तसंही सध्या मला शिकायचं आहे... पण ही उठाठेव मला माझ्या आयुष्यातून गायत्रीला जाऊ द्यायचं नाही या साठी आहे...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 18 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
0 टिप्पण्या