रविवार... पार्टीचा दिवस..
अन्विता पार्टी देणार होती...
त्या मुळे सूर्या मात्र मनातून खूप खूष होता.. बरं झालं आपण अन्विताला तोडलं नाही तिच्याशी मैत्री कायम ठेवली...
असा विचार करत असतानाच त्याला अन्विताच्या बॉयफ्रेंड ची आठवण झाली...
कसा असेल तो... माझ्यापेक्षा दिसायला हँडसम असेल का? असा विचार मनात आला आणि सूर्याला एकदम असुरक्षित वाटायला लागलं....
सूर्याच्या मनातली चलबिचल आणखीनच वाढली... कधी नाही ते आज त्याला देवाशी भांडावं वाटत होतं... मला आवडणाऱ्या व्यक्ती माझ्या आयुष्यात राहूच शकत नाहीत का?? आधी बाबा, मग आई आणिआता??अन्विता...
प्रथमच कुणीतरी मला मनापासून आवडलं होतं...
भलेही ती माझ्या षडयंत्राचा भाग असेल तरी मी अन्विताच्या खऱ्या खुऱ्या प्रेमात पडलो होतो ना..
मिस्टर ब्लॅकला ऐनवेळी बरोबर समजावलं असतं किंवा ईथुन पळून गेलो असतो पण तिच्या केसांना धक्का देखील लागू दिला नसता मी😢...
पण आता... माझ्यासाठी ते आणखीनच अवघड झालंय...
काय करू मी? पोलिसांना शरण जाऊ का? सांगून टाकू का की अमली पदार्थांची तस्करी मी केली होती.. त्या नंतर काही लोकांना विषबाधा झाली त्या गुन्ह्यात देखील मीच होतो... पण मग पोलीस मला सोडून देतील?? खूद्द कमिशनर चा मुलगा मरता मरता वाचलाय...
मला पोलीस तर सोडणार नाहीतच पण अन्विता 🤔तिच्या नजरेत माझी काय किम्मत राहील आतापर्यंत आपण कधी कुणाच्या जीवाशी खेळलो नाही..
पण या वेळेस ब्लॅक च्या ब्लॅकमेलिंग मुळे आपण सुपारी घेतली... विचार करून करून सूर्याच्या डोक्याचा नुसता भूगा झाला होता.. अधून मधून त्याला स्वतःचाच खूप राग येत होता....
जाऊदे आता जास्त विचार करायची गरज नाही... पार्टीची वेळ होत आली...असा विचार करून सूर्या पार्टी साठी छान तयार झाला..
ठरलेल्या वेळेमध्ये सूर्या कॅफे मध्ये पोहोचला.. अन्विता, बेला आणि झुक्या आधीच येऊन बसलेले होते... तिथे सूर्या गेला...
अन्विता :वेलकम सूर्या!!
सूर्या :थँक्स😊...अन्विता!!तो नाही आला??
अन्विता : हो तो निघाला आहे येईलच ईतक्यात... तो पर्यंत आपण काही स्टार्टर्स मागवून घेऊ...
सूर्या : ठीक आहे...
अन्विताने स्टार्टर्स मागवले..
तितक्यात सूर्याला अन्विताच्या डोळ्यात चमक दिसली..ती चमक पाहताच अन्विताचा बॉयफ्रेंड आला हे त्याच्या लक्षात आलं...
अन्विताने तिघांची ओळख करून दिली...
अन्विता : मोहीत!! हा सूर्या!!ही बेला आणि हा मोहीत उर्फ झुक्या
मोहीत :मोहीत.. हं.. Hi बेला!!hi सूर्या!!...
सूर्या :hi... मोहीत!!आधी कुठे आपण भेटलो आहोत का?तुझा चेहरा ओळखीचा वाटत आहे... मी नक्कीच कुठे तरी पाहिलं आहे...
मोहीत :डिझायर मध्ये पाहिलं असशील कदाचीत.. मी एनी ला सोडायला आणि घ्यायला येतो ना..
सूर्या :एनी??
मोहीत : तुमची "अन्विता " माझी एनी 😊 सूर्या!!माझी एनी बरं का?
मोहीतचं ते वाक्य ऐकल्यावर सूर्या एकदम खजील झाला... त्याला वाटलं की आपण यांच्या पार्टीत यायला नको होतं.. आता हा मोहीत काही आपला अपमान केल्याशिवाय सोडत नाही...
Dont mind सूर्या!!अरे माझी एनी आहेच तितकी सुंदर.. तुझा काहीच दोष नाही.. अन आता असं बोललो पण मी कानाला खडा लावतो.. परत असं काहीच बोलणार नाही..
मोहीतने सूर्याची समजूत घातली...
किती समजूतदार आहे माझा मोहीत... उगाचच नाही मी त्याच्या प्रेमात पडले.. मला खात्री आहे... हा माझ्या आई बाबांचं मन देखील जिंकून घेईन...अन्विता सूर्याकडे पाहत होती...
आता वातावरण खेळीमेळीचं झालं होतं...सूर्याही थोडा खुलला होता... मोहीत आपल्या पेक्षा सगळ्याच बाबतीत उजवा आहे हे त्याने जाणलं होतं..
अन्वितावर सूर्याचं मनापासून प्रेम होतं.. अन्विता मोहीत बरोबरच सुखाचा संसार करू शकेल हे त्याला वाटायला लागलं होतं.
शेवटी काय आपल्या दैवात जे असणार ते घडणारच...आता आपल्याला अन्विताचा विचार सोडून देण्याशिवाय काही पर्याय नाही हे त्याने जाणलं होतं.
पार्टी झाली.. ग्रुप फोटो झाले... सूर्या मात्र आता अजून जड अंतःकरणाने त्याच्या घरी गेला...
एकीकडे तो स्वतःच्या मनाची समजूत काढत होता तर राहून राहून मोहीतचा चेहरा त्याच्या नजरे समोर येत होता... शेवटी प्रदीप कडे जाऊन बसावं असं ठरवून तो प्रदीप कडे गेला..
अन्विताला नेहमी प्रमाणे मोहीत घरी सोडायला आला...
अन्विता : मोहीत!!आज हे असं शेवटचं... उद्यापासून मी तुला घरी घेऊन जात जाईल...
मोहीत : म्हणजे 😳... अगं पण तुझे बाबा??
अन्विता : मी आईला सर्व सांगेन... ती बाबाला सांगेल पण आणि त्यांना पटवून पण देईल... तसंही त्यांचं लव्ह मॅरेज आहे 😜... ते देखील पळून जाऊन...
मोहीत :😳काय?? मग तरी पण तुझे बाबा ईतके पझेसिव्ह...
अन्विता : आता बाबा आहेत ना... पळून जाताना असली जबाबदारी थोडीच त्यांना माहिती होती...
मोहीत : बरं चल निघतो मी... नाहीतर उगाचच तुझ्या घरी वेगळ्या पद्धतीने कळेल...
अन्विता : बाय 🥰
अन्विता घरी पोहोचली तेव्हा तिचा बाबा नेहमीप्रमाणे संशोधनासाठी लॅब मध्ये गेलेला होता...आणि आई सर्व आवरून हॉल मध्ये टीव्ही बघत बसली होती...
अन्विता घरी आली आणि आल्या आल्या तिच्या आईच्या गळ्यात पडली..
अन्विताची आई : अगं अन्विता!! काय झालं??
अन्विता : आई.. आय लव्ह यू...
अन्विताची आई : मस्का हं.. बोल काय बोलायचं आहे..
अन्विता : आई!!तुला तर न सांगताच कळालं की मला काही बोलायचं आहे म्हणून
अन्विताची आई : बेटा!!आई आहे मी... बोल आता काय बोलायचं आहे ते...
अन्विता :आई!!माझं एका मुलावर खूप प्रेम आहे..त्याने मला अगदीच महिनाभराआधी प्रपोज केलं...
मी तेव्हाच बाबांना सांगायचा प्रयत्न केला पण तुला माहिती आहे ना बाबा कसे हायपर होतात ते...
असं करत अन्विताने आजच्या पार्टीपर्यंत सगळं काही तिच्या आईला सांगितलं..
आई!!आता बाबांना मात्र तू सांग... त्यांना सांगायची माझी हिम्मत नाही...
अन्विताची आई : अन्विता!! मी बाबांना सांगते पण ते तुझ्या बाबतीत ईतके पझेसिव्ह आहेत की ते कसे रिऍक्ट होतील हे मी सांगू शकत नाही..
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 10 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇http://www.swanubhavsaptarang.com/2021/07/10.html
.
0 टिप्पण्या