ऑनलाईन, बिनलाईन

कोरोनाच्या संकटाला संपूर्ण जगाला खूप काही शिकवलं. प्रत्येक व्यक्ती ला आपलं स्वतःचं living standard बदलावं लागलं.
आता पर्यंत प्रत्येक जण आपल्या मनाला वाटेल तसे वागत होता पण आता त्याची प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरायला लागली.

त्यातून प्रत्येक व्यक्ती सफर झाला.ज्या व्यक्तीने नवीन व्यवसाय सुरु करण्याचे जे स्वप्न पाहिले ते अक्षरशः धुळीस मिळाल्या सारखे झाले.

प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठे सक्तीचे थांबणे आले.

त्यात सततचे लागणारे लॉकडाऊन त्या मुळे व्यापारी वर्गाला ते एक वेगळे आव्हान ठरल्यासारखे झाले..

लॉकडाऊन काळात बऱ्याच व्यक्ती घरीच राहायला लागल्यामुळे साहजिकच सोशल मीडियाचा वापर वाढला...

फेसबुक, whatsapp सारख्या सोशल साईट वर त्यांचा बराचसा वेळ खर्च होऊ लागला..

टाईम पास करता करता हुशार भगिनींनी आपला व्यवसाय सोशल मीडिया चा वापर करून कसा करायचा ह्याचा मार्ग शोधून काढला...

महिला वर्गांसाठी बरेचसे ग्रुप हे सोशल मीडिया वर उपलब्ध आहेत..

त्या ग्रुप्स वर जाऊन... ज्वेलरी, फूड प्रॉडक्ट,कपडे, utensil, विविध फॅन्सी प्रॉडक्ट, हॅन्डमेड प्रॉडक्ट..
 असे बरेच व्यवसाय त्या सोशल मीडिया वर live जाऊन करत आहेत..आणि त्यांना खूप मोठया प्रमाणात रिस्पॉन्स देखील मिळत आहे..

live शो मध्ये अगदीच आपण दुकानामध्ये जश्या variety बघतो तश्या बघण्यात येतात...

खरंच या व्यावसायिकांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे...

ज्या महिलांना असे व्यवसाय करायचे आहेत आणि ते कश्याप्रकारे करायचे आहेत तर फेसबुक वर असणाऱ्या महिलांसाठीच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हा... जाहिरात करायची असेल तर त्या त्या ग्रुप ऍडमिन, किंवा काही पेज असतील त्यांच्या ऍडमिनशी संपर्क साधा म्हणजे तुम्हाला तुमची जाहिरात कशी करायची ते तुम्हाला मार्गदर्शन करतील....

आणि ज्यांना सोशल मीडिया वर खरेदी करायची आहे त्या भगिनी अश्या प्रकारचे live शो अटेंड करून खरेदी करू शकतात... आणि कळत नकळत या कोरोनाच्या संकटावर अश्या प्रकारे फुल न फुलाची पाकळी म्हणून मात करू शकतात...

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
लेख आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या