दैव जाणीले कुणी (भाग 18)

मोहित मिस्टर ब्लॅकला भेटायला गेला....

मोहित :बॉस!! मी आपल्या प्लॅन मध्ये बरंच पुढे गेलो आहे... आणि अन्विताच्या आईवडीलांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास बसला आहे...

मिस्टर ब्लॅक : हो रे मोहित!!काल तू त्यांच्या लॅब ला भेट दिलीस ना...

मोहित :हो 😳 मिस्टर ब्लॅक!!तुम तो अंतर्यामी हो...

मिस्टर ब्लॅक : पण आज तू अन्विताला एकटं सोडलं हे चांगलं नाही केलं.. आज जर तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला तर? 🤔

मोहित : बॉस!!हल्ला कसा होईल.... मी तर ईथेच आहे... ओ नो बॉस म्हणजे तुम्ही त्या कमजोर सूर्याला अन्विताच्या जिवावर हल्ला करायला सांगितलं का?

मिस्टर ब्लॅक : हा हा हा... तुला काय वाटतं?? या मिस्टर ब्लॅकचे डाव ईतके कमजोर असतात की काय??

मोहित : नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं... पण बॉस मी आहे ना क्यू मध्ये... मी करतो की ते काम...

मिस्टर ब्लॅक : ते जाऊ दे... तू माझ्याशी गप्पा मारायला तर आला नाहीस हे नक्की... सांग मला तू अन्विताच्या बाबाकडून काय काय माहिती आणली आहे ती?

मोहित :अन्विताचे बाबा! आपण इमॅजिन पण करू शकणार नाही... आर्मी साठी काम करतात... त्यांचे मुख्य काम नवनवीन गॅझेट तयार करणे... पण ते देखील आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने कश्याप्रकारे कामाला येईल असे त्यांचे प्रोजेक्ट असतात....ज्या वेळेस ते आर्मीसाठी काम करतात त्या वेळी पंधरा दिवस, महिनाभर लॅब मध्येच असतात...

मिस्टर ब्लॅक :  हं ही काही विशेष माहिती नाही... देशाच्या हितासाठी?? मागे त्याने कॅमेरा रायफल तयार केल्या होत्या.. त्याचा फॉर्मुला मग कसा काय देशद्रोह्यांपर्यत पोहोचला होता?? किती धिंगाणा झाला होता... वेळेवर कळालं म्हणून शत्रू पर्यंत पोहोचला नाही... काय तर म्हणे गोपनीय 😂😂😂

मोहित : हो का बॉस??पण तिथे एक गोष्ट कळाली..ती तुमच्या कितपत फायद्याची आहे माहिती नाही पण त्यांच्या स्वतःच्या लॅब सोबत लागून एक जमीन आहे... ती त्यांच्या कुठल्यातरी मित्राची आहे ... आणि ती त्या मित्राच्या नावावर आहे म्हणे....

मिस्टर ब्लॅक : काय 😳 मित्र?? कुठला मित्र? अन्विताच्या बाबांनी नाव सांगितलं नाही का त्याचं?

मोहित : नाही ना.... मी जोर दिला होता पण तितक्याच शिताफीने त्यांनी सांगायचं टाळलं... जणू काही त्यांना सांगायचं नव्हतंच...

मिस्टर ब्लॅक : हं... मग आता तुझं पुढचं काम हेच राहील माहिती काढ... अगदीच दोन दिवसातमाहिती पाहिजे...

दोन दिवसात.... आता हे काय नवीन??... मिस्टर ब्लॅकच्या मनात काय असतं देव जाणे... आणि त्याच्या समोर आपल्याला बाहुल्या सारखं नाचावं लागतं...मला माझे निर्णय घेता येत नाहीत.... मला पण डॉन व्हायचं आहे...हं... आत्ताचं ठीक आहे पण जास्त झालं तर माझे निर्णय मलाच घ्यावे लागतील...मोहित मनातल्या मनात धूमसत होता...

मिस्टर ब्लॅक : अरे मोहित!!कुठे हरवला आहेस??

मोहित : काही नाही बॉस!!अन्विताच्या बाबांना संशय न येता मित्राचं नाव कसं माहिती करायचं ते...

मिस्टर ब्लॅक : ते तू तुझ्या पद्धतीने बघ.... चल कामाला लाग लवकर...

झुक्या :अन्विता!!तू माझ्यासाठी एक करशील??

अन्विता : काय रे....

झुक्या : गायत्री तुझ्याशीच फक्त मोकळेपणाने बोलली आहे... बेला!!अन्विता!! तुम्हा दोघीनांही काही अडचण नसेल तर आपल्या ग्रुप मध्ये तिला घेशील... तसंही ती फारशी कोणासोबत मोकळेपणाने बोलताना किंवा कुठल्या ग्रुप मध्ये मिसळताना दिसत नाही...

अन्विता : हं गायत्रीला जर काही हरकत नसेल तर मला तरी काही प्रॉब्लेम नाही..

बेला : पण मला प्रॉब्लेम आहे 😡

झुक्या :तुला प्रॉब्लेम... क क काय?? झुक्या बावचळला

बेला :असं मी कुठे म्हटलं.. झुक्या जरा माझं वाक्य पूर्ण होऊ देत जा😂😂..

झुक्या :काय बेला!!किती घाबरवलंस ग मला...

अन्विता : हर एक दोस्त कमिना होता है 😜😜 हो ना बेला??
बेला :😂😂

झुक्या :  चिडवा चिडवा अजून मला चिडवा... आज तुमची वेळ आहे ना...

अन्विता :अरे झुक्या तू तर पार इमोशनल होत आहेस... तुम्ही दोघे थांबा मी जरा गायत्रीशी बोलून येते...
अन्विता गायत्रीजवळ गेली

अन्विता :hi गायत्री!!

गायत्री : हाय अन्विता!!

अन्विता : गायत्री!! मला तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे...

गायत्री : बोल ना...

अन्विता :गायत्री!! मी जेव्हा तुझा भूतकाळ ऐकला तेव्हा कसं काय बोलावं हेच मला समजत नव्हतं... पण आता सगळं काही माहिती आहे... त्या मुळे तुझ्या आणि माझ्या मैत्रीच्या नात्यात कुठलाही आडपडदा नाही...

गायत्री : हो अन्विता!!खरं सांगू तुझ्याशी बोलल्यावर मला खूप भरून आलं होतं... मला माझ्या देवेनची खूप आठवण आली... आणि खूप छानही वाटलं.... आता मी तुझ्यासोबत तरी देवेन बद्दल बोलू शकते म्हणून...

अन्विता : गायत्री!! मला तेच म्हणायचं आहे... तू आमच्यासोबत का रहात नाही...

गायत्री : पण झुक्या??हे बघ अन्विता माझ्या मनात झुक्या बद्दल कुठलीच भावना नाही... आणि तो माझा काही मित्रही नाही... अन जर त्याची कुठली चुकीची अपेक्षा असेल तर???

अन्विता : गायत्री!!समजा झुक्याने तुझ्याकडून कुठलीही अवास्तव अपेक्षा न करता मैत्रीचा हात पुढे केला तर??
.
गायत्री :तसं असेल तर माझी काहीच हरकत नाही.. पण फक्त मैत्रीच हं... तू त्याला क्लिअरली सांग... नाहीतर माझं शिक्षणच बंद होईल...

अन्विता : नाही गायत्री!!तसं काही नाही होणार... झुक्याला मी क्लिअरली सांगते... पण एक सांगू झुक्याला मी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून ओळखते... तो पण असला तसला नाहीये...त्यामुळे काळ्जी करण्याचं काहीच कारण नाही... तो समजून घेईल....

अन्विता आणि गायत्री सोबतच झुक्या आणि बेला जवळ गेल्या....

आता यांचे त्रिकुट चौकडी मध्ये रूपांतर झालं होतं...

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
भाग 19 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या