झुक्याचा आजचा दिवस छान गेला होता..
काही का असेना गायत्री त्याला मैत्रिणीच्या स्वरूपात मिळाली होती...
कॉलेज सुटले... मोहित येणार नव्हता... पण वैजू??... वैजू देखील अन्विताला घेण्यासाठी आला नव्हता..थोडा वेळ वाट पाहून अन्विताने वैजूला फोन लावला..
वैजू :अन्विता ताई!!आपली डिझायर पंक्चर झाली... तुम्ही कॅब करून याल का?मी तसं साहेबाना कळवलं आहे...
अन्विता : काय वैजू!!एकच दिवस मला आणायचं तर असा गोंधळ...
वैजू :सॉरी ताई...
अन्विता: बरं राहू दे.. मी कॅब बुक करते....
अन्विता कॉलेज गेट च्या बाहेर पडली... आणि थोडं पुढे चालून झाल्यावर एका चौकाजवळ उभी राहून कॅब बुक करू लागली होती...
तितक्यात तीन ते चार पुरुषांचा घोळका अन्विता जवळ आला आणि अन्विता जवळ येऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला...
चारही पुरुष आडदांड होते.... केसाच्या झिपऱ्या आणि शरीर पिळदार होते... दिसताच ते गुंड असावेत असा अंदाज बांधता येत होता...
अन्विता त्यांना बघुन एकदम घाबरून गेली... तिचे पाय एकदम लटलट कापायला लागले....तिचा हात मोबाईल साठी बॅग कडे जाताच एका गुंडाने तिचा हात धरला...
भर चौकात हे सगळं घडत असताना लोकं मात्र बघ्याची भूमिका घेत होते...
अन्विता पुरती गोंधलेली, घाबरलेली,तिच्या हातापायात त्राणही उरले नव्हते...
काय पाहिजे तुम्हाला?? तुम्ही मला असा का त्रास देत आहात.... माझ्यावर दया करा....तुम्हाला ही सोन्याची चैन पाहिजे का? पैसे पाहिजे का? ही घड्याळ घ्या आणि लोकांकडे मला वाचवा असं ओरडत होती...
ओरडताना तिचा घसा अक्षरश: कोरडा झाला होता... आता अचानक तिच्या डोळ्यासमोर काळोख आल्यासारखं झालं.... आणि ती पडणार तितक्यात तिला कुणीतरी आधार दिल्याचं जाणवलं...
अन्विता थोडी सावरली आणि डोळे मोठे करून बघू लागली... सूर्या!!तू?
सूर्या : अन्विता!!तू काळजी करू नकोस?? मी जरा यांच्याकडे बघतो... तू त्या कोपऱ्यातल्या बाकावर जाऊन बस...
सूर्याला अचानक पाहून ते गुंडही जरा वेळ थबकले...
अन्विता दूर गेल्यावर त्यातील एक गुंड सूर्याला म्हणाला ए सूर्या!!आमच्या मध्ये येण्याचं कारण नाही समजलं ना...
सूर्या : ए भाल्या तू ईथे कसा काय??
भाल्या : बॉस ने पाठवला होता... त्या पोरीचा गेम करायचा होता?
सूर्या : गेम म्हणजे?? तुम्ही तिला मारून टाकणार होतात का? ते काम तर मोहित चे आणि माझे होते ना...
भाल्या :ते मला काय माहिती नाही... बॉस ने आज...
सूर्या : मग काही तरी गैरसमज झाला आहे... अरे मलाच बॉस चा फोन आला होता की तू जाऊन अन्विताला वाचव...आज काही तिचा गेम करायचा नाही
भाल्या :काय 🤔?? ह्या बॉसची खेळी मला काही समजत नाही... टिड्या, दाम्या... चला रे आपण परत जाऊ...
हुश्श... खोटं बोललो पण रेटून बोललो... पण सूर्या आता तुझं काही खरं नाही... बॉस तर बॉस पण अन्विताने देखील तुला यांच्याशी बोलताना बघितलं आहे...
असा विचार करत सूर्या अन्विता जवळ पोहोचला...
अन्विता : सूर्या!!कोण लोकं होते ते... अन तुझ्याशी काय बोलले?? तुझ्याशी बोलल्यावर निघून कसे काय गेले? मला तर वाटलं होतं की तुमच्या मध्ये जाम फाईट होईल....
सूर्या : अन्विता!!कूल.... हे बघ आपण तिथे कॉफी घेऊ तू थोडी सेटल हो मग मीच तुला घरी सोडतो...
अन्विता : नाही... तू आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे....
सूर्या :अगं तेच तर.... तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच म्हणतोय मी... ईथे रोडवर उभं राहून आपल्याला जास्त वेळ बोलता येणार नाही म्हणून...
अन्विता : ठीक आहे... असं म्हणून ती बाजूच्या कॅफे मध्ये घुसली आणि तिच्या पाठोपाठ सूर्या गेला....
अन्विता : हं सूर्या बोल आता...
सूर्या :एक मीन... मी कॉफी ऑर्डर करतो... ए छोटू एक चिल्ड बिसलेरी बॉटल आन आणि दोन कॉफी...
अन्विता संशयाने सूर्या कडे बघत होती....
तसं पहायला गेलं तर सूर्याच्या मनात देखील घालमेल सुरु होती... त्याचं एक मन म्हणत होतं की तिला सांगायचं का की तुझा जीव घेण्यासाठी एक नाही तीन तीन जणांना सुपारी दिली गेली आहे... त्यात मोहित देखील आहे... पण अन्विता यावर विश्वास ठेवेल?? नाही शक्यच नाही कारण तिच्या डोळ्यावर मोहितच्या प्रेमाची पट्टी बांधली गेली आहे ना...
अन्विता :सूर्या!!ए सूर्या!!काय विचार करतोस?
सूर्या : अं... काही नाही... अन्विता अगं तू बघितले नव्हते का की कसले आडदांड गुंड होते ते... त्यांच्यासोबत फाईट करण्यात माझा निभाव थोडीच लागला असता.... म्हणून मग मी त्यांच्यासोबत एक खेळी खेळलो...
अन्विता : खेळी कसली खेळी??
सूर्या :अगं खेळी म्हणजे गनिमीकावा....
त्यांना मी विचारलं की ही एक कॉलेजची साधी मुलगी आहे हिला तुम्ही का मारत आहात....की तुम्हाला पैसे पाहिजे... पैसे पाहिजे असतील तर मी देतो....
तर त्यातील एक गुंड मला म्हणाला तुला काय करायचं??तितक्यात एक गुंड समोर आला आणि त्यानी मला फोटो दुरूनच दाखवला...तो फोटो तुझा नव्हता... मी लागलीच म्हणालो अरे तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर हल्ला केला...म्हणजे त्यांची चूक ह्याच्या मुळे झाली की त्या मुलीची शरीरयष्टी, आज घातलेला ड्रेस आणि ती जागा सगळं तुझ्याशी मिळतं जुळतं होतं....
म्हणजेच त्या गुंडाना तुझ्याशी मिळत्याजुळत्या मुलीला मारण्याची सुपारी दिलेली होती...
का की हा सूर्या म्हणतोय खरा पण मला त्याच्या वागण्यावर आणि बोलण्यावर विश्वास ठेवावा वाटत नाही... पण काही का असेना त्या गुंडाच्या तावडीतून आज सुटलो.. आता मी मोहितला कुठेच जाऊ देणार नाही... अन्विता विचार करायला लागली...
सूर्या : अन्विता!!काय विचार करत आहेस?? बरं चल आता मी तुला घरी सोडून माझ्या घरी जातो...
सूर्या ने कॅफे मधूनच कॅब बुक केली... कॅब ने तिला घरी सोडलं...
अन्विताला सूर्याचं वागणं संशयास्पद वाटल्यामुळे तिने त्याला घरी बोलावलं नाही...
सूर्या मात्र वेळीच आपल्याला मिस्टर ब्लॅकची खेळी समजली आणि अन्विताला वाचवलं या गोष्टीवर जाम खूष झाला होता पण आता आपण मिस्टर ब्लॅकसोबत उघड उघड पंगा घेतला याचं खूप टेन्शन आलं होतं...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
भाग 20 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
0 टिप्पण्या