दैव जाणीले कुणी (भाग 20)

टेन्शन आल्यामुळे सूर्या डायरेक्ट प्रदीप कडे गेला...

सूर्या : प्रदीप!! आपला अंदाज खरा ठरला... अन्विता वर पहिला जीवघेणा हल्ला झाला...

प्रदीप : 😳 हो ना... तो मिस्टर ब्लॅक आहेच तसा... एकावेळी तो एकाच षडयंत्राच्या मागे हात धुऊन लागतो... मी तर म्हणतो ना हे जे तो मध्ये परदेशात गेला होता ना... तो देखील याच षडयंत्राचा भाग असावा.. फक्त वीक पॉईंट काय आहे माहिती??

सूर्या : काय??

प्रदीप : मिस्टर ब्लॅकचे गुंड... जितके जास्त आडदांड तितकी त्यांची बुद्धी कमी 🤣🤣 आणि याचाच फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे...

सूर्या : प्रदीप!!तू म्हणतोय ते अगदी खरं आहे... अरे भर चौकात कुणी जीवघेणा हल्ला करतं का? त्याचे नंतर परिणाम काय होतील ह्याचा सुद्धा विचार कदाचीत त्यानी केला नसावा...

प्रदीप : खरं आहे तुझं... आणि बरं झालं तुझ्यामुळे अन्विता वाचली.. पण सूर्या!!माझा मिस्टर ब्लॅक बद्दल चा अनुभव सांगता आता लवकरच परत अन्वितावर हल्ला होईल....

सूर्या : हो....अन मोहित तिच्या आजूबाजूला असताना ते सहज शक्य आहे...प्रदीप!! आता मला ट्वेंटी फोर बाय सेव्हन अन्वितावर लक्ष द्यावं लागेल... काहीच कळत नाहीये...

मिस्टर ब्लॅक ने मोहीतला दोन दिवसात अन्विताच्या बाबांकडे असलेल्या जमिनीविषयी माहिती काढायला सांगितली.. आणि ती माहिती मिळाली की अन्विताचा खात्मा देखील करायचा असं त्याला सांगितलं....

अन्विताने संपूर्ण विश्वास मोहित वर टाकल्यामुळे तिला मारणं त्याला अवघड नव्हतं..

 पण अवघड होतं ते त्या जमिनीची माहिती मिळवणं...

 आता आपण डायरेक्ट अन्वितालाच जमिनी विषयी विचारू... पण तिला जर माहिती नसेल तर... मोहित या जर तर च्या गोष्टी आत्ताच कशाला.... Think positive..असा विचार मोहितने केला....

चला आता आपल्या मोहिमेवर जायचं आहे... मोहित लागा कामाला मनातल्या मनात विचार करत मोहितने मिस्टर ब्लॅकची रजा घेतली...

मोहित तिथून त्याच्या गावी गेला... गावी त्याने त्याच्या बायको आणि दोन मुलांची भेट घेतली... रात्री गावी थांबून त्याच्या मोहिमेवर निघाला...

मोहितच्या बायकोने आम्ही पण तुमच्यासोबत शहरात येणार असा तगादा लावला पण माझं एक काम पूर्ण झाल्यावर मीच गावाकडे येऊन राहणार आहे..
मोहितने कशी बशी त्याच्या बायकोची समजूत काढली आणि तो त्याच्या मोहिमेवर निघाला...

त्याला दोन दिवसातच अन्विताच्या बाबांच्या प्रॉपर्टीची सगळी माहिती काढून तिसऱ्याच दिवशी अन्विताला संपवायचं असा आदेश मिस्टर ब्लॅक कडून मिळाला होता...

मोहितच्या डोक्यात सर्व प्लॅन तयार झाला होता...

 सकाळीच मोहित अन्विताला घ्यायला तिच्या घरी गेला....

नेहमीप्रमाणे दोघेही सोबतच कॉलेजला गेले... कॉलेज मध्ये जात असताना अन्विताने आधल्या दिवशी घडलेला प्रकार मोहितला सांगितला...

अन्विता : मोहित!! या पुढे तू मला बिलकुल एकटं सोडायचं नाहीस...काल माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर...

मोहित : हो अन्विता!! आता मी तुला शेवटपर्यंत एकटं सोडणार नाही... मग तर झालं...

अन्विता : मोहित!!पण सूर्याचं वागणं तुला पटतंय का रे? म्हणजे त्यानी चक्क गुंडाशी गप्पा मारून पळवून लावलं...

मोहित : विचित्र वाटतंय खरं... पण जाऊ दे शेवट छान झाला ना.... तुला काही झालं नाही ते महत्वाचे... अन तो सूर्या म्हणतोय तसं असेलही कदाचीत... तुझी कुणाशी दुष्मनी असणार आहे??..

अन्विता : हं... पण ते चुकले होतेच ना... अन समजा वेळेवर सूर्या आलाच नसता तर...

मोहित : अन्विता!! प्लीज...असं काही बोलू नकोस गं... तुला काही नाही होणार... मी तर देवाजवळ प्रार्थना करेल की माझं उर्वरित आयुष्य देखील अन्विताला मिळू देत...

अन्विता : नाही रे मोहित!! असं काहीही म्हणू नकोस तू... मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही...

मोहित :राह्यलं.. आपण जरा विषय बदलू बरं...

अन्विता : हो ना...नाहीतर उगाच डोक्याचा भूगा होतोय...

मोहित :अन्विता!! बाबाची लॅब फारच भारी आहे गं...

अन्विता : हो ना....

मोहित : अन्विता!! बाबांनी मला बोलता बोलता सांगितलं की त्या लॅब च्या जवळ असलेली अर्धी जमीन त्यांच्या मित्राची आहे... कुठल्या मित्राची आहे गं??

अन्विता : काय?? बापरे मोहित!!मला देखील असलं काही माहिती नव्हतं... तसंही प्रॉपर्टी बिपर्टी मला काहीच माहिती नाही... माझ्या बाबांनी मला काही कमीच पडू दिलं नाही...

ते ऐकताच मोहितला मात्र खूप राग आला... ह्या अन्विताचा तर काहीच फायदा नाही.... असं वाटतं ना इथंच हिचा गळा दाबून हिला मुक्त करावं... पण काय करणार?? मिस्टर ब्लॅक चे आदेश.... काही वेगळेच आहेत...

अन्विता : मोहित!!काय झालं... का शांत झालास?

मोहित :अं... काही नाही अन्विता!! अगं तुझ्या बाबांनी मित्राचं नाव सांगितलं नाही... थोडं विचित्र वाटलं...

अन्विता : विचित्र म्हणजे??

मोहित : अगं म्हणजे त्यात लपवण्यासारखं काय आहे...

 लपवण्यासारखं नाही... पण ईतकं खोदून विचारण्या सारखं काही आहे का?अन्विताने प्रतिप्रश्न केला....

मोहित : अगं अन्विता dear... बरं जाऊदे....

अन्विता : ठीक आहे बाबा!!मी पॉप्सला विचारते...

मोहित : म्हणजे ईतकं हार्ड अँड फास्ट नाही.. पण सहजच सांगितलं तर बघ....

अन्विता : बरं...किती छान गप्पा होत होत्या आपल्या... हे कॉलेज उगाचच इतक्या लवकर आलं 😢...

मोहित : नको उतरूस मग.... चल कुठेतरी छान लॉन्ग ड्राइव्हला जाऊ. ...

अन्विता :आले असते... पण प्रिलीम्स सुरु झाल्या आहेत ना.... जाऊ दे.... संध्याकाळी घरी जाण्या आधी थोडावेळ कुठे तरी कॅफे मध्ये बसू....

मोहित : हं.. म्हणजे मला आता संध्याकाळची वाट बघावी लागेल...

अन्विता : चल उतरते मी... बाय....

सूर्याला मिस्टर ब्लॅक ने ताबडतोब भेटायला बोलावलं... सूर्याला त्याची कल्पना होतीच...

मिस्टर ब्लॅक जवळ गेल्या गेल्या सूर्यावर मिस्टर ब्लॅक ने शिव्यांचा भडीमार सुरु केला....

सूर्या : बॉस!!तुम्हाला मला बोलण्याचा पुरेपूर अधिकार आहे.. पण एकदा माझं ऐकून तर घ्या...

मिस्टर ब्लॅक : काय ऐकायचं ठेवलं आहेस तू... तुला माहिती आहे का?? कालचा मुहूर्त किती महत्वाचा होता...

सूर्या : मुहूर्त?? 🤔

मिस्टर ब्लॅक : हो... मुहूर्त??

सूर्या : बॉस!! तुम्ही या भाल्या, टिड्या आणि दाम्याला पाठवलं... पण ती फक्त त्या अन्विताची सुपारी देऊन... हे महाशय भर चौकात अन्विताचा गेम करणार होते... ते पण असल्या चौकात जिथे हजारो लोकांचा वावर असतो... म्हणून complications होण्याआधी मी सूत्र हातात घेतले.... बॉस!!मला एक कळत नाही.... तुमचा माझ्यावर विश्वास का नाही?? मी पूर्ण जबाबदारी घेतो ना... मी मारतो अन्विताला.... माझं म्हणणं ईतकंच होतं आणि आहे कि तिला मारण्यासाठी मला वेळ द्या....

मिस्टर ब्लॅक : वेळ?? किती वेळ 🤣🤣🤣 हाहाहा वेळच तर नाही माझ्या कडे....तुला माहिती ना.... मी वेळेच्या पुढे चालणारा माणूस आहे ते...

सूर्या :म्हणजे??

मिस्टर ब्लॅक :😡 तू येऊ शकतोस.... समजला... माझा फोन येईपर्यंत तू कुठलंच काम करायचं नाही... समजलं का?

सूर्या : ok बॉस!!
क्रमश :
भाग 21 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या