दैव जाणीले कुणी (भाग 21)

सूर्याच्या बोलण्याने मिस्टर ब्लॅकचं समाधान झालं नव्हतं.. या सूर्या मध्ये काहीच दम नाही... उगाचच आपण याला आपल्या षडयंत्राचा भाग ठरवला... हा नक्कीच आपले काम बिघडवू शकतो. एक तर हा कुठलेही काम पटकन करत नाही. आणि याच्या पाळतीवर अजून दोन माणसे कामाला लावावी लागली... मिस्टर ब्लॅक सूर्यावर भयंकर चिडला होता... आणि मनामध्ये मोहित, अन्विता अन्विताचे शास्त्रज्ञ वडील आणि ती अनोळखी व्यक्ती जिच्या नावावर अन्विताच्या वडिलांकडे प्रॉपर्टी आहे ती या सगळ्यांचे गणित आखत होता....

मोहित आता दोन दिवसात काय पाऊले उचलतो याकडे मिस्टर ब्लॅकचं लक्ष लागलं होतं... मोहितच्या खेळी नंतरच आपल्याला पुढची खेळी खेळता येईल हे त्याने मनात ठरवलं होतं... तसंच सूर्यावर नजर ठेवणाऱ्या गुंडाना सूर्या वर अजून कडक नजर ठेवायला सांगितली..सूर्या मात्र पूर्णपणे अनभिज्ञ होता.... पण आधीच्या अनुभवामुळे सूर्याला मिस्टर ब्लॅक आपल्यावर पाळत ठेवणार आणि त्याच्या मनाविरुद्ध काम झाल्यामुळे तो नक्कीच पाळत ठेवणार याचा अंदाज सूर्याला आलेला होता...


मिस्टर ब्लॅकला भेटल्यावर सूर्या तडक प्रदीप कडे गेला...

प्रदीप : सूर्या!! मी काय म्हणतोय तू आता थोडे दिवस शांत बस... काहीही हालचाल करू नकोस... नाहीतर मिस्टर ब्लॅक तुला सोडणार नाही..

सूर्या : अरे प्रदीप एरव्ही मला कुठे इंटरेस्ट आहे त्या मिस्टर ब्लॅकच्या प्लॅन मध्ये... मी पूर्णतः दुर्लक्ष केलं असतं पण.... अन्विता जी मला खरंच मनापासून आवडते तिचा जीव धोक्यात आहे रे... तिला कसं वाचवावं हेच मला कळत नाही... आणि मी जर शांत बसलो तर तो मोहित तिचा बसल्या बसल्या कधी काटा काढेल हे साऱ्या जगाला देखील कळणार नाही... तसाही तो मर्डरर आहे हे तू मला सांगितले आहेसच ना...

प्रदीप : सूर्या!!आपण एक करू शकतो... अन्विताचा मृत्यूचा मिस्टर ब्लॅकला काय फायदा होणार आहे हे शोधून काढलं तर...

सूर्या : हो ना प्रदीप!!डोक्यात तर हेच आहे... पण मिस्टर ब्लॅक वेळच तर देत नाही... अन तो मोहित रात्रीतून नाहीतर उद्या अन्विताला मारून टाकेल...

सूर्या!!ते बघ ते दोघे... मिस्टर ब्लॅकची माणसं... खिडकीतून बघत प्रदीप म्हणाला...

सूर्या : बघू रे बघू... नेमकं कोण पाळत ठेवत आहे माझ्यावर...

प्रदीप : अरे सूर्या!!हे दोघे ते नवीन.... ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी मदत करणारे...

सूर्या ने खिडकीतून नजर टाकली... अरे हो रे... आणि लपण्यासाठी काय परफेक्ट जागा शोधली आहे त्यानी... नशीब तुझ्या खिडकीतून तिथवर नजर जाते...

प्रदीप : हाहाहा.... नजर जात नाही सूर्या!!प्रकाश मुळे दुर्बीणीच्या काचा बरोबर मधोमध ईथे लावलेल्या आहेत... तू बाजूने बघ तुला काहीही दिसणार नाही...

सूर्या : बघू... ग्रेटच...

प्रदीप : हे बघ सूर्या!!या पुढे आपण फोन वर बोलू... कमीत कमी पुढचा आठवडा तरी तू माझ्या घरी येऊ नकोस...नाहीतर आपन दोघे एकत्र आल्याचा संशय मिस्टर ब्लॅकला यायला वेळ लागणार नाही.

सूर्या : खरं आहे तुझं... चल निघतो मी... आपण फोनवर बोलू....

घरी जाईपर्यंत सूर्याच्या डोक्यात नुसतं विचार चक्र चालू होतं...

मोहित नेहमीप्रमाणे अन्विताला घेण्यासाठी तिच्या घरी गेला... घरी जाण्यापूर्वीच मोहित ने एक विषाची( poison )बॉटल सोबत घेतली...दुपारी इंटरमिशन नंतर दोघेही लॉंग ड्राईव्हला जाणार होते आणि तिथे जेवताना अन्विताच्या नकळत ते विष तिच्या जेवणात कालवायचे आणि तिचा गेम करायचा.... असं त्याने ठरवलं.... अन्विताला सकाळी कॉलेजला सोडल्यावर त्यांच्या प्रॉपर्टीची माहिती असणारा वकील पकडायचा आणि त्याला दमदाटी करून प्रॉपर्टीची माहिती काढायची....सगळा प्लॅन एकदम व्यवस्थित मोहितने केला होता ....


मोहित : येऊ का घरात.... अन्विता कुठे आहे?? मी तिला न्यायला आलोय....

अन्विताची आई : अरे मोहित!!तू तिला घरी घ्यायला आला... तू तर अन्विताला टिळक चौकात भेटणार होतास ना.... अर्धा तास झाला आहे...ती टिळक चौकात गेली.. तिला नाश्ता कर म्हटलं तर म्हणाली कि मी आणि मोहित नाश्ता करू...

मोहित : काय?? 🤔 मी अन्विताला कधी म्हणालो टिळक चौकात भेट म्हणून... आता ही नवीन कुठली मिस्टर ब्लॅकची खेळी तर नाही ना.... विचार करतच मोहितने त्याची गाडी भरधाव वेगात टिळक चौकाकडे वळवली.....

मोहित च्या डोक्यात विचारांचं थैमान सुरु होतं... या मिस्टर ब्लॅक ला कुणावरच विश्वास नाही... कशाला सुपारी देतो मग... मागच्या मर्डरच्या वेळेसही मिस्टर ब्लॅक ने किती गेम खेळले होते... नाही... माझंच चुकलं... आधीचा ईतका दांडगा अनुभव असताना मी मिस्टर ब्लॅकच्या ऑर्डर वर अवलंबून राहायला नको होतं....

विचारात असतानाच मोहित टिळक चौकात पोहोचला... अन्विता काही दिसली नाही... मोहितने अन्विताच्या मोबाईलवर कॉल लावला...मोबाईल स्विच ऑफ... मोहित ने मनातल्या मनात शिव्या हसडत त्याची गाडी त्याने मिस्टर ब्लॅक कडे वळवली...
.क्रमश :
भाग 22 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या