मोहित,मिस्टर ब्लॅकच्या अड्डयावर पोहोचला... मिस्टर ब्लॅक त्याच्या आरामखुर्चीवर बसलेला होता आणि भाल्या आणि टिड्या मिस्टर ब्लॅकचे दंड दाबत होते...
मोहीतला पाहताच मिस्टर ब्लॅक अचंबित झाला...
मिस्टर ब्लॅक : मोहित तू?? अन्विताला ईतक्या लवकर टपकावला कि काय??
मोहित : काय जोक करता राव बॉस तुम्ही... तुम्हीच तिला गायब केला आणि मला म्हणता कि मी टपकावला म्हणून...
मिस्टर ब्लॅक : काय?? मोहित तू शुद्धीवर आहेस का?? काय बडबडतो आहेस... मी एका क्षणाला दोघांनाही कशाला कामाला लावेन...
मोहित : पण बॉस या आधी तुम्ही??
मिस्टर ब्लॅक : मोहित!!या आधी काय??या आधी तुला माहिती आहे का? माझं सगळं वेळेचं नियोजन असतं समजलं ना....
मग अन्विता गेली कुठे??ते ही माझं नाव वापरून... अन्विता खोटं बोलली का?कशाला बोलली असेल तिला आपला प्लॅन तर माहिती झाला नसेल ना... नाही नाही ते कसं शक्य आहे...असं काही होऊ नये म्हणून तर मी या शहरात तळ ठोकून बसलो आहे.. काय काय नाही केलं मी?? माझं गाव सोडून माझं कुटुंब सोडून ईथे राह्यलो... छे... ते शक्य नाही... अन्विताला माझ्याबद्दल काही कळणं शक्य नाही...त्या सूर्याला देखील आपण आपल्याबद्दल कळू दिलं नाही तर अन्विताला तर शक्यच नाही...मोहित विचारात पडला....
मिस्टर ब्लॅक : अरे मोहित!!विचार काय करत बसलास... कृती कर कृती... अन्विता घरी गेली का ते बघ....आणि लवकर मला फॉलो अप दे...
मोहित : ठीक आहे बॉस... मी कळवतो लवकरच
काय?? मिस्टर ब्लॅकला माहिती नाही... मी उगाचच पॅनिक झालो का? पण मग ती मला भेटायला टिळक चौकात का गेली असेल?? 🤔जाऊदे कदाचित आपण जास्तच विचार करत आहोत...आता ती कॉलेज मध्ये असेल... घड्याळाकडे पाहून मोहित कॉलेज कडे जाण्यासाठी निघाला
कॉलेजमध्ये जाताच बेला झुक्या आणि गायत्री चं त्रिकुट त्याला दिसलं पण अन्विता काही दिसली नाही...
मोहित : बेला!!अन्विता कुठे आहे?
बेला : अन्विता?? अन्विता आलीच नाही... मला तर वाटलं कि तुम्ही दोघेही कुठे लॉंग ड्राईव्ह ला गेले कि काय??
मोहित : नाही ना.... पण तिच्याशी काही बोलणं वगैरे झालं का?
बेला : नाही... आज तर तिचा फोन देखील आला नाही....का?? तुमचं काही भांडण वगैरे झालं आहे का?
मोहित : नाही नाही... भांडण वगैरे काही नाही... असंच आज सकाळी मला यायला उशीर झाला तर मला वाटलं तिचं ती आली असेल... तिचा फोन ही लागत नाहीये म्हणून मी शोधत इथवर आलो... मी परत एकदा घरी जाऊन बघतो... असं म्हणत मोहित अन्विताच्या घरी जाण्यासाठी निघाला....
सूर्याचा फोन खणखणला... फोनची रींग ऐकताच सूर्या एकदम खूष झाला... आनंदात सूर्याने फोन उचलला... पलीकडून आवाज आला... आपल्या षडयंत्राप्रमाणे काम फत्ते झालं... मी अन्विताला किडनॅप केलं 🤣🤣🤣 हाहाहा...
सूर्या : हाहाहा🤣🤣 प्रदीप!! वेल डन.... आता कुणाच्या बापालाही कळणार नाही कि तू आणि मी मिळून अन्विताला किडनॅप केलं आहे म्हणून... पण प्रदीप तिला safe ठिकाणी ठेवलं आहेस ना??
प्रदीप : अरे सूर्या ते माझं गोडाऊन आहे ना... तिथे मी ठेवलं आहे.... पण सूर्या मला अन्विताला झोपेचं इंजेक्शन द्यावं लागलं.... ती खूपच गोंधळ घालत होती... काय यार सूर्या या षडयंत्रात व्हीलन नसताना आपल्याला व्हीलन चा रोल करावा लागत आहे....
सूर्या :काय करणार प्रदीप?? जेव्हा ईथे व्हीलनच हिरो होऊन बसला आहे आणि त्या व्हीलन ने सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे... म्हणून तर ही पाऊले उचलावी लागली ना... अन त्या मुळे तर अन्विताचा जीव वाचला आहे... पण काय रे ते इंजेक्शन तुला कुठे मिळालं??
प्रदीप : मिळालं कसलं...घरीच होतं...प्रकाश साठी डॉक्टरने दिलं होतं तो अधून मधून वोयलेंट व्हायचा तेव्हा...
सूर्या : ग्रेटच....
प्रदीप : सूर्या!! आता पुढे काय?? जोपर्यंत तुझ्यावर मिस्टर ब्लॅकची नजर आहे तो पर्यंत आपल्याला काहीच हालचाल करता येणार नाही का??
सूर्या : हं... विचार करतो... पण तू अन्विताचा फोन कस्टडीत घे... सीम कार्ड तोडूनच टाक... कारण उद्यापासून पोलीस अन्विताचा शोध घेतील.... बरं प्रदीप तू अन्विताला किडनॅप केलं ती जागा... मी सांगितली तीच होती ना... कारण तिथे आजूबाजूला कुठलाही cctv कॅमरा नव्हता आणि सकाळी शक्यतोवर तिथे कुणी नसतं...
प्रदीप :हो सूर्या!! अन्विताने फक्त डिझायर गाडी बघितली... गाडीत बसे बसे पर्यंत तिला संशय देखील आला नाही... मग काय मी भरधाव गाडी चालवायला लागलो तितक्यात तिला काय घडतंय याची कल्पना आली....
सूर्या : मग?? तिने प्रतिकार करण्यासाठी काहीतरी केलं असेलच ना...आणि तिने तुला ओळखलं असेल की...
प्रदीप : कसं ओळखणार सूर्या!!ठरल्या प्रमाणे मी मास्क घालूनच समोर होतो...
सूर्या : ok... म्हणजे न चुकता परफेक्ट अन्विताचं किडनॅप झालं... आता आपल्याला मिस्टर ब्लॅक अन्विताला मारण्यासाठी का ईतका उतावीळ झाला आहे हे फक्त समजायला हवं... म्हणजे मग आपल्याला सारं कोडं उलगडता येईल....
प्रदीप :तेच तर खूप अवघड आहे... मिस्टर ब्लॅक काय विचार करतो ते ... तो कुणालाही जवळ फटकूच देत नाही....
सूर्या : हं... हे जरी खरं असलं तरी आपण या वेळेस त्याला मात दिलीच ना... म्हणूनच माझा आत्मविश्वास आता वाढला आहे....
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या