अन्विताची आई सतत रडत होती आणि मोहित ला फोन करून विनवत होती...
पोलिसांची मदत घेण्यासाठी तिने तगादा लावला होता...
पण मोहित ला पोलिसांच्या भानगडीत पडायचे नव्हते...
. त्याचे आधीचे क्रिमिनल रेकॉर्ड पाहता त्याला स्वतःला पोलिसांच्या समोर जायचे नव्हते....
मोहितने कशीबशी अन्विताच्या आईची समजूत काढली..
पण आता पोलिसांच्या भानगडीत पडायचे नाही आणि अन्विताच्या आईला संशय देखील येऊ द्यायचा नाही या साठी काय करता येईल याचा विचार त्याने केला होता.
अन्विताच्या आईने रडत पडत रात्र काढली... सकाळ होताच मोहित ला फोन लावला...
मोहितने त्याचा फोन काही उचलला नाही...अन्विताची आई आता मात्र सैर भैर झाली...
आता वेळ न दवडता अन्विताची आई पोलीस स्टेशन ला गेली.... आणि अन्विता हरवल्याची तक्रार दिली...
तक्रार देऊन झाल्यावर अन्विता ची आई तिच्या घरी आली...
घरी पोहोचल्या पोहोचल्या मोहितने अन्विता च्या आईला फोन लावून त्याच्या अनाथ आश्रमाचे डायरेक्टर खूप सिरीयस आहेत आणि तो त्यांच्यासोबत हॉस्पिटल मध्ये जात आहे...
तिथे कदाचीत माझा फोन पण लागणार नाही.... अन्विताचं म्हणाल तर तुम्ही काळजी करू नका मी लवकरच तिचा शोध लावेन...
अं काय झालं बॉस... पोहोचलो पोहोचलो आपण हॉस्पिटल ला पोहोचलो म्हणत मोहित ने फोन कट केला आणि फोन मधलं सिमकार्ड काढून मोडून टाकलं.... आणि त्याने स्वतःला सुरक्षित करून घेतलं....
अन्विताचे देखील रडून रडून खूप हाल झाले होते... पण तिला काहीच करता येत नव्हते....
आता पर्यंत तिच्या लक्षात एक गोष्ट आली होती की किडनॅप करणारी व्यक्ती तिला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नव्हती...
उलट तिची थोडयाफार प्रमाणात काळजीच घेत होती... आणि तिला किडनॅप करण्यामागे कदाचीत देशद्रोही लोकांचा हात असावा कारण तिचे बाबा सिक्रेट मिशन वर जात असतात असं देखील अन्विताला वाटायला लागलं होतं...
दोन्हीही गोष्टींचा विचार सतत तिच्या डोक्यात येत असल्यामुळे ती खूप गोंधळली होती....
प्रदीप आणि सूर्या अन्विताच्या समोर मास्क घालून येत... सूर्या अन्विता समोर एका शब्दाने देखील बोलत नसे... जे काही बोलायचं ते प्रदीपच बोलत असे..
अन्विता थोडी स्थीर झाल्यावर तिने प्रदीपला विचारण्याची हिम्मत केली... तुम्ही मला कश्या साठी किडनॅप केलं आहे?? तुम्हाला काय हवं आहे?? पैसे हवे आहेत का?
अन्विताच्या प्रश्नांची उत्तरे तसं पाहिलं तर सोपी होती... पण अन्विताला आपल्यावर विश्वास बसणार नाही कितीही केलं तर ती मोहितच्या प्रेमात आहे...
असा विचार करून प्रदीप अन्विताला म्हणाला. मला जे पाहिजे ते मिळेपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही...
तू जर नीट वागलीस तर आम्ही तुझ्या केसांना देखील धक्का लावणार नाही पण जर का तू इथून पळून जाण्याचा वाकडा विचार जरी केलास तर तुझी गाठ आमच्याशी आहे...समजलं ना.. हे बोलताना प्रदीप चा आवाज चढलेला होता....
त्या मुळे अन्विता एकदम शांत झाली.... आपण आता तरी काही न प्रयत्न करणं आणि शांत राहणं उत्तम हे तिच्या लक्षात आलं....
सूर्या मिस्टर ब्लॅक कडे काय चालू आहे याचा अंदाज घेण्यासाठी मुद्दाम मिस्टर ब्लॅक ला भेटायला गेला..
मिस्टर ब्लॅक चा एक स्वभाव होता... त्याचं एखादं षडयंत्र जर बिघडलं तर तो कमालीचा शांत रहात असे... त्याला वाटत असे की जर आहे त्या परिस्थितीत आपण जास्त पॅनिक झालो तर आपण आपल्या कुठल्याही षडयंत्रात यशस्वी होणार नाही...आणि त्याची टिम त्याला वादळापूर्वीची शांतता समजत असत...
सूर्या ला बघताच मिस्टर ब्लॅकचं डोकं एकदम तापलं... त्याला सूर्याचा राग येत होताच पण मोहितचा राग देखील येत होता.... पण तरी देखील चेहऱ्यावर शांत भाव आणत मिस्टर ब्लॅक सूर्याला म्हणाला.... काय सूर्या?? तुझी अन्विता प्रकरणात कितपत प्रगती झाली आहे?
सूर्या : मिस्टर ब्लॅक!!मी तेच तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे...
अन्विता दोन दिवसापासून मला दिसत नाही... मला वाटलं की माझ्या आधीच तुमच्या षडयंत्राने काम केलं असेल...माझा अंदाज खरा आहे ना मिस्टर ब्लॅक??
मिस्टर ब्लॅक : 😡😡😡 सूर्या!!कुठल्या मुहूर्तावर मी तुला अन त्या मोहितला सुपारी दिली कोण जाणे... तावातावाने मिस्टर ब्लॅक बोलून गेला....
सूर्या : काय?? मोहित??.. म्हणजे तो अन्विताचा बॉयफ्रेंड?? तो तुमच्या षडयंत्राचा भाग?? बापरे मिस्टर ब्लॅक मानलं तुम्हाला....तुमच्या सारखं पॉवरफुल दिमाग सगळयांकडे नसतं...
मिस्टर ब्लॅक सूर्याच्या स्तुतीने हुरळून गेला.. पण फक्त क्षणासाठीच... त्याने लागलीच त्याचा पवित्रा बदलला...
ते काही नाही...सूर्या मी आता तुला दोन दिवसांची मुदत देतो... अन्विता मला माझ्यासमोर पाहिजे... आता तिचं काय करायचं ते मी बघतो.... तुला किंवा त्या मूर्ख मोहित ला काहीही करायची गरज नाही.... मी त्या मोहित ला पण ताकीद देतो😡😡😡... समजलं का?
मिस्टर ब्लॅकच्या एकदम अश्या चवताळून जाण्याने सूर्या ला मिस्टर ब्लॅक कडे येण्याचा पश्चाताप वाटायला लागला होता..
तितक्यात मिस्टर ब्लॅक ने त्याचे भाल्या, टिड्या आणि बाकी गुंड देखील बोलावून घेतले आणि सर्वांना त्यांची पूर्वनियोजित कामे रद्द करून फक्त अन्विताला शोधण्याचे काम करण्याची सक्त ताकीद दिली...आणि कुठल्याही परिस्थितीत दोन दिवसात अन्विता प्रकरण संपलंच पाहिजे आता बस्स झालं... मला काय फक्त एकच काम नाही... आणि सूर्या तू देखील लक्षात ठेव जर दोन दिवसात अन्विता माझ्यासमोर आली नाही तर नंतर होणाऱ्या परिणामांना तू जबाबदार असशील समजलं का? अन तो मोहित कुठे घुम्यासारखा लपून बसलाय... बोलवा त्याला... ए सूर्या तू जाऊ शकतोस समजलं का??अन याद रख...
सूर्या :हो बॉस!!मी येतो.... असं म्हणून सूर्या तिथून सटकला आणि थेट प्रदीपला भेटून त्याने मिस्टर ब्लॅक बद्दल सांगितलं...
प्रदीप : सूर्या!! आपल्याला सध्या तर काही भीती नाही. पण मिस्टर ब्लॅकचं जाळं पाहता तो आपल्या पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही... हे तर आहेच पण अन्विता तिचं एक वेगळंच टेन्शन चालू आहे.... ती काही नियमित जेवण वगैरे करत नाही... तिला खूप धमाकावल्यावर मग कुठे थोडं खात आहे... असंच जर अजून एखादा दोन दिवस चाललं तर ती आजारी पडेल...
सूर्या : प्रदीप!!चल मास्क घाल बघू.... आपण अन्विता कडे जाऊ....
प्रदीप : सूर्या!! विसरू नकोस....तुझ्या मागावर मिस्टर ब्लॅक चे माणसं आहेत..मी असं करतो एकदा मी अन्विताशी बोलून बघतो...
सूर्या : हो रे प्रदीप!! आता तिला असं दाखवून द्यायला हवं की आपण जे केलं ते तिच्या चांगल्यासाठीच केलं आहे... निदान थोडं थोडं तरी विश्वासात घेण्याचा प्रयत्न कर... तो पर्यंत मी जरा मोहित विरुद्ध पुरावे गोळा करतो...
हे विचार करत असतानाच सूर्या ला बेला आणि झुक्याची आठवण झाली..... चला सकाळी एकदा कॉलेजमध्ये बेला आणि झुक्याची भेट घेऊन अन्विता बद्दल नेमकं काय वातावरण झालं आहे याचा अंदाज घेऊ....त्यांच्या मदतीने आपण अन्विताच्या घरी जाऊ असा विचार करत करतच सूर्या त्याच्या घरी पोहोचला.
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या