मोहितने त्याचे सगळे सोर्सेस कामाला लावले... अन्विताच्या घरावर आता मोहितच्या माणसांची नजर होती तशीच मिस्टर ब्लॅकच्या देखील माणसांची नजर होती...
तसंच दोघांचीही काही माणसे कॉलेज मध्ये देखील लक्ष ठेवून होती...
तर पोलिसांनी देखील त्यांचे कर्मचारी दोन्हीही ठिकाणी तैनात ठेवले होते...
अन्विताच्या आईचे मोबाईल आणि लँड लाईन टॅप करणे सुरु झाले होते..
अन्विताला नक्की कुणी किडनॅप केलं असेल की तिच्यासोबत काही बरं वाईट झालं असेल याचा अंदाज सगळीकडे बांधला जात होता...
पोलीस देखील सगळे सिटी हॉस्पिटल, शहरातील, तालुक्यातील पोलीस चौक्या सगळीकडे तिची काढण्यासाठी जमेल ते प्रयत्न सुरु झालेले होते.
मिस्टर ब्लॅक मात्र आता अस्वस्थ झाला होता.
.त्याला मान्य नसताना देखील हार पत्कारावी लागणार होती...
तितक्यात मिस्टर ब्लॅक च्या फोन ची रींग वाजली
... अननोन नंबर 😢 आता मी यांना काय उत्तर देऊ??
हॅलो....
काय हॅलो??... पलीकडून आवाज आला... नुसता दहशतीचा आव आणता.... काय तर म्हणे मिस्टर ब्लॅक... तुम्हाला साधं एक काम करता नाही आलं? त्या अन्विताला नाही टपकावता आलं?
न न नाही... डागा !!मी लागलीच काम करतो मला फक्त दोन दिवसाचा कालावधी द्या.. मी काम पूर्ण करतो.. घाम पुसत मिस्टर ब्लॅक फोन वर बोलू लागला...
डागा :दोन दिवस...फक्त दोन दिवस... समजलं ना... अन्विताच्या वडिलांचे संशोधन होण्याआधी एक तर तिचा काठ लावा नाहीतर तीला जिवंत माझ्या कडे घेऊन ये... मी बघतो पुढं तिचं काय करायचं ते...
आता या डागाला आता काय उत्तर देऊ... सगळे सोर्सेस लाऊन झालेत... बस्स आता मीच शोधत फिरायचं बाकी आहे.... मोहित आणि सूर्या तर काहीच कामाचे नाहीत असा विचार करून मिस्टर ब्लॅक आता सुरुवातीपासून सगळे घटनाक्रम जोडून मनात काहीतरी विचार करू लागला...
अर्रे मला कसं क्लिक नाही झालं... सूर्या हा हा नक्कीच सूर्या....हा अन्विताच्या प्रेमात पडला होता ना... म्हणजे तसं लक्षण दिसत होतं ना... त्याने तर अन्विताला किडनॅप नसेल केलं तिला वाचवण्यासाठी शक्यता नाकारता येत नाही .... पण पण.... आपण तर सूर्याच्या मागावर काही माणसे पण ठेवली आहेत... सूर्यावर ती चोवीस तास नजर ठेवून आहेत... मग त्यांच्या नजरेतून हे सुटलं असेल का? नाही हे अशक्य आहे... माझ्या सोबतच डागा चे माणसं देखील सूर्यावर पाळत ठेऊन आहेत.... कुठे ना कुठे संशयास्पद काहीतरी दिसलं असतं ना... की त्या अन्विता सोबतच आपोआपच काही बरं वाईट झालं असेल....
ओ नो... लास्ट लोकेशन... हे माझ्या डोक्यात आतापर्यंत का नाही आलं... नुसतं डोकं न वापरता मी फक्त शक्तीचा वापर करत बसलो....आता सूर्या आणि अन्विता दोघांचं अन्विताच्या लास्ट लोकेशन च्या वेळेस चं लोकेशन चेक करतो... म्हणजे सूर्या यात सामील आहे की नाही हे देखील आपल्याला समजेल...
ए टिड्या त्या आपल्या सायबर डिटेक्टिव्ह वाल्याला बोलाव अर्जेन्ट... मला खूप महत्वाचे काम करायचे आहे....
एकंदर मिस्टर ब्लॅकला आपल्याला आता काहीतरी सापडेल हा विचार करून त्याच्या अंगात एक वेगळा उत्साह संचारला होता.
अन्विता खूप जिद्दीपणा करत होती... किडनॅप झाल्यापासून तिने काही खाल्ल नव्हतं... कसं बसं धमक्या देऊन प्रदीप अन्विताला थोडंफार खाऊ घालत होता... पण त्या साठी त्याला खूप कसरत करावी लागत असे...काय डोक्याला ताप आहे एक तर हिचा जीव देखील वाचवा आणि हिला आता जिवंत राहण्याचे काम देखील करा...
प्रदीपने थोडंसं युक्तिवाद करून अन्विताशी बोलायचं ठरवलं.... तिला जेवण घेऊन गेला... नेहमीप्रमाणे अन्विताने ते जेवण नाकारलं आणि चेहऱ्यावर मास्क असेलल्या प्रदीपला ती विचारायला लागली... तुम्हाला काय हवं आहे... पैसा हवा आहे की प्रॉपर्टी?? का मला तुम्ही किडनॅप केलं आहे... मी तुमचं काय वाकडं केलं आहे?
आतापर्यंतच्या वागण्यावरून किडनॅप करणारी व्यक्ती तितकी तापदायक नाही हे अन्विताने जाणलं होतं...
प्रदीप : हे बघ अन्विता!! मला किंवा माझ्या टिमला ना तुला मारायचं आहे ना काही पैसे उकळायचे आहेत...
अन्विता : मग हे किडनॅप?? आणि मलाच का? हं आता लक्षात आलं.माझे वडील शास्त्रज्ञ आहेत म्हणून.. हो ना...
प्रदीप :नाही गं.... अन जर मी म्हणालो की तुझा जीव वाचवण्यासाठी मी तुला किडनॅप केलं असेल तर....
अन्विता :काय??माझा जीव वाचवण्यासाठी?? काहीही काय?मला मारून कुणाचा फायदा होणार आहे?? मी कुणाचं काय वाकडं केलं आहे.. छे.. हे न पटण्यासारखं आहे... तुम्ही उगाचच लांबन लावत आहात. माझी ना कुणाशी दुश्मनी ना मला मारून कुणाचा फायदा होणार.... बरं मला एक तरी कारण द्याल का की मी तुमच्यावर का विश्वास ठेऊ... काही प्रूफ आहे का की मला मारण्याचा कट वगैरे काही होत आहे तो....
प्रदीप : हे बघ अन्विता!! तुला आज विश्वास बसत नाहीये पण लवकरच मी तुझ्या समोर प्रूफ आणेल मग तर झालं? अन मी मनापासून सांगतो तू जर आमचं ऐकलं तर तुला एक टक्काही त्रास होणार नाही... पण सध्या या पेक्षा जास्त मी तुला काहीच सांगू शकत नाही... तुला माझ्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा आहे हे तुझं तू ठरव...
प्रदीपच्या त्या बोलण्यानंतर अन्विता खूप विचारात पडली... खरंच हा मास्कधारी म्हणत असेल ते खरं असेल का? पण जेव्हपासून यांनी मला ईथे आणलं आहे तेव्हापासून यांचे वागणे पाहता हे सगळं सहज पटू शकतं.पण माझा जीव घेणार कोण? आणि का? मला मारून कुणाला काय मिळणार..विचार करून अन्विताचं डोकं सुन्न झालं.
दरम्यान अन्विताच्या आईला अन्विताच्या बाबांचा फोन आला.अन्विताच्या आईने रडत रडत अन्विता बद्दल सांगितलं.
अन्विताचे बाबा :काय?? अन्विता घरी आली नाही?? तू पोलीस कंप्लेंट पण केलीस?मग तिच्याबद्दल अजून कसं काही कळालं नाही... जानकी!! दोन मिनिटे थांब.. मला माझ्या कामातून सुट्टी मिळते का ते बघतो...
फोन ठेवून अन्विताच्या बाबांनी हाय कमांडला फोन लावला... हाय कमांडनी एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन दोन दिवसांची रजा मंजूर केली.
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
1 टिप्पण्या
The best casino games to play in India 2020
उत्तर द्याहटवाCheck out 라이브스코어사이트 our detailed list of the best sss 포커 Indian casinos to play 토토 폴리스 in India 2020. Discover more than 4000 top casino games & free spin 🏆 Best Indian Casino: 888 Casino🎲 New Indian Bonus: 100% Deposit Bonus🏆 Top Indian m 2 슬롯 Casino: Betway💰 메종프란시스커정바카라루쥬오드퍼퓸 Top Indian Casino Promos: Videoslots💰 Top Indian Casino Bonus: 100% Deposit Bonus