दैव जाणीले कुणी (भाग 26)

कशीबशी सुट्टी मिळाल्यावर अन्विताचे वडील लागलीच तिच्या घरी पोहोचले.अन्विताच्या वडिलांना अन्विताच्या आईने काय काय घडले ते सर्व सांगितले.

अन्विता गायब झाल्यानंतर मोहित देखील त्यांच्या आश्रमाचे डायरेक्टर आजारी असल्यामुळे कॉन्टॅक्ट मध्ये नाही. आणि तिथे रेंजही नसल्याचे सांगितले.

असं कसं... म्हणजे??अन्विता सापडत नाहीये याचं दुःख मोहित ला नसावं का? कितीही काही टेन्शन असलं तरी तो काही ना काही प्रयत्न करू शकला असता ना..

 त्यातल्या त्यात मी कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो म्हटल्यावर त्याची जबाबदारी दुप्पट होते ना.प्रेम आहे म्हणे... हे कसलं प्रेम? अन्विताच्या वडिलांना मोहितचं वागणं खटकलं होतं.पण त्याचा उल्लेख जानकी समोर त्यांनी केला नाही..

मिशन वरून निघताना अन्विताच्या वडिलांनी त्यांच्या हाय कमांडला अन्विता बद्दल माहिती काढण्यासाठी सांगितलं...

अन्विताचे बाबा शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांनी देशासाठी खूप अधुनिक शोध लावले होते. त्या कारणामुळे धोका होऊ शकतो हे त्यांनी जाणलं होतं..

मिस्टर ब्लॅकने अन्विताचे लास्ट लोकेशन टिळक चौक असे सापडले. त्या नंतर कुठलेच लोकेशन दिसत नव्हते.आणि अन्विता ज्या दिवशी गायब झाली त्या दिवशीचे ते लोकेशन होते.

Yes... म्हणजे अन्विता इथूनच गायब झाली..लास्ट लोकेशन कळताच मिस्टर ब्लॅक ने आपली संपूर्ण टिम टिळक चौकात पाठवली... टिळक चौकातील प्रत्येक दुकानातील cctv कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग काढण्यासाठी प्रयत्न करू लागला.

 पण त्या आधीच पोलीस त्या चौकातील सर्व रेकॉर्डिंग घेऊन गेले होते. आधी पोलीस येऊन गेल्यामुळे मिस्टर ब्लॅकला टिळक चौकातील दुकानदारांना धमाकावता आले नाही.

मग त्या पोलिसांपैकी एका पोलिसाला फितूर करून मिस्टर ब्लॅक ने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग त्याच्या एका पेन ड्राईव्ह वर ट्रान्सफर करून घेतले.

सिसिटीव्ही फुटेज मिळाल्यावर मिस्टर ब्लॅकला फुटेज मध्ये विशेष संशयास्पद असं काही मिळालं नाही...

मिस्टर ब्लॅकने त्याचा मोर्चा आता सूर्या कडे वळवला. आणि त्याने अर्जंट सूर्याला बोलावून घेतलं.

मिस्टर ब्लॅक : सूर्या!!अन्विता कुठे आहे?😡

मिस्टर ब्लॅक च्या प्रश्नाने सूर्या एकदम गोंधळून गेला... मिस्टर ब्लॅक ला कसं काय माहिती??

आपण पकडलो गेलो की काय? पण जिथपर्यंत मला आठवतं मी एकही घोडचूक केलेली नाहीये.

 पण आपण चुकून किंवा प्रदीपने चुकून काही पुरावा सोडला असेल तर?? नाही कदाचीत आपला फक्त संशय आला असेल?

जाऊदे आता उडी घेतलीच आहे तर सूर्या!!
आता खोटं बोल पण रेटून बोल असं करावं लागणार..

मिस्टर ब्लॅक : सूर्या!!काय म्हणतोय मी..अन्विता कुठे आहे?

सूर्या : काय?? बॉस!!तुम्ही मला विचारलंत.. आजूबाजूला बघितल्यासारखं करत...मला आपलं वाटलं तुम्ही आजूबाजूला कुणाला विचारलं... "अन्विता?? "मला कसं माहिती असेल ती कुठे आहे ते??

एकदम सोज्वळ भाव चेहऱ्यावर आणून सूर्या म्हणाला

खरं सांगू का बॉस मला वाटतं की मोहित.. अन्विता गायब झाल्यानंतर तो जरा कमी दिसत आहे ना.. म्हणजे मला काही माहिती नव्हतं पण आधी बोलता बोलता तुम्ही त्याचं नाव घेतलं होतं ना म्हणून आपलं अंदाज केला ...

मोहितने तर काही गेम खेळला नसेल ना...म्हणजे नाटक करता करता तो तिच्या प्रेमात पडला असेल तर??विषय बदलत सूर्या मिस्टर ब्लॅकला म्हणाला.

मिस्टर ब्लॅक :अशक्य आहे ते.. त्याचा प्रेमविवाह आधीच झाला आहे.आणि मला जितकं माहिती आहे तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी आहे.

सूर्या : काय 😳?? सूर्याला अजून एक मोहितचं गुपित आपोआपच माहिती झालं. 

 मिस्टर ब्लॅकने कळत न कळत आतापर्यंत दोन गुपितं माझ्यासमोर उलगडले.

चला आपली आजची भेट पण फायद्याची ठरली.. आता मला अन्विताला शंभर टक्के विश्वासात घेता येईल.. हुर्रे.. सूर्या मनातल्या मनात स्मित करू लागला.

सूर्याच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव मिस्टर ब्लॅक ने ओळखले.

मिस्टर ब्लॅक : काय सूर्या?? काय झालं?? तुला मी जोकर दिसतोय का? मनातल्या मनात हसतोय..

सूर्या : नाही बॉस!!तसं नाही...मोहित आणि अन्विताची लव्ह स्टोरी आठवली म्हणून जरा हसू आलं... काही मुली किती मूर्ख असतात ना.... कुणाच्याही जाळ्यात पटकन अडकतात...

मिस्टर ब्लॅक : हं...

अन्विताच्या वडिलांचे सोर्सेस जे होते ते सगळ्यात पॉवरफुल सोर्सेस होते. कारण त्यांच्या टिम मध्ये सगळे रिटायर्ड डिटेक्टिव्ह, मोठ मोठया हुद्द्यावरील रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स होते. ईतकंच काय तर रिटायर्ड आर्मी, नेव्ही, असे सर्वच बडे अधिकारी होते.

ह्या सर्वांचं एकच काम होतं की देशद्रोही लोकांवर नजर ठेवणे आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे.

त्यांच्या ह्या सर्व कामांमुळे आणि एकनिष्ठतेमुळे ह्यांची टिम update रहात असे.

अन्विताच्या बाबांच्या टिमने अन्विताच्या मागावर डागा असू शकेल याची माहिती काढली होती..

डागाची संघटना एक अतिरेकी संघटना होती. त्या संघटनेचे काम म्हणजे देशद्रोह करणे.आणि ती संघटना सतत अन्विताच्या बाबांच्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवून होती.त्यांच्या कामांमध्ये वेळोवेळी अडथळे आणत होती. आणि प्रत्येक वेळी अन्विताचे बाबा आणि त्यांची टिम मात देत होती..

पण जर डागाच्या अतिरेकी संघटनेने अन्विताला किडनॅप केलं असेल तर  ब्लॅकमेल नक्कीच केलं असतं.आतापर्यंत त्यांचा काही कॉल देखील आला असता.

जर डागाचा अन्विताच्या किडनॅपिंग मध्ये हात असेल तर आपल्याला त्याच्या कॉल ची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.असा विचार अन्विताचे बाबा करत होते.

अन्विताचा उडालेला गोंधळ काही कमी होत नव्हता. पण हेही तितकंच खरं होतं की तिला आता किडनॅपर च्या तावडीत सुरक्षित वाटायला लागलं होतं.ती सतत प्रदीपच्या बोलण्याचा विचार करत होती.

कॉलेज मध्ये बेला,गायत्री आणि झुक्या तिघांनाही अन्विता गायब झाल्याचे माहिती झाले होते.हे तिघेही अन्विताच्या घरी जाऊन आले होते .

अन्विताच्या वडिलांनी या तिघांनाही अन्विता गायब झाली असली तरी तिच्या जीवाला धोकाही असू शकतो म्हणून कॉलेज मध्ये ही गोष्ट कुणाला कळू देऊ नका अशी तंबी देखील दिली.

कॉलेज मध्ये आल्यावर झुक्या बेलाला म्हणाला बेला!!आपली मैत्रीण संकटात आहे आणि आपण असं हात धरून बसणार आहोत का?

बेला : हो रे झुक्या!!मलापण आता स्वस्थ बसवत नाहीये...पण आपण करणार काय?

झुक्या : मी माझ्या टेकनॉलॉजि चा वापर करून अन्विताचं काही लास्ट लोकेशन किंवा आत्ताचं लोकेशन ट्रॅक होतं का ते बघतो..

गायत्री : अन्विताच्या वडिलांनी पोलिसांना कळवले असेलच ना... मग त्यानी ट्रॅक केलेच असेल की..

झुक्या : हो... पण तरी देखील असं रिकामं बसण्या पेक्षा काही ना काही प्रयत्न केला तर काय हरकत आहे.

बेला : झुक्या!!गायत्री!!मोहित कुठे आहे गं.. तो अन्विताला शोधत होता ना.. नंतर परत आलाच नाही..

झुक्या : हो ना... कदाचीत तो देखील तिला गोपनीय पद्धतीने शोधत असेल...

बेला :हं असू शकतं..
क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या