रूमवर आल्या आल्या सूर्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु झाले.. अन्विता? आता अन्विताला विश्वासात घेणं अवघड नाही. लवकरात लवकर मोहितची माहिती मी अन्विताला देऊ शकतो ते ही with प्रूफ...
हा हा हा..
सूर्याने लागलीच त्याच्या वेगळ्या नंबर वरून प्रदीप ला कॉल केला..
सूर्या : हॅलो प्रदीप !! एक गूड news आहे.. असं म्हणून सूर्याने प्रदीपला मोहितबद्दल सर्व काही सांगितलं.आणि प्रदीपने अन्विताला थोडंफार विश्वासात घेतलं म्हणून सांगितलं.
बेला झुक्या आणि गायत्री तिघे मिळून अन्विताला शोधण्यासाठी दिवस रात्र एक करत होते.
झुक्याने त्याच्या मोबाईल मधील टेकनॉलॉजिचा वापर करून अन्विताचे बाजारातले लास्ट लोकेशन शोधून काढले. व त्या जागेवर जाऊन जागेची संपूर्ण पहाणी केली.
आजूबाजूला कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत असा एकच कोपरा झुक्याला दिसला.
अन्विताच्या बाबाने बोलता बोलता अन्विता गायब झाली ते कुठल्याच सीसीटीव्ही मध्ये आले नाही. हे सांगितले होते. पण जरी एका कोपऱ्यात अन्विता दिसली नाही तरी आजूबाजूला कुठे??ती किंवा तिचा ऑटो.. हा सगळा शोध झुक्या, पोलीस, आणि अन्विताच्या बाबांचे हाय कमांडचे लोकं घ्यायला लागले होते. राहून राहून सीसीटीव्ही कॅमेरा मधून प्रत्येक येणारी जाणाऱ्या गाडीची ते नोंद करत होते.
झुक्या अन्विताच्या बाबांच्या परवानगीने पोलिसांसोबत बसला होता.
एक पांढऱ्या रंगाची मारोती ओमनी कार झुक्याच्या आणि पोलिसांच्या नजरेत भरली.
सीसीटीव्ही फुटेज थांबवून रील मागे पुढे फिरवून कॅमेरा झूम करून मारोती ओम्नी मध्येच अन्विता किडनॅप झाली असावी प्राथमिक अंदाज त्यानी बांधला.
अंदाज बांधल्यावर ओमनी गाडीच्या फोटो वर फोकस करून गाडीची नंबर प्लेट दिसते का या साठी त्यांचा प्रयत्न झाला.
ओमनी गाडीला नंबर प्लेट नव्हती. त्या मुळे अन्विताचं किडनॅप हे ओमनी मध्येच झालं याची खात्री झुक्या आणि पोलिसांना पटली. आता या ओमनीच्या मालकाचा शोध घेतला की आपण अन्विता पर्यंत पोहोचलोच समजा..
असा विचार झुक्या आणि पोलिसांच्या मनात देखील येऊन गेला.
अन्विताचे बाबा येऊन दोन दिवस झाले होते. नाही म्हटलं तरी दोन दिवसात अन्विताच्या शोधाच्या दिशेने बऱ्याच हालचाली झालेल्या दिसल्या.
मिस्टर ब्लॅक पर्यंत देखील पांढऱ्या ओमनी कार ची बातमी पोहोचली होती. झालं मिस्टर ब्लॅक, पोलीस, झुक्या आणि हाय कमांड असे चारही जण अन्विताच्या शोधात जवळ जवळ अर्ध्या मार्गात पोहोचले होते.
फक्त ओमनी कार ची नंबर प्लेट नसल्याने जो काय वेळ लागणार होता तो हाय कमांड व्यतिरिक्त टीम्स ला लागणार होता.
कारण हाय कमांड मध्ये एक रिटायर्ड आर टी ओ ऑफिसर होता. आणि अश्या नंबर नसलेल्या गाड्यांचा शोध कसा लावायचा हे त्याला पक्क माहिती होतं.
प्रदीप मात्र या बाबतीत संपूर्णपणे गाफिल होता. त्याला वाटत होतं की मिस्टर ब्लॅक अन्वितापर्यंत पोहोचूच शकत नाही.
सूर्या मात्र मोहितची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला मोहितची अत्यंत जुजबी माहिती मिळत होती. ज्या मुळे सूर्या काही समाधानी होत नव्हता.
अचानक सूर्याला झुक्याची आठवण झाली.
हं झुक्या त्याच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून मोहितला शोधण्यासाठी आपल्याला मदत करू शकतो.
असा विचार करून सूर्या ने झुक्या ची भेट घेतली.
झुक्याने या आधी पोलिसांची मदत केलेली असल्यामुळे पोलिसांनी झुक्याला सर्व काही गोपनीय ठेवण्याची तंबी दिलेली होती.
त्या मुळे झुक्या सूर्याशी मोकळेपणाने बोलायला तयार नव्हता.
शेवटी सूर्याने झुक्याला विश्वासात घेण्यासाठी तो बोलायला लागला...
हे बघ झुक्या अन्विता गायब झाल्यानंतर मोहितही कुणाच्या संपर्कात नाही हे संशयास्पद नाही का?? काय सांगावं मोहितनेच अन्विताला किडनॅप केलं असेल तर..
अरे हो हे आपल्या डोक्यात कसं नाही आलं... झुक्या विचार करू लागला...पण मोहितचं किती प्रेम होतं अन्वितावर... कशाला त्याने तिला किडनॅप केलं असेल.
सूर्या : हे बघ झुक्या??ईतका काय विचार करतोस??मी काय म्हणतोय हे तुला पटतंय ना?
बरं किडनॅप नसेलही केलं पण अन्विता गायब झाल्यापासून तो कुठे आहे??
झुक्या :हं हे मात्र मलाही खटकलं....
सूर्या : हो ना...मग तू मला फक्त थोडी मदत करशील??
झुक्या : मदत कसली मदत?
सूर्या : तुझ्या टेकनॉलॉजि च्या मदतीने मोहितचं लोकेशन ट्रॅक करशील? बघूयात तर आपल्या हाती काही लागते का?
झुक्या : मोहितचं लोकेशन होय... ठीक आहे... आपण प्रयत्न करू..
झुक्याने मोहितचं लोकेशन ट्रॅक करायला सुरुवात केली.. क्या बात है... मोहितचं लास्ट लोकेशन ईथेच आजूबाजूचं दिसत आहे... हं पण हे काय? नंतरचं लोकेशन?? मोहितचं लोकेशन पण ट्रॅक होईना... सूर्या एकदम निराश झाला...
तितक्यात त्याला मोहितचं लोकेशन अगदी मध्यरात्रीस काही क्षणापूरतं ट्रॅक होत होतं... काय असेल हे झुक्या आणि सूर्याला आता मोहितवर चांगलाच संशय यायला लागला होता..
सूर्या : झुक्या!!बघितलं का... मोहितचं हे वागणं तुला अधिक संशयास्पद नाही वाटत आहे का?बरं त्याचं आत्ताचं काही लोकेशन ट्रॅक होतंय का ते बघतोस का?
झुक्याने लोकेशन बघितलं... अगदीच कालच्या मध्य रात्रीचं होतं...
झुक्या :सूर्या सर!! एक सांगू का... मोहितचं मध्यरात्रीचं जे लोकेशन आहे ते आधीचं आणि कालचं लोकेशन एकच आहे...
सूर्या : अरे वा.... तू तर खूप मोठी लीड दिलीस... झुक्या thanks a lot... माझं काम झालं की मी तुला पार्टी देतो नक्की...
झुक्या : thanks सूर्या सर!!सर एक विचारू का?
सूर्या :काय?
झुक्या :मी हे पोलिसांना सांगू का? तसंही ते माझी अन्विताच्या बाबतीत मदत घेत आहेत?
सूर्या :काय? 😳मग अन्विताच्या बाबतीत तुला काय काय कळालं...
अरे हे काय?? आपण असा विचार का नाही केला? की पोलीस देखील अन्विता पर्यंत पोहोचत असतील? प्रदीप ला सावध करायला हवं...सूर्या विचारात पडला...
झुक्या : सूर्या सर!!मला पोलिसांनी तंबी दिली आहे? मी नाही सांगू शकत... प्लिज मला माफ करा... मी बोलता बोलता बोलून गेलो....
सूर्या : बरं बाबा!!राह्यलं नको सांगू.... तू टेन्शन घेऊ नकोस... पण माझ्यासाठी एक करशील?
झुक्या :काय?
सूर्या : मोहित बद्दल तू पोलिसांना आत्ताच काही सांगू नकोस...म्हणजे मी स्वतःहून तुला सांगेपर्येंत... थोडा वेळ... म्हणजे मला पोलिसांच्या आधी त्याला गाठायचं आहे त्या साठी...
झुक्या : ठीक आहे... पण जर तुला काही कळालं तर मला सांगशील म्हणजे मी लागलीच पोलिसांना कळवतो..
सूर्या : झुक्या!! परत एकदा थँक्स... मी तुला खात्री देतो की मी लवकरच मोहित पर्यंत पोहोचेल आणि मग तुला पोलिसांपासून लपवून ठेवावं लागणार नाही..
चल लवकरच भेटू... बाय
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या