दैव जाणीले कुणी (भाग 28)

झुक्या ला बाय म्हणून सूर्या बाहेर पडला... बाहेर पडल्या पडल्या सूर्याने त्याचा सीम कार्ड बदलून प्रदीप ला फोन लावला..

सूर्या : प्रदीप!! मला वाटतं की लवकरच पोलीस आपल्या पर्यंत पोहोचतील.. ते तू किडनॅप करताना जी ओमिनी गाडी वापरली होती तिथपर्यंत ते पोहोचले आहेत..

प्रदीप : हा हा हा.... सूर्या!!मिस्टर ब्लॅक च्या तालमीत मी तयार झालो आहे...मला हा अंदाज आलाच होता.. मी आत्ताच थोडया वेळापूर्वी लोकेशन बदललं आहे... अन गेस व्हॉट... या वेळेस अन्विता खूप शांत होती.. तिने काहीच प्रतिकार केला नाही.. मी तिला फक्त ईतकंच म्हटलं की तू मला फक्त अजून तीन दिवस दे.. तुझ्यासमोर मी तुला किडनॅप तुझा जीव वाचवण्यासाठी केलं ह्याचं with प्रूफ तुला सगळं दाखवतो... तो पर्यंत फक्त मला कोअपरेट कर... कदाचीत तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला असावा..

सूर्या : प्रदीप!! वेल done... तरी देखील अन्विताच्या बाबतीत तू ढिल्ला पडू नकोस...नाहीतर अन्विताचं शांत असणं म्हणजे वादळापूर्वीची शांतता निघायची..

बरं ऐक!!अन मोहीत चं लोकेशन मला मिळालं आहे... एकदा मोहितचं पितळ अन्वितासमोर उघडं पाडलं की माझं काम झालं समजा.

प्रदीप :वा... एक नंबर काम झालं मग... हे बघ सूर्या!!आपल्याकडे आता फार कमी वेळ शिल्लक आहे असं मला माझं सिक्स सेन्स सांगतय...

सूर्या :खरं आहे... मला देखील तसंच वाटत आहे...हे काय मी निघालोच मोहितच्या लोकेशनला...फक्त जाताना मला मिस्टर ब्लॅकने अडवू नये म्हणजे झालं....

प्रदीप : चल तू निघ... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव की मिस्टर ब्लॅकची लोकं तुझ्यावर सतत पाळत ठेवत आहेत...

सूर्या :हो ना...त्या मिस्टर ब्लॅकचं तर मला काही कळतच नाही..स्वतःच्या लोकांवर कधी पाळत ठेवतात का? बरं पाळतच ठेवायचं होतं तर मला त्यांच्या षडयंत्रात घ्यायचं नसतं ना... असो... मी त्यांच्या लोकांना केव्हाच चकमा दिला आहे. त्यांच्या रोजच्या अनुभवामुळे हे मी हे साध्य करू शकलो. पण त्या मुळे आता मला धड घरीही जाता येत नाही आणि धड एका ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही.प्रदीप!! मी आता हा नंबर आणि माझा खरा नंबर बंद करतो. म्हणजे या दोन दिवसात मिस्टर ब्लॅक माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.बाय.. असं. म्हणून सूर्याने त्याचा फोन बंद केला.आणि तो मोहितच्या गावाला निघाला.

सूर्या चा पाठलाग करताना त्याची link तुटल्यामुळे आता भाल्या आणि टिड्या जाम टेन्शन मध्ये आले होते.. त्यांनी सूर्याला फोन लावायचा प्रयत्न केला. पण सूर्याचा फोन स्वीच ऑफ येत होता.पण आता जर आपण हे मिस्टर ब्लॅकला सांगितलं तर आपलं काही खरं नाही... पण आज संध्याकाळ पर्यंत मिस्टर ब्लॅकला सूर्याचे देखील काही ना काही अपडेट्स द्यावे लागणार यांचं त्यांना जाम टेन्शन आलं होतं ...निसटला तर निसटला... निसटून जाणार कुठे?झोपायला घरीच येईल ना... मग परत ठेवता येईल नजरकैदेत असा विचार करून भाल्या आणि टिड्या थोडे शांत झाले.

ईकडे डागाने त्याच्या संघटनेतील सगळ्या माणसांना अन्विताच्या शोधासाठी स्वतः माणसे पाठवली.मिस्टर ब्लॅक नक्कीच आपल्यासोबत काहीतरी गेम करत आहे असा त्याचा समज झाला होता.

 डागाची अतिरेकी संघटना खतरनाक होती.त्यातील प्रत्येक व्यक्ती अतिशय कट्टर अतिरेकी होता. कट्टर अतिरेकी म्हणजे त्यांना समोरच्या व्यक्तीचा साधा संशय जरी आला तरी मागचा पुढचा विचार न करता ते बंदूक काढत असत. अश्या कितीतरी निरापराध लोकांच्या या संघटनेमुळे मृत्यू झाला होता.कितीतरी अतिरेकी हल्ले या डागा ने आणि त्याच्या डागा संघटनेने घडवून आणलेले होते.

आता अन्वितासाठी मिस्टर ब्लॅक आणि डागा संघटने व्यतिरिक्त, हाय कमांड, अन्विताचे आई बाबा, पोलीस यंत्रणा आणि झुक्या आणि त्याच्यासोबत गायत्री आणि बेला हे सर्वच झटत होते.

सूर्या मोहितच्या गावाला पोहोचला. लोकेशन ट्रेस करत करत त्याने मोहितची जागा शोधून काढली तत्पूर्वी सूर्याने त्याचा पेहराव संपूर्णपणे बदलला होता. चेहऱ्यावर पांढरी दाढी आणि पांढऱ्या मिश्या लावून त्याने डोक्यावर पांढरी टोपी आणि धोतर असा अंगावर पोशाख चढवला होता. त्या मुळे मोहित देखील सहजा सहजी सूर्याला ओळखणार नव्हता.

सूर्याने आजूबाजूला बघुन मोहितच्या घराचा दरवाजा ठोठावला..

दरवाजा एका लहान मुलाने उघडला...

सूर्या : मोहितराव घरात आहेत का?

लहान मुलगा : कोण?? कोण मोहितराव??

सूर्या : बेटा तुझं नाव काय आहे?

लहान मुलगा... मी...

कोण छे रे... आतून आवाज आला....

सूर्या : कदाचीत ही त्याची बायको असावी.. अन तो मुलगा..अंदाज काढत सूर्या बोलायला लागला.. मोहितराव आहेत का घरात माझं त्यांच्याशी जरा काम होतं..

मोहितची बायको : अं ते जरा बाहेर गेले आहेत... येतीलच ईतक्यात... तुम्ही बसा मी जरा पाणी आणते..

मोहितला त्या गावात बिट्टू म्हणून ओळखत... दूर दूर पर्यंत मोहित नाव हे कुणालाच माहिती नव्हतं म्हणून तिला लागलीच सूर्याचा संशय आला.

सूर्याने हॉल मध्ये बसल्या बसल्या ईकडे तिकडे नजर फिरवली... हॉल मध्येच मोहितचा फॅमिली फोटो होता. पटकन त्याचा एक फोटो मोबाईल चालू करून त्याने काढला.. आणि त्याच्या मुलाला ये फोटो किसकी है आणि इस फोटो मे कोन है विचारून त्याचा व्हिडीओ शूट घेतला..

दरम्यान पाणी आणण्यासाठी गेलेल्या मोहितच्या बायकोने ताबडतोब मोहितला फोन लावला व घरी आलेल्या म्हाताऱ्याबद्दल सांगितले..

मोहित : ये देख...दाल मे कुछ तो काला है.. मेरा यहा का पता किसी बाहर वाले को पता ना छे.. एक बात कर तू उसे बातो मे उलझा के रख.. मै जरा देखता हूं की कोन है वो...

सूर्याने व्हिडीओ काढला... पण त्याच्या सिक्स सेन्स ने आता ईथे थांबणं योग्य नाही असं जाणलं... तो लागलीच तिथून बाहेर पडला... कारण मोहितच्या विरोधात त्याला हवा तसा कामापुरता पुरावा मिळाला होता.

मोहितने त्याच्या आजूबाजूच्या साथीदारांना सांगून स्वतःच्या घरी घेराव घातला..

पण तो पर्यंत सूर्या तिथून सटकला होता आणि परत जाताना त्याने त्याचा पेहराव परत बदलला होता... त्या मुळे मोहितचे साथीदार दाढीवाला आणि धोतर नेसलेला म्हातारा शोधत होते आणि सूर्या त्यांच्यासमोरच एका खाजगी बस मध्ये परतीच्या प्रवासासाठी चढला..

बस मध्ये बसल्या बसल्या सूर्याने प्रदीपला मोहितच्या घरातील फॅमिली फोटो आणि व्हिडीओ पाठवला.

सूर्याने विचार केला होता त्या पेक्षा देखील जलद गतीने त्याचं काम झालं होतं.

व्हिडीओ आणि फोटो पाहून प्रदीप खूप खूष झाला...

 अन्विताला आता मोहित बद्दल सर्व सांगायचं ठरवलं.. झुक्याने सूर्याला माहिती दिल्याप्रमाणे आता अन्विता पर्यंत कोणत्याही क्षणी झुक्याची टिम पोहोचेल याचा अंदाज आलेला होता. त्या मुळे त्याला प्रत्येक क्षण महत्वाचा वाटत होता.

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या