दैव जाणीले कुणी (भाग 29)

पुरावा हातात आल्यावर प्रदीप लागलीच अन्विताला भेटण्यासाठी गेला.

अन्विता शांतपणे खुर्चीवर बसेलेली होती... प्रदीप ने अन्विताला बांधलेल्या सर्व दोऱ्या सैल केल्या.. आणि तिला म्हणाला... अन्विता!!हे बघ आता हे शेवटचं या नंतर तू मुक्त असणार आहेस अगदीच सर्वार्थाने मुक्त असणार आहेस..

या नंतर तुला तुझ्या मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य देखील मिळणार आहे..

 आता फक्त काही क्षणातच मग मी तुला पूर्णपणे मुक्त करेन या किडनॅपिंग च्या बंधनातून...

अन्विता : ए तू जो कोणी आहेस असं कोड्यात का बोलत आहेस? सरळ सरळ बोल...

प्रदीप : हो आता सरळ सरळच बोलतो मी... असं म्हणून प्रदिपने त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढला...

प्रदीपला पाहून अन्विता अवाक झाली... प्रदीप सर तुम्ही?? आणि माझं अपहरण... का?
का केलं तुम्ही माझं किडनॅप..
किडनॅप न करता तुम्ही मला सरळ सरळ सांगू शकला असता तरी देखील मी तुमच्यावर विश्वास ठेवला असता ना..
अन काय हो... मला तुम्ही सांगा तुम्हाला कसं माहिती होतं की माझा जीव धोक्यात आहे म्हणून??

प्रदीप : अगं अन्विता!! थांब  एका वेळेस किती प्रश्न विचारणार आहेस? सांगतो तुला,सगळं काही सांगतो.. तत्पूर्वी तू ईथे बस आणि आता ऐक...

अन्विताचं पूर्ण लक्ष आता प्रदीप काय बोलतोय त्या कडे होतं...

प्रदीप : अन्विता!! आम्हाला तुला किडनॅप करावं लागलं याचं कारण तुला तुझ्या एकदम जवळच्या व्यक्ती पासून धोका होता...

अन्विता : आम्हाला म्हणजे?? Dont say की या किडनॅपिंग मध्ये अजून कुणी ओळखीच्या व्यक्तीचा हाथ आहे..

प्रदीप : अन्विता!!सांगतो सांगतो सगळंच सांगतो पण तू पॅनिक होऊ नकोस..हे बघ तुला कितीही आश्चर्य वाटले किंवा राग आला तरी आता मी जे काय बोलतोय त्याला तू डिस्टर्ब् करू नकोस कारण तुझ्या मागावर खूप जण आहेत..

 माझी फक्त इतकीच इच्छा आहे की ते सर्व तुझ्यापर्यंत पोहोचण्या आधी हे सत्य तुला कळालं पाहिजे...

अन्विता :ठीक आहे... नाही बोलणार मी आता मध्ये....

प्रदीप : अन्विता हा बघ व्हिडीओ... असं म्हणून प्रदीपने व्हिडीओ आणि मोहितचा फॅमिली फोटो अन्विताला दाखवला...

फोटो आणि व्हिडीओ बघताच अन्विताला छातीत एकदम धस्स झालं...
काय?????मोहितचं लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे... हे खोटं पण असू शकेल ना.. नाही खोटं कसं असेल तो छोटासा मुलगा सांगत आहे ना ते खोटं वाटत नाहीये...

पण माझं मन मानत नाहीये की मोहित माझ्याशी असं वागेल...अन्विताच्या डोळ्यातुन अश्रुंचे ओघळ वाहत होते...

प्रदीप :अन्विता!!अन्विता कुठे हरवलीस... ऐक लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे....

अन्विता!!मान्य आहे की आता तुला खूप मोठा धक्का बसलाय आणि तसेच अजून काही धक्के तुला पाचवायचे आहेत...

अन्विता : म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला... मोहित!!माझं जीवापाड प्रेम आहे त्याच्यावर... तो असं कसं माझ्याशी वागू शकेल...काही महिन्यांनी आम्ही लग्न करणार होतो... बरं एक वेळ मी फसेन पण माझे "बाबा " माझ्या बाबांना देखील मोहित फ्रॉड आहे हे लक्षात आलं असतं ना...

प्रदीप : अन्विता!!प्लीज ऐक ना.... हे बघ मोहित तुझ्याशी लग्न वगैरे करणार नव्हताच कधी... उलट वेळ पाहून तो तुझा जीव घेणार होता..तो एका षडयंत्रात काम करत होता...तो ईतका परफेक्ट आहे की कुणालाच संशय येणार नाही..

अन्विता : षडयंत्र कुठलं षडयंत्र... अन हे सर्व तुम्हाला कसं माहिती??

प्रदीप : कारण इच्छा नसताना देखील आम्ही त्या षडयंत्राचा भाग होतो..

अन्विता :काय??आम्ही... आम्ही म्हणजे अजून कोण??

प्रदीप :आम्ही म्हणजे...मी आणि सूर्या...


अन्विता : काय?? सूर्या सुद्धा.. चांगली मैत्री निभावली... हं आता कळालं मी सूर्याला नकार दिलेला होता ना... बरोबर आहे तो बदला घेणारच...


प्रदीप : अन्विता!! मैत्री होती म्हणून सूर्याने आणि मी आमचा जीव धोक्यात घालून तुझं अपहरण केलं.... तूच सांग..नाहीतर काय गरज होतीआम्हाला हे सर्व करायची ... तुला आठवतं का की तुझ्या अपहरणाच्या दिवशी मोहितचं अन तुझं काय ठरलं होतं ते...तुम्ही दोघे लॉन्ग ड्राइव्हवर जाणार होता हो ना..

अन्विता : हो पण ही गोष्ट फक्त मला अन मोहितला माहिती होती... तुम्हाला कशी कळाली..

प्रदीप : एक्साक्टली... तूच सांग... आम्हाला कशी कळाली... कारण आम्हाला माहिती होतं की त्या दिवशी मोहित तुझी हत्या करणार आहे.. अन हे जर तुला सांगितलं तर तू माझ्यावर किंवा सूर्या वर विश्वास ठेवला असता का? नाही ना...

मग तूच सांग तुला वाचवण्यासाठी तुझं अपहरण करने योग्य नव्हते का?

अन्विता : हं..

प्रदीप : अन्विता!!तुला जर माझं म्हणणं पटलं असेल तर तू तुझ्या घरी जाऊ शकतेस किंवा तू फोन लाऊ शकतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या जीवाला मिस्टर ब्लॅक पासून अजूनही धोका आहे..

अन्विता : कोण आहे हा मिस्टर ब्लॅक... अन हे सगळं काय आहे?? सूर्या कुठे आहे तो का तोंड लपवून बसला आहे मग...

प्रदीप : अन्विता!!सूर्याच्या मागावर मिस्टर ब्लॅक चे लोकं आहेत कारण मिस्टर ब्लॅक ला संशय आहे की सूर्यानेच तुला लपवलं असेल म्हणून.....

अन्विताचं डोकं नुसतं फटफट करत होतं... तिला हे सगळं वाईट स्वप्न आहे असंच वाटत होतं... मोहित आपल्याला धोका देईल असं तिला अजूनही वाटत नव्हतं.. अन्विता नुसतीच तिच्या डोक्याला हात मारून बसली होती...अन्विताला असा काही त्रास झाला की ती तिच्या बाबा जवळ जाऊन मनसोक्त रडायची... आपोआपच तिचं मन मोकळं व्हायचं...त्या मुळे तिला आता तिच्या बाबांची आठवण यायला लागली

अन्विता: प्रदीप!!मला घरी जायचं आहे..

प्रदीप : अन्विता!! माझी हरकत नाही... पण तुझ्या मागावर खूप जण आहेत..परत एकदा सांगतो मिस्टर ब्लॅक पासून तुझ्या जीवाला धोका आहे...

अन्विता : आता जीव वाचून काय फायदा... ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानेच असा धोका दिला..

प्रदीप : अन्विता!! असं नकारात्मक का बोलतेस.. असं म्हणतात की ज्याला आपल्या प्रेमाची कदर नाही त्या पेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते त्या व्यक्तीची कदर केली पाहिजे... नाही का?

अन्विता : प्रदीप!!तुझा इशारा सूर्या कडे तर नाही ना..

प्रदीप : अन्विता!!समझदार को ईशारा काफी है..

प्रदीपचं ते वाक्य ऐकून अन्विता एकदम धुसफूस करू लागली.

तितक्यात प्रदीपने त्याच्या रूम ची दारे खिडक्या लावायला सुरुवात केली..वातावरणात एकदम बदल झाला प्रदीपच्या चेहऱ्यावर एकदम गांभीर्य दिसायला लागले..

अन्विता काही विचारणार तितक्यात खाणाखुणा करून प्रदीप ने अन्विताला शांत राहायला सांगितले.

प्रदीपच्या हालचालीने अन्विता गोंधळली पण नक्कीच शत्रू वगैरे आपल्या कडे येत असतील असा अंदाज तिला आला..

अरे हे काय... मिस्टर ब्लॅक चे लोकं... आत्ताच ईथे दिसत होते कुठे गायब झाले.. हळूच एका खिडकीच्या कोपऱ्यातून पाहून प्रदीप पुटपुटला...

अन्विता मात्र फक्त प्रदीप कडे बघत होती...

तितक्यात धाडकन प्रदीपच्या रूमचा दरवाजा तोडला गेला...

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या