दैव जाणीले कुणी (भाग 30)

प्रदीप अन्विताला घेऊन एका रूममध्ये लपण्यासाठी धावला तितक्यात तीन चार कमांडो वेशात, वयस्कर पण अतिशय ऊर्जा असलेले कमांडो एकदम या दोघांच्या समोर येऊन उभे टाकले. आणि त्यातील एका कमांडोने प्रदीपच्या डोक्याला बंदूक लाऊन त्याच्या हातात बेडया ठोकल्या..

अन्विता : हे तुम्ही काय करत आहात... तुम्ही सर्व जण बाबांच्या टिम मधले ना... बाबा कुठे आहेत..

अन्विता बेटा!! तुझ्या बाबांना तू ईथे असल्याचं कळवलं आहे ते येतीलच ईतक्यात...त्यातील एक कमांडो ऑफिसर अन्विताला म्हणाला..

अन्विता : पण बाहेर तर मिस्टर ब्लॅक ची माणसे होती ना.. मग आतमध्ये तुम्ही कसे?

मिस्टर ब्लॅक?? हा मिस्टर ब्लॅक कोण आहे? अन तू त्याच्या माणसांना कशी काय ओळखतेस? अरे हे काय धोक्याची सूचना... मी तर इथली चार माणसे माझ्या ताब्यात घेतली होती... असं म्हणत तो कमांडो अन्विताला म्हणाला: अन्विता!! ईथुन काही बाहेर निघण्याचा दुसरा मार्ग आहे काय...

अन्विता : काका!!या प्रदीप ला माहिती असेल..

कमांडो विचित्र नजरेने प्रदीप कडे पाहू लागला...

प्रदीप : सर!! या दुसऱ्या रूमला एक भुयारी मार्ग आहे.. पण तो तुम्हाला दाखवण्यासाठी माझे हात सोडावे लागतील.. आणि या भुयाराचा दुसरा दरवाजा बंद आहे. तो आधी उघडून ठेवावा लागेल.नाहीतर आपण गुदमरून जाऊ..

कमांडो : ए जास्त शहाणपणा करू नकोस.... तितक्यात कमांडो ला एक मेसेज आला... तो वाचुन कमांडो प्रदीप ला म्हणाला हे बघ माझ्या हातात शस्त्र आहे तू जर काही हुशारी केलीस तर मी आहे अन ही बंदूक आहे...

अन्विता : काका!! मी प्रदीप ला ओळखते... तुम्ही त्याचे हात मोकळे करू शकता..

कमांडो ने लागलीच प्रदीप चे हात मोकळे केले.

अन्विताचे इतक्या लवकर कमांडो ने ऐकले याचा क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही..

कमांडो : ए प्रदीप!!असा बघत काय बसला आहेस?? चल पटकन

 प्रदीप ने लागलीच दुसऱ्या रूमच्या एका कार्पेट सारख्या दिसणाऱ्या दरवाजावर काहीतरी गिरवले आणि मग भुयारी दरवाजा उघडला गेला..

भुयारी मार्गाने जवळ जवळ एक किलोमीटर चालल्यावर दुसऱ्या मार्गाने ते तिघेही बाहेर पडले..आणि बाकीचे कमांडो रूम मध्येच प्रतिकार करण्यासाठी थांबले..

प्रदीप : अन्विता!! माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद.. सर.. अन्विताच्या जीवाला धोका होता म्हणून आम्हाला ही असली पाऊले उचलावी लागली..

कमांडो : ठीक आहे तू म्हणतोस तर मी विश्वास ठेवतो.. पण मला हे सांग तू अन्विताला अश्या ठिकाणी का ठेवलं होतंस?? आणि हा भुयारी मार्ग वगैरे आजकालच्या काळात असले भुयारी मार्ग हे जरा संशयास्पद नाही का?

प्रदीप : नाही सर,तुम्ही अन्विताला विचारा मी कालच अन्विताला ईथे शिफ्ट केलं होतं... ते देखील मला अशी माहिती मिळाली होती की मिस्टर ब्लॅकच्या लोकांना आम्ही राहतोय त्या जागेचा पत्ता जवळ जवळ मिळाला आहे आणि भुयाराचं असं आहे की तो मार्ग माझ्या भावासाठी तयार करावा लागला.

कमांडो : भावासाठी??म्हणजे??

प्रदीप : त्याचं झालं काय की माझा भाऊ प्रकाश ड्रग्जच्या आहारी गेला आहे... ईतका की त्याने शेजारी पाजारी चोऱ्या करायला सुरुवात केल्या.. शेजारी लोकांनी एका मर्यादेपर्यंत त्याला सहन केलं पण तो सगळ्यांच्याच घरात चोऱ्या करायला लागला..

मग एके दिवशी सगळ्या शेजाऱ्यांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला..

ही रूम म्हणजे आमची घरापासून दोन किलोमीटर असणारी पडीक जागा होती..

सर्व शेजार्यांपासून वाचवून मी त्याला ईथे कैदेत ठेवलं.. पण आमचे शेजारी ईतके खवळलेले होते की ते माझ्या मागे येत होते..

ते सर्व मिळून त्याचा जीव घेतील अशी भीती देखील मला वाटत होती.

सुरुवातीला कसं बसं मी स्वतः लपून त्याच्या पर्यंत पोहचलो. पण दिवस रात्र ते शक्य होईना.. मग खूप विचार करून मी माझ्या काही खास मित्रांच्या मदतीने हा भुयारी मार्ग खोदला... ओह नो.. माझ्या आत्ता लक्षात आलं हे भुयार  खोदतांना मला मिस्टर ब्लॅक च्या माणसांनी मदत केली होती..

आपल्याला लवकरच ईथुन सटकावे लागेल...

कमांडो : डोन्ट वरी,आम्ही मिस्टर ब्लॅक च्या लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे.. आता आपल्याला जो धोका आहे तो डागाच्या माणसांकडून.

प्रदीप : डागा... कोण डागा..

कमांडो :तुला खरंच डागा माहिती नाही की तू माहित नसल्याचं नाटक करतो?

प्रदीप : नाही मला खरंच माहिती नाही.. पण मी मिस्टर ब्लॅक च्या तोंडून पुसटसं नाव ऐकलं आहे..

कमांडो :अच्छा म्हणजे तू मिस्टर ब्लॅक च्या गोटातला आहे तर मग..

बोलत बोलतच ते तिघेही एका जीप जवळ जाऊन उभे राहीले... जीपवाल्यानी पासवर्ड विचारला.. प्रदीप काहीतरी ड्राइव्हरच्या कानात पुटपुटला..

जीप चं दार उघडलं गेलं.. अन्विता ने पाह्यलं ड्राइव्हर दुसरं तिसरं कुणी नव्हतं सूर्या होता...

अन्विता :सूर्या! तू??

सूर्या : हो... मला प्रदीप ने मेसेज केला होता...चला बसा लवकर... आताच प्रदीपच्या रूमवर बॉम्ब सारखं काहीतरी टाकलं आहे.. बरं झालं तुम्ही वेळेतच बाहेर पडला..

कमांडोने फोन करून आपले साथीदार सुरक्षित आहेत का याची खात्री करून घेतली आणि मग तो प्रदीप ला म्हणाला... डागा ची माणसे असं काहीतरी पाऊल उचलतील याचा मला अंदाज आला होता.. म्हणूनच मी दुसरा मार्ग विचारला.. आपलं नशीब चांगलं म्हणून भुयारी मार्ग मिळाला...

सूर्याने थेट जीप अन्विताच्या घरी नेली ..

ईकडे डागा च्या माणसांना वाटले की बॉम्ब च्या हल्ल्या मध्ये अन्विता व कमांडो यांचा खात्मा झाला आहे.. म्हणून ते परत डागा कडे निघून गेले...

आतापर्यंत सूर्या आणि प्रदिपच अन्विताच्या अपहरणात सामील होते ह्याची खात्री मिस्टर ब्लॅकला झाली होती. पण त्याचे चार गुंड देखील कमांडोच्या हाती लागल्यामुळे तो फार अस्वस्थ झाला होता..

त्याला सूर्या आणि प्रदीपचा राग तर येतच होता पण आत्ता त्याला त्याची माणसे सोडवणं जास्त महत्वाचे असल्यामुळे इच्छा नसतानाही त्याला सूर्या आणि प्रदीप कडे दुर्लक्ष करावं लागलं होतं.

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या