मुख्य कमांडो ने आधीच फोन करून कळवल्यामुळे अन्विता चे आई आणि बाबा दरवाजातच तिची वाट पाहत उभे होते.
अन्विताची आई तर अन्वितासाठी ओवाळणीचे ताट घेऊन उभी होती. लेकराला भूक लागली असेल म्हणून तिच्या आवडीच्या पदार्थांचा बेत देखील त्यांनी तयार केला होता.
जीप मध्ये कमांडो, सूर्या, प्रदीप अन्विता सगळेच शांत होते पण प्रत्येकाच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले होते.
अन्विताला आणि कमांडोला हजारो प्रश्न पडले होते. आपण मोहितला ओळखण्यात चुकलो की सूर्याचा काही डाव आहे असं देखील तिला वाटून गेलं होतं.
मोहित वर तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्या मुळे तो अपराधी नसावा त्याला अडकवलेले असू शकते असं तिला वाटत होतं..
विचारांच्या तंद्रित असतानाच अन्विता घरी पोहोचली.. अन्विता आणि कमांडो हे घरामध्ये गेले तर प्रदीप आणि सूर्या बाहेरच थांबले. अन्विताचं स्वागत झाल्यावर अन्विताचे बाबा सूर्या जवळ गेले.. सूर्याच्या कानाखाली ते लगावणार इतक्यात कमांडो ने त्यांचा हात पकडला...
कमांडो : मीस्टर दिवाकर !! मी तुमचा राग समजू शकतो.. पण अन्विता आज जिवंत या दोघांमुळेच आहे. नाहीतर ती आणि तुम्ही त्या मोहितच्या म्हणजेच मिस्टर ब्लॅक च्या तावडीत पूर्णतः अडकलेले होते..
असं म्हणून कमांडो ने अन्विताच्या बाबांना मोहित, मिस्टर ब्लॅक आणि नुकताच हल्ला केलेले डागाचे लोकं यांच्या बद्दल सर्व काही सांगितलं...
अन्विताचे बाबा(दिवाकर ): काय? याच्या मागे मिस्टर ब्लॅक आहे? मिस्टर ब्लॅक म्हणजे रामचरण का? हो हो हो आठवलं रामचरणच तोच मिस्टर ब्लॅक म्हणून प्रसिद्ध झाला होता ..
अरे देवा... रामचरण काय करणार होतास तू.. स्वतःच्याच मुलीला मारून टाकणार होतास...अन्विताचे बाबा मनात विचार करायला लागले....
किती शोधलं होतं तुला मी... पण काय करणार तू दुरावला गेला होतास निव्वळ एक
गैरसमज झाल्यामुळे...
रामचरण तुझी सुप्रिया तुझीच होती रे....अगदी शेवटपर्यंत... पण नशिबासमोर ती देखील हतबल झाली होती..... विचार करून अन्विताच्या बाबांचे डोळे पाणावले... चला या निमित्ताने का होईना राम lचरण आणि मी परत एकदा समोरासमोर येणार आहोत...
अन्विताचे बाबा : सूर्या!!प्रदीप!! मला भेटायचं आहे तुमच्या त्या मिस्टर ब्लॅक ला...
तितक्यात कमांडोच्या फोन ची रिंग वाजली... काय?? थांबा त्याला आत जाऊ देऊ नका... ही इज क्रिमिनल...काय सिक्युरिटी गार्ड ने त्याला जाऊ दिले.. तुम्ही काय करता हो... तुम्हाला कळत नाही का अश्यावेळेस लागलीच ऍक्शन मोड वर जायचं ते...
कमांडोच्या त्या बोलण्याने सर्वांचे कान टवकारले गेले..
कमांडो जोर जोऱ्यात ऑर्डर देतच होते... तितक्यात त्यांनी कुणीतरी पकडला गेल्याने सुस्कारा सोडला...
कमांडो: मिस्टर दिवाकर!!(अन्विताचे बाबा )तुम्ही इमोशनली इतके वीक कसेकाय निघालात?
दिवाकर : म्हणजे? मला नाही कळालं...
कमांडो : तुम्ही त्या मोहितला तुमची लॅब दाखवायला नको होती...
दिवाकर : का काय झालं? त्याने माझ्या लॅब ला काही केलं की काय? आणि आपल्या सिक्युरिटी सिस्टिम मधून सगळे जुने रेकॉर्ड स्क्रीन होतात ना... म्हणून मोहितच्या बाबतीत मी बिनधास्त होतो..
कमांडो : पण तो सिक्युरिटी फितूर झाला होता... मिस्टर दिवाकर!! त्या मोहितवर आधीच 302 कलम लागलेला आहे..
मोहितबद्दल बोलत असल्यामुळे साहजिकच अन्विता देखील त्यांचं बोलणं ऐकत होती..ओ.... म्हणजे माझं अपहरण खरंच माझा जीव वाचवण्यासाठी केलं गेलं होतं... सूर्या गुन्हेगार नसावा म्हणजे... पण काय करू अजूनही वाटतंय की मोहित गुन्हेगार नसून त्या मागे रचलेलं षडयंत्र असावं..
कमांडो : आता मोहित तुमच्या लॅबला चालला होता... मी आपला एक psi लॅब वर आधीच तैनात ठेवलाच होता... त्याच्याकडून ही बातमी मला कळाली... आता मोहितला आपण ताब्यात घेतलं आहे..
बापरे अनावधानाने मी हे काय केलं?? चोराच्या हातातच लॅबची बऱ्यापैकी माहिती दिली.. ते तरी बरं की कुठला शोध किंवा काही काम असेल ते माझ्यापासूनदेखील गोपनीय ठेवले जाते ते... नाहीतर भावनांच्या ओघात मी देखील सर्व काही सांगून मोकळा झालो असतो...आणि त्या सिक्युरिटी गार्डचं काय केलं?अन्विताच्या (दिवाकर ) बाबांनी कमांडोला विचारलं
कमांडो : त्याला ताब्यात घेतलं... नौकरीवरून काढून टाकतो म्हणालो तर गयावया करू लागला... त्याचं मागचं रेकॉर्ड बघता एक चान्स द्यावा लागेल... पण शिक्षा तर मिळालीच पाहिजे...म्हणून त्याला नक्षलवादी एरियात पाठवलाय...
बरं अजून एक...अन्विताच्या किंवा आपल्या जीवाला असणारा धोका अजून संपलेला नाहीये... त्या मुळे अन्विता आणि तिच्या आईला दिवाकर तुमच्या सोबत गोपनीय जागी न्यावे लागणार आहे... तरच आपण आपलं काम पूर्ण करू शकू...
दिवाकर : काय? आपल्या नियमाविरुद्ध??
कमांडो : नाही.... नियमांना फाटा बसेल असं काही घडणार नाही... मिस्टर दिवाकर!!मला आनंद वाटला की तुम्ही तुमच्या मुली आणि बायकोच्या आधी नियमांचा विचार केला...
दिवाकर : पण धोका?? कसला धोका??
कमांडो : डागा... डागाला जर कळालं की आम्हाला काहीच झालं नाही तर तो परत प्रयत्न करणारच ना...
सूर्या : सर मी काही बोलू का?
सूर्याचा आवाज ऐकल्यावर सर्वांचं लक्ष सूर्या कडे गेलं...
कमांडो : बोल काय म्हणतोस...
सूर्या : सर या सर्व हालचालीत माझी काही मदत लागली तर मी तयार आहे...
प्रदीप : मी सुद्धा
बेला,झुक्या, गायत्री : सर आम्ही सुद्धा...
कमांडो : गुड... व्हेरी गुड... अन्विता!! तुझे सगळे फ्रेंड्स खरंच खूप चांगले आहेत... Very good मैत्री असावी तर अशी...
कमांडो : ऐका मी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे...
पण तो आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचा आहे...
कारण आपले शत्रू हे तीन प्रकारचे आहेत...
पहिला शत्रू आहे मोहित... हा फक्त सुपारी घेऊन काम करतो... आणि सध्या तो आपल्या ताब्यात आहे..
दुसरा शत्रू म्हणजे मिस्टर ब्लॅक याला तावडीत घेण्यासाठी सूर्या आणि प्रदीप तुम्हा दोघांची मदत मला लागेल...
आणि तिसरा शत्रू आहे डागा हा अतिरेकी असल्यामुळे तुम्हा सर्वांचीच मदत मला लागेल...
झुक्या!! तू... तुझी आम्हाला आधी खूप मदत झाली... आता मात्र प्रत्येक क्षणाला तुझी मदत लागणार आहे... त्या मुळे तू आता अन्विताच्या बाबांसारखं आमच्या सोबत गोपनीय ठिकाणी असणार आहेस... तुला आजच तुझे कपडे वगैरे काय आहे ते सगळं घेऊन सोबत यावं लागेल...
(कमांडो जेव्हा झुक्याला हे सर्व सांगत होता तेव्हा गायत्रीचा उर अभिमानाने भरून येत होता...नकळत तिच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकत होते..)
बाकी सर्वाना... जसजशी प्रत्येकाची गरज पडेल तसतसे कळवण्यात येईल... तुम्ही प्रत्येक जण आपला नंबर या कॉन्स्टेबल कडे देऊन ठेवा आणि तो फोन दिवसरात्र चालू ठेवा.... अननोन नंबरचे फोन उचला...
ते ऐकून गायत्री जरा परेशान झाली... असा जर रात्री बे रात्री फोन आला तर आपल्या घरचे काय म्हणतील?
पण गायत्रीची चलबिचल कमांडोने ताबडतोब ओळखली...
कमांडो : ए मुली!!गायत्री ना तू...काळजी करू नकोस तुझ्यासाठी मी या बेला कडे निरोप देईल मग तर झालं...
कमांडोचे ते वाक्य ऐकताच गायत्रीचा चेहरा खुलला...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®भाग
0 टिप्पण्या