दैव जाणीले कुणी (भाग 33)

दिवाकर : जानकी आणि मी जीव मुठीत घेऊन पळत होतो.. अचानक जानकीला सुप्रिया आठवली...

 सुप्रियाकडे जाऊन नवरीच्या लोकांकडून आलो असं भासवून आम्ही तात्पुरतं तुमच्या लग्नाच्या गर्दीत घुसणार होतो...
 त्याची दोन कारणे होती...
एक तर पळून पळून आम्ही खूप दमलो होतो.. आणि आम्ही दोन दिवसापासून काही जेवलो देखील नव्हतो...
अगदी ठरल्याप्रमाणे आम्ही सुप्रियाकडे गेलो...

 सुप्रियाला जानकीने सर्व काही सांगितल्यावर तिने आम्हाला जेवू घातले आणि आता आम्ही तिघेही लग्नमांडपात येण्यासाठी तयार झालो..बाकी सर्व मंडळी लग्नमंडपात पोहोचली होती... आणि आम्ही दोघेच सुप्रियासोबत राहिलो होतो 

पण निघता निघता अचानक सुप्रियाला घेरी आली आणि ती तिथेच खाली बेशुद्ध पडली...
 सोबत डोक्याला एक खोच देखील पडली...
 तिच्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते... आम्ही ताबडतोब तिच्या डोक्याला कपडा बांधला
 पण सुप्रिया काही शुद्धीवर आली नाही...

बरं घरातली सगळी मंडळी लग्नमंडपाकडे निघालेली होती... म्हणून घरात कुणालाच माहिती नव्हते.. आम्ही लागलीच सुप्रियाला हॉस्पिटलला नेलं...

जवळच्या हॉस्पिटल मध्ये तिला नेत असताना परत आमच्या मागे असणारी मंडळी आम्हाला हॉस्पिटल जवळ दिसली म्हणून आम्हाला दूर पळावं लागलं...

 बरं तुला मी कॉल करतोय तर तू काही फोन उचलायचं नावच घेईना...

मिस्टर ब्लॅक : हं बरोबर... माझा फोन माझ्या लांडग्यानी घेतला होता..आणि वरतीपुढे नाचताना हरवून टाकला 😞

दिवाकर : अन नंतर जानकीचे वडील आम्हाला ट्रेस करतील म्हणून आमचा फोन आम्ही स्विच ऑफ केला होता..

 तर पुढे ऐक...
आम्ही सुप्रियाला ऍडमिट केलं...

कदाचित.... डोक्याच्या जखमेतून रक्तस्त्राव खूप झाला होता म्हणून तिला शुद्धीवर यायला वेळ लागला असावा पण तिला घेरी येण्याचं कारण म्हणजे सुप्रिया गरोदर होती आणि हे आम्हाला तिथे हॉस्पिटल मध्ये कळालं...

या सगळ्या घटनांमध्ये लग्नघटिका निघून गेली.. शुद्धीवर आल्यावर सुप्रियाने तुला आणि तिच्या आई वडिलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला...

 तुझा तर फोन लागला नाहीच पण सुप्रियाच्या आईवडिलांनी देखील काही ऐकून न घेता आमच्यासाठी तू मेलीस आता इथून पुढे फोन देखील करायचा नाहीस असे सुनावले...

खरं तर सुप्रिया देखील खूप भांबावली होती...

 कारण जरी ती तुझ्यामुळे गरोदर असली तरी लग्नाआधी गरोदर राहिली हे तिच्या आईवडिलांना सांगूच शकणार नव्हती....

 नंतर ती कशी बशी या शहरात आलेली तुला भेटायला तुला सर्व कहाणी सांगायला पण तू कुठे गायब झाला होता काय माहिती...

इतकं सगळं छान चाललेलं अगदी काही क्षणातच बदललं होतं... पण याला कोण जबाबदार होतं??तूच सांग आता...

मिस्टर ब्लॅक : काय?? इतकं सगळं घडून गेलं अन मी... सुप्रिया कुठे आहे... मला तिला भेटायचं आहे मला तिची माफी मागायची आहे..

दिवाकर : रामचरण!! तू खूप उशीर केला आहेस? सुप्रिया आता या विश्वात नाहीये...

 ती कधीच या जगातून निघून गेलीये...

तुझ्या अन्विताला आमच्याकडे सोपवून...

मिस्टर ब्लॅक : काय... काय बोलतोस तू हे... असं कसं...

दिवाकर : गरोदरपणातच तिला ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाला होता...

डॉक्टरांनी वेळेच्या आधीच डिलिव्हरी करून घ्यायला सांगितली होती.त्यात मात्र तिने बाळ गमावलं असतं...

मग काय सुप्रिया ती सुप्रिया ना

तिने हे बाळ तुझं असल्यामुळे सुप्रियाने बाळाला पोटात पूर्ण वाढवण्याचा निर्णय घेतला..

नंतर महिन्याभराने डिलेव्हरी झाली अगदी नॉर्मल पण अन्विता एकदम नाजूक...

वजनही दोन किलो भरले..

 पण डिलेव्हरी झाल्या झाल्या सुप्रियाला BP चा झटका आला...

त्यात ती इतकी सिरीयस झाली की परत वरती आलीच नाही..

पण जाता जाता अन्विताची जबाबदारी आमच्यावर सोपवून गेली...

जाताना फक्त म्हणाली माझ्या मुलीला वाचवा तिची नीट काळजी घ्या...

जर रामचरणची तुमची कधी भेट झाली तर त्याला सांगा की मी तुझ्यावरचं प्रेम अगदी माझ्या शेवटपर्यंत निभावलं...

सॉरी बेटा मी तुझा सांभाळ करू शकत नाही असे म्हणून तिने प्राण सोडले...

मिस्टर ब्लॅक हे सर्व ऐकत होता... ऐकता ऐकता तो बधिर झाला होता..
आपल्या हातून काय निसटून गेलं ते देखील आपल्या काही अति घाईच्या निर्णयामुळे हे त्याने जाणले होते....
 ते ऐकून तो जागीच मटकन खाली बसला....

दिवाकर!!हे काय घडून गेलं रे.. साधा सरळ होतो मी...

पण एक क्षण अन माझी मती भ्रष्ट झाली...
सैरभैर झालो...

लग्नाच्या वेळी आपण फोन सांभाळायला दिला होता?त्या वेळेस आपल्याला इतके सारे फोन कॉल्स आलेले का माहिती नाही? माझाच फोन कसाकाय हरवला?त्या वेळेस माझं तर कुणाशी शत्रूत्व नव्हतं मग कुणी काही षडयंत्र रचलं होतं का? की माझं नशीबच मला दगा देत होतं?

मिस्टर ब्लॅकच्या डोक्यात विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं...

जवळ जवळ वीस एकवीस वर्षांपूर्वीची गोष्ट... मला तर सोबत लांडगे कोण होते ते देखील आठवत नाही...

देवा मी तर साधा सरळ होतो ना.. माझं मन तेव्हा साफ होतं तरी माझ्यासोबत हे असं का? कुणी माझ्याविरुद्ध षडयंत्र तर रचले नव्हते ना... पण रचले असेल तर का रचले असेल??

रामचरण, ए रामचरण!!दिवाकरच्या आवाजाने मिस्टर ब्लॅक भानावर आला...

दिवाकर : हे बघ रामचरण!!जे घडून गेले ते तर आपण बदलू शकत नाही.. पण डागा ने आपल्या शहरात जे ड्रग्ज चं जाळं पसरवलं आहे.. त्याचे अवैध धंदे सुरु आहेत आणि तो ज्या प्रकारे अतिरेकी कार्यवाह्या करत आहे त्या आपण तुझ्या मदतीने थांबवू शकतो...त्याला माझ्या संशोधनाचे फॉर्मुले हवे आहेत ते फॉर्मुले घेण्यासाठी तो जे काही करत आहे त्याचा परिणाम आपल्या कुटुंबाला भोगायला लागत आहे... त्याला पकडल्यावर हे टेन्शन दूर होईल...

रामचरण स्तब्ध होऊन दिवाकर चे बोलणे ऐकत होता... आपले कुटुंब... स्वतःवरच तो kutsit हसला..

दिवाकरच्या ते लागलीच लक्षात आलं... रामचरण!!अरे अन्विता बद्दल म्हणतोय मी... ती तर तुझीच मुलगी आहे ना...

ते ऐकून रामचरण दिवाकर कडे आश्चर्याने बघू लागला... आणि दिवाकरला म्हणाला...
 दिवाकर!!कुठल्या तोंडाने मी अन्विताच्या समोर जाऊ सांग ना...
एक तर मी सुप्रियाची साथ अर्ध्यावर सोडली... प्रेम होतं ना माझं तिच्यावर? मग मी तिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता... अन अन्विता? तिची तर मी सुपारी दिली होती... ती मला माफ करेल?? तू सांग ना?

दिवाकर :अरे रामचरण!!ती तुला समजून घेईल..काळजी करू नकोस... पण तुला त्या साठी सरंडर व्हावं लागेल... वाटलं तर तू वेळ घे... विचार कर पण माझा सल्ला आहे की हे सगळ्यासाठीच चांगलं आहे... तसंही तू डागाच्या तावडीत आहेस याचा अंदाज आम्हाला सगळ्यांनाच आला आहे..

रामचरण :दिवाकर!!विचार काय करायचा? मी तयार आहे सरंडर व्हायला... तू बोलवून घे कुणाला बोलावून घ्यायचं आहे ते...

दिवाकर :रामचरण!! आपल्याला माझ्या घरी जावं लागेल?

रामचरण :तुझ्या घरी?? आपण तर तुझ्या घरीच आहोत ना...

दिवाकर : घरी म्हणजे सरकारी घरी जिथे मी माझे सिक्रेट काम करतो तिथे... अर्थातच तुला तिथे आत प्रवेश नाही... पण तिथे बाहेरच आमच्या टीमचे काही कमांडो आहेत... तिथे तुला थांबावं लागेल...ते तुला ताब्यात घेतील...अन तिथूनच आपलं मिशन डागा सुरू होईल... तसंही काही कमांडो डागाच्या मागावर आहेतच... त्यांनी जर डागा किंवा त्याच्या माणसांना पकडलं तर आपल्यासाठी अजून चांगलं होईल...

रामचरण : बरं बाबा!!ने तू कुठे न्यायचे आहे ते... तत्पूर्वी मला एकदा माझ्या लेकीला भेटायचं होतं...

दिवाकर : हे बघ रामचरण!!सध्या अन्विता!!अन जानकी यांना मी गुपित ठिकाणी ठेवलं आहे... कारण डागा माझी गुपिते मिळवण्यासाठी काहीही करू शकतो हे मी जाणलं आहे...

तितक्यात दिवाकरचा फोन वाजला... फोन उचलताच दिवाकरचा चेहरा पांढरा फटक पडला... त्याला कळालं कसं काय? असं कसं तो देव ला ताब्यात घेऊ शकतो.. अरे ट्रेनिंग दरम्यान सिक्युरिटी होती ना... मग....

रामचरण : काय झालं दिवाकर? अन हा देव कोण?

दिवाकर : देव!!माझा मुलगा आहे... तो दोन वर्षांपासून ट्रेनिंग घेत आहे.. अगदी माझ्या पावलावर पाऊल टाकत आहे... माझ्या वेळेस हे ट्रेनिंग सहा महिन्याचं होतं पण आता दोन वर्षांचं केलं आहे.. या आजकालच्या मुलांना माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवला जातो त्या मुळे नुसतं chemical reaction च नाही तर ते technical कामातही माहीर होतात...

रामचरण : मग त्याला कुणी उचलला...

दिवाकर : डागाच्या माणसांनी... 😄😄😄पण त्यांना वाटत असेल की डागा जिंकला... पण हा देखील माझाच प्लॅन आहे...

रामचरण : पण मग बातमी ऐकताच तुझा चेहरा पांढरा फटक का पडला....

दिवाकर : हं.. रामचरण हुशार आहेस रे... बारीक observation... ते काय आहे ना देव पकडला गेल्यावर मला आधी कळणार होतं... माझ्या जवळ असणाऱ्या सेन्सर मुळे... पण सेकंदाचा फरक झाला आणि डागाच्या लोकांनी मला आधी फोन केला...

रामचरण : पण तुझा मुलगा देव स्वतःहुन का...

दिवाकर :रामचरण!!मला या पुढे काहीही माहिती सांगण्याची परवानगी नाही 

हे सर्व बोलत बोलतच दिवाकर अन रामचरण दिवाकरच्या ऑफिसच्या ठिकाणी पोहोचले...


क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©® स्वानुभवसप्तरंग

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या