दैव जाणीले कुणी (भाग 34)

ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या दिवाकर रामचरणला म्हणाला... रामचरण!!ही बघ तुझी प्रॉपर्टी?

रामचरण : माझी प्रॉपर्टी?? माझ्याकडे कुठलीच प्रॉपर्टी नव्हती...

 पण हो,तुला उध्वस्त करण्यासाठी मी ह्या प्रॉपर्टीच्या मागे लागणार होतो... पण आता नाही... नकोय मला काही... जे होतं तेच गमावून बसलो मी... एका माझ्या मूर्खपणा मुळे... का...मी... का शहानिशा नाही केला की माझी सुप्रिया माझीच होती म्हणून...

खरं सांगू दिवाकर!!आता मला जगावंसंच वाटत नाहीये...

जिथून माझ्या या गुन्हेगारी विश्वाची सुरुवात झाली तो निव्वळ एक गैरसमज होता...

अन मी आता हे काय करून बसलो आहे...

दिवाकर : काय बोलू... पण रामचरण खरंच तू असा नव्हतास.. सहजा सहजी आपलं माणूस सोडून तू दुसऱ्या कुठल्या व्यक्ती वर विश्वास देखील ठेवत नव्हतास मग... तुला एकदाही सुप्रिया किंवा माझ्यावर विश्वास ठेवावा वाटला नाही... बरं आमचं जाऊदे तू जानकी बद्दल देखील काही माहिती काढली नाहीस का?

रामचरण : दिवाकर!!कुठल्या तोंडाने सांगू मी अरे माझी मती भ्रष्ट झाली होती...

तू बघ ना दिवाकर!! अरे चक्क लग्नमंडपात लग्नघडीला सुप्रिया हजर झाली नाही...

 त्यात कुणीतरी सांगितलं की सुप्रिया घरी पण नाही आणि पूर्ण रस्ता पाहिला तर कुठेही नाही..

बरं त्या वेळेस माझा फोन खराब झाला म्हणून मी माझ्या चुलत भावाच्या मोबाईल वरून फोन लावले... तर हिचा फोन बंद...

त्यात तिथे कुणीतरी ओरडलं की सुप्रियाला शेवटचं तुझ्यासोबत पाहिलं गेलं...

म्हणून मी तुझा फोन लावतो तर तोही स्विच ऑफ... जानकीचाही फोन लागला नाही..
मग मात्र माझा संयम सुटला... डोक्यात चित्रविचित्र विचार यायला लागले...

माझ्या भावांनी तर सुप्रियाच्या आईवडिलांना चांगलंच धारेवर धरले...
पण त्यांनाही काही माहिती नसल्याने चांगलेच भांबवून गेले...

माझ्या काही नातेवाईकांनी त्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली आता माझ्या नातेवाईकांचा चांगला जमाव जमू लागला होता...

पुढचा धोका लक्षात आल्यामुळे मी सुप्रियाच्या आईवडिलांना तिथून घरी जाण्याची विनंती केली...

त्यांना कसंबसं या घोळक्यातून सोडवून गाडीत बसवून दिले..

.आता कळतंय.. निदान मी तेवढं तरी एक बरं काम केलं...

 जाता जाता सुप्रियाचे वडील मला म्हणाले सुप्रिया माझ्यासाठी मेली...


दिवाकर :हं.. एकंदर अशी परिस्थिती होती तर...

कमांडो आले आहेत... जयहिंद सर!! बोला काय अपडेट्स आहेत..

कमांडो : डागा जास्तच हुशार निघाला... त्याने स्वतः ऐवजी त्याच्या दोन माणसांना पाठवलं होतं ... मग आम्ही त्यांना पकडलं...

पण मुंबई मध्ये देव किडनॅप झाला आहे ही एक चांगली गुड news आहे...थँक्स दिवाकर!! तुझ्या मुळे आता डागाच्या संपूर्ण संघटनेचा खातमा होणार...

अन मिस्टर ब्लॅक!! तुम्ही आम्हाला शंभर टक्के साहाय्य करा मी वचन देतो की मी तुमची शिक्षा कमीतकमी करण्याचा प्रयत्न करतो...

हो सर!! माझ्या शिक्षेचं काहीही होवो..पण आता मी तुम्हाला जमेल तशी मदत करणार... कदाचित या मुळे का होईना माझ्या सुप्रियाच्या आत्म्यास शांती मिळेल...डोळ्यातले अश्रू लपवत मिस्टर ब्लॅक कमांडोला म्हणाला...

दिवाकर : बरं कमांडो!!आता पुढचे काय प्लॅन आहेत?

कमांडो : हो आता आपल्याला टीम पाडाव्या लागतील...एकंदर आपल्याला सगळ्यांचीच मदत लागणार आहे...

दिवाकर :सगळ्यांची म्हणजे?

कमांडो : अन्विता, तिची आई जानकी, बेला, मोहित उर्फ झुक्या, गायत्री, सूर्या, प्रदीप, प्रकाश सुद्धा आणि मग आपली टीम आणि मिस्टर ब्लॅक... त्या मोहितचं काय करायचं ते पण बघावं लागेल... आणि देव... ज्याने ऑलरेडी आपल्या प्लॅन मध्ये उडी घेतली आहे. दिवाकर!!तुझा पोरगा डॅशिंग आहे रे.. जरा देखील घाबरत नाही.. मला खात्री आहे की तो हे काम चोख पणे पार पाडेल...

दिवाकर : हो नक्की... कारण त्याच्याजवळ मी ते घड्याळ दिलं आहे जे घातल्यावर समोरचा माणूस कसा आहे ते ओळखू येतं... त्याचाच वापर करून तो डागा ची टीम फोडणार आहे..

मिस्टर ब्लॅक : कमांडो!!मी काही विचारू का?

कमांडो : काय?

मिस्टर ब्लॅक : आपल्या सगळ्यांची मदत घ्यायची हे समजू शकतो.. पण अन्विता, जानकी आणि अन्विताचे मित्रमैत्रिणी यांची इन्व्हॉल्व्हमेंट हे मात्र मला नाही समजले...

कमांडो : मिस्टर ब्लॅक!!डागा ही जरी एक व्यक्ती असली तरी त्याचीच डागा नावाची अतिरेकी संघटना आहे.. आणि ही संघटना आपल्या शहरातील काना कोपऱ्यात पोहोचली आहे...

म्हणजे जर आपण फक्त डागाला पकडलं तर दुसरा डागा तयारच आहे..
फक्त त्याचं नाव बदललेलं असेल... आणि ही संघटना अगदी छोटयापासून ते मोठया वाईट गोष्टी देखील करते..

जसं की छोटे, मोठे जुगार, मोबाईल वर गेम चं व्यसन... ते गेम पैश्यांनी खेळवायचे, ड्रॅग्ज, अफू, चरस, गांजा अश्या अमली पदार्थांची तस्करी करणं, वन्य प्राण्यांना पकडणं त्यांची तस्करी करणं, लहान मुलामुलींना विकणे... अजून बरंच काही..

तर इतकं सगळं आपल्या पोलीस यंत्रणा, डिटेक्टिव्ह यंत्रणा करू शकत नाही
कारण यांच्या गुन्ह्याचा रॅशो हा 1:100 आहे म्हणजे एका पोलीस कर्मचाऱ्याने एका वेळी 100 केसेस हॅन्डल करण्यासारखं जे की शक्य नाही कारण संपूर्ण 24/7 जरी पोलिसांनी काम केले तर ते एका वेळी 1:12 पर्यंत गुन्हेगार पकडू शकतील हं डिजिटल गोष्टीमुळे हे प्रमाण वाढेलही पण संपूर्ण कव्हर नाही होऊ शकणार...

दिवाकर : हे सगळं खरं आहे... पण आपण या मुलांना यात गोवणं मला योग्य वाटत नाही...

कमांडो : योग्य तर मलाही वाटत नाही... पण खरं सांगू का दिवाकर कॉलेज च्या तरुणवर्गात ह्यातील बरेचसे गुन्हे घडत आहेत... कॉलेजच्या मुलींना पळवून नेण्याचं प्रमाण देखील याच गँगमुळे वाढलं आहे.. यांचे गुन्हे सांगत बसलो तर आजचा पूर्ण दिवस नाही पुरणार... आपल्या जवळ वेळ खूप कमी आहे... दिवाकर!!देव ची काही update??

दिवाकर : हो... देव त्यांच्या तावडीत आहे माझं सेन्सर मला सगळी माहिती बरोबर अर्धा मिनिट उशिरा देत आहे... म्हणून जरा काळजी वाटत आहे..

कमांडो : पण देव ला याची कल्पना नसेल... त्याच्याकडून हे घड्याळ आणि मोबाईल काढून घेतले जाण्याची शक्यता आहे...

दिवाकर : हो... ह्याची मला कल्पना आहे.हे घड्याळ डिझाईन करताना मी पुरेपूर काळजी घेतली आहे.. ते हातावर घातले की दिसत नाही...

कमांडो : म्हणजे...मिस्टर इंडिया का?

दिवाकर : हा हा हा... अजून इतका मोठा मिस्टर इंडिया सारखा शोध मी लावू शकलो नाही... घड्याळ हातावर घातले की घड्याळ दिसत नाही...म्हणून ते सुरक्षित आहे... आणि त्यातच मोबाईल पण आहे अगदी आपल्या स्मार्ट वॉच सारखं... त्या लोकांसाठी एक साधा मोबाईल त्याने जवळ ठेवला होता... तो आतापर्यंत फोडून टाकला असेल...

कमांडो : बापरे दिवाकर प्लॅन एकदम फुलप्रूफ की...

दिवाकर : हो मग.... कितीही केलं तर देव ला डागाच्या तावडीत द्यायचं होतं ना...ते घड्याळ धोक्याची घंटा देखील कळवतं आणि इतकंच काय जर ते देव च्या हातात असेल तर मला हे ग्रीन सिग्नल मिळेल आणि दुसऱ्या कुणाच्या हातात गेलं की रेड सिग्नल...

कमांडोने दिवाकर चे ते वाक्य ऐकताच टाळ्या वाजवायला सुरुवात केली...दिवाकर!!खरंच हॅट्स ऑफ टू यु.. कुठे chemistry चा विद्यार्थी आणि कुठे हा शोध...

दिवाकर : हे सगळं आम्हाला स्पेशल ट्रेनिंग मध्ये शिकवलं... आय मीन टेकनॉलॉजि वगैरे...सगळ्यांचं कॉम्बिनेशन.....

कमांडो : ग्रेट....👍

दिवाकर : थँक्स

कमांडो : बरं दिवाकर ऐक ना... माझी सगळ्यांसोबत मिटिंग फिक्स कर अगदीच तासाभरात सगळे जमू शकतील का बघ.. अन्विता, जानकी अन्विताचे मित्र, सूर्या, प्रदीप,.. मिस्टर ब्लॅक तू आणि दिवाकर...

दिवाकर : हो लागलीच सगळ्यांना कळवतो...

दिवाकर ने सूर्या आणि अन्विताला फोन लावला..सगळेच जण तासाभरात जमा झाले...

कमांडो ने वेळ न दवडता मिटिंग ला सुरुवात केली... मित्रांनो!!आता सगळे जण आपापल्या घरी निवांत जाऊ शकता... इथे गुंडांपासून आता तुमचा धोका कमी झाला आहे... म्हणजे तुम्ही गाफिल राहायचं आहे...

सूर्या : सर!!तुम्ही काय बोलता आहात हे आम्हाला कळत नाहीये सगळंच डोक्यावरून चाललं आहे...

कमांडो :सांगतो सांगतो.. आता तुमचं काम हे तुमच्या कम्युनिटी मध्ये असेल, कॉलेज मध्ये असेल... आजूबाजूला असेल.... तुम्हाला फक्त गाफिल राहिल्यासारखं दाखवायचं आहे मात्र हुशारीने राहायचं आहे... आजूबाजूच्या हालचालीवर बारीक निरीक्षण ठेवायचं आहे... झुक्या तू मात्र तुझ्या घरच्यांची परवानगी घेऊन येशील... तू आम्हाला 24/7 लागणार आहे...
अन गायत्री मला तुझ्या नवऱ्याची पर्सनल डायरी हवी आहे...

कमांडोचे ते वाक्य ऐकताच सगळ्यांच्या नजरा गायत्रीकडे वळाल्या...

गायत्री देखील एकदम कावरी बावरी झाली आणि म्हणाली सॉरी सर मी त्यांची पर्सनल डायरी कशीकाय देऊ...

कमांडो : का तुला तुझ्या नवऱ्याच्या देवेनच्या मारेकऱ्याला पकडायचं नाही का?

गायत्री : काय? गायत्री सोबत सगळ्यांचेच कान आता कमांडो काय बोलतात तिथे टवकारले....

क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या