दैव जाणीले कुणी (भाग 32)

ठरल्याप्रमाणे बेला, झुक्या,गायत्री आपापल्या घरी गेले...
कमांडोने सूर्या आणि प्रदीप ला मिस्टर ब्लॅक ची अपॉइंटमेंट घेण्यासाठी सांगितलं...आणि अजून एका ऑफिसर ला फोन लावून कमांडो ने अन्विता व त्याच्या आईला एका गुप्त ठिकाणी नेण्याची सोय केली..
एकदा का डागा पर्यंत पोहोचलो की अन्विता आणि तुमच्या मॅडमच्या जीवाचा धोका टळाला असं समजू... ऑफिसर ला बोलावल्यानंतर कमांडो म्हणाले...
अन्विता : माझ्या जीवाला धोका होता हे समजू शकत होते पण आता आईच्या??

दिवाकर : अन्विता बेटा!! थोडं लक्षात घे... हा डागा म्हणजे एक अतिरेकी आहे आणि त्याची डागा नावाची अतिरेकी संघटना आहे...तो डागा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जनसामान्यात घुसला आहे.. जसं की त्याने मिस्टर ब्लॅक, सूर्या, प्रदीप, मोहित या सगळ्यांचा वापर केला आहे

त जे की छोटे मोठे गुन्हेगार आहेत... आता प्रश्न असा आहे की तो तूझ्या मागे का? कारण मी शास्त्रज्ञ आहे.. आणि मी जे शोध लावलेत त्याचे फॉर्मुले वापरून त्यांना त्यांची टीम बळकट करायची आहे... आता माझी ती घड्याळ ती घातली की कुठली व्यक्ती खरी आहे अन कुठली खोटी ही लागलीच कळते त्याचा भरपूर फायदा डागाला होणार आहे...आणि सर!!मिस्टर ब्लॅकचं आमच्याशी खाजगी वैर असावं.. तसं मला खात्री नाही पण अंदाज आहे तो देखील निव्वळ एका गैरसमजामधून झालेला...

कमांडो : गैरसमज? कसला गैरसमज?

अन्विताची आई : अन्विता बेटा!!चल आपण पॅकिंग करू..

अन्विता : अगं आई!! बाबा...कमांडो काकांना काय सांगतात ते मला ऐकू दे ना..

दिवाकर : अन्विता बेटा!! तू आईला मदत करू लाग.. मी तुला नंतर सांगतो...सर!!आपण तिथे गार्डन मध्ये जाऊन बोलू या का?

असं म्हणून दिवाकर कमांडो ला घेऊन गार्डन मध्ये गेला...

दिवाकर : सर!! मला कळतच नाही के हे जे गुपित वर्षानु वर्ष आमच्या मनात दडलंय तुम्हाला कसं सांगावं.. पण मिस्टर ब्लॅक साठी आता ह्याचा आम्हाला उलगडा करावा लागणार...

कमांडो : दिवाकर!!खरंच आता कोड्यात ऐकायची इच्छा नाही आधीच्या सगळ्या कामांमुळे मला जरा मानसिक थकवा जाणवायला लागला आहे..

दिवाकर : सर!!मी इतकंच म्हणेन की "अन्विता " ही माझी biological मुलगी नाही.. ती मिस्टर ब्लॅक ची मुलगी आहे

कमांडो :काय??? 

दिवाकर : हो...

तितक्यात कमांडोचा फोन वाजला... हो मी लागलीच निघतो... असं म्हणून कमांडो ने फोन ठेवला...दिवाकर मला आत्ताच निघावं लागेल.. डागा ची एक लीड मिळाली आहे...पण अन्विता बद्दल नक्कीच ऐकायला आवडेल..

दिवाकर : ठीक आहे सर...काश रामचरण बदलला नसता तर... त्याचा मिस्टर ब्लॅक झाला नसता तर आज चित्र वेगळं असतं...

कमांडो तिथून निघून गेला...

अन्विता आणि तिची आई कमांडो च्या एका माणसासोबत एका गोपनीय ठिकाणी निघून गेले...

सूर्या आणि कमांडो चा इशारा मिळेपर्यंत दिवाकर त्याच्या घरीच थांबणार होता...

दिवाकर च्या घरातून बाहेर पडल्या सूर्या आणि प्रदीप डायरेक्ट मिस्टर ब्लॅकच्या अड्डयावर गेले... अड्डयावर बाहेरच त्या दोघांवर मिस्टर ब्लॅक च्या माणसांनी पिस्तूल रोखली...

दोघेही हात वरती करून......भाल्या ऐक माझं आम्हाला मिस्टर ब्लॅकच्या फायद्याचं बोलायचं आहे... असं सूर्या म्हणाला..

टिड्या... ए भाल्या!!या सूर्याचं काही ऐकू नकोस बरं का? ह्याच्या ओठात एक आणि पोटात एक असतं...

सूर्या : खरंच मी मिस्टर ब्लॅक ला अन्विता कडे घेऊन जायला आलो आहे...

टिड्या : भाल्या तू पिस्तूल तशीच ठेव... मी यांची खबर मिस्टर ब्लॅकला देतो... असं.म्हणून टिड्याने मिस्टर ब्लॅकला फोन लावला...

टिड्या : बॉस!!तो सूर्या आलाय...

बॉस : मग कशाची वाट बघताय... संपवा त्याला...

टिड्या : हो सर... संपवणारच होतो... भाल्याने त्यांच्यावर पिस्तूल रोखलाय...

टिड्या!!प्लीज फोन स्पीकर वर टाक...मला फक्त एकदा मिस्टर ब्लॅक शी बोलू दे...सूर्या विनवणी करू लागला...

टिड्या ने फोन स्पीकर वर केला..

सूर्या : बॉस!! मी तुम्हाला अन्विताकडे घेऊन जाण्यासाठी आलो आहे.. तुम्ही विचार करा.. तुम्ही माझ्यावर इतके चिडले असताना मी तुमच्या अड्डयावर का येईन...

मिस्टर ब्लॅकला सूर्याचा युक्तीवाद पटला... त्याने सूर्याला आणि प्रदीपला आत बोलावले...

सूर्या : बॉस सर्व प्रथम मी तुमची माफी मागतो... काय करू मी अन्विताच्या प्रेमात पडल्यामुळे तिचा जीव जाऊ नये असंच मला वाटत होतं.. मला तुम्हाला मुळीच धोका द्यायचा नव्हता... पण माझं प्रेम अडवं आलं..पण बॉस आता नाही... आता मी कमजोर पडू नये म्हणून प्रदीपला सोबत घेऊन आलो आहे..

मिस्टर ब्लॅक :ए सूर्या!!उगाचच लांबन लावू नकोस... जे काय बोलायचं ते पटकन बोल..

सूर्या : बॉस!!मला कमांडो कडून कळालं की अन्विताला मारण्याचा प्लॅन हा तुमचा प्लॅन नव्हता.. डागा आणि त्याच्या संघटनेचा होता... बरोबर ना

हं मला तर त्या दिवाकर चा बदला घ्यायचा होता म्हणून मी त्यात सामील होतो खरा पण अन्विताला मारण्यासाठी डागा ने सांगितलं होतं हे खरं... मनात विचार करतच... हं त्याचं काय आता?

सूर्या : म्हणून तुम्ही मुख्य आरोपीच्या पिंजऱ्यात नाहीत.. सह आरोपीच्या पिंजऱ्यात आहात.. म्हणजे तुम्ही, मी,प्रदीप, आणि हो मोहित सुद्धा...

मिस्टर ब्लॅक :सूर्या!! तुझा मुद्दा सांग रे... बाकी गप्पा मारू नकोस समजलं ना..

सूर्या : ठीक आहे बॉस!!मी आता सांगूनच टाकतो... जर तुम्ही कमांडोला सरंडर झाले तर तुम्हाला ते कुठल्याच केस मध्ये अडकू देणार नाहीत असा निरोप दिला आहे... अगदी ड्रग्स रॅकेट मधून सुद्धा तुमची सुटका होईल..म्हणजे निदान तुमची आमची शिक्षा कमी तरी होईल...

मिस्टर ब्लॅक : हा हा हा... तू काय मला येडा बिडा समजला का रे..

सूर्या : नाही बॉस!! नाही.... कारण कमांडो आणि पोलीस यांना मुख्य अतिरेकी डागा ला पकडायचं आहे..आणि मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःहुन आपला हात पुढे केला आहे... आता मोहित पण त्यांच्या कस्टडी मध्येच आहे... आपली एक न एक कडी कमजोर होत चालली आहे...

मिस्टर ब्लॅक :  नेमकं काय म्हणायचं आहे तुला??

सूर्या : म्हणजे मला म्हणायचं आहे की या शिवाय उत्तम पर्याय आपल्या कडे असूच शकत नाही...

मिस्टर ब्लॅक : हं... तू म्हणतोय त्यात तथ्य आहे खरं... ठीक आहे चल आपण सरंडर करू...

डागा समुद्र मार्गाने त्याच्या देशात परत जाणार आहे . आणि दुसऱ्याच दिवशी परत भारतात येणार आहे.. अशी माहिती कमांडोला मिळाली होती..

 डागाला लवकरात लवकर जेरबंद करून शहरात चाललेले ड्रग रॅकेट, छोटे मोठे गुन्हे, तसंच दहशतवाद या सर्वांचा खातमा करण्यात यावा व दिवाकर जे नवनवीन संशोधन करतात त्यांच्या संशोधनात बाधा येणार नाही या साठी वेळीच हे करणे गरजेचे होते... त्या साठी कमांडो ने डागा ला पकडण्यासाठी त्याचं जाळं लावलं.. त्याचे सगळे सहकारी कोळीच्या वेशामध्ये समुद्रमार्गांवर तैनात केले...

. मिस्टर ब्लॅक सरंडर करण्यासाठी म्हणून निघाला.. पण सूर्या ने त्यांची जीप अन्विताच्या घराकडे वळवली

मिस्टर ब्लॅक : सूर्या!!हे काय?? आपण कुठे जातोय..

सूर्या :बॉस आपण सरंडर करण्यासाठी जातोय.. पण हे पोलीस स्टेशन ला नाही तर मिस्टर दिवाकर च्या घरी जात आहोत. त्यांचं जे अँटीटरोरिसम युनिट आहे.. तेच आपल्यावर योग्य ती कार्यवाही करणार आहेत.

त्यावर मिस्टर ब्लॅक काहीतरी बोलणार तितक्यात सूर्याने जीप दिवाकरच्या घरासमोर घेतली...

जीपमधून उतरल्यावर ते तिघेही दिवाकरच्या घरात गेले... दिवाकर एकटाच सोफ्यावर बसलेला होता...

मिस्टर ब्लॅक दिसताच दिवाकर एकदम भावनिक झाला... आणि म्हणाला रामचरण : काय होतास तू अन हे काय झालास रे...

मिस्टर ब्लॅक : रामचरण कोण रामचरण मी त्याला ओळखत नाही.. अन माझ्या मधल्या बदलाचं म्हणशील तर याला सर्वस्वी तू जबाबदार नाही का?

दिवाकर :रामचरण!! तू तूझ्या मित्राला ओळखू शकला नाहीस आणि सुप्रियाला तर नाहीच नाही..

मिस्टर ब्लॅक : म्हणजे काय म्हणायचं आहे तुला...तू तर धोकेबाज आहेस रे.. ऐन लग्नाच्या दिवशी सुप्रियाला घेऊन पळून गेला होतास.. अन म्हणे मी ओळखलं नाही...अन काय रे तुझं प्रेम तर त्या जानकी वर होतं ना... का सगळा दिखावा होता?

दिवाकर : जानकीच माझी बायको आहे रामचरण!!पण "अन्विता" जिला तू माझी मुलगी म्हणून मारायला निघालास ती तुझीच मुलगी आहे रे...

मिस्टर ब्लॅक : काय?? काहीही काय बोलतोस??

दिवाकर : तेच ना.. अरे आधी खात्री तरी करून घ्यायची होतीस ना की लग्नाच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं ते...

मिस्टर ब्लॅक : म्हणजे??

दिवाकर : तुमच्या लग्नाच्या दोन दिवस आधी माझ्या आणि जानकीबद्दल आमच्या दोघांच्या घरी कळालं... आमच्या लग्नाला आमच्या दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता म्हणून आम्ही दोघांनी पळून जायचं ठरवलं... माझ्या आणि जानकी बद्दल तुला तर माहिती होतं ना...

मग?मी सुप्रियाला सोबत कशाला पळून जाईल... एवढा विचार तूझ्या डोक्यात आला नाही का?


मिस्टर ब्लॅक : हम  मला कुणीतरी सांगितलं..

दिवाकर : हो.. अन तू विश्वास ठेवलास.. हो ना

मिस्टर ब्लॅक : दिवाकर.. मी तुटलो होतो.. आतून पोखरलो गेलो होतो...

दिवाकर : हो पण विश्वास नावाची काही गोष्ट असते की नाही...

मिस्टर ब्लॅक :खरं तर माझा खूप विश्वास होता सुप्रियावर पण... ती ऐन लग्नासाठी आली नाही.. असं काय झालं की तिच्या घरातून तिला कार्यालयात देखील येता नाही आलं??

दिवाकर :तेच तर सांगतोय....पुढे असं झालं की मी आणि जानकी पळून जायला निघालो... पण तुला तर माहिती ना जानकी एका मोठ्या असामी  व्यक्ती ची मुलगी...त्यांनी आमच्या मागे गुंड लावले होते.
क्रमश :

नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®स्वानुभवसप्तरंग

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या