डायरी मिळाल्यावर कमांडोने डायरी ताब्यात घेतली.व handwriting एक्स्पर्टला दिली.. व त्याच्या कानात काहीतरी पुटपुटले. समजल्यासारखं करून तो एक्स्पर्ट तिथून निघून गेला.
देव ने त्याच्या मनामध्ये दोन गट पाडले... एक गट म्हणजे त्याचे ऐकू शकणारा आणि दुसरा गट म्हणजे त्याच्या विरुद्ध जाणारा गट... बस्स आता हा अंदाज खरा ठरावा म्हणजे आपलं काम खूप सोपं होईल....
काय रे काय विचार चालू आहे डोक्यात.. तिथे असलेला म्होरक्या देवकडे बघून म्हणाला..
देव : क क काही नाही सर.. मला.... जाऊद्या सर मी बोललो की तुम्ही ओरडता माझ्यावर.. मी आपला शांतच बरा आहे..मुद्दाम घाबरल्याचं नाटक करत देव म्हणाला
म्होरक्या : हं.. समजूतदार आहेस.. असंच रहा.. आणि जरा आमची मदत करा...
देव : मदत? मी काय मदत करू शकेन..
म्होरक्या : मला तुझ्या बाबांच्या आताच्या शोधकार्याचा फॉर्मुला हवा आहे... आणि कुठलं काय ते स्मार्ट घड्याळ पण बनवलं आहे म्हणे.. मला त्याचा पण फॉर्मुला हवा आहे.. समजलं का? अन जर यात तू कुचराई केलीस तर मग मात्र तू आहेस आणि मी आहे... तुला देवाघरी पाठवायला वेळ लागणार नाही समजलं ना...
देव : न न नको सर... मी प्रयत्न करेन..पण सर एक प्रॉब्लेम आहे.. माझ्या बाबांच्या हातात पूर्ण फॉर्मुला नसतो...त्यांना पण पूर्णतः माहिती नसते
म्होरक्या : कसं आहे ना मी तुला बोट दिलं तर तू हातच पकडायला लागलास... मी तुला ऑर्डर देत आहे समजलं का? विनंती समजायची चूक करू नकोस... मला तो पूर्ण फॉर्मुला चोवीस तासाच्या आत पाहिजे... समजलं का? त्या साठी मला तुझा एक व्हिडीओ शूट करायचा आहे... म्होरक्या ने लगेच एका गुंडाला खुणावले...
त्या गुंडाने सणकण एक देव च्या थोबाडीत मारली.. देव ला एकदम झाँजच आली.. तो खाली पडला... दुसरा एक गुंड त्या दृष्याचा व्हिडीओ काढत होता... आणि बाकी आजूबाजूला असलेले गुंड जोरजोरात हसत होते.... आता मात्र देवला आपण भयंकर गुंडाच्या तावडीत सापडलो ह्याची प्रचिती आली...
झुक्या कमांडोच्या ऑफिस मध्ये आला त्याला एक स्पेशल केबिन आणि त्याला लागूनच राहण्यासाठी एक स्पेशल रूम देण्यात आली..
दोन्हीही रूम मध्ये छान व्यवस्था होती...
त्याच्या स्वतःच्या रूम मध्ये छोटासा फ्रीझ कॉफ़ी तयार करण्याचे मशीन एक टेबल एक खुर्ची आणि कॉट अगदीच हॉटेल मध्ये असलेल्या सुपर डिलक्स रूम सारखी होती..
रूम वगैरे पाहून झुक्या एकदम खूष झाला...
तितक्यात कमांडो म्हणाला झुक्या!!चला लागा कामाला..
झुक्या त्याच्या केबिन मध्ये गेला...
केबिन मोठी होती त्या केबिन मध्ये तीन कॉम्पुटर होते आणि एक रिकामा टेबल होता...
रिकाम्या टेबल कडे बोट दाखवत कमांडो म्हणाले झुक्या ही आता तुझी कर्मभूमी...
तू इथे तुझा लॅपटॉप वापरू शकतो.. आणि हे तीन ऑफिसचे कॉम्प्युटर आहे...
तुझ्यासोबत इथे आमचे काही सहकारी बसतील... ते वेळोवेळी तुझी मदत करतील आणि वेळप्रसंगी मदत घेतीलही...
सगळीकडे एकदम भयाण शांतता पसरली... अन्विता रडत रडत एकदा दिवाकर कडे बघत असे एकदा रामचरण कडे बघत असे... आणि मग तिच्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवत असे...
रामचरण : अन्विता!! बेटा..तू रडू नकोस ना.. अगं दिवाकर आणि जानकीच तुझे आईबाबा आहेत.. मी थोडंच तुला त्यांच्यापासून कुठे घेऊन जाणार आहे.. दिवाकर!!मी निघतो फक्त मला इतकं सांग की मला पोलीस स्टेशनला जायचं आहे की कमांडो कडे?
दिवाकर : रामचरण!!तुला एकट्याला नाही मला आणि तुला कमांडो कडे जायचं आहे.. तत्पूर्वी डागाची जी काही तुला माहिती आहे ती मला तू द्यायची आहेस... मी ती या व्हिडीओ मध्ये रेकॉर्ड करणार आहे... जेणेकरून मला आणि टीमला पुढे काय करायचं ते कळेल...
रामचरण : दिवाकर!!आत्ता देव कुठे असेल याचा मला अंदाज आहे..
शु शु शु दिवाकर ने रामचरणला तोंडावर बोट ठेवून शांत रहा असे खुणावले..
अन्विता : काय म्हणालात देव!!तुम्हाला कसं माहिती आहे देव?
काय.. मी देव म्हणालो... हो देव आपलं संकट दूर करण्यासाठी नक्कीच उपलब्ध नसेल हो ना
आकाशाकडे बघून हात जोडून रामचरण म्हणाला...
अन्विता : अच्छा देव होय... मला वाटलं की तुम्हाला माझ्या भावबद्दल कसं काय माहिती?
तुझा भाऊ?.. दिवाकर ही अन्विता काय म्हणतेय?काहीच माहिती नसलेल्या सुरात रामचरण म्हणाला...
दिवाकर : रामचरण!!देव माझा मुलगा आहे.. चल बरं लवकर आपल्याला कमांडो कडे जायचं आहे.... तिकडून निरोप आला आहे...
भाल्या टिड्याच्या ग्रुप ने त्यांच्या माहितीतले जितके अवैध धंदे चालतात तितकंयांची माहिती माफिचा साक्षीदार होण्यासाठी पोलिसांना दिली..
सूर्या आणि प्रदीप ला देखील कमांडो ने त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावलं होतं...
ऑफिस मध्ये आता कमांडो, दिवाकर, रामचरण, झुक्या उर्फ मोहित, सूर्या, गायत्री आणि प्रदीप होते..
तसेच कमांडोच्या हाताखाली असणारी त्याच्या गुप्त हेरांची टीम तिथे होती..
कमांडो ने बोलायला सुरुवात केली : मित्रानो आपण एकत्र आल्यापासून डागाच्या विविध गुन्ह्यांचा खातमा करण्यात आला आहे..
त्याचे मोठे नाही पण छोटे छोटे गुन्हे आपण जवळ जवळ 70 टक्के बंद केले आहेत..
विशेष म्हणजे आपल्या या मिशन डागा मुळे कळत न कळत का होईना आपण आपल्या शहरातील पोलिसांना खूप मोठा हातभार लावला आहे..
आता काय होणार माहिती आहे का? डागाची ही मुख्य कमाई यातच होत होती...
अन तीच affect झाल्यामुळे तो चवताळणार आणि मोठी कमाई म्हणजे मोठा अतिरेकी हल्ला करायचा प्रयत्न करणार...
आता आपल्याला अलर्ट राहावं लागेल... या साठी तुम्हा सगळ्यांची मदत घ्यावी लागेल..
झुक्या? सर्वात पहिले तू..
तुला मी आणि ही इथे बसलेली टीम डागा ची काही बेसिक माहिती पुरवतो...
या वरून तुला डागाला हॅक करायचं आहे...
आता तू म्हणशील डागा ला? माणसाला कुठे हॅक करता येतं का? तर मी म्हणेल हो...
त्याचं सोशल मीडिया, त्याचे बँक डिटेल्स, त्याचे फोन डिटेल्स, त्याचे लोकेशन डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स काय काय मिळू शकेल याचा प्रयत्न तुला करावा लागेल...
झुक्या!!तुला काहीही अडचण आली तर या तिघांची मदत तू घेऊ शकतोस.. हे तिघे देखील इथीकल हॅकर आहेत actually हे डागा च्या जवळ येत आहेत पण त्यांना काही डिकोड करता येत नाही कदाचित तुझ्या मदतीने करता येईल..
गायत्री!!तू दिलेल्या डायरी मध्ये शेवटच्या पानापर्यंत काही नव्हते..
पण त्या डायरीच्या शेवटच्या पानावर देवेन ने मेनासारख्या वस्तूने काहीतरी लिहिले होते आणि ते डिकोड करण्यात आम्हाला यश आलं आहे..
त्याने लिहिलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे.. मला खूप मोठं षडयंत्र माहिती झालं आहे..
आणि त्याची चाहूल तुझ्या काकांना लागली लागली आहे..
गायत्री take care...
खूप काही सांगायचं आहे.. लिहायचं आहे पण काय करू माझ्या अवती भवती सगळे फिरत आहेत... बस्स..
कमांडो चे शब्द ऐकताच गायत्रीला एकदम कानठळी बसल्यासारखे झाले.. एकदम घेरी आली..
काय माझे काका? ओह आता लक्षात येत आहे रवी दादा सुद्धा तरी म्हटलं हा हल्ली का आपल्या घरात चक्कर मारत होता.. उफ घरातून हाकलून देण्याचं नाटक करून आपल्याकडे थांबला होता.. आपल्याला देवेन शी बोलू देखील देत नव्हता... म्हणजे एकदम सतत पाळत असावा का?
काय विचार करत आहेस गायत्री? कमांडो ने तिची तंद्री तोडली..
गायत्री : सर माझे काका? पण का? असलं कुठलं गुपित देवेन ला माहिती झालं होतं? त्यांनी माझ्या देवेनचा जीव घेतला का? हो आता आठवतं देवेन ला मला काही सांगायचं होतं पण माझा चुलत भाऊ रवी सतत आमच्या आजूबाजूला असायचा...
कमांडो : हो तुझे काका एका मोठया ड्रग रॅकेट मध्ये involve होते हे अपघातानेच देवेनला माहिती झालं होतं... आणि त्याची चाहूल तुझ्या काकांना लागली होती म्हणून त्यानी देवेनचा अपघात घडवून आणला होता..आमच्याकडे पुरावा असं फारसं सापडलं नव्हतं आता तू दिलेली डायरी त्या पुराव्याचा एक भाग आहे..
कमांडो आता सूर्या कडे वळले...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या