सूर्या!! आतापर्यंत तुझं काम हे वरवरचं होतं पण आता मात्र तुला खूप महत्वाचं काम करायचं आहे.. तसं तुमच्या तिघांच्या मदतीने आम्ही छोटे छोटे ड्रग रॅकेट जरी उध्वस्त झाले तरी आता हा जो डागा आहे त्याला पकडण्यासाठी जशी देव ची मदत मिळाली तशी तुझी देखील लागणार आहे..कमांडो सूर्याला म्हणाला
सूर्या : yes sir, i am ready
कमांडो : good.. मग लागलीच कामाला लाग... हे बघ हे डागाचं सध्याचं लोकेशन.. देव मुळे कळालं.. तुला अगदीच गनिमीकाव्याने त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे... त्या साठी 48 तास आहे... कारण डागा फक्त 48 तासच इथे भारतात असणार आहे... एकदा याच्या मुचक्या आवळल्या की काम झालं समजायचं... आम्ही गेलो असतो... पण माहिती नाही कसकाय त्याला आमची चाहूल फार पटकन लागते... त्या मुळे तुला हुशारीने त्याच्यापर्यंत पोहोचायचं... एकदा तो तावडीत सापडला की थोडं दूर अंतरावर आम्ही घेराव घातलेला असेल..
Ok सर...मी लागलीच कामाला लागतो... निघतो sir
कमांडो : गनिमीकावा कसा वापरायचा आहे ह्याचे डिटेल्स मी तुला mail करतो... त्याच मार्गाने तुला जावं लागेल... चल best luck
अन प्रदीप!! तू त्याच मार्गाने जायचं आहे पण बरोबर अर्ध्या तासाच्या अंतराने आणि हा दुसरा point इथे तू थांबायचं आहे.. सूर्यावर लक्ष ठेवायचं आहे.. सूर्या जर कुठल्याही संकटात सापडला तर तू तिथे असला पाहिजे... एक पाठीराखा म्हणून... अन सोबतीला माझे हे दोन सहकारी घे..
प्रदीप : ok सर...
प्रदीप ने रजा घेतली...
कमांडो : आता सर्व व्यवस्थित प्लॅन झालं आहे... फक्त गायत्रीच्या काकांना कसं आपल्या कैचीत पकडायचं ते पाहावं लागेल... तितक्यात कमांडोचा फोन वाजला...
काय काय म्हणतोस... म्हणजे मुख्य वजीर... मग तर आपल्यासाठी सोपं आहे हे.. धन्यवाद धन्यवाद खूप महत्वाची टीप दिलीस...
सगळ्या उपस्थितांचे कान कमांडोकडे लागले...
गायत्री!! तुझे काकाच वजीर आहेत अशी टीप मिळाली आहे... डागा ला आपल्या शहरातील संपूर्ण माहिती आणि प्लॅनिंग तुझे काका देतात म्हणे..कमांडो ने गायत्रीकडे रोखून बघितलं आणि म्हणाले...
गायत्री : सर!! माझे काका!!आज रात्रीच अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहे ओह आता लक्षात आलं कदाचित ते आपला देश सोडून जाण्याच्या तयार आहेत... कायमस्वरूपी म्हणूनच त्यांनी इथली प्रॉपर्टी काही दिवसांपूर्वी विकली... आता link लागत आहे सर!!
कमांडो : काय? भारताबाहेर? अन तू आता सांगत आहेस... थांब मी माझ्या पोलीस यंत्रणेला फोन लावतो अन एअरपोर्ट वर तुझ्या काकांना ताब्यात घ्यायला लावतो..असं म्हणून कमांडोने पोलीस यंत्रणेला गायत्रीच्या काकांची माहिती दिली...
देव वरची पकड थोडी ढील्ली झाली... देव ने लागलीच संधी साधली..त्याने डागाच्या टीम मधील एकाला माँटी ला त्याच्या विश्वासात घेतलं.. त्या साठी त्याने त्याची गळ्यातली सोन्याची चैन पणाला लावली..माँटीच्या मदतीने देव ने डागाच्या कॉम्प्युटर लॅब मध्ये एंट्री घेतली.... तसं लॅब ला खूप security होती.. पण डागाच्या खास मर्जीतला असं माँटी ची ओळख असल्यामुळे त्याच्यासोबत देव ला त्यांनी लॅब मध्ये जाण्यासाठी परवानगी दिली...
परवानगी मिळणार नाही असं शक्य नव्हतं कारण देव आणि माँटी ने एक नाटक वठवलं होतं... देव त्याचे दोन्हीही हात वरती करून आणि माँटीने त्याला पाठीला पिस्तूल लावली होती..आणि देव त्यांच्या संशोधनाचा फॉर्मुला देणार हे कारण सांगितले गेले होते...
देव ला आता oficially डागा चं कॉम्पुटर हाताळता येणार होतं... तेही 48 तास पण जर कुणी शहानिशा केला तर कधीही घात होऊ शकतो ही भीती देखील होती.
देव ने त्याच्या खास गॅझेट मार्फत त्याच्या वडिलांना हिंट दिली...
हिंट मिळताच दिवाकरने झुक्या आणि टीम ला त्यांच्या कॉम्पुटर सिस्टिम वर बसवलं...
देव ने डागा चा कॉम्पुटर on केला... कॉम्प्युटर on करताच सुरक्षा रक्षक असलेली शीळ वाजायला ला लागली... शीळ वाजताच धडाधड डागाचे गुंड लॅब मध्ये बंदूक घेऊन जमा झाले...सगळे येताच देवला एकदम धडकी भरली... पण माँटी त्या जमवासमोर आला आणि मला बॉस ने हे करायला सांगितले आहे हे पटवून दिले...
आता मात्र देवला हे लक्षात आलं कि आपल्याला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावं लागेल...जेवढं लवकर जमेल तेवढं...
देव : माँटी!!पासवर्ड?
माँटी ने नजरेनेच कॉम्पुटर वर काम करणाऱ्या एका सहकाऱ्याला खुणावले... त्याने कॉम्पुटर चालू करून दिला...
आता काय या लोकांच्या नजरेसमोर सगळं ऑपरेट करायचं? काय बरं युक्ती करावं कि बाकी लोकांचं दुर्लक्ष व्हावं विचार करतच देव ला एक कल्पना सुचली..
इकडे ज्याप्रमाणे टीप मिळाली होती त्या प्रमाणे लागलीच पोलिसांनी नाका बंदी केली.. गायत्री कडून काकाच्या कारचा नंबर मिळाला होता.. अगदीच दुसऱ्या नाक्यावर गायत्रीचे काका एकदम गाफिल असल्यामुळे पकडले गेले..
खूप मोठं काम झालं होतं... सगळ्या खेळतला मुख्य वजीर आता पोलिसांच्या तावडीत सापडला होता.. व त्याची काहीच चौकशी न करता त्याला कमांडो समोर हजर करण्यात येणार होतं...तोपर्यंत गायत्रीच्या काकांना कसलीही कल्पना नव्हती.. अन आपण डागाशी कनेक्ट आहोत हे माहिती असणं शक्यच नाही... असा गैरसमज असल्यामुळे ते जरा गाफिलच होते...
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या