देव ला एक कल्पना सुचली...
सगळा मेसेज त्याने html code मध्ये ओपन करून लागलीच त्याच्या गॅझेट मध्ये copy पेस्ट केला आणि त्याच्या वडिलांना म्हणजेच दिवाकरला send केला.
कॉम्पुटर वर काहीतरी चित्रविचित्र भाषेत लिहिलं आहे असं दिसत होतं कॉपी पेस्ट करून उगाचच चू... चू..असा आवाज करून जसं की कॉम्पुटर वरचं काहीच समजत नाही या अविर्भावात त्याने कॉम्प्युटर सोडून दिला...हे सर्व नाटक त्याने तिथे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांसाठी केलं...
झुक्या तिथल्या कॉम्पुटर वर बसलेला होताच त्याने लागलीच कोड.. डिकोड करून सगळी माहिती दिवाकर ला दिली...
आता मात्र दिवाकर च्या हातात डागा ची कुंडली होती..
डागा चे कुठे कुठे काय धंदे आहेत ते क्लिअरली त्या कुंडली मध्ये होतं..
इकडे देव ने न समजल्या सारखं नाटक केलेलं होतंच ... आणि म्हणाला काय यार ही कसली कोड लँग्वेज आहे.. काहीच कळत नाहीये.. परत एकदा प्रयत्न करतो असं म्हणून त्याने पटापट कर्सर फिरवला आणि त्या फितूर माँटीच्या न कळत फॉरवर्ड केलेल्या मेसेज ची हिस्टरी डिलीट केली..
माँटी : चल बस्स कर आता.. नाहीतर दुसरी सिक्युरिटी बिप वाजेल जी मात्र डायरेक्ट डागापर्यंत पोहोचेल..
देव : पण..माँटी!!मला काहीच समजले नाही... काहीतरी वेगळीच कोड लँग्वेज आहे...असं म्हणून देव विनंती करण्याचं नाटक करू लागला..
माँटी : हा हा हा तो म्हणून तर तो आमचा बॉस डागा आहे... एकदम अनन्यसाधारण.. पण ते राहू दे ऐक जरा आपल्याजवळ शेवटचे फक्त दोन मिनिटे शिल्लक आहेत त्यात आपण फक्त या प्रिमॅसिस मधून बाहेर पडू शकतो... नाहीतर वॉर्निंग बीप वाजेल...
चल लवकर म्हणून माँटीने देव ला हाताला धरून चक्क ओढलं.. आणि त्या रूम च्या बाहेर दोघेही पडले व माँटीने एकदम उसासा सोडला..वाचलो बुवा... नाही तर देव!!आज तू मला खपवलं होतंस... पण आता नाही.. देव!!मी तुला या बाबतीत परत मदत करू शकत नाही.. तुला मदत करण्यासाठी मी माझा बळी देऊ शकत नाही...
देव : माँटी प्लीज असं नको करूस.. तू आता सध्या शांत हो.. आपण नंतर बघू... पण असं एकदम negative बोलू नकोस रे.. तू माझ्यासोबत राहिलास न की मी तुला बऱ्याच technical गोष्टी सांगतो.. मग काय तूच बॉस राहशील..
हं..असं म्हणून माँटी बॉसचं स्वप्न पाहण्यात रममान झाला...
आणि" देव" त्याचं तर काम झालं होतं... त्या मुळे त्याची विनवणी देखील खोटी होती... जेणेकरून आपण काही कोड समोर पाठवला आहे ह्याचा काडीमात्र संशय कुणाला येऊ नये ....
डागा भारतात आला होता..
मुंबईला गेट वे ऑफ इंडिया जवळच असणाऱ्या एका साध्या घरगुती हॉटेल मध्ये तो मुक्कामी आला होता...
ते हॉटेल म्हणजे बाहेरून एकदम पडकी झोपडी असं त्याचं रूप होतं पण..
आतमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल इतका शाही थाट होता...
डागाची भारतात जिथे जिथे त्याचे काळे धंदे चालतात त्या सगळ्यांसोबत तिथे दुपारी चार वाजता मिटिंग ठरलेली होती.. आणि त्या मिटिंग मध्ये आता डागा पुढे काय करायचं कसं करायचं याचं मार्गदर्शन करणार होता..
आणि ह्या मिटिंग चं सर्व प्लॅनिंग आता दिवाकरच्या हातात होतं...दिवाकर ने कमांडोला डागाच्या प्लॅनिंगची इन्फॉर्मशन दिली आणि कमांडो ने डागा व त्याच्या सहकाऱ्याना पकडण्याचा इशारा दिला...त्या प्रमाणे सापळा देखील रचण्यात आला....
सूर्या पर्यंत आता डागा चे सगळेच डिटेल्स पोहोचले होते.. डागा जर त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात आला तर उत्तमच पण नाही आला तर तो कुठल्या मार्गाने पळेल, कुठल्या मार्गाने परत जाईल याची सर्वच कुंडली डागा आणि प्रदीप पर्यंत पोहोचली
...
इकडे झुक्या डागाचे सर्व bank अकॉउंट हॅक करण्यात यशस्वी झाला... त्याने डागाचे अकाउंट हॅक ही केले आणि ब्लॉक ही केले...
ब्लॉक झाल्याच्या मेसेज ची बिप वाजली...डागा त्याचा फोन बघणार तितक्यात कुणीतरी असल्याची चाहूल त्याला लागली...
डागाने ज्या लोकांसोबत मिटिंग ठेवली होती त्यात त्याला तीन ते चार नवीन चेहरे दिसले...
अन आपण ट्रॅप मध्ये अडकलो याची जाणीव त्याला झाली ....
लागलीच त्याने त्याच्या चोरखिशात असलेली बंदूक त्याने समोर काढली आणि आजूबाजूला चाहूल घेऊ लागला...
पण त्यांच्या मिटिंग साठी असणारे नवोदित चेहऱ्यानी पटापट आपल्या पिस्तूल काढल्या आणि मिटिंग ला हजर असणाऱ्या बाकी लोकांवर ताणल्या...
काही कळायच्या आत डागाच्या मागून त्याच्या उजव्या खांद्यावर वार झाला..
अन त्याची पिस्तूल वरची पकड ढिली झाली..
वेळ न दवडता सूर्या ने डागा वर ताबा मिळवला.. आणि एक शीळ वाजवून थोडया अंतरावर उभ्या असलेल्या प्रदीप ला इशारा केला... कमांडो आणि त्याच्या टीम ने त्या जागेला घेराव घातलेला होताच...पण कुणालाही काही इजा होऊ नये म्हणून सर्व ती खबरदारी घेतलेली होती....
डागा खूप चवताळलेला होता पण सूर्याची घट्ट पकड त्याला काही करू देत नव्हती...
डागा भारतात आल्या नंतर तब्बल 20 तासातच तो पकडला गेला होता...
पण विषय इथेच संपला नव्हता कारण देव हा डागाच्या ताब्यात होता...आणि 48 तासानंतर जर डागा तिथे परत पोहोचला नाही तर देव चा खात्मा करायचा अशी डागाची त्यांच्या एका खास माणसाला सक्त ताकीद होती....48 पैकी 20 तास तर डागाला पकडण्यात गेले होते...आता फक्त 28 तासच उरले होते...
आणि देव बद्दल मात्र कमांडो ला मिळालेल्या माहिती मध्ये विशेष असे काही नोंदले नव्हते..
सुरुवातीला आटापिटा केल्यावर डागाची सुटका काही झाली नाही पण क्षणभरातच त्याने प्रतिकार करणं बंद केलं... आणि एकदम एक कुत्सित हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटलं...
कारण देव त्याच्या ताब्यात आहे याची त्याला आठवण झाली...
डागाच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र सूर्याच्या नजरेतून सुटलं नाही...
इकडे देव ने त्याच्या गॅझेट मधून त्याचं लोकेशन सुरुवातीलाच सेंड केलेलं होतं... पण झुक्या आणि त्यांच्या टीम ला ते डिकोड करता आलं नाही...भाषा तर तीच होती... फॉरमॅट ही तोच.. मग अडलं कुठे... झुक्याला काही समजत नव्हतं... लोकेशन का ट्रॅक होत नाहीये..
क्रमश :
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या