झुक्या बैचेन होता.. देव चं लोकेशन ट्रॅक होत नव्हतं काय करावं काय नाही त्याचं डोकं बधीर झालं होतं..
दिवाकर : काय झालं सायबर टीम... Any move.. देव शी कनेक्ट कसं व्हायचं आता?
तितक्यात सूर्या आणि प्रदीप तिथे आले... डागाला जेल मध्ये टाकल्यानंतर सूर्या आणि प्रदीपला तातडीने कमांडोने दिवाकर कडे पाठवलं...
अभिनंदन सूर्या आणि प्रदीप तुम्ही एक मोठं युद्ध लढला आहात...
सूर्या : धन्यवाद सर!!पण आम्हाला कमांडो ने तुमच्या कुठल्या तरी मदतीसाठी पाठवलं आहे... झुक्याचा उतरलेला चेहरा पाहून सूर्या म्हणाला झुक्या!!काय झालं रे?
दिवाकर : सूर्या मी सगळं थोडक्यात सांगतो.. असं म्हणून देव कसा किडनॅप झाला आणि आता तो त्यांच्या तावडीत आहे इथपर्यंत सगळं ok पण आता मात्र देव ला लवकरात लवकर सोडवायला हवं.. पण त्याचं लोकेशन ट्रॅक होत नाहीये...
सूर्या : इतकंच ना... आपण डागा ची कुंडली काढली तेव्हा त्याचं मुख्य ठिकाण आपल्याला कळालं असेलच की जिथून त्याचे काळे धंदे चालतात ते...
झुक्या : अरे हो... हे माझ्या डोक्यातच नाही आलं... झालं झालं लोकेशन match झालं... वा सूर्या बॉस थँक्स....
दिवाकर : सूर्या!! हे लोकेशन तर मला भारतातलच दिसत आहे.. मग भारता बाहेर 🤔 पण एकंदर बरं झालं भारताबाहेर आपल्याला काहीच शक्य नव्हतं..
सूर्या : हो.. पण देव ला भारताबाहेर नेणं ते पण सहजासहजी तितकं शक्य झालं नसतं...
दिवाकर : हं..ते ही बरोबर आहे म्हणा...
तितक्यात अन्विता धावत तिथे आली...
दिवाकर : अन्विता!!तू इथे?
अन्विता : बाबा!!.. मी परत हे काय ऐकतेय... देव कुठे आहे ...
दिवाकर काही बोलणार इतक्यात सूर्या म्हणाला... सर!!मी येतो...
दिवाकर : हो, अन देव ला सोडवलं की उत्तरेकडून येऊ नका बरं का... तिथल्या चुंबकीय शक्ती मुळे गॅझेट वर उलट परिणाम होईल आणि निकामी होईल..
सूर्या: सर!! पण हे अंतर तर खूप दिसतंय इथे जायचं कसं...
दिवाकर : कमांडो आणि टीम पण तुमच्या सोबत राहणार आहे... त्यांचं एक हेलिकॉप्टर तुम्हाला घेऊन जाईल... आपल्या या लॅब च्या बाजूला एक हेलिपॅड आहे तिथे जावं लागेल..आणि त्यांची टीम एका प्रायव्हेट विमानाने निघाली सुद्धा
अन्विता :बाबा!!काय हो हे...
दिवाकर : बेटा मी तुला नंतर सांगतो... पण आता तो लवकर भेटावा इतकंच.....
अन्विता : बाबा!!मला मिस्टर ब्लॅक ने कल्पना दिलेली आहे...
सूर्या प्लिज माझ्या देव ला सोडवून आन...
सूर्या : अन्विता!!नको काळजी करूस.. तुझा भाऊ शूर आहे... मला त्याला सोडवायला जास्त मेहनत लागणार नाही...
अन्विता : तू जा पण जरा काळजीपूर्वक...आता आपल्यावर कुठलंही संकट नको आहे...
अन्विताचं ते वाक्य ऐकताच सूर्याच्या डोळ्यात चमक आली... त्याने एकदम रोखून तिच्या डोळ्यात बघितलं...अन्विताची नजर जास्त वेळ सूर्याच्या नजरेला नजर देऊ शकली नाही... लाजून आणि टेन्शनने तिने तिची मान एकदम खाली केली...
सूर्या : असं होय... मग आता तर मला पण माझी काळजी घ्यावी लागेल तर दिवाकरच्या नकळत सूर्याने अन्विताकडे रोखून बघितले आणि म्हणाला...
आणि लागलीच सूर्या मोहिमेवर निघाला...पण या वेळेस त्याच्या डोळ्यात एक चमक होती.. अन्विता आता त्याला त्याची वाटत होती...
देवाच्या लोकेशन वर सूर्या पोहोचला.. तो पर्यंत 35 तास होऊन गेले होते... आजूबाजूला कडेकोट बंदोवस्त होता.. आत जायचं कसं एंट्रन्स दिसत नव्हता... कमांडो च्या माणसांनी घेराव घातलेला होता...
सूर्याला एक दरवाजा दिसला... तो दरवाजा नक्कीच एंट्रन्स असेल असा विचार करत सूर्या ने त्याचं पिस्तूल काढलं सोबत प्रदीप होताच.. तो दरवाजा कडे जाणार इतक्यात सूर्याच्या फोन ची रिंग वाजली...तसा त्याचा फोन व्हायब्रेट मोड वर होता त्याने लागलीच त्याच्या कानाचं ब्लुटूथ चं बटन दाबलं... फोन दिवाकरचा होता...
दिवाकर : सूर्या!! थांब आणि टीम ला देखील थांबव... कुठलीही action घेऊ नका.. तुम्ही पोहोचले ते लोकेशन एकदम करेक्ट आहे... झुक्या आणि देवाचं गॅझेट वर communication झालं आहे... पण तुम्हाला जो दरवाजा दिसेल तो दरवाजा नसून भूलभुलैया आहे.. आणि नुसतंच भूल भुलैया नाही तर त्यांच्या sicurity सिस्टिम चा एक भाग आहे... लागलीच त्याची बिप वाजेल आणि तुमचा डाव कोलमडून पडेल... त्या पेक्षा... तिथूनच अर्धा किलोमीटर मागच्या दिशेने चालत जा... अगदी तुम्ही सर्वच... तिथे घेरावा साठी चार माणसे बस होतील.. पण अर्ध्या किलोमीटर दुरवर एक भुयारी मार्ग आहे तिथून डागा सुद्धा एंट्री करतो.... त्याची वेगळी बिप तिथे वाजेल.. सुरक्षा दरवाजा काही क्षणासाठीच उघडेल... त्या क्षणात तुझ्या सोबत सगळीच टीम आत गेली पाहिजे...
सूर्या : ok सर!!असं म्हणून सूर्या ने कमांडो ला दिवाकर ने दिलेला प्लॅन समजावून सांगितला..
देव आणि माँटी मुळे ही सगळी माहिती गॅझेटच्या मदतीने दिवाकर पर्यंत पोहोचली होती...
कमांडो : बरं झालं अगदी शेवटच्या क्षणी का होईना आपल्याला हे सगळं कळालं... नाहीतर एक युद्ध व्हायला वेळ लागला नसता...
कमांडो ने त्याच्या टीम ला आदेश दिले आणि अगदी बोटावर मोजण्या इतके कर्मचारी मुख्य दरवाजा समोर थांबले..
सूर्या आणि टीम आता भुयारी मार्गाच्या गेट जवळ थांबले... सेन्सरने तिथला गेट उघडला गेला... त्या गेट मधून एकावेळी फक्त चार लोकं जाऊ शकत होते...दरवाजा बंद न होऊ देता एका मागे एक सारे घुसले खरे...
पण वॉर्निंग बजर बराच वेळ वाजत राहिला...
त्या मुळे emurgancy टीम च्या मनात शंकेची पाल चुकचुकली...
सगळेच एकदम अलर्ट मोड मध्ये गेले...
त्यांच्या म्होरक्याने देव कडे जाऊन बघितले... देव व्यवस्थित होता... त्याच्या सोबत माँटी देखील होता...त्या मुळे क्षणापुरता तो म्होरक्या गाफिल झाला आणि आता emurgancy टीम ला काही आदेश देणार इतक्यात कमांडोच्या लोकांनी त्या टीम वर हल्ला चढवला काही कळायच्या आत कमांडो ने त्यांच्या म्होरक्या ला पकडलं... सूर्या लागलीच मॉन्टी कडे धावला.... तो आपला माणूस आहे.. त्याला नका मारू प्लिज अशी विनवणी देव ने सूर्या ला केली... उगारलेला हात मागे घेत सूर्या कमांडो जवळ गेला...
माँटी ये तुने अच्छा नही किया.... डागा को अगर पता चला तो वो तुझे नही छोडेगा...लालबुंद होऊन म्होरक्या म्हणाला..
सूर्या : माँटी तुम्हारा कोई कुछ नही बिघाडेगा.. डागा अब हमारे कब्जे मे है...
सूर्याचं ते म्हणणं ऐकल्यावर म्होरक्या ने देखील उरला सुरला प्रतिकार करणं सोडून दिलं...
कमांडो : ये देखो अगर आप सब लोग चुपचाप मेरे साथ आते हो तो मै प्रॉमिस करता हू की आप लोगो को कम से कम सजा होगी... और कोई प्रतिरोध करता है तो ये याद रखे की डागा हमारे कब्जे मे आ चुका है |
म्होरक्या : कुछ भी... हम कैसे मान ले की डागा आपके कब्जे मे है | तितक्यात 48 तास पूर्ण झाले आणि तिथे असलेली अलर्ट ची बिप वाजली... म्होरक्याला आता हे लक्षात आलं की हे कमांडो वगैरे म्हणत आहेत ते खरं आहे...
सूर्या : ए तू कोण तू... हे बघ... तू मानलं नाही मानलं तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही समजलं ना... तुझ्या कडे ते मान्य करण्याशिवाय ऑपशन नाही... शिवाय आता तुमचे सगळेच गुंड आमच्या ताब्यात आहेत.. तर आता चुपचाप सोबत चला...
आता काहीच पर्याय उरला नाही म्हणून तो म्होरक्या शांत झाला... सर्वांना जेल मध्ये नेण्यात आलं... माँटी सुटला... काहीही गुन्हा परत न करण्याच्या शर्तीवर...
डागा ला चौदा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली...
बाकी लोकांना ही छोटया मोठया शिक्षा झाल्या... त्यात मिस्टर ब्लॅक ला सरंडर झाल्याने कमीच शिक्षा झाली...सगळीकडे आता मोकळे वातावरण झाले... मुळावरच घाव घातल्याने आता ड्रॅग्ज चे रॅकेट देखील उध्वस्त झाल्यात जमा होते...
दिवाकर ने आणि मिस्टर ब्लॅक ने अन्विता साठी सूर्या ला मागणी घातली...
तर गायत्रीच्या वडिलांना दिवाकर ने झुक्यासाठी सुचवले...
गायत्री च्या वडिलांनी गायत्री च्या सुखासाठी तिचा पुनर्विवाह झुक्यासोबत करून देण्याचं मान्य केलं...
पण झुक्याचे आईवडील त्याला असं करून देण्यास तयार नव्हते...नेहमीप्रमाणेच झुक्याने आपण कसे सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत आणि गायत्री किती आवडते हे पटवून देण्यात तो यशस्वी झाला....
मिस्टर ब्लॅक ने थाटामाटात अन्वीताचं लग्न तिचं इंजिनीरिंग पूर्ण झाल्यावर सूर्या शी लाऊन दिलं...
गायत्री चं तिच्या वडिलांनी मोहित उर्फ झुक्यासोबत लग्न लाऊन दिलं...
सगळीकडे आनंदोत्सव साजरे झाले... झुक्या ला सायबर तज्ञ म्हणून विशेष ट्रेनिंग मिळाली तर सूर्याला मिस्टर ब्लॅक ने त्याची सगळी प्रॉपर्टी सूर्याच्या नावे केली.. सूर्या आणि अन्विताने तीच प्रॉपर्टी जनतेच्या कल्याणासाठी वापरली... त्या मध्ये त्यांनी व्यसनमुक्ती केंद्र स्थापन केले...
दिवाकरच्या गॅझेट ला नेहमी प्रमाणे पेटंट मिळाले.... आणि त्याला दुसऱ्या मिशन साठी नवीन गॅझेट तयार करण्याचे आदेश झाले...
समाप्त
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या