डॉक्टर डायरी (केस नंबर 2)

अहो ऐकलं का?
आपल्या वेदांत च्या लग्नाच्या पागोट्याच्या कार्यक्रमासाठी तुमचे ते चुलत चुलत भाऊ आहेत ना..
डॉ वेदपाठक त्यांना पण बोलवा....
 ते कसं आहे ना कार्यक्रमात जरा प्रतिष्ठित व्यक्ती असलं म्हणजे बरं...
जरा मानी असल्यासारखं वाटतं....
 मिसेस देशमुख मिस्टर देशमुखांना बैठकीसाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या लिस्ट साठी सांगत होत्या....
 डॉक्टर वेदपाठकला पागोट्यासाठी बोलावलं गेलं... व त्यांच्या व इतर पाहुण्यांच्या साक्षीने वेदांत आणि संगीताचे लग्न ठरले....

लग्न झाले व जो तो आपल्या ठिकाणी कामाला लागले....

डॉ वेदपाठक हे सरकारी रुग्णालयात क्लास वन वैद्यकीय अधिकारी म्हणून होते.....

असंच एका मध्यरात्री डॉक्टरांना मिसेस देशमुख चा फोन आला...

त्या घाबऱ्या घुबऱ्या होऊन डॉ वेदपाठक यांना फोन वर बोलत होत्या

सर माझ्या सुनेने जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे....

डॉ वेदपाठक : तुम्ही तिला लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा... ही पोलीस केस आहे रीतसर पोलीस केस होईल...
तिच्या उपचारासाठी काहीही मदत लागली तर मी हजर होतो...

डॉक्टरांनी फोन ठेवला व ड्युटी डॉक्टर ला देशमुख पेशंट विषयी पूर्ण सूचना दिल्या... व घाई गरबडीत तयार होऊन डॉक्टर हॉस्पिटल ला गेले...

पेशंट हॉस्पिटल मध्ये पोहोचला होता... डॉक्टरांनी त्याला तपासलं.... Sir its 70 percent deep burn...

डॉ वेदपाठक : ok पेशन्ट ला iv लावून burn वॉर्ड मध्ये शिफ्ट करा... जितकं लवकर iv लागेल तितकं लवकर चांगलं...

ड्युटी डॉक्टर : sir iv लावायच्या ठिकाणी सगळीकडे burn झालेलं दिसत आहे...

डॉ वेदपाठक : थांब मी venesection करतो... (Venesection म्हणजे की  छोटयाश्या शस्त्रक्रियेने शीर कट करून सलाईन देण्यासाठी मार्ग तयार करतात )

डॉक्टरांनी वेळ न दवडता venesection करून तिला सलाईन लावले व बर्न वॉर्ड मध्ये शिफ्ट केले...
व तिच्यावर पुढील उपचार सुरू झाले...

पण ऑलरेडी ती 70 percent बर्न होती ती पण deep... ती नंतर डिटोरीएट होत गेली आणि मरण पावली...

ती मरण पावल्या नंतर मुलीच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर मुलीला जाळून मारली म्हणून केस केली आणि ती मुलगी जिवंत राहू नये म्हणून डॉक्टरांनी देखील मदत केली....इतकंच नव्हे तर डॉक्टरांनी सलाईन मध्ये विष टाकलं होतं.... असा आरोप डॉक्टरांवर झाला....

शेवटी त्या डॉक्टरला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी भूमिगत राहावं लागलं....अचानक ते गाव सोडून चोरासारखं लपावं लागलं...

पोलिसांनी सगळ्या प्रकरणाचा छडा लावला... मुलीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले....डॉक्टर निर्दोष साबीत झाले... पण तुम्ही सांगा आता यात काय चुकलं डॉक्टरचं??

समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे असं म्हणतात म्हणून?
की कुणाचे नातेवाईक असल्यामुळे?
की एक जबाबदार डॉक्टर म्हणून वेळेवर उपचार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे...??

©®डॉ सुजाता कुटे
©®swanubhavsaptarang 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या